* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613526
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"1. GAULAN: DR. VASANT S. JOSHI DR. VASANT S. JOSHI IS ONE OF THE MOST EMINENT SCHOLARS AND WRITERS IN THE FIELD OF ANCIENT MARATHI LITERATURE. A FEW AREAS OF HIS INTEREST ARE MAHANUBHAV SAINTS AND THEIR LITERATURE, GREAT POETS AND PERSONALITIES LIKE DNYANESHWAR AND EKNATH WHO MASTERED THE BHAGWAT, MUKTESHWARA WHO MASTERED IN POETRY RELATED TO ARTS, ETC. DR. JOSHI HAS A KEEN INTEREST IN MARATHI CULTURE AND MARATHI AS A LANGUAGE. ‘GAULAN’ HAS BEEN POPULARISED BY FORMER MARATHI POETS. IT IS A LOVE SONG LINED WITH SPIRITUALITY. GAULAN HAD BEEN A PROFOUND STYLE OF POETRY AND HAD A PROMINENT PLACE IN THE OLD MARATHI LITERATURE. DR. JOSHI HAS MINUTELY REVIEWED GAULAN IN HIS BOOK. HE BRINGS IT TO OUR NOTICE THAT GAULAN PORTRAYS RADHA’S LOVE TOWARDS KRISHNA. HE ALSO ANALYSES RADHA AS A CONCEPT. HE STRETCHES HIS RESEARCH FROM DNYANESHWAR TO NILOBARAYA; FOLLOWERS OF BHAGWAT SECT. "
"प्रा. डॉ. वसंत स. जोशी हे प्राचीन मराठी साहित्याच्या अभ्यासकांच्या परिचयाचे आजचे एक प्रमुख नाव. महानुभाव संत आणि साहित्य, ज्ञानेश्‍वर-एकनाथासारखे भागवत कवी, मुक्तेश्‍वरासारखा कलाकवी याप्रमाणेच मराठी संस्कृती आणि मराठी भाषआ ही डॉ. जोशींच्या वैचारिक कुतूहलाची खास क्षेत्रे. ’गौळण’ हे वास्तविक प्राचीन मराठी कवींनी लोकप्रिय केलेले खास असे पारमार्थिक नाट्य-प्रेम-गीत. त्याला जुन्या साहित्यात जवळ जवळ स्वतंत्र काव्यप्रकाराची प्रतिष्ठा प्राप्त झालेली प्रस्तुत ग्रंथात डॉ. जोशींनी ’गौळणीं’चा शोध घेतलेला आहे. ’गौळणी’तून आविष्कृत होते ते राधेचे कृष्णविषयक प्रेम इतकेच सांगून डॉ. जोशी थांबत नाहीत. त्यांची शोधयात्रा एका बाजूला राधा या संकल्पनेचीच छाननी करते तर दुसर्‍या बाजूला ज्ञानेश्‍वरापासून निळोबारायापर्यंतच्या भागवत कवींच्या ’गौळणी’चे व्यक्तिविशिष्टत्व स्पष्ट करते. या भागवत संप्रदाय बरोबरच लोकगीते, पंडिती कविता, शाहीर, संतकवयित्री यांनी साधलेल्या ’गौळणीं’च्या साहित्यरूपाची चिकित्साही डॉ. जोशींच्या या शोधयात्रेत समाविष्ट होताना दिसते. डोळस व्यासंग, चिकित्सक विचार दृष्टी, समतोल बैठक, अनाठाही विवेचनशैली, सांप्रदायिकतेपेक्षा रसिकतेवर भर आणि मुख्य म्हणजे निरलंकृत-पण ओघवती व परिणामठााही भाषा हे सहजपणे जाणवणारे या शोधयात्रेचे काही विशेष... डॉ. अरविंद वामन कुलकर्णी "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MARATHI GAULAN#VASANT JOSHI#मराठी गौळण# डॉ. वसंत जोशी# संतसाहित्य# वाङ्मयप्रकार# राधा-कृष्ण भक्ती# ज्ञानदेव# नामदेव# भानुदास# एकनाथ# तुकाराम# होनाजी बाळा# निळोबा# पठ्ठे बापूराव# परशराम आणि इतर# स्फुटकाव्य# गोपी# यशोदा# नंद...
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more