* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I,PHOOLANDEVI
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788171617418
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS, POLITICAL LEADERS, POLITICAL PARTIES
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS ONE OF THOSE RARE PEOPLE WHO, IN THEIR VERY LIFETIME, SEEM STRAIGHT OUT OF A LEGEND ... BORN IN THE HEART OF INDIA INTO A LOW-CASTE FAMILY, PHOOLAN DEVI WAS DESTINED FOR DOMESTIC SLAVERY. MARRIED AT ELEVEN TO A MAN THREE TIMES OLDER THAN HER, ABANDONED AND THEN RAPED BEFORE BEING KIDNAPPED BY OUTLAWS, SHE REBELLED TO BECOME THE FAMOUS QUEEN OF BANDITS. FOR THREE YEARS, AT THE HEAD OF A REAL ARMY, SHE STRUCK THE IMAGINATION OF AN ENTIRE CONTINENT, STEALING FROM THE RICH TO GIVE TO THE POOR, IN THE PURSUIT OF REVENGE EVER SATIATED AGAINST THE BRUTALITY OF MEN. FOR ALL THE WOMEN IN THE WORLD, FROM HUMILIATION TO LIBERATION, PHOOLAN DEVI HAD BECOME THE SYMBOL OF REBELLION AND STRUGGLE. SHE WAS MURDERED ON JULY 25, 2001. THIS BOOK IS HER WILL. PHOOLAN DEVI WAS BORN IN 1961 IN A POOR VILLAGE IN INDIA. AFTER ELEVEN YEARS IN PRISON, SHE GIVES US THE HEARTBREAKING TESTIMONY OF HER FIGHT AGAINST MISERY, VIOLENCE AND SLAVERY. AFTER FOUNDING AN ADVOCATE FOR THE OPPRESSED, PHOOLAN DEVI BECAME A MEMBER OF THE STATE OF UTTAR PRADESH, WHERE SHE GREW UP. SHE WAS FINALLY MURDERED ON JULY 25, 2001, LEAVING BEHIND COUNTLESS REBELS.
रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्ष ती उत्तरप्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती. अत्याचाराची शिकार होणार्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचार्‍यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदील झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्ष खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. अजूनही तळागाळातल्या शोषित वर्गाला ती आपली वाटते. फूलन म्हणते, ’’मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय. अन्यायानं दबल्या जाणार्‍या आणि अपमानानं जळणार्‍या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न.’’

No Records Found
No Records Found
Keywords
#PHOOLAN DEVI # MARIETHÉRÈSECUNY&PAUL RAMBALI #PRAMOD JOGLEKAR #मीफुलनदेवी #मारीतेरेजक्यूनी #पॉल रोम्बाली #प्रमोद जोगळेकर#CHAMBALGHATI #BANDITQUEEN #चंबळघाटी #दरोडेखोर #गोरहा #BEHMAIMASSACRE #
Customer Reviews
  • Rating StarMoin Humanist

    खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फुलनने दारिद्र्य आणि अपमानच जीणं याचा सामना केला.अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतीमध्ये माती लिंपावी लागते,अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलींपेक्षा जास्त मान दिला जातो..आपल्यापेक्षा िप्पट वयाच्या माणसाशी लग्न झाल्यावर अवघ्या ११व्या वर्षी तिला मारहाण,अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं.समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली.तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकुनी तिला पळवल.पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः एक डाकू बनली..श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली.सरकार हवालदिल झालं,अखेर ती शरण आली आणि मग ११ वर्ष खटल्याशिवाय तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं...🙏आणि २००१ मध्ये तिची निर्घृण हत्या करण्यात आली.... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.