* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989489
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 260.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER A BATTLE OF 1962 MASVI MADE A LOADER FOR ARMY TO LOAD OR RELOAD THE LUGGAGE . ON THAT DAY SUBBU HUG ME AND CRIED .IT WAS A TEARS OF HAPPINESS. I ASKED HIM TO WHAT HAPPENED .HE SAID.” I SAW MANY SOLDIERS DIED IN BATTLE JUST BECAUSE LACK OF MATERIAL AND FOOD. NOW IT WILL NEVER HAPPEN AGAIN.’’
१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू होते. मी त्याला इतके काय झाले म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ‘बॉर्डरवर सामान नाही, दारूगोळा नाही; रसद नाही म्हणून मृत्युमुखी पडलेले अनेक शहीद जवान पाहिलेत. आता तसे होणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MASVIKANHERE #MASVIKANHERE #मॅस्वीकान्हेरे #BIOGRAPHY #MARATHI #ANANDKANHERE "
Customer Reviews
  • Rating StarSAHITYA SUCHI, APRIL 2016

    एका कल्पक उद्योजकाच्या जिद्दी वाटचालीची कहाणी… ‘मॅस्वी आणि कंपनी प्रा. लि.’ या १९४३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे मालक शारंगधर पुरुषोत्तम कान्हेरे यांचे हे छोटेखानी चरित्र.हे चरित्र आनंद कान्हेरे या त्यांच्या मुलानेच लिहिलं आहे. उत्तम आर्थिक परिस्थित असल्याने शारंगधर कान्हेरे यांनी त्या काळात परदेशात, मँचेस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस्सी. टेक केलं आणि त्यानंतर बर्मिंगहॅम इथल्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. या काळात युरोपातही दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. कंपनीतलं उत्कृष्ट काम करून कान्हेरे राष्ट्रभक्ती आणि घरातील जबाबदारीची जाण ठेवत भारतात परतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात पाच जणांनी केली आणि त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांनी मॅस्वी हे नाव दिले. सुरुवातीच्या काळात मॅस्वीने मुख्यत्वे पंपसेट, मोठ्या इलेक्ट्रिकल मोटारी व स्वीचगिअरची विक्री केली. हा व्यवसाय मुख्यत्वे एजन्सीजच होता. त्याची वाढ होत असली तरी कान्हेरेंच्या शिक्षणाचा, अनुभवाचा कस लावणारा नव्हता. त्यामुळे कान्हेरेंनी ‘भारत मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. या उद्योगाने सुरुवातीला शेगड्या, इस्त्री अशा विद्युत्चलित गोष्टी बनवायला सुरुवात केली. आईसफ्रूट बनवणे, प्लेटिंग करणे अशी कामे सुरू केली. मात्र दोन्ही कामांचा ताण आल्याने त्यांनी ‘भारत इलेक्ट्रिकल’ची जबाबदारी दुसरीकडे सोपवली. पुढे मॅस्वीचा विस्तार करत त्यांनी त्याची शाखा कोल्हापूरलाही सुरू केली. कंपनीकडे पुढे एअर इंडियाने काही वस्तू बनवण्यासाठी विचारणा केली आणि १९५३ मध्ये मॅस्वीत वस्तुंचीही निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला सामान ठेवण्यासाठी रॅक्स आणि लोखंडी स्कॅफोल्डिंग बनवले आणि पुढे विमानाच्या दाराशी जाईल अशी शिडी बनवण्यात येऊ लागली. असंख्य कसोट्यांना पार करत ही शिडी एअर इंडियाला योग्य वाटली आणि हीच या कंपनीसाठी यशाची शिडी ठरली. पुस्तकाचे चरित्र लेखकही अभियंते असल्याने या शिडीचे तांत्रिक बारकावेही तयांनी कुशलतेने लिहिले आहेत. मॅस्वी उद्योगाने यानंतर पुण्यात स्वतंत्र कारखाना उभा केला. या कारखान्यात केवळ विमानांसाठी शिड्याच नव्हे तर अनेक उत्पादने घेतली जाऊ लागली. जुन्या उत्पादनातही त्यांनी कल्पक सुधारणा केल्या. लेखकांनी हा भाग तांत्रिक तपशील अन् आकृत्या देत अतिशय स्पष्ट लिहिला आहे. पुढे एअर इंडियासाठी टायर ट्रान्सपोर्ट डॉली, पॅरॅफिन एअरक्लिनिंग इक्विपमेंट बॅगेज ट्रॉली अशी अनेक उत्पादनं बनवली आणि विमानतळावर लागणाऱ्या वस्तुंचे कान्हेरे प्रमुख उत्पादक बनले, एवढेच नव्हे तर देशात आयात होणाऱ्या या वस्तूंचे उत्पादन भारतातच झाल्याने देशाचे लक्षावधी डॉलरचे परकीय चलन वाचवले. एअर इंडियाच्या ‘इंजिन इन्स्ट्रॉलेशन अ‍ॅन्ड रिमूव्हल स्टॅन्ड’ या उत्पादनासाठी कान्हेरेंना १९७३ साली राष्ट्रपती पदकही मिळाले. पुढे १९७१ नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात मात्र मॅस्वीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अगदी दिवाळखोरीलाही सामोरे जावे लागले. या सगळ्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या कान्हेरेंनी अतिशय ठामपणे निश्चयाने आपला लढा सुरू ठेवला आणि देणेकऱ्यांचे पैसे देण्यात यशही मिळवलं. मॅस्वीची ही वाटचाल लेखकाने अतिशय बारकाईने लिहिली आहे. विशेषत: त्यातला तांत्रिक भाग सखोलतेनं लिहिला आहे. अतिशय सुसंस्कृत प्रयोगशील माणसानं कष्टानं उभा केलेला हा उद्योग यशाची उंचीही गाठतो आणि अपयशाने पूर्णत: खचतो. त्यामुळे ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते, अनुभवाचे धडेही देते. लेखकाने आपल्या पित्याचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची प्रयोगशील वृत्ती अन् हुशारी अत्यंत जवळून अनुभवली असल्याने आशयाची अस्सलता लेखनात उतरली आहेच. व्यवसायाबद्दल, वडिलांबद्दल तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या माणसांविषयी आस्था, आदर अन् त्यांच्या यशापशातलं गुंतणंही पुस्तकात वाचायला मिळतं. एकूणच एका कर्तबगार, संवेदनशील वत्सल माणसानं आपला व्यवसाय, कुटुंबाचा मांडलेला हा लेखाजोखा वाचकांनाही आपलंसं करून घेतो. व्यवसायाचं चरित्र लिहित असताना उत्पादनातल्या तांत्रिक गोष्टी अन् त्यामागचे विचार, अनुभव, उत्पादन अधिकाधिक उत्कृष्ट. बनवण्यासाठी घेतलेला ध्यास परिपूर्णतेनं आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more