* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668957
  • Edition : 15
  • Publishing Year : JANUARY 1977
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IT IS VERY TRUE THAT ALL THE STORIES BY VA PU ARE BASED COMPLETELY ON THE MIDDLE CLASS PEOPLE, YET THESE STORIES ARE NOT ABOUT THE ROUTINE OF THIS CLASS, THEY HAVE DIFFERENT ASPECTS, VARIOUS DIMENSIONS. THEY GIVE WAY TO THE UNCOMMON MOMENTS OF HAPPINESS AND SORROW IN THE COMMON LIFE OF THE COMMON PEOPLE. VA PU HAS THE BLESSINGS TO WRITE THE STORIES WITH A TOUCH OF HUMOUR BUT AT THE SAME TIME, HIS TRAIN NEVER DERAILS ON THE TRACKS OF FRIVOLITY. HIS WRITING REFLECTS PATIENCE, IT IS NO WHERE LOUD. IT BRINGS SMILE ON THE LIPS AND HOPES IN THE HEARTS. IT GIVES IMPORTANCE TO THE ENTERTAINING ASPECT MORE THAN PAINFUL TORTURE. IT NEVER BECOMES CHEAP. THE AUTHOR HIMSELF HAS A VERSATILE PERSONALITY; THIS SAME IS PORTRAYED THROUGH HIS STORIES AVOIDING REPETITION. THE BEST STRENGTH OF HIS STORIES IS EACH STORY TOUCHES THE SOUL SOMEWHERE COMPELING THE READER TO INTROSPECT.`` PROF. SADA KARHADE: (LALITJULY 1976)
मायाबाजार-वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarVarsha Mahakal

    मायाबाजार.... वपुंच्या अनेक पुस्तकांपैकी असलेलं हे पुस्तकं. वपुंच्या कथांमधली पात्रं ही बहुधा तुमच्या आमच्यातलीच असतात आणि म्हणुनच की काय ती थेट आपल्या ह्रदयाला जाऊन भिडतात. या पुस्तकातील `मायाबाजार ` नावाची कथा पुर्णपणे कल्पनातीत असली तरीही खाडकनआपले डोळे उघडण्याइतकी ती प्रभावी आहे.सटवाई, अधांतरी,षंढ,दीडदमडीची माणसे इ. बरोबरच यातल्या इतर कथा ही आपणास अंतर्मुख करतात. त्यांच्या लिखाणात विविधता असल्याने त्यांना वाचल्यानंतरही त्या कायम स्मरणात राहतात. ...Read more

  • Rating StarPRABODHAN - JANUARY, 2017

    मानवी मनाचे अंतरंग अत्यंत सहजपणे उलगडून श्रोत्यांशी संवाद साधत लेखन करणारे – श्री वसंत पुरुषोत्तम काळे यांनी मराठी वाचकांच्या मनात अढळस्थान प्राप्त केले आहे. मध्यमवर्गीय घरातील माणसे व त्यांच्या आजूबाजूचे जग यावर या संग्रहातील सर्व कथा आहेत. पण प्रत्ेक कथेतील विषय मानवी मनाचे विविध पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडत जातो व वाचकांचे कथेतील पात्रांशी नाते तयार होते. माया बाजार या कथेत जुनी वस्तू देऊन त्याबद्दल नवीन वस्तू मिळण्याचे ठिकाण तेथून नवीन वस्तु घेऊन दोन दिवस नव्या वस्तूत रमतो. पण जुन्या वस्तूतील आठवणी मनात कुरतडत राहतात तर जुन्या बायकोच्या बदल्यात नवीन सुंदर बायको आणणारा महाभागही येथे दिसतो. याशिवाय या पुस्तकातील अधांतरी, मृदुंग, सरलाई, न उमटलेले छायाचित्र, दीडदमडीची माणसे, चोर व नालायक या सर्वच कथा अतिशय छान आहेत. प्रत्येक मराठी वाचकाने त्या वाचून त्याचा अनुभव घ्यायलाच हवा आहे. प्रत्येकाला आयुष्यात शिक्षक भेटतात. ते मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी व्रात्य मुलांना वळण लावण्यासाठी शिक्षा करतात. पण या कथेतील व्रात्य मुलगा शिक्षा भोगतो पण शिक्षकांवर आकस ठेवून, त्यामुळे पुढे आयुष्यात तो काही करू शकत नाही. मोठा झाल्यावर तो शिक्षकांना येऊन भेटतो. म्हणतो सर, मला तुम्ही नालायक म्हणत हिणवत राहिलात. आयुष्यात मी काही करू शकलो नाही. अशा विविध कथा मनाला चटका लावून जातात? हे महान लेखक आता आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेले लेखन. आपल्याला त्यांच्या उमद्या व्यक्तीमत्त्वाची साक्ष देते व त्यांचे लेखन परत परत वाचायला भाग पाडते. हे नक्की! – रवीन्द्र अनंत गाडगीळ ...Read more

  • Rating StarTarun Bharat 03 -02 -2008

    पुनःप्रत्ययाचा आनंद ‘मायाबाजार’ हा व. पु. काळे यांचा कथासंग्रह. जानेवारी १९७७ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि तीस वर्षानंतर त्याची सहावी आवृत्ती ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केली आहे. या संग्रहात एकूण ११ कथा समाविष्ट करण्यात आल्या हेत. तीस वर्षांनंतरही या कथा वाचताना वाचकाला आनंद देतात, अनुभवाचे बोल ऐकवतात, जीवनमूल्यांविषयी, जीवनाविषयी भाष्य करतात आणि माणसांचाही नव्याने शोध घेतात. व. पु. काळे यांच्या या साऱ्या कथा आजही ताज्या, वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. पुन:प्रत्यायाचा आनंद देणारा हा कथासग्रंह वाचकांना पुनःपुन्हा वाचावासा वाटतो, हे वपुंच्या लेखनाचे यश आहे. ‘मायाबाजार’, ‘षंढ’, ‘झिंटू’, ‘अधांतरी’, ‘मृदंग’, ‘हनीमून’, ‘सटवाई’, ‘न उमटलेलं छायाचित्र’, ‘दीडदमडीची माणसं’, ‘चोर’ आणि ‘नालायक’ अशा या कथा आहेत. या साऱ्या कथांमध्ये एक आंतरिक सूत्र शोधले तर ते वपुंच्या माणसांच्या विविध परी, जीवनदृष्टीकोन, जगण्याचा तात्त्विक झगडा, मानवी मूल्यांचा शोध घेण्याचं आहे, हे प्रकर्षाने अधोरेखित होते. पहिल्या ‘मायाबाजार’मध्ये आपल्या मनातील आदर्श जोडीदार शोधणारे दाम्पत्य, ‘षंढ’मधील अंतर्गत ऊर्मी दाबून, समाजासमोरील मुखवटे शाबूत ठेवून खोटी प्रतिष्ठा जपणारी माणसं, ‘झिंटू’च्या रूपातील तत्त्वशून्य, चारित्र्यहीन पिढी, ‘अधांतरी’मधील आस्तिक-नास्तिकतेच्या दोलायमान अवस्थेतील नायिका आणि पुढच्या संभ्रावास्थतेच्या पिढीचं नेतृत्व करणारा तिचा मुलगा, ‘मृदंग’मधील विपरित परिस्थितीत अडकलेला प्रामाणिक अधिकारी, व्यवस्थेचा शिकार होतो. ‘हनीमून’मधील नवविवाहित दाम्पत्याची पूर्वग्रहमुळे होणारी फजिती, ‘सटवाई’मधील उपहास, त्यातून मांडलेलं आजचं विदारक वास्तव. ‘छायाचित्र’, ‘माणसं’, ‘चोर’, ‘नालायक’ यातील सत्त्व जपणारी, माणुसकी जोपासाणारी, तत्त्वशील मातीच्या पायाची (देव) माणसं यांचं चित्रण वपुंनी केलं आहे. वपुंच्या साऱ्याच कथालेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रचंड प्रवाही, ओघवती निवेदनशैली, मित्राला आपलं अनुभव कथन करावं तसा त्यांच्या कथांचा घाट आहे. कथांतील पात्रांची व्यक्तिमत्त्वं त्याच्या मनात अगदी स्पष्ट असल्याने कथांची मांडणी आणि व्यक्तिमत्त्वांचा विकास ते सहजतेने करतात. पात्रांविषयी वाचकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमेला ते कथेच्य या अखेरीस जी छेद देतात, त्याने ती पात्रं वेगळ्याच उंचीवर जातात आणि कथाही वाचकांच्या मनात रुजते. त्यांचे अनुभवही सुभाषितासारखे व्यक्त होतात. उदा. ‘सुखं कधी संपत नाहीत. ती नित्य नवी उगवतात...’ नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलावता येतात. (पृ. १३) ‘सगळे वार परतवात येत नाही आणि पचवताही येत नाही. (पृ. १४)’,‘ आनंद जसा लादता येत नाही, तसाच जबरदस्तीने मिळवताही येत नाही’ (पृ. २५) ‘भीतीपायी माणूस लांब राहातो.’ अनुभवातून जाण्याचं तो नाकारतो. भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही. भिणारा माणूस संशोधनही करीत नाही’ (पृ. ६७) किंवा ‘अशी देवमाणसे ठिकठिकाणी गावोगावी आहेत. ती माणसे प्रसिद्धीपराङ्मुख असतात, म्हणून त्यांचा सहज काढलेला फोटो येऊ शकत नाही.’ (पृ. ११७) आपल्या आसपासच्या जीवनातील अनुभव, माणसं यांना वपुंनी कथारूप दिल्याने वाचकांना ती आपल्या जवळची वाटतात. कथेतील पात्रांच्या जीवनानुभवाशी ते समरस होऊ शकतात. वपुंच्या कथाशैलीचं हेही एक वैशिष्ट्य आहे. ‘मायाबाजार’ पुन्हा एकदा वाचून रसिकांनी पुनप्र्रत्ययाचा आनंद अवश्य घ्यावा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more