* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARATHESHAHITEEL MANSWINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663891
  • Edition : 3
  • Publishing Year : 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THROUGH THIS BOOK, DR. DESHPANDE HAS TRIED TO BRING IN LIGHT SOME OF THE GREAT, CAPABLE AND COMPETENT WOMEN FROM THE `MARATHESHAHI`. HE HAS RESEARCHED THE OLD HISTORICAL DOCUMENTS MAINLY THE LETTERS WRITTEN THEN; TO CAST A LIGHT ON THE TRUTH. ALL THESE LADIES HOLD A GREAT POSITION IN THE MINDS OF THE `MARATHAS` YET EACH HAD TO FACE THE WORST TURNS OF DESTINY. THROUGH THE DRASTIC SITUATIONS THEIR SKILLS WERE TESTED. THEIR PATIENCE, THEIR TOLERANCE LEVEL, THEIR PRESENCE OF MIND, AND THEIR DETERMINATION TO TACKLE THE WORST SITUATIONS WERE TESTED. THE AUTHOR HAS DESCRIBED THIS IN A VERY SIMPLE LANGUAGE. HE HAS GIVEN APPROPRIATE HISTORICAL PRECEDENTS WHILE BRINGING THESE LADIES INTO LIMELIGHT. THE POST `PESHWAI` PERIOD HAS ALWAYS SKETCHED LADIES LIKE MASTANI AND ANANDIBAI AS VAMPS, BUT THE THEN CORRESPONDENCE REVEALS THE FACT THAT THESE TWO LADIES ARE NOT TREATED PROPERLY BY THE HISTORIANS. FOR THE FIRST TIME, THROUGH THIS BOOK, WE COME TO KNOW ABOUT THE PROUD REGIME OF JIJABAI OF KARVEER WHILE TRYING HER BEST TO PRESERVE THE KOLHAPUR SANSTHAN. HARDLY, ANYONE HAS EVER WRITTEN IN DETAIL ABOUT HER TILL TODAY. THIS BOOK ALSO REVEALS SOME NEW ASPECTS OF THE NATURE OF THE GREAT LADIES LIKE JIJABAI, THE MOTHER OF SHIVAJI; MAHARANI YESUBAI; AND MAHARANI TARABAI. THIS BOOK WILL SURELY ADD TO THE KNOWLEDGE OF HISTORY LOVERS AND STUDENTS OF HISTORY.
मराठेशाहीतील काही निवडक कर्तबगार-कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय डॉ. सुरेश देशपांडे यांनी अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. या सर्व स्त्रियांबद्दल मराठा मंडळात मोठा पूज्यभाव होता; तथापि राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने प्रत्येकीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची त्यांची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते. डॉ. सु. र. देशपांडे यांनी अतिशय सोप्या, साध्या व ओघवत्या भाषाशैलीत, ऐतिहासिक दाखले देत ही जीवनचरित्रे शब्दबद्ध केली आहेत. उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी-आनंदीबार्इंसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले; मात्र तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुरावा पाहता, या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवते. याचा परामर्श लेखकाने तत्कालीन ऐतिहासिक दाखले देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करवीरच्या जिजाबार्इंची स्वाभिमानी कारकीर्द आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या संरक्षण-संवर्धनासाठी केलेली खटपट प्रस्तुत पुस्तकात प्रथमच सविस्तर आली आहे. यापूर्वी एखादा अपवाद वगळता या महाराणीवर स्वतंत्ररीत्या कुणी फारसे लिहिले नाही. तसेच शिवमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई या शिवकालाशी निगडित असलेल्या स्त्रियांविषयी काही नवीन माहिती उजेडात आली आहे. तिचा डॉ. देशपांडे यांनी परामर्श घेतला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी व इतिहास विषयाच्या विद्यार्थी वर्गाला आणि अभ्यासकांना हा ग्रंथ खचितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #डॉ.एस.आर.देशपांडे #DR.S.R. DESHPANDE #मराठेशाहीतील मनस्विनी #MARATHESHAHITEEL MANSWINI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-01-2004

    इतिहासातील स्त्रियांचे अज्ञात पैलू… आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिकाधिक बंधमुक्त होत चालली आहे. अधिक स्वतंत्र, अधिक धीट, अधिक ्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणाऱ्या आजच्या स्त्रीचे धडाडीचे व्यक्तिमत्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या शूर आणि कर्तृत्वान स्त्रिया अगदी तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे मध्ययुगीन कालखंडातही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या कर्तृत्ववान स्त्रिया इतिहास शिकताना आपल्याला जरूर भेटल्या. त्यातल्या काही तपशीलवारपणे समोर आल्या, तर काही केवळ ओझरत्या दिसल्या. या स्त्रिया कर्तबगार असल्यामुळे अर्थातच इतिहासप्रसिद्ध होत्या. मात्र, त्यांच्या विस्ताराने परिचय किंवा त्यांचे जीवनचरित्र आपल्या वाचनात फारसे न आल्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेले प्रवादच आपल्या अधिक स्मरणात राहतात. राजघरण्यातील किंवा श्रीमंत कुटुंबातील स्त्रिया, नाजूक, ऐतखाऊ, परावलंबी असतात, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. मात्र मराठेशाहीतील काही लोकोत्तर स्त्रिया आपल्या वैध हक्कांसाठी, सत्तेसाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्वराज्यासाठी, वारशांसाठी संघर्ष करताना, जिवाची बाजी लावताना किंवा प्रसंगी राजकीय कटकारस्थानेही करताना दिसतात. अशा अनेक स्त्रिया मराठेशाहीत होऊन गेल्या. त्यापैकी शिवमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, महाराणी जिजाबाई (करवीर), मस्तानी, गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा नऊ मनस्विनी स्त्रियांचे जीवनचरित्र डॉ. सुरेश र. देशपांडे यांनी ‘मराठीशाहीतील मनस्विनी’ या पुस्तकाद्वारे वाचकांपुढे मांडले आहे. मराठेशाहीतील अस्सल ऐतिहासिक साधनांचा विशेषत: तत्कालीन पत्रांचा धांडोळा घेऊन या स्त्रियांचा परिचय करून देण्यात आला असल्यामुळे त्यांच्याविषयी काही नवी माहितीही आपल्याला या पुस्तकातून मिळते. राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानाही त्यांच्या जीवनात आलेल्या काही खडतर प्रसंगामध्ये या मनस्विनीची सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधानता, नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द आणि महत्त्वाकांक्षा या जीवनचरित्रातून पाहावयास मिळते. जानेवारी १६६४ मध्ये शहाजीराजांचे अपघाती निधन झाल्यावर जिजाबार्इंनी सती जाण्याचा दृढनिश्चय केला. धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या समाजात वाढलेल्या जिजाबार्इंनी स्वराज्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सती जाण्याचा निश्चय सोडून देण्याचा धडाडीचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर औरंगजेबाने बाटविलेल्या बजाजी निंबाळकरांना पुन्हा धर्मदीक्षा देवविली. यामुळे ब्राह्मणांनी मोठा गहजब केला. त्याकडे साफ दुर्लक्ष करून बजाजीच्या मुलाशी आपल्या नातीची सोयरिक घडवून आणखी एक प्रागतिक पाऊन टाकले. ही घटना सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐन वैभवकाळात वीरस्नुषा म्हणून भोसले घराण्यात प्रविष्ट झालेली, महाराणी होऊनही ऐन उमेदीची हयात काबाडकष्टांत, पारतंत्र्यात, तुरुंगात व्यतीत करणारी, खडतर जीवनाला सामोरी जाऊन राजकीय संक्रमणाच्या अवस्थेत आपल्या पराक्रमी, पण तापट स्वभावाच्या पतीमागे छायेप्रमाणे एकदिलाने उभी राहिलेली आणि आप्तस्वकियांचा रोष सांभाळून आपल्या परीने चोख राज्यव्यवहार करणारी महाराणी येसूबाई या पुस्तकात आपल्याला भेटते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या मराठी घराण्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा अथक प्रयत्न करणारी महाराणी ताराबाई आजच्या राजकाराणात सहभागी झालेल्या महिलांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे. युद्धक्षेत्र असो वा राज्यकारभार - या दोन्हीवर ताराबार्इंनी जबरदस्त पकड बसविली होती. शक्य तितका किल्ला लढवून मनुष्यहानी टाळायची. शिबंदी संपत आली की वाटाघाटी सुरू करून शत्रूला गुंतवून ठेवायचे आणि वेळ आलीच तर भरपूर पैसे घेऊन नंतरच किल्ला शत्रूच्या स्वाधीन करायचा... किल्ला जिंकल्याचा आनंदशत्रूला उपभोगू द्यायचा नाही, असे ताराबार्इंचे धोरण होते. हंबीरराव मोहिते या सेनापतीची ही कन्या; पण विवाहनंतर तिच्या पदरी नजरकैदच आली. नवऱ्याचा सहवास जेमतेम सात-आठ वर्षे लाभलेल्या या महाराणीने जिद्द, जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर औरंगजेबासारख्या बलाड्य शत्रूला सळो की पळा करून सोडले. नानासाहेब पेशव्यांच्या निधनाची वार्ता ऐकून ‘माझा सूड मी उगवला, आता मी सुखाने मरेन’, असा आसुरी आनंद व्यक्त करणाऱ्या ताराबाई यांनी आपल्या मरणापूर्वी पेशवार्इंची वस्त्रे थोरल्या माधवरावांस दिली. हे लक्षणीय आहे. ताराबार्इंप्रमाणेच त्यांची सावत्र सून करवीरची महाराणी जिजाबार्इंनेही कोल्हापूरच्या संस्थानाचा विकास, विस्तार करताना संस्थानाचे हित जपून, एकाच वेळी बलवान पेशव्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवून छत्रपती शाहूमहाराजांशी जवळीक साधली व कोल्हापूरच्या गादीचे रक्षण केले. जिजाबाई मुत्सद्देगिरीत चलाख होत्याच. पण रणनीतीतही वाकबगार होत्या. राज्यकारभारातही त्यांचे बारीक लक्ष असे. देवदर्शनसाठी निघालेल्या जिजाबार्इंनी आपल्या गैरहजेरीत भगवंतराव अमात्य यांना करवीर नगरीची व्यवस्था पाहण्याची आज्ञा दिली. भगवंतरावांनी नकार देताच या स्वाभिमानी महाराणीने ‘आपण हे काम न केल्याने फार मोठी अडचण होईल असे समजू नये. हे काम सामान्य कुणबिणींकडूनसुद्धा चालविता येईल,’ असे भगवंतरावांना कळवून गंगू. रंगू, भागू, नागू आणि लिंगू या पाच सुज्ञ कुणबिणींकडून हे काम करवून घेतले. आज विविध क्षेत्रांत अधिकारपदावर असलेल्या महिलांसाठी ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे. उत्तर पेशवाईतील बखरकारांनी मस्तानी आणि आनंदीबाईसारख्या स्त्रियांना खलनायिका बनविले. मात्र, तत्कालीन अस्सल पत्रव्यवहार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या स्त्रियांवर इतिहासकारांनी अन्याय केल्याचे जाणवल्याचे त्याचा परामर्श ‘मनस्वीनी’त घेण्यात आलेला आहे. आनंदीबार्इंना त्यांच्या जीवनात सुयोग्य जोडीदार लाभला असता तर पेशव्यांच्या कुळात या शहाण्या व धूर्त स्त्रीने एक देशाभिमानी, कर्तबगार स्त्री म्हणून मान्यता मिळविली असते, असे लेखकाचे म्हणणे आहे. पेशव्यांच्या स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या गोपिकाबाई महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी होत्या. रघुनाथरावांनाही त्यांनी प्रायश्चित घेतल्यानंतरच भेट दिली. राजकारण, धूर्तपणा, माणसांची पारख आणि निर्भीडपणा याबाबतीत या तत्कालीन सरदार, कारभाऱ्यांपेक्षा काकणभर सरसच होत्या. आपल्या सेवकवर्गावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. देशी औषधांची, वनस्वतींची त्यांना चांगली जाण होती. कित्येकांना त्या औषधोपचारासाठी आपल्या वाड्यात ठेवून घेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद दुर्लक्षित करण्यासारखी निश्चितच नाही. भारतभरची अवघी प्रजा पोटच्या लेकराप्रमाणे मानून, जनांच्या हालअपेष्टा वर्तमानी गोळा करून, त्यांच्या कष्टदशेचे निवारण व्हावे यासाठी अनेकविध उपाययोजना आखणाऱ्या अतिशय कर्तबगार अशा अहिल्याबाई होळकर आणि तळपती समशेर घेऊन रणांगणावर शत्रूच्या सैन्यावर झेप घेणारी आणि स्वदेहाचा धारातीर्थी बळी देऊन पुढच्या पिढीची संतती, संपत्ती सुरक्षित करणारी झाशीची राणी काही नवीन पैलूंसह या पुस्तकात आपल्यासमोर येते. राजघराण्यातील या तथाकथित अशिक्षित स्त्रिया बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने आजच्या आधुनिक स्त्रीच्याही चार पावले पुढेच होत्या याचा प्रत्यय येतो. त्या प्रतिगाती कालखंडातह या स्त्रियांचे विचार काही प्रसंगी कमालीचे पुरोगामी कसे होते, हे समजून घेण्यासाठी आजच्या आधुनिक स्त्रीवादी वर्गाने हा ग्रंथ जरूर अभ्यासला पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more

JAMILCHYA SAHASKATHA
JAMILCHYA SAHASKATHA by MOHAMMED UMAR Rating Star
Pradnya Aher

Very interesting story especially for children and youngsters too. Translated well. If you take your children back to books from mobile. These kinds of books are must read