* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATIKHALCHI MATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983388
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1965
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV BIRTHDAY OFFER
    ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANAND YADAV HAS A SPECIAL PLACE IN THE MINDS OF MARATHI READERS. HE HAS NOT ONLY MASTERED THE SHORT STORIES BUT ALSO THE NOVELS. WE HAVE OFTEN COME ACROSS HIS SENSITIVE MIND THROUGH MANY OF HIS STORIES. HIS MIND NOTICES THE SMALLEST OR TINIEST FEELINGS IN THE MINDS AROUND. HE GIVES MEANING TO THE NEGLECTED FEELINGS OF THOSE DOWNTRODDEN PEOPLE. WE ALL KNOW THAT THE PLANTS THRIVE IN THE SOIL. BUT ARE WE ALL AWARE OF THE FACT THAT IT DOES NOT THRIVE BECAUSE OF THE OUTERMOST LAYER VISIBLE TO OUR EYES? ON THE CONTRARY, IT IS THE LAYER OF SOIL BENEATH THE OUTERMOST SOIL WHICH IS NOT ONLY HUMID BUT ALSO WARM, THUS BEARING THE BEST SUITABLE CONDITIONS FOR THE PLANT TO ROOT ITSELF WELL. THE STORIES INCLUDED UNDER THIS TITLE HERE ARE ALL RELATED TO THE LIFE OF VILLAGERS. THROUGHOUT, THE WRITING REFLECTS THE URGE THAT THE WRITER HAS FELT FOR THE WARMTH BENEATH THESE OTHERWISE DRYAPPEARING PEOPLE. IT IS THIS URGE IN HIM THAT MAKES HIM SEE BEYOND THE DAYTODAY LIVING AND BEARING OF THE VILLAGERS. HE REVEALS THE UNKNOWN SHADES OF THESE PURE MINDS WHICH MAY OTHERWISE APPEAR TO BE SELFISH. THE STORIES HELP THE READERS TO FIND THE WARMTH AND MOISTURE DEEP WITHIN WHICH INITIATES THE DAWNING OF SUPER SENSITIVENESS. THE RESULT… THIS BOOK ENHANCES US IN RETURN, IN TERMS OF HUMANITY.
ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्सल शैलीतला हा आविष्कार. मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला मातीतल्या गहिऱ्या थरांची ओढ लागली आहे. ही विविध व्यक्तिचित्रे संवेदनाशील मनाने टिपली आहेत. त्यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो... आणि त्यासोबत वाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो. सभोवारच्या माणसांचेही ‘माणूसपण’ त्यांच्या मनाला जाणवू लागते. ती जाणीव मनातल्या मातीत रुजते, बहरते. असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते!

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 02-01-1966

    ग्रामीण वास्तव जीवनाला नकळत झालेला स्पर्श... नाविन्यपूर्ण नावाने प्रकाशित झालेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह ग्रामीण स्वभावचित्रांचे विविध दर्शन घडविणारा आहे. ‘मातीखालची माती ओली आणि उबदार असते... तिच्या उबीतच पिकं जीव धरतात’ आईच्या एका सहज बोलून गेलल्या वाक्यांतून ह्या संग्रहाला वेदनाशील मनाचे अंकुर फुटले आहेत असं भासतं. हातबुडी आलेला शिवा, चव्हाणांचा आबामा, बापू, आक्कू मावशी, गडी, सखाराम, बाबाजी बल्लाळ, फुलाआत्ती, भाडेकरु दत्तू, पोरका दिन्या, तपस्विनी, धोंडबा खादाड्या, खुळा इठू आणि लंगडा गोपा अशा चौदा व्यक्तिरेखांतून दर्शन घेतलंसं वाटतं एका सलंग खेडे गांवाचं - जिथं उंस पिकतो आहे-तितक्याच शिव्याही पिकताहेत, उधळल्या जात आहेत. ग्रामीण जीवनांतील विविध कथा मराठी साहित्यांत चांगल्याच रुजल्या आहेत, ‘खेड्यांत चला’ ह्या ग्रामोद्धाराच्या संदेशापाठोपाठच ग्रामीण कथांना आगळे महत्व आलें. शहरातल्या यांत्रिक जीवनाला कंटाळलेल्या मुळच्या ग्रामीण मनाला मूळ गावच्या व्यक्तिचित्रांचा आठव सुखद गुदगुदल्या करून जाणे स्वाभाविक होतं. भोळ्या-भाबड्या शेतकरी कुटुंबाच्या कथा निसर्गरम्य परिसरांतून डोकावणाऱ्या निर्व्याज आनंदासारख्याच स्वागतार्ह झाल्या, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचा वीट येणे हेसुद्धा निसर्गप्राप्तच आहे. अशापैकी ‘खेड्यावल्ली माणसं’ ही कथा लक्षात रहाण्यासारखी लिहिली गेली. भोळी भाबडी म्हणवून घेणारी ही खेड्यावरची माणसं किती लबाड आणि संधिसाधू असतात ह्याच एक नमुनाच ह्या कथेने पेश केला होता. ग्रामीण कथा लिहिणे याचा एक सांचाच तयार झाल्यासारख्या ग्रामीण कथा पटापट निर्माण होत होत्या - त्यातूनच अनेक नवे नवे साहित्यिक उदयाला आले. ग्रामीण कथानके लिहिण्याची खास स्पेशेलिटी असलेला लेखक - वर्ग वरचेवर लक्षात भरु लागला. श्री. आनंद यादव यांनी ह्या कथासंग्रहांतून असेच एक स्थान अशा लेखकमालिकेत निर्माण केले आहे. जिवंत भाषा, स्वाभाविक वर्णन आणि पुष्कळशा शिव्यांचे हे ग्रामीण जीवन ‘जुनेरा’ चे जुणेर करते. घाटली, निवद असे विविक्षित अस्सल गांवठी शब्द घेऊन साकार होते. गावच्या मळ्यांचे शिवाराचे व वस्तीचें ओझरते दर्शनही वास्तवतेचे नाते सांगून जाते. ग्रामीण जीवनांतील - विशेषत: घाटावरच्या ग्रामीण जीवनांतील - दैनंदिन व्यवहार व काही विशिष्ट मनोवृत्तीच्या स्वभावरेखा ग्रामीण जीवनाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. त्यात नाही ग्रामीण मनाची केवळ तरफदारी किंवा केवळ त्यांच्या मागासल्या स्वार्थी मनाचें कौतुक - ! शब्दाशब्दांतून इथे निर्माण होते आहे - कींव, दारिद्र्यांच्या ह्या जगाबद्दल कणव. येथलं अज्ञान, दारिद्रय, उपासमारीच्या पोटी आलेली अगतिकता, किंवा केवळ कष्ट करायला नको हा वृत्तींनी चटावलेली लाचारता, चोरटी वृत्ती किंवा रामोशीपणा पाहून मन विषण्ण होतं. ग्रामजीवनाची केवळ कौतुकं पहायला सरावलेल्या साहित्याला वास्तव जीवन स्पर्श करून गेल्याचा भास होतो. कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड टापूंतील कुठल्यातरी एका खेड्यांतील ऊसाच्या मळ्याचे, शेतकऱ्याच्या शेतीचे कष्ट ‘दिसाचा गोंडा उगवतीला मोहरत हुता, तवापून तो रातची चांदनी उगवून मिटायच्या वकतगत - आपण आखोदेखा हाल’ प्रमाणे पुन्हा अनुभवत आहोत, अशी भावना कुठल्याही घाटावरच्या व्यक्तीला होईल आणि मग ह्या व्यक्तिचित्र संग्रहांतील प्रत्येक व्यक्तिरेखा परिचयाची वाटू लागले. वऱ्हाड, कोंकण, मराठवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध भूभागाची ग्रामीण वैशिष्टये आपण वाचली, अनुभवली. घाटावरची ग्रामीण चित्रे तर आपण सिनेमांतूनही अनेकदा पाहिली आहेत, पण त्यांतून दृश्य झालेल्या रगेल रंगेल जीवनाहून एक वेगळेच जीवन ह्या कथा संग्रहांतून पहायला सापडते. कष्ट, सुख-दु:खाचा खेळ हा मानवी जीवनाचा नित्याचाच भाग आहे, परंतु त्या सुख-दु:खाच्या विश्वालाही अनेक स्वभाव वैशिष्टयाचे पैलू असतात. प्रत्येक पैलूतून वेगवेगळे सप्तरंगी इंद्रधनुष्य हातांवर उमटतं - प्रकाशाचा किरण साधून मनाला हंसवतं - खुलवतं ! श्री. आनंद यादव ह्यांनी अशाच एका इंद्रधनुष्यांतून मानवी जीवनाचे स्वाभाविक रंग खुलवले आहेत. चौदा कथा घेऊन संग्रह मोठा करण्याऐवजी निवडक आठ दहा कथांनी तो छोटा केला असता, तर एका बैठकीत कथा संग्रह वाचन काढणाऱ्याला तो आटोपशीरही वाटला असता. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more