* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660647
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL PRESENTS THE VILLAGE LIFE AS IN THE FIRST HALF OF THE TWENTIETH CENTURY. THE FAMILIAR FACETS OF VILLAGE LIFE LIKE THE FAMILY FEUDS, ASSASSINATIONS ETC. ARE CERTAINLY TRIBES OF MEN WHO CHERISHED VALUES MORE THAN THEIR OWN LIVES AND DEVOTEDLY WORKED FOR THE GOOD OF THEIR VILLAGES AS A WHOLE. THE SETTING AND THE CHARACTERS ARE RATHER CONVENTIONAL BUT THE AUTHOR IS SUCCESSFUL IN CREATING POWERFUL AND CONVINCING CHARACTERS RENDERING SITUATION UNREAL AND LIFE AND MAKING THE READER FEEL THE VINTAGE AROMA OF THE VILLAGE LIFE OF YESTER YEARS.
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarVijay Patil

    `माझा गाव` लेखक- मा.रणजित देसाई मेहता पब्लिशिंग हाऊस ` स्वातंत्र्यपूर्व काळातील तांबड्या मातीचा सुगंध देणारी, एखादा कृष्ण-धवल मराठी चित्रपट पाहतो आहोत याची अनुभूती देणारी, आपण त्या गावाचा एक भाग आहोत असं वाटणारी एक संवेदनशील कलाकृती`. आप्पासाहेब इनामदार म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील त्या गावचे प्रमुख. आपल्या गावातील मंडळींना प्रसंग पडला तर आपल्या छातीचा कोट आणि गरज पडल्यास नरडीचा घोट घ्यायला कमी पडणार नाही असं एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वरून जरी नारळासारखे कठीण वाटत असेल तरी त्यांचा स्वभाव अतिशय मृदू गोड पाण्यासारखा आहे हे त्यांच्या आपल्या सुनेवर लेकीची माया पांघरणारा व आपल्या सुनेच्या गरोदर आणि बाळंतपणाच्या प्रसंगी सासू-सासरे अशी दुहेरी भूमिका निभावन्यातून दिसून येते.गावात पडलेल्या ओला दुष्काळ वेळी गावातील लोक गाव सोडून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना आपल्या धान्याची कोठारे मोकळी करून देणार, आणि तेही संपल्यावर स्वतःचे घरातील दागिने मोडून त्याचा पैसा उभा करून गावकऱ्यांसाठी धान्य विकत घेणारा आणि गरज पडल्यास आपली जमीन विकायला मागेपुढे न पाहणारा गाव प्रमुख आपल्याला येथेच भेटतो. तात्या म्हणजे गावातील पुजारी आणि वैद्यकशास्त्राला धंदा न मानता, सेवा मानणारे उत्तम वैद्य . रामशास्त्री प्रभुणे यांचं दुसरं रूप म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आप्पा साहेबांचा मोठा आधार आणि प्रत्येक अप्पासाहेबांच्या संकटात बरोबरीने तोंड देणारी व त्यातून मार्ग काढणारी व्यक्ती म्हणजे तात्या. आप्पा साहेबांना योग्य सल्ला व वेळप्रसंगी आप्पासाहेबांना सुनवायला सुद्धा मागेपुढे न बघणारा गावातील एकमेव माणूस म्हणजे तात्या.गावात पटकीच्या साथी वेळी तात्यांनी अहोरात्र केलेले प्रयत्न व आप्पासाहेब यांनी गावाच्या प्रमुख या नात्याने त्यांना दिलेलं बळ.रावबाच्या हौशाच्या वेडापायी आणि नंतर तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावात झालेली दुफळी व बिघडलेल्या वातावरण आणि या बाक्या प्रसंगावर त्यांनी केलेली मात.मनात आदर्श सल्लागार व आदर्श गावप्रमुख कसा असावा याच उदाहरण घालून देतात उमा म्हणजे आप्पासाहेब यांची थोरली सून, वाड्यातील जबाबदार स्त्री, आपल्या सासूच्या निधनानंतर आपल्या दिरावर आईची माया लावणारी आदर्श सून.आपल्या नवऱ्याचा चुकत आहे हे माहीत असूनही तोंड न उघडणारी, आपले वडील आणि सासरे यांच्यात वाद झाल्यानंतर तब्बल 11 वर्षे आपल्या माहेरचं नाव न काढणारी व माहेरचे तोंड न बघणारी, दरोड्याच्या वेळी आपल्या कुटुंबांना सोडून न जाण्याची हिंमत दाखवणारी, आदर्श कारभारी आणि सून उमा वहिनी. रावबा म्हणजे आप्पा साहेबांच्या शेती आणि शिकारीची आवड असलेले पण आप्पांच्या धाकात असलेले तरुण रक्ताची रग असणारे, थोरले वारसदार. जयवंत म्हणजे आपल्या आईच्या निधनानंतर, उमा वहिनी च्या सावलीत वाढणारा आणि वहिनीलाच आई मानणारे संवेदनशील असे अप्पासाहेबांच्या धाकले वारसदार. कथानकाच्या शेवटी आप्पासाहेब दरोडेखोरांच्या गोळीबाराला बळी पडतात आणि काकी पण तापाने मरण पावतात व त्या धक्क्याने तात्या ही हे जग सोडून जगतात आणि जयवंत पुढच्या शिक्षणासाठी बेळगावला निघून जाण्यास तयार होतो. त्यावेळेस आपल्याला स्वतःला ही जयवंत सारखी वाटते की, खरोखरच आता या गावात आपलं काही राहिले नाही. पण उमा वहिनी साठी व छोटया यशवंत साठी हा गाव सोडून आपण जाऊ नये असं एक मन सांगत असते. शेवटची 2-3 पाने वाचताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबायचं नाव घेत नाहीत आणि गावच्या तांबड्या वाटेवरून मागे बघवत ही नाही,माझ्या गावातून पाय ही निघत नाही. ✅️विजय पाटील ✅️ ...Read more

  • Rating StarPriya Deshmukh

    #माझागावं ◆◆◆◆◆◆◆ कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीचं. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली. मीही कल्पना केली माझ्या गावाची.. !!! होय मझा गावं. बेळगावातील डोंगराच्या कुशीत वसलेलं. माणुसकीच्या झऱ्याचा किनारा लाभलेलं माझं गावं. रणजीत देसाईंचं `माझा गावं`. कल्पना केली अन् थेट गावात उडी मारली. गावगाडा, गणगोत, नदी, डोंगर, मंदिर, यात्रा, मेळे ह्या सगळ्या मनातल्या आठवणी एका क्षणात नजरेसमोरुन गेल्या.... जयवंत हा या कादंबरीचा सूत्रधार असून त्याचे वडील आप्पासाहेब इनामदार हे मुख्य पात्र आहे. गावची आठवण यावी आणि माझा गावं न वाचाव असं होऊच शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं हा हेतू कादंबरी लिहीण्यामागे होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसं जुळवून घेत होता, कसं वाहून घेत होता, कसा जगत होता याचं वर्णन माझा गावमध्ये देसाईंनी उत्तम पद्धतीने रेखाटलं आहे. अठरापगड जाती, त्यांचे उद्योग, गावच्या वेशीवर होणाऱ्या बैठका, शिकारीवर जाण्याचे प्रसंग अत्यंत रंजक स्वरूपात मांडले आहे. गावचा कारभारी म्हणून आप्पासाहेबांकडे बघितले जाते. आपल्या पंखाखाली असलेल्या या गावचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची सतत जाणिव असणारे आप्पासाहेब. प्रशस्त वाडा, त्याची रचना, वाड्यातील नोकर-चाकर यावरून त्या काळातील त्यांचा रुबाब आणि तो वाडा डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो. सत्तालोलूप नसलेले आप्पासाहेब गावचे प्रमुख असून गावाबद्दल त्यांनी नेहमीच योग्य ते कर्तव्य पार पडले आहे. गावातील बोलीचे एकूण एक प्रकार लिहीताना लेखकांनी त्यातील बाज अत्यंत जाणिवपुर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावकऱ्यांची आप्पासाहेबांप्रती नम्रतेची आणि आदराची बोली, आप्पासाहेबांची गर्वविरहीत पण रुबाबदार बोली, तर घरंदाज सुनेची डोक्यावर पदर घेऊन आदराने केलेली सुसंस्कारी बोली, रायबाची अहंकारी आणि स्वार्थी बोली, जयवंताची खट्याळ बोली तर तात्यांची गावकऱ्यांच्याप्रती सेवाभावी आणि मित्राला सल्ला देतानाची सल्लागार म्हणून केलेली बोली जशीच्या तशी वर्णन केली आहे. गावात महामारी दुष्काळ पडला असताना गावकऱ्यांना धान्याचे कोठार रिकामे करणारे दानी आप्पासाहेब दिसून येतात तर वेळप्रसंगी कर्ज काढून गावकऱ्यांना जगवितांना एक गावाचा पालक म्हणून खंबीरपणे उभे राहतात. त्यांचा मुलगा रायबा मात्र त्याच्या अगदीच विरुद्ध वृत्तीचा. कर्तव्य, परंपरा या सगळ्या गोष्टीपासून दूर असलेला, बाहेरख्याली होता. घरात सोन्यासारखी बायको म्हणजेच उमा असताना रायबाचे घरात कमी आणि बाहेरच लक्ष जास्त असायचे. याचा विचार सतत आप्पा साहेबांना खात असायचा. पण तिच्यावर पोरीसारखी माया, प्रेम आणि जीव लावताना सुनेपेक्षा बाप-लेकीचं नातं डोळ्यासमोर उभं राहतं. गावचे ब्राम्हण म्हणजे तात्या कुलकर्णी. आप्पासाहेबांचे खास मित्र आणि एक उत्तम वैद्य देखील. ते ब्राम्हण असून देखील त्यांनी वैद्यकीय सेवा कधीच कमी पडू दिली नाही किंवा त्याच्यामध्ये जात-पात, उच्चनीचता आडवी आणली नाही. प्रत्येक रोगावर त्यांच्याकडे उपचार असतात आणि त्यांची जडीबुटी लवकर रोगावर परिणाम देखील करायची. प्रसंगी तात्या भरल्या ताटावरून उठून देखील गावातील गरिबांच्या उपचारासाठी जायचे. त्यावेळी त्यांच्या पत्नी मधील अस्सल ब्राम्हणी पण प्रेमळ, मायाळू आणि काळजीवाहू स्वभाव दिसून यायचा. व्यभिचारी रायबाच्या वागणुकीचा फटका, त्यांच्या व्यभिचारी कर्माची फळ आप्पासाहेबांना भोगावी लागलेली दिसून येतात. केवळ मुलाच्या चुकीमुळे आप्पासाहेबांवर चवताळून आलेले गावकरी दिसतात आणि गावावर आलेल्या संकटाच्या वेळी आप्पासाहेबांनाच हात जोडून मदत मागणारे गावकरी देखील दिसतात. वाड्यावर आलेल्या या प्रसंगांमध्ये तात्या कुलकर्णींची नेहमीच एक वेगळी भूमिका मनात प्रश्न निर्माण करून जाते. नेहमी सत्य बोलणारे तात्या वाड्याच्या कुलदीपकाची आपल्या हुशारीने सुटका करुन वडिलांची आणि आपल्या मित्राची अब्रू वाचवतात आणि पुन्हा आप्पासाहेबांचे गावातील स्थान आदरसहीत निर्माण होते. जुन्या परंपरांचे उदात्तीकरण न करता त्यांच्या चांगुलपणाचे गुणगान करण्याची मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. त्यातूनच माझा गावाची निर्मिती झाली. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पहिला. तेथेच देसाईंच्या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज बघायला मिळतो. गावात यात्रा मेळे भरतात तेव्हा सहकुटुंब यात्रेत जाताना आणि त्या यात्रेतील देवाच्या समोर मुख्य बकऱ्याची बळी देतानाचा प्रसंग जिवंत उभा केला आहे. उमाला मुलं नसल्यामुळे आप्पासाहेब बकऱ्याची बळी देऊन नवस देखील बोलले होते. त्यातून त्या काळातील दैवी शक्तीचे वर्णन केले आहे. दोन वर्षांचा जयवंत उमाला आपल्या दिरापेक्षा मुलगा जास्त वाटत होता. दीर-भावजयीच्या संवादाला मर्यादा असून मायलेकाचा नातं मात्र खूप मार्मिक रित्या रेखाटलं आहे. प्रत्येक वेळी उमा जयवंताची आई होताना दिसून येते. जयवंताचे देखील तिच्याशिवाय पान हालत नाही. फरक फक्त एवढाच की तो उमाला आई ऐवजी वहिनी म्हणायचा. पण दोघांचाही एकमेकांत फार जीव गुंतला आहे असे लक्षात येते. आप्पासाहेब- उमा, जयवंत-उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातील हळवी तार छेडून जातो. गावचा प्रमुख गावासाठी आनंदातच नाही तर संकट काळात देखील ढाल म्हणून उभा राहतो. गावच्या वेशीवर असलेल्या लक्ष्मी मंदिराची हुबेहूब रचना डोळ्यासमोर क्षणात उभी राहते. रायबा कडून घडलेला प्रसंग मनात भीती निर्माण करून जातो. गावात महामारी आली असताना गावचा कुठलाही नागरिक मृतदेह नेऊन टाकण्यासाठी पुढे सरसावत नव्हता, तेव्हा तरुणांना प्रोत्साहन देऊन आप्पासाहेबांनी स्वतः गावातील मृत पडलेल्या लोकांचे देह उचलले होते. इथे आप्पासाहेबांची माणुसकी दिसून येते. एकदा गावात दरोडा पडला असताना त्यातच आप्पासाहेबांचा मृत्यू होतो. त्यावेळी संपूर्ण गाव धाय मोकलून रडत असतो. उमाचा आधार खचलेला असतो, तात्यांचा मित्र न सांगता, न भेटताच निघून गेला असतो, जयवंत आणि रायबाचा बाप कायमचा निजलेला असतो. गावकऱ्यांचा पालक काळाच्या पडद्याआड गेला असतो. वाड्याची आणि गावची शान निस्तेज झाली असते. इकडे तात्यांची पत्नीदेखील आजाराने ग्रासली असताना त्यांची दोन्हीकडील होत असलेली ओढाताण आणि आलेला ताण त्यांचं दुःख खोलवर रुजत जातो. आप्पासाहेब गेल्यानंतर लगेचच दहाच दिवसात तात्यांची पत्नी देखील स्वर्गवासी होते. तात्यांची आणि त्यांच्या पत्नीची एक वेगळीच प्रेमळ नाळ आणि आत्मिक बांधिलकी या कथेत दिसून येते. तात्यांच्या पत्नी सोबतच तात्यांचा देखील मृत्यू होतो. एकाच दिवशी गावच्या ब्राम्हण दांपत्याचे एकाच घरातून दोन मृतदेह वाजत-गाजत, भगवंताच्या जयजयकाराने, साधुसंतांची पालखी निघावी त्याप्रमाणे अंतिम प्रवासासाठी निघतात. टाळ्याच्या गजरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जातो तेव्हा देखील संपूर्ण गाव दुःखात न्हाऊन निघतं. जयवंतला तात्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा खूप लळा होता. उठसूट वहिनीच्या तक्रारी तर आई म्हणून वाहिनीने केलेल्या कामाचे कौतुक आणि गुणगान करण्यासाठी जयवंत तात्याचे घर गाठायचा. तो प्राथमिक शिक्षण देखील याच ठिकाणी घ्यायचाह यातून आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पाहत असतं. कथेचा सूत्रधार जयवंत आता गाव सोडून निघालेला आहे नदीच्या काठाला वळसा घालून तो पुढे निघालेला आहे. गावात स्मशान शांतता पसरली आहे. गावचा प्रमुख गेला आणि गाव ओसाडं पडल्यासारखं वाटू लागलं. रायबा आता गावच्या प्रमुखपदी आला होता. जयवंताचं पुढील शिक्षण आता उमाच्या माहेरी म्हणजे कोल्हापूरला होणार होतं. जयवंताला खूप शिकायचं होतं पण इथे कथेचा सूत्रधार निराश आणि हताश दिसून येतो. या गावातील त्याची प्रेमाची माणसं एक-एक करून गळून गेली. आज तो उच्चशिक्षणासाठी हे गाव सोडून जातं आहे. पांधीच्या तोंडाशी उभे राहून त्याला या गावचा जीवनपट आठवतो. चांगले-वाईट प्रसंग आठवतात. माझा गाव म्हणून आप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगत आहे. हे गाव सोडून जाताना प्रशस्त वाडा आणि उमाचा नवरा जरी तिच्यासोबत असला तरी ती वाड्यात किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला असते. मायलेकाच्या निरोपाचा हा प्रसंग खूप हळवा आहे; इतका की वाचताना आपल्या डोळ्यातून कधी अश्रू पुस्तकावर गळून पडतात कळत देखील नाही. आप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे वहिनी किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला आहे. याच कारणाने त्याचे पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत आहे आणि वाडयाकडे बघून त्याचे हात आपसूकच जोडले गेले आहे. "तुला माहित आहे तु हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा होतो... ...Read more

  • Rating StarAmod Mehta

    रणजीत देसाई यांचे माझा गाव ही कादंबरी तशी वाचकांना अपरिचित आहे. या कादंबरीत काय आहे ते पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेच आहे. नेहमीप्रमाणे या या पुस्तकाची भाषा शैली अत्यंत ओघवती आणि हृदयंगम आहे. पुस्तक अतिशय वाचनीय व खिळवून ठेवणारे आहे.

  • Rating StarBageshree Deshmukh

    #रणजितदेसाई #माझागाव उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं. पुस्तकं म्हटले की रणजित देसाई हे नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकू घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय... कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे..... या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट आपल्याला त्या काळातल्या इनामदारकी. सत्तालोलूप नसलेली पण आपल्या पाखराखाली असलेल्या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात सतत जागृत असलेले अप्पासाहेब या कथेचे नायक असल्यासारखे शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली सुद्धा. तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही. एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधत राहतो. गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा गळून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पसाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. गाव इनामदारांचे कोठार बघता बघता रिकामे करतात. अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब देसाई लेखणीतून उभे करतात. गावात पडलेली दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको ची भुमिका क्षणभर व्यथित करते. त्या पेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखातला हा बदल पचायला जड जातो. गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातातच. वहिनी दीरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं. देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही. जयवंताची एक- एक करून प्रेमाची माणसं गळून गेली आहेत आणि तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे. हे गाव सोडून जाताना, वाड्यात नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे त्याची उमावहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय.... वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे.... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more