* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY LIFE AS A TRAITOR
  • Availability : Available
  • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
  • ISBN : 9789386175052
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 194
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AT THE AGE OF TWENTY, ZARAH GHAHRAMANI WAS SWEPT OFF THE STREETS OF TEHRAN AND TAKEN TO THE NOTORIOUS EVIN PRISON, WHERE CRIMINALS AND POLITICAL DISSIDENTS WERE HELD SIDE BY SIDE IN CONDITIONS OF LEGENDARY BRUTALITY. IN THIS RICHLY TEXTURED MEMOIR, SHE TELLS THE TERRIFYING, INSPIRING STORY OF HER TIME IN PRISON. MY LIFE AS A TRAITOR CELEBRATES A TRIUMPH OF THE INDIVIDUAL OVER THE STATE AND IS AN AFFECTING ADDITION TO THE LITERATURE OF STRUGGLE AND DISSENT.
`माय लाइफ अ‍ॅज अ ट्रेटर` ही कथा आहे झारा गहरमानी या सामान्य मुलीची. कैदेच्या अंधारात लुप्त झाल्यापासून तिथून पुन्हा स्वातंत्र्याकडे केलेल्या तिच्या निरतिशय धीट प्रवासाची. सदर विदारक प्रवास पूर्णत्वाला नेताना झारा स्वतःमधील सामथ्र्याबद्दल अनभिज्ञ होती; पण परिस्थितीनुरूप तिला आपल्यातलं ते सामथ्र्य जागृत करून त्याचा योग्य तो वापर करावा लागला. झारानं हे सगळं नेमकं कसं साधलं आणि एका सामान्य पर्शियन मुलीपासून ती एका धैर्यवान, करारी कार्यकर्तीमध्ये कशी रूपांतरित झाली, याची ही प्रेरणादायक कथा आहे.
म.स.प.-स.ह.मोडक उत्कृष्ठ अनुवादित ग्रंथ पारितोषिक २०१६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIZARAHGHAHRAMANIEKDESHDROHI #MYLIFEASATRAITOR #मीझारागहरमानीएकदेशद्रोही #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #RESHMAKULKARNI-PATHARE ZARAH GHAHRAMANI "
Customer Reviews
  • Rating StarVijay Gokhale

    फारच छान....

  • Rating StarKiran Borkar

    ही कथा आहे एका सामान्य मुलीची ,इराण मधील खोमेनीच्या जुलमी राजवटीविरुद्ध वागणारी झाराची ,तुरुंगात खितपत पडल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्याकडे केलेल्या प्रवासाची . या प्रवासात तिला स्वतःचे सामर्थ्य कळले आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याची जाणीव झाली .एका ामान्य पर्शियन मुलीपासून ती एका करारी कार्यकर्तीत कशी परावर्तित झाली याची हि कथा. माय लाईफ ऍज अ ट्रेटर या मूळ पुस्तकाचा सुंदर अनुवाद ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 29-01-2017

    ज्वलंत अनुभवांचे प्रखर आत्मकथन... स्थापित व्यवस्थेच्या विरोधात बोलताना, शासनाच्या विरोधात आंदोलन करताना त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याची खरंच आंदोलनकर्त्यांना कुठे कल्पना असते? जेव्हा अशाच एखाद्या आंदोलनात पकडले गेल्यानंतर देशद्रोही म्हणून बंिस्त केले जाते. जगाशी संपर्क तुटतो आणि एकांतवास भोगतानाच अनन्वित अशा अत्याचारांना सामोरे जावे लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्ण भावविश्वाची उलथापालथ होऊन जाते आणि स्वत:विषयीच्याच भ्रामक कल्पनांना धक्का बसतो आणि वास्तवात आपण परिस्थितीच्या विरोधात संघर्ष करण्यात किती दुबळे असतो, याची प्रकर्षाने जाणीव होते. या साऱ्यांचाच वास्तवदर्शी वेध आणि एक ज्वलंत अनुभव म्हणजे ‘मी झारा गहरमानी एक देशद्रोही’ हे पुस्तक. मूळची पर्शियन असलेल्या झारा गहरमानी या तरुणीने केलेले प्रांजळ आत्मकथन आणि तुरुंगवासात छळ भोगत असताना मनात उमटलेले विचार या पुस्तकरूपाने समोर येतात. रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी लेखिकेच्या भूमिकेत शिरून सारे प्रसंग लिहिल्याने अनुवादही चांगला झालेला आहे. ‘माय लाईफ अ‍ॅज अ ट्रेटर’ या मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रभावीपणे करण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्यासमवेत होऊ शकेल, अशा एका वातावरणात राहत असतानाही तिने ज्या पद्धतीने परिस्थितीचा सामना केला आहे. ते वाचताना आपणही झाराच्या भावविश्वाशी एकरूप होऊन जातो. या प्रवासात तिला सोबत असते ती सोहराब नावाच्या एका वेडसर कैद्याची. तो तिच्या वरच बंदिस्त असतो. सुरुवातीला ज्याला ती झिडकारत असते, तोच एकमेव संवादाचा आधार आहे, हे तिच्या लक्षात येते. त्यालाही नकळतपणे तिची काळजी वाटत असते. तो तिला वेळोवेळी सावधही करत असतो. त्याच्या प्रेमात तर आपण पडलो नाही ना, असेही तिला वाटून जाते. अशा झारा जेव्हा बाहेर पडते आणि मोकळ्या वातावरणात येते व घरी परत जाते तो प्रवास आपल्यालाही सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो. ...Read more

  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 18-12-2016

    झारा गहरमानी या सामान्य मुलीची ही आत्मकथा आहे. झारा ही एक सामान्य पर्शियन मुलगी. एव्हिन तुरुंगासारख्या भीषण ठिकाणी राहण्याची तिच्यावर वेळ येते. मात्र ती तेथून निसटते. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ती जी जिद्द दाखवते, ती निश्चितच स्तिमित करणारी आहे. तिचया या बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाचे दर्शनही या पुस्तकात घडते. एका सामान्य स्त्रीपासून एका धाडसी, निग्रही कार्यकर्तीमध्ये झालेले तिचे रूपांतरही या पुस्तकातून दिसते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more