* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY NAME IS ERIC
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184985627
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A "DOGOGRAPHY" WRITTEN FROM THE POINT OF VIEW OF ERIC, AN OUTSPOKEN AND MEMORABLE POMERANIAN. FROM HIS BIRTH ON A REMOTE DOG BREEDING FARM, DEEP INSIDE RURAL NEW SOUTH WALES, AUSTRALIA THROUGH HIS FORMATIVE YEARS IN SINGAPORE AND INTO OLD-AGE, YOU WILL GET TO KNOW, AND LOVE, ERIC AND THE FAMILY THAT RAISES HIM.
एक आठवणीत राहण्यासारख्या स्पष्टवक्त्या पॉमेरियन कुत्र्याच्या, एरिकच्या दृष्टिकोनातून लिहिलेले हे ‘कुत्र्याचे आत्मचरित्र’ आहे. ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स भागातील एक छोटे खेडेगाव आणि तेथील कुत्र्यांची निपज करणारे एक दूरवरचे शेत. तिथं जन्म झाल्यापासूून ते सिंगापूरला वाढत्या वयात येऊन म्हातारा होईपर्यंतचा एरिक. आणि ज्या कुटुंबात तो वाढला, ते कुटुंबही तुम्हाला कळेल आणि त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटू लागेल.रेई किमुरा ही टोकियोत जन्मली आणि तिथंच वाढली. आता ती सिंगापूरमध्ये राहते आणि तिथंच काम करते. ह्या लेखिकेने सिंगापूरमध्ये कायद्याचा अभ्यास केला, तसेच वृत्तपत्रीय शिक्षण ऑस्ट्रेलियात घेतले. एक वकील तसेच जमीन-जुमल्याचा व्यवसाय करणारी आणि खूप कादंब-या लिहिणारी ती एक लेखिका आहे. तिचे लिखाण डच, स्पॉनिश, टंगेरियन, रशियन, पॉलिश, हिन्दी, मराठी, थाई, इंडोनेशियन, कोरियन, जपानी, व्हिएतनामी आणि चायनिज अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध झालेले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 20-07-2018

    श्वानांच्या विचारांचे भावचित्र... खरे तर माणसाला तो सोडून निसर्गातले बाकीचे प्राणी सारखेच. तरीही काही प्राण्यांवर त्याचे जरा जास्त प्रेम असते. त्यातलाच एक प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला माणसाचा मित्र असेच म्हटले जाते. श्वानप्रेमींवर आजवर अनेक साहि्यिकांनी लिहून झालेले आहे. श्वानप्रेमींची लक्षणे, त्यांचे नखरे, त्यांचा जिव्हाळा, ऋणानुबंध अशा अनेक गोष्टी साहित्यातून येऊन गेल्या आहेत. पण प्राणी स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगतायत, असे थेट साहित्य फारसे वाचनात नसते. अर्थात अशा प्रकारचे चित्रपट आपण पाहिलेले असतात. कार्टून्समधून बोलणारे कुत्रे पाहिलेले असतात. तरीही एखादा कुत्रा स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगताना कसे वाटेल? ‘मी एरिक’ या पुस्तकात असाच एक मस्त केसाळ पॉमेरियन त्याची गोष्ट सांगतो आहे. ‘माय नेम इज एरिक’ या रेई किमुरा यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मुळात पुस्तकाचा मूड मस्त खेळकर आहे. ती एका पाळीव कुत्र्याची गोष्ट आहे, त्यामुळे त्याचे लोभस नखरे, त्याच्या कुटुंबावरचे त्याचे प्रेम, किस्से असे सगळे काही आहे. पण हा खेळकर मूडमध्ये हसवणारा कुत्रा त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा सहजपणे सांगून जातो की आपल्या डोळ्यांत नकळत पाणी येते. अगदी सुरुवातच करायची तर पहिल्या प्रकरणात एका श्वान प्रजोत्पादन केंद्रामधील एका एरिकचे आयुष्य आणि आईपासून दूर होताना त्याची अवस्था, याचे वर्णन आपल्याला अस्वस्थ करते. पाळीव प्राण्यांच्या दुकानात गेल्यावर तिथले गोजिरे श्वान, गोबऱ्या मांजरी आपले लक्ष वेधून घेतात. पण आपल्या सुखासाठी या पिलांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते, हे आपल्या लक्षातही येत नाही. ती गोष्ट ‘मी एरिक’चे पहिले प्रकरण सहज सांगून जाते. विमानातून या प्राण्यांची होणारी ने-आण, गैरसोय, त्यामध्ये त्यांना वाटणारी निसर्गसुलभ भीती, त्यांच्या मनाची द्विधा अवस्था सगळे काही एरिक आपल्याला सांगतो. पाळीव प्राण्यांच्या दुकानातून त्याच्या मालकाच्या म्हणजे जेनिफर आणि तानियाच्या घरी आल्यावर मात्र एरिकचे अच्छे दिन सुरू होतात. इथपासून म्हणजे प्रकरण तीनपासून एरिकच्या धम्माल कसरतींना सुरुवात होते आणि पुस्तकातील खेळकरपणा, गंमत परत येते. एरिकचा स्वभाव, त्याचे मालकिणीला म्हणजे त्याच्या भाषेत त्याच्या मानवी आईला आपल्या तालावर नाचवणे, घरातील इतर माणसांसोबतचे त्याचे नातेसंबंध, पिंजऱ्यातून घरी जाण्यासाठी त्याने श्वानसुलभ भावनेने घरच्या लेकीला लावलेला मस्का अशा सगळ्या गोष्टी मजा आणतात. एरिकचा आगाऊपणा, त्याचे कचऱ्याचे वेड, धुण्याच्या कपड्यांचा त्याने केलेला उकिरडा या गोष्टी या कुत्र्याबद्दल राग वाटू न देता त्याच्याबद्दलचे प्रेमच जागृत करतात. एरिकच्या अशक्य दंग्याला कंटाळून त्याला आज्ञापालन केंद्रात दाखल केले जाते. तिथला किस्साही धम्माल आणतो. एरिकचा शेजारी असलेल्या ‘कोल’ या जर्मन शेफर्डसोबतची त्याची खुन्नस, त्याचा कोलने काढलेला राग, एरिकला झालेला अपघात, श्वानसौंदर्य स्पर्धेत खट्याळ एरिकने घातलेला गोंधळ या सगळ्या गोष्टी हसू आणतात. एरिकचे सामर्थ्य आणि तथाकथित पुरुषार्थ दाखवणारे तसेच त्याच्या आगाऊपणामुळे त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे प्रकरण वाचनीय आहे. दोन्ही प्रकरणांत एरिक आपल्या लहान असण्याची काळजी न करता उद्योग करून बसतो आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात. पहिल्या प्रकरणात एरिक घरात शिरलेल्या चोराच्या पायाचा कडकडून चावा घेतो आणि त्याला पळवून लावतो. त्याच्या धाडसाचे खूप कौतुक होते; परंतु त्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते, तर दुसऱ्या प्रसंगात एरिक घरात कुणी नसताना हट्टाने उड्या मारतो आणि पायाचा घोटा दुखावून बसतो. मरणाच्या दारातून अनेकदा परत आलेला एरिक त्याच्या कुटुंबीयांना अधिकाधिक हवासा होत जातो तसाच आपल्यालाही. संपूर्ण पुस्तकात एक गोष्ट सतत येते, ती म्हणजे एरिकला त्याच्या ऑस्ट्रेलियन वंशाची, आईची येणारी आठवण. माणूस कुठेही गेला तरी त्याला त्याचे बालपण आठवतेच. तो ते विसरू शकत नाही. कुत्र्यांचेही असेच असेल का, अशी एक पुसटशी शंका यामुळे येऊन जाते. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी केली जाते. अनेक पाळीव कुत्र्यांबाबतही मालक तोच निर्णय घेतात. कुत्र्यांचे खच्चीकरणही केले जाते. ही गोष्ट प्राणिमित्रांना पटत नाही, त्याबद्दल खरे तर फारसे बोललेच जात नाही. कारण जिथे मानवाच्या लैंगिकतेबद्दल बोलणेच कठीण तिथे प्राण्यांबद्दल कोण बोलणार? पण पुस्तकातला एरिक मात्र त्याच्या खच्चीकरणाच्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहितो. त्यात शेवटी तो म्हणतो, हे होणे कुत्र्यांसाठी आणि त्याहीपेक्षा कुत्र्यांच्या जवळच्या मित्रासाठी म्हणजे माणसासाठी फार महत्त्वाचे असते. अशी वाक्ये विचारात पाडतात. श्वानप्रेमींबरोबरच इतरांनाही हे पुस्तक आवडू शकेल. कारण नुसतेच ‘आमचा टॉम्या बाई गुण्णाचा!’ असे भारावलेले हे पुस्तक नाही. त्याला कुत्र्याच्या मनातील प्रत्यक्ष विचारांची जोड आहे, अर्थात कल्पनेतल्याच. माणसांसाठी अनभिज्ञ अशा कुत्र्यांच्या विचारांचे भावचित्र रेखाटणारे हे पुस्तक एकदा वाचावे, असे नक्कीच आहे. स्नेहल जोशी यांनी पुस्तकाचा अनुवादही चांगला केला आहे. -स्वाती केतकर-पंडित ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 23 -11 -2014

    मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरंच जर का माझ्या शेंगदाण्याच्या आकाराच्या मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय, ते मी त्यंची आज्ञा पाळावी या जाणिवेने नव्हे; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! .... विचार करणे, आठवून गोष्टी करणे, हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे.... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले, तो मेंदू दुसऱ्यांच्या मेंदुपेक्षा थोडा लहान आहे!.... त्यामुळे ‘निव्वळ कुत्रा’ असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?.....इति एरिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more