HEART-BREAKING, HOPEFUL AND HORRIFYING, I SHALL NOT HATE IS A PALESTINIAN DOCTOR`S INSPIRING ACCOUNT OF HIS EXTRAORDINARY LIFE, GROWING UP IN POVERTY BUT DETERMINED TO TREAT HIS PATIENTS IN GAZA AND ISRAEL REGARDLESS OF THEIR ETHNIC ORIGIN. ABUELAISH IS AN INFERTILITY SPECIALIST WHO LIVES IN GAZA BUT WORKS IN ISRAEL. AND, MOST RECENTLY, AS THE FATHER WHOSE THREE DAUGHTERS WERE KILLED BY ISRAELI SHELLS ON 16 JANUARY 2009, DURING ISRAEL`S INCURSION INTO THE GAZA STRIP. IT WAS HIS RESPONSE TO THIS TRAGEDY THAT MADE NEWS AND WON HIM HUMANITARIAN AWARDS AROUND THE WORLD. INSTEAD OF SEEKING REVENGE OR SINKING INTO HATRED, IZZELDIN ABUELAISH CALLED FOR THE PEOPLE IN THE REGION TO START TALKING TO EACH OTHER. HIS DEEPEST HOPE IS THAT HIS DAUGHTERS WILL BE `THE LAST SACRIFICE ON THE ROAD TO PEACE BETWEEN PALESTINIANS AND ISRAELIS`. THE EXTRAORDINARY STORY OF A PALESTINIAN DOCTOR WHO, DESPITE WITNESSING THE DEATH OF THREE OF HIS DAUGHTERS IN THE ISRAELI INCURSION INTO GAZA IN JANUARY 2009, CONTINUED HIS MEDICAL AND HUMANITARIAN WORK AIMED AT BRINGING THE PEOPLE OF THE REGION TOGETHER IN PEACE. HIS WEBSITE AND FOUNDATION CAN BE FOUND AT WWW.DAUGHTERSFORLIFE.COM
डॉ. इझेलदिन अबुइलेश- ज्यांना आता ‘तोगाझा डॉक्टर’ असे ओळखले जाते, त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. १६ जानेवारी, २००९ रोजी त्यांच्या घरावर झालेल्या इस्राईलच्या बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि पुतणी बळी पडल्या. गाझामधील लोकांच्या धडपडीचा आणि हलाखीच्या जीवनाचा अबुइलेश यांनी सांगितलेला वृत्तान्त वाचताना कधी स्फूर्तिदायक, तर कधी हृदय द्रावक वाटतो. गाझामध्ये राहणारा आणि इस्रायली इस्पितळात काम करणारा हा पॅलेस्टिनी असलेला वंध्यत्वोपचार तज्ज्ञ डॉक्टर आयुष्यभर या दोन विभागांतील सीमा रेषा दररोज पार करत असे. एक डॉक्टर याना त्याने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारणे आणि स्त्रियांचे शिक्षण यावर भर देणे, हे मध्य पूर्वेतील एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांना वाटते.
त्यांच्या मुलींचे बॉम्ब हल्ल्यात बलिदान पडल्यावर त्यांनी जो जगावेगळा प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे नाव सर्व जगात झाले. त्यांना जगभरातून मानवतावादी पारितोषिके दिली गेली. या घटनेचा सूड घेण्याऐवजी, इस्रायलींबद्दल तिरस्काराची भावना बाळगण्याऐवजी, अबुइलेशचे मध्य पूर्वेतील लोकांना सांगणे आहे की, एकमेकांत संवाद सुरू करा. पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांमधील वैराची भावना संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील त्यांच्या मुलींचे बलिदान शेवटचे ठरावे, अशी त्यांना आशा वाटते