* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MICHAEL JACKSON: THE MAGIC AND THE MADNESS
  • Availability : Notify Me
     
  • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
  • ISBN : 9788184987157
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 936
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SO MUCH HAS HOW BEEN SAID AND WRITTEN ABOUT THE LIFE AND CAREER OF MICHAEL JACKSON THAT IT HAS BECOME ALMOST IMPOSSIBLE TO DISENTANGLE THE MAN FROM THE MYTH. THIS BOOK IS THE FRUIT OF OVER 30 YEARS OF RESEARCH AND HUNDREDS OF EXCLUSIVE INTERVIEWS WITH A REMARKABLE LEVEL OF ACCESS TO THE VERY CLOSEST CIRCLES OF THE JACKSON FAMILY - INCLUDING MICHAEL HIMSELF. CUTTING THROUGH TABLOID RUMOURS, J. RANDY TARABORRELLI TRACES THE REAL STORY BEHIND MICHAEL JACKSON, FROM HIS DRILLING AS A CHILD STAR THROUGH THE BLOOMING OF HIS TALENT TO HIS EVER-CHANGING PERSONAL APPEARANCE AND BIZARRE PUBLICITY STUNTS. THIS MAJOR BIOGRAPHY INCLUDES THE BEHIND-THE-SCENES STORY TO MANY OF THE LANDMARKS IN JACKSON`S LIFE: HIS LEGAL AND COMMERCIAL BATTLES, HIS MARRIAGES TO LISA MARIE PRESLEY AND DEBBIE ROWE, HIS PASSIONS AND ADDICTIONS, HIS CHILDREN. OBJECTIVE AND REVEALING, IT CARRIES THE HALLMARKS OF ALL OF TARABORRELLI`S BEST-SELLERS: IMPECCABLE RESEARCH, BRILLIANT STORYTELLING AND DEFINITIVE DOCUMENTATION.
विजेचा वेग धारण केलेली त्याची नृत्यशैली अदभुत अशीच होती ताल सुरांच्या सुखद प्रकाशात तार सप्तकातल्या त्याच्या एकाहून एक अशा सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या रोमारोमात अनामिक बेहोशी भिनायची, त्याचा रंगमंचावरील देदीप्यमान वावर चाहत्याच्या संवेदनांचा ताबा घ्यायची. अशा या किंग ऑफ पॉप चा कलाकार म्हणून आणि त्याच्या आयुष्यातील काही घटनांमुळे वादग्रस्त व्यक्ती म्हणून करून दिलेला परिचय जितका परखड तितका हृदयस्पर्शी आहे.त्याचा व्यक्तिमत्व वास्तव्य आणि दंतकथा यातील सीमारेषा धूसर करणार आहे ते त्यामुळेच!!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MICHAELJACKSONEKJADUANIBEDUNDI #MICHAELJACKSON:#THEMAGICANDMADNESS #मायकलजॅक्सनएकजादूआणिबेधुंदी #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #RESHMAKULKARNI-PATHARE "
Customer Reviews
  • Rating StarSandeep Gaikwad

    कलाकारांच वैयक्तिक आयुष्य आपल्यासारख्या सर्व सामान्य लोकांना नेहमीच एका अलिबाबाच्या गुहेप्रमाणे आकर्षित करत असत, आणि कलाकार जर "King of Pop" मायकल जॅक्सन असेल तर आपल कुतूहल अजुन वाढत जात. जे.रँन्डी ताराबोरेली यांच्या "Michael Jackson - The Magic an The Madness" (पुस्तकाचा अनुवाद रेश्मा ओमर पाठारे) पुस्तकातुन "खराखुरा" मायकल डोळ्यासमोर उभा राहतो. जवळ जवळ हजार पानांच पुस्तक,एकुण १२ भाग आणि १५० प्रकरण पुस्तकात आहेत. जोसेफ आणि कँथरीनच्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मायकलची ही कहाणी आहे, सुरुवातीला आपल्या ५ भावांबरोबर ( जॅक्सन ५ ग्रुप) जर्मेन,जॅकी,टीटो,मार्लन सह आपल्या आवाजाच्या जादुची पखरण करणारा ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक बारीक सारीक घडामोडींचा, स्वत:च्या डोळ्यादेखत पाहीलेला जीवनप्रवास लेखकाने परखडपणे मांडलेला आहे. मायकल जॅक्सनच्या सानिध्यात आलेल्या जवळ जवळ प्रत्येक व्यक्तिच्या मुलाखतींमधुन मायकलच परिपूर्ण व्यक्तिचित्र लेखकान उभ केलय. आप्त स्वकीयांच्या नुसत्या मुलाखतींवरच अवलंबुन न राहता लेखकाने स्वत: त्याच्याबद्दल उठणा-या वावड्या,अफवा,त्याच्यावर झालेले आरोप यांच्याबद्दल संशोधन करुन लेखकाने अचुकपणे मायकलच चरीत्र तर मांडल आहेच पण स्वत:ची खरी मत ही तितक्याच ठामपणे (जे फार कमी आढळत) मांडायला लेखक कचरला नाही हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येत. मायकल जॅक्सनची जगप्रसिध्द गाणी आणि त्यांमागचा इतिहास, स्वत:च्या शरीरावर केलेल्या ढीगभर शस्त्रक्रियां,मायकलच्या समलैंगिक किंवा अ लैंगिक असण्याबद्दलच्या वावड्यां,. त्याच्यावर `पेडोफाईल`(लहान मुलांच लैंगिक शोषण करणारा.) असा ठेवण्यात आलेला ठपका असो, किंवा `नेवरलँन्ड` सारख जगाला विस्मयचकित करणार बांधकाम असो,त्याची प्रेम प्रकरण असो,लग्न असो,स्वत:च्या बापाबरोबरचा वैयक्तिक संघर्ष,आईवरील पराकोटीच प्रेम,आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीची,किंवा प्रसिध्दीसाठी विचित्र चाळे करणारा मायकल,पैशांच्या राशीत लोळत असतानाही आपल्या समाजबांधवांप्रती असलेली तळमळ आणि शेवटी शेवटी कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला परंतु परिस्थितीला हार न मानता पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रयत्न करतानाच चटका लावुन जाणारा मृत्यु असा मायकलचा जीवनप्रवास पुस्तकात अनुभवायला मिळतो. प्रस्तावनेतच लेखक मायकलच "एकटेपपणा" त्याच वागण,सुंदर अधोरेखित करतो. "तुमच्याकडे जर अमाप पैसा असेल - इतका की, त्यामधुन तुम्ही तुम्हाला पाहीजे ती; वाट्टेल त्या किमतीची गोष्ट विकत घेऊ शकाल - आणि त्यातही तुमच्या बेसुमार खर्चाबद्दल अटकाव करायला आणि त्यामागे दडलेल्या टोकाच्या असुरक्षिततेला ओळखून त्याबद्दल समुपदेशन करायला तुमचं कुणीच आप्तस्वकीय जवळ नसेल तर तुम्ही कसे वागाल?........" अफवांच्या जंजाळ्यात हरवलेला मायकल जॅक्सन शोधायचा असेल तर हे चरीत्ररुपी पुस्तक वाचायलाच हवं ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more