* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE WRITING ON MY FOREHEAD
  • Availability : Available
  • Translators : SHEELA KARKHANIS
  • ISBN : 9788184984927
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FREE-SPIRITED AND REBELLIOUS, SAIRA HAS GROWN UP IN CALIFORNIA WITH HER BEAUTIFUL, OBEDIENT SISTER AMEENA. FROM CHILDHOOD, SHE HAS BROKEN THE BOUNDARIES BETWEEN HER DESIRE FOR INDEPENDENCE AND HER FAMILY`XXS TRADITIONS - IN PARTICULAR, HER BOMBAY-BRED MOTHER`XXS IDEA OF HOW GIRLS SHOULD BEHAVE. NOW, HUNGRY FOR EXPERIENCE AND CURIOUS ABOUT THE WORLD, SAIRA TRAVELS TO KARACHI FOR A WEDDING, AND STUMBLES ON FAMILY SECRETS THAT WILL SHAPE THE REST OF HER LIFE. IT`XXS THE BEGINNING OF A JOURNEY OF UNDERSTANDING AND RECONCILIATION THAT GOES BACK THREE GENERATIONS. FURTHER SURPRISES ARE TO COME AS SAIRA VISITS LONDON AND DISCOVERS THE POLITICAL FORCES THAT HAVE DRIVEN HER FATHER`XXS FAMILY, IN INDIA AND IN ENGLAND. AS HER BACKGROUND GRADUALLY REVEALS ITSELF, SAIRA FINDS THAT THE BATTLES SHE FACES - OVER LOVE, BELONGING AND FULFILMENT - HAVE FACED OTHERS BEFORE, AND COMES TO REALISE THAT HER MANY-LAYERED INHERITANCE IS A THING TO BE TREASURED. IN A BEAUTIFULLY WRITTEN AND DEEPLY MOVING NARRATIVE, NAFISA HAJI EXPLORES ISSUES OF DISPLACEMENT AND BELONGING AND THE LURE OF FAMILY, HOME AND TRADITION VERSUS CAREER AND THE EXCITEMENT OF THE WIDER WORLD - FOR MEN AS WELL AS WOMEN.
मी माझे डोळे मिटून घेते. आणि माझ्या लहानपणीच्या दु:स्वप्नांना पिटाळून लावून; मला शांत करणारा माझ्या आईच्या हाताचा माझ्या कपाळावर होणारा स्पर्श आठवू पाहते. स्वतंत्र्यवृत्तीची आणि बंडखोर अशी सायरा आपल्या सुंदर आणि आज्ञाधारक बहिणीबरोबर – अमिनाबरोबर, कॅलिफोर्नियात वाढली आहे. लहानपणापासून तिने आपली स्वातंत्र्याची इच्छा आणि आपल्या कुटुंबाच्या परंपरा यांना विभागणारी सीमारेषा ओलांडली आहे. विशेषत: मुंबईत वाढलेल्या तिच्या आईच्या मनात आपल्या मुलीने कसं वागावं याच्या ज्या कल्पना होत्या; त्या साऱ्या तिने मोडीत काढल्या होत्या. नवे-नवे अनुभव घेण्यासाठी आतूर असलेली आणि जगाबद्दल अपार कुतूहल असलेली सायरा एका लग्नाला हजर राहण्यासाठी कराचीला जाते आणि तिथे तिच्या कुटुंबातील काही रहस्यं तिच्यापुढे अचानक उभी ठाकतात – ती रहस्यं ज्यांनी तिच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळाच आकार दिला. मागच्या तीन पिढ्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याचा जो सायराचा प्रवास होता; त्याची ही सुरुवात होती. सायराच्या लक्षात येतं की, प्रेमासाठीची, काहीतरी मिळवण्याची आपल्या इच्छांची परिपूर्ती करण्याची जी लढाई ती लढत होती, तीच लढाई तिच्या आधीच्या पिढीतील व्यक्तींनीही लढली होती आणि म्हणूनच तिला मिळालेला बहुआयामी वारसा तिने जपून ठेवला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MAZILALATRESHA #THEWRITINGONMYFOREHEAD #माझीललाटरेषा #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHEELAKARKHANIS #NAFISAHAJI "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 10-02-2017

    आपली वाटणारी कादंबरी... कुठल्याही परदेशस्थ भारतीय कुटुंबाची गोष्ट तशी आपल्या जिव्हाळ्याची. चारांतील एका घरातील तरुण-तरुणी हल्ली अमेरिकेत स्थायिक झालेले ऐकत असल्यामुळे या परदेशी भारतीयांच्या कथा, व्यथा आपल्या खास परिचयाच्या असतात. भारतातील नातेवाइकांा गोतावळा, भारतीय लग्नपद्धती आणि अमेरिकेतील मोकळी आचार-विचारसरणी यांतील विरोधाभासही त्यामुळे आपल्याला चांगला ओळखीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. नफिसा हाजी लिखित ‘द रायटिंग ऑन माय फोरहेड’ या पुस्तकातून एका परदेशस्थ भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या मुस्लीम परिवाराची गोष्ट उलगडते, तेव्हादेखील हाच जिव्हाळा कायम राहतो. ‘ते आणि आपण’ यांच्यातली साम्यस्थळे वारंवार नजरेत येत राहतात आणि आपल्याच आसपासची गोष्ट असल्यासारखे आपण त्या कथेत गुंतत जातो. भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन लेखिका नफिसा हाजी यांच्या या पुस्तकाचा ‘माझी ललाटरेषा’ हा अनुवाद शीला कारखानीस यांनी केला आहे. नफिसा जन्माने अमेरिकन असल्या, तरीही त्यांचे कुटुंब मुळात मुंबईचे. फाळणीनंतर कराचीला स्थायिक झालेले. त्यामुळे त्यांच्या लिखाणात मुंबई आणि कराचीचे संदर्भ डोकावतात. ‘माझी ललाटरेषा’ या कादंबरीची नायिका – सायरा ही अशीच अमेरिकेत वाढलेली पण भारतीय उपखंडातील मूळचे संस्कार घरात लाभलेली तरुणी. या कथेला भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासूनचा संदर्भ आहे. फाळणी, त्यानंतरची साठोत्तरी अस्थिरता, बंडखोर तरुणाई ते थेट वल्र्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ला एवढी मोठी पार्श्वभूमी कथेला मिळाली आहे. या घटनांच्या संदर्भाने सायराच्या कुटुंबाची ही गोष्ट उलगडत जाते. सायराच्या कुटुंबाचा गोतावळाही कुठल्याही भारतीय कुटुंबाप्रमाणे मोठा आहे. तिच्या वडिलांचे वडील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कट्टर देशाभिमानी, तर वडील अमेरिकेतील आधुनिक वैभवशाली जीवनाकडे आकर्षिक झालेले. सायराच्या आईच्या वडिलांची तर वेगळीच कथा. आपल्या पहिल्या पत्नीला सोडून एका गोऱ्या अमेरिकन स्त्रीशी ते लग्न करतात आणि सायराला कायमचे दुरावतात. कारण तिची आईच त्यांच्याशी संबंध तोडते. त्या विस्तारित कुटुंबातील मुलांपर्यंत साऱ्यांच्या कथा सायराच्या नजरेतून कथेत उलगडत जातात. यामध्ये सायराची पाकिस्तानात राहणारी आजी, मावशी आजी, पाकिस्तानी लिप्ताळ्यात रमलेली एक मावशी, लंडनला राहणारे आजोबा, चुलते, त्यांची आंग्रजाळलेली मुलं, असे सारे जण त्यांच्या कथेसह भेटतात. अमेरिकत वाढलेल्या बहुसंख्य भारतीय मुलांप्रमाणे ‘आपले संस्कार’ आणि अमेरिकेतील वातावरण हा विरोधाभास पचवतच सायरा मोठी होते. जग बघायला लागल्यानंतर तिचे विचार स्वतंत्र होत जातात. शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर जायला मिळाल्यावर ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, वेगळ्या विचारांच्या, जग पाहिलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन प्रोफसरच्या प्रेमात पडते, घरचे पारंपरिक वळण सोडून सायरा मोकळ्या जगात शिरते आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबातील व्यक्तीचा, त्यांच्या पार्श्वभूमीचा एका वेगळ्या अंगाने विचार करायला शिकते. सायराबरोबर आपणही दुसऱ्या बाजूने उलगडत जाणाऱ्या या कुटुंबाच्या कथेत गुंतून जातो, हेच या लेखनाचे यश म्हणावे लागेल. वडिलांनी पारंपरिक विचारांच्या पत्नीला सोडून एका अमेरिकन स्त्रीशी लग्न केलं म्हणून वडिलांशी कायमचे संबंध तोडलेली सायराची आई तिला योग्य वाटत असते; पण आजोबांची संपूर्ण कथा उलगडते, तेव्हा सायरा या सगळ्या घटनांचा त्रयस्थपणे विचार करू शकते. तिची पाकिस्तानातील पारंपरिक आजी (नानी माँ) आणि तिची स्वतंत्र विचारसरणीची, स्वावलंबी बहीण – म्हणजे सायराची मावशीआजी (बडी नानी माँ) यांच्या पूर्वेतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासचा भारतीय उपखंडातील काळ उलगडतो. त्या वेळच्या स्थलांतरित उच्चमध्यमवर्गीच समाजापुढची आव्हाने, राष्ट्रनिर्मितीसाठी झपाटलेला तत्कालीन तरुण वर्ग आणि त्याला समांतर असा परंपराधिष्ठित समाज हे सगळे या दोघींच्या भूमिकांमधून व्यक्त होत राहते. किशोरवयीन सायराचा एका बंद, ठोकळेबाज जीवनशैलीतून नव्या, स्वतंत्र, प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाकडे होणारा हा प्रवास तिला तिच्या आधीच्या तीन पिढ्या समजून घ्यायला लावतो. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपताना या तिन्ही पिढ्यांतील सर्वांशी जुळवून घ्यायला लावतो. नानी माँ आणि बडी नानी माँ या दोन बहिणींमधील विरोधाभास सायराला तिच्या आणि तिची बहीण अमिनामधील विरोधाभासातील प्रेम समजावून देतो. या प्रवासात एक अशी घटना घडते की, हे संपूर्ण मोठे कुटुंब हादरून जाते. सायराच्या संपूर्ण उलगडलेल्या व्यक्तिमत्वाला कलाटणी देणारी ही घटना पुढच्या अस्वस्थ हाकांची चाहूल असते. रहस्यांचा गुंता हळूहळू उलगडण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. अमेरिकेसह इंग्लंड, भारत आणि पकिस्तान या चार देशांत ही कादंबरी घडते, फुलते. त्या त्या शहरांतल्या बारीक तपशिलांसह घटना चितारल्यामुळे हे चित्रण वास्तवाच्या जवळ जाणारे झाले आहे. आधुनिक जगातील बदलेली सामाजिक मूल्ये, स्वातंत्र्यांची बदलती व्याख्या, लैंगिकता, जगाला हादरवून टाकणाऱ्या घटनांचे सामान्य कुटुंबावर उमटणारे पडसाद या सगळ्याचा वेध कुठल्याही अभिनिवेशाशिवाय या कादंबरीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे सायराची ही कथा थेट भिडते. प्रभावी ठरते. आपली वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more