* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LAUGHTER OF MY FATHER
  • Availability : Available
  • Translators : VYANKATESH MADGULKAR
  • ISBN : 9788184983777
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 1998
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 76
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRANSLATION OF THE BOOK LAUGHTER WITH MY FATHER A BOOK BY CARLOS BULOSAN, AN AUTHOR FROM THE PHILIPPINES. IN OUR SOCIETY, WE DO NOT APPROVE OF A RELATION BETWEEN A FATHER AND HIS SON WHICH IS SO VERY FREE, YET, THE MANY OTHER THINGS IN THE BOOKS LIKE THE HUMOUR, THE NAUGHTINESS ARE THE SAME AS IN OUR SOCIETY. THE OVERALL ATMOSPHERE IS ALSO QUIET CLOSE TO THAT OF OURS. I WOULD ALSO SAY THAT THE READERS WILL FIND MANY CHARACTERS FROM THIS BOOK VERY FAMILIAR.
‘कार्लो बुलोसान’ नावाच्या एका फिलिपिनो लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करून द्यावा, म्हणून `लाफ्टर वुइथ माय फादर` हे रूपांतर केले आहे. ‘...बापलेकाचे इतके मोकळे नाते आपल्याकडे मंजूर नाही.’ तरीपण ह्या पुस्तकातील बेरकीपणा, खट्याळपणा, गावरान विनोद आपल्यासारखाच आहे. वातावरणही फारसे परके नाही, काही चेहरेही वाचकांना ओळखीचे वाटतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating Starअनिल विद्याधर आठलेकर

    व्यंकटेश दिगंबर माडगूळकर म्हणजे मराठीमधील एक श्रेष्ठ साहित्यिक. ‘गदिमा’ यांच्यासारखे सर्वार्थानं थोरले असणारे बंधू असताना त्यांच्या सावलीत न राहता त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेचा स्वतंत्र ठसा व्यंकटेश माडगुळकर यांनी उमटवल आहे. ते कथाकार म्हणून प्रामुख्याने ज्ञात असले तरी त्यांनी नाटकं, कादंबर्या् आणि ललितगद्यलेखनही विपुल प्रमाणात केलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचं स्वतःचं साहित्यही पाश्चात्य भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. त्यांच्या बनगरवाडी या कादंबरीचा अनुवाद इंग्रजी, जर्मन, हिंदी डॅनिश या भाषांमध्ये झाला आहे, तर वावटळ या कादंबरीचा अनुवाद इंग्रजी व रशियन या भाषांमध्ये झाला आहे आणि `सत्तांतर` या कादंबरीचा अनुवाद कन्नडमध्ये झाला आहे `नॅशनल बुक ट्रस्ट` तर्फे त्यांच्या अनेक कथांचेही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘माणदेशी माणसं’, ‘वाघाच्या मागावर’, ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘बनगरवाडी’ हे त्यांचं प्रसिद्ध आणि लोकप्रिय साहित्य आपल्याला माहीत आहेत, पण आज मी ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे ते पुस्तक अनुवादित या प्रकारातील पुस्तक असून या पुस्तकांमध्येही आपल्या प्रतिभेची चुणूक व्यंकटेश माडगूळकरांनी दाखवून दिलेली आहे, हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येतं आणि आपण व्यंकटेश माडगूळकर या प्रतिभावंत साहित्यिकाचे पुन्हा एकदा फॅन होतो. खाण्यामध्ये जशी रूचीपालटाची जागा असते त्याचप्रमाणे वाचनातही रुचीपालटाचं वेगळं महत्व आहे. अनेकदा असं होतं की आपण एकाच पठडीतलं वाचत जातो आणि एका क्षणी एक थांबा येतो जिथे आपण खूप वेळ रेंगाळतो. हे रेंगाळणं जाणूनबुजून नसतं तर ती एक अपरिहार्यता असते. अशा वेळीच हा रूचीपालट उत्प्रेरकाची भूमिका बजावतो. काहीवेळा एकच पुस्तक तुम्ही वाचत असता पण त्यातील विषय कदाचित तुम्हाला फार गुंतवून ठेवू न शकल्यामुळे असेल किंवा अतिवर्णनात्मक शैलीमुळे असेल, तुम्हाला रूचीपालटाची गरज भासते किंबहुना असते. अशावेळी एका हलक्याफुलक्या विषयावरील, एखादं अनोख्या शैलीतील पुस्तक हाती आलं तर? मजा येईल नाही ? माझ्या वाचनाचे विषय तसे भाषेच्या अंगाने जाणारे अधिक, त्यामुळे अनेकदा अभ्यासाच्या अंगानेच वाचन होतं, त्यावेळी कंटाळा येत नाही पण केवळ तेवढंच वाचून मन भरत नसल्यानं साहजिकच इतर पुस्तकंही खुणावत असतात. परवा का कोण जाणे हाती असलेलं पुस्तक सुरू ठेवून दुसरं काहीतरी वाचावं असं वाटलं. माझ्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तकं चाळताना नेमकं व्यंकटेश माडगूळकर यांचं `मी आणि माझा बाप` पुस्तक समोर आलं. माडगूळकरी शैलीशी मी सुपरिचित असल्यामुळे तेच पुस्तक वाचायचं ठरलं आणि एका बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून संपलंदेखील! गेल्या काही महिन्यांचा विचार करता एका बैठकीत संपवलेलं हे पहिलंचं पुस्तक. `मी आणि माझा बाप` (मेहता पब्लिशिंग हाऊस) हा रूपांतरित कथासंग्रह आहे. `कार्लो बुलोसन` नावाच्या एका फिलिपिनो लेखकाच्या `लाफ्टर वुइथ माय फादर` या पुस्तकातील कथांचं मराठी रूपांतरण म्हणजे `मी आणि माझा बाप` हा कथासंग्रह. या कथेतील फिलिपिनो लोकांचं चित्रण माडगूळकरी शैलीत मराठी/भारतीय संदर्भांसह वाचताना विशेष मजा येते. या कथासंग्रहात एकूण १२ कथा आहेत. बाप आणि लेक यांच्यातील नात्यांचे विविध कंगोरे यात मजेदार पद्धतीने चित्रित केले आहेत. खरं तर संपूर्ण कथासंग्रहाचा विचार करता बाप आणि लेक यांचं व्यक्तिचित्रही मस्त उभं केलं आहे. यातील गावरान विनोद अगदी वाखाणण्याजोगा आहे. फिलिपिनो व्यक्तींचं केलेलं झकास भारतीयीकरण, योग्य भारतीय संदर्भ (Indianness), दैनंदिन कौटुंबिक घटनांचं खुसखुशीत चित्रण, गावरान संवाद हे सर्व घटक कथा वाचताना तुम्हाला गुदगुल्या करत राहतात. मग तो कोर्टातील सीन असो की गावात तीन शहरी मास्तरणी येण्याचा, बापाचं स्वत: वारण्याचं नाटक असो की महादेवकाकाचा बिलंदरपणा असो प्रत्येक गोष्टीत एक पकड आहे. वाचक गोष्ट संपवेपर्यंत कल्पना लढवत राहतो किंवा हसत राहतो किंबहुना घटना जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करण्याची लेखकाची हातोटी प्रत्येक गोष्टीगणिक तुम्हाला खिळवून ठेवते. कथासंग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की यात माणसांबरोबरच प्राण्यांनाही विशेष महत्व दिलेलं आहे. पांढरा घोडा, झुंजीसाठी पाळलेला कोंबडा, टकरीचा एडका, कुत्रे, म्हैस असे प्राणी यातील कथांमध्ये ठळकपणे आपलं अस्तित्व दर्शवतात आणि कथेची रंगत वाढवतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सकारलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकाला अगदी साजेसं आहे. शेजारी इतर गोष्टीत असणाऱ्या प्राण्यांसह हातात झुंजीचा कोंबडा घेऊन घोड्यावर बसलेला अतरंगी बाप अतिशय सुंदररित्या चितारलेला आहे. ``Don`t judge a book by its cover `` ही म्हण इतर ठिकाणी खरी होत असली तरी इथे मात्र नेमकं मुखपृष्ठ तुम्हाला आतील मजकुराची झलक नक्की दाखवतं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. `बनगरवाडी`, `माणदेशी माणसं, `गावाकडच्या गोष्टी` या पुस्तकांची मुखपृष्ठंदेखील नेमकी आणि परिणामकारक आहेत. माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांचं हे वैशिष्ट्य आहे. पेपरबॅक स्वरुपात असणारा हा कथासंग्रह हाताळायलासुद्धा अगदी हलकाफुलका आहे. मूल्यही नाममात्र आहे. व्यक्तिचित्रणं तसेच कथासंग्रह वाचण्याची आवड असणाऱ्यांनी हा कथासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे. केवळ स्वत:लाच नाही तर इतरांनाही वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कोणतं पुस्तक भेट द्यायचं असेल तर हे पुस्तक एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही एकाच विषयाची पुस्तके वाचून दमला असाल, थांबला असाल तर तुमच्या मनावरील भार हलका करण्यासाठी रूचीपालट म्हणून आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे, एवढं मात्र निश्चित.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more