* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MICRO
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9789353172633
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 372
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : CRIME & MYSTERY, THRILLER / SUSPENSE
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THE VEIN OF JURASSIC PARK, THIS HIGH-CONCEPT THRILLER FOLLOWS A GROUP OF GRADUATE STUDENTS LURED TO HAWAII TO WORK FOR A MYSTERIOUS BIOTECH COMPANY—ONLY TO FIND THEMSELVES CAST OUT INTO THE RAIN FOREST, WITH NOTHING BUT THEIR SCIENTIFIC EXPERTISE AND WITS TO PROTECT THEM. AN INSTANT CLASSIC, MICRO PITS NATURE AGAINST TECHNOLOGY IN VINTAGE MICHAEL CRICHTON FASHION. COMPLETED BY VISIONARY SCIENCE WRITER RICHARD PRESTON, THIS BOUNDARY-PUSHING THRILLER MELDS SCIENTIFIC FACT WITH PULSE-POUNDING FICTION TO CREATE YET ANOTHER MASTERPIECE OF SOPHISTICATED, CUTTING-EDGE ENTERTAINMENT.
एका ऑफिसमध्ये तीन व्यक्तींचा रहस्यमयरीत्या मृत्यू होतो... केंब्रिज येथील एका जीवशास्त्र प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या सात जणांपैकी पीटरच्या भावाचा एरिकचा खून होतो...नॅनीजेनचा उपाध्यक्ष असलेल्या एरिकचा खून नॅनीजेनचा अध्यक्ष व्हीन ड्रेक आणि तेथीलच एक कर्मचारी अ‍ॅलिसन यांनी केल्याचा पीटरला संशय... हे सातजण नॅनीजेनमध्ये नोकरीसाठी दाखल झाल्यावर पीटरकडून उघड उघड संशय व्यक्त...त्यामुळे व्हीन ड्रेकचा संताप आणि त्या सात जणांचं ड्रेककडून अतिसूक्ष्म (एखादा ग्रॅम वजन भरेल एवढ्या लहान) आकारात रूपांतर... त्यांना ठार मारण्याचा ड्रेकचा उद्देश... पण त्या सात जणांचं तिथून नाट्यमय रीतीने पलायन... त्या सूक्ष्मावस्थेत ते फक्त दोन दिवस जिवंत राहू शकतात... मग मूळ आकारात परत येण्यासाठी सुरू होतो त्यांचा संघर्ष... ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का? जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का? पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का? त्या तीन व्यक्तींच्या रहस्यमय मृत्यूचा आणि या सातजणांच्या सूक्ष्मावस्थेचा काय संबंध असतो? एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो, या सगळ्या गुंतागुंतीचं थरारक, उत्कंठावर्धक चित्रण केलंय ‘मायक्रो’ या कादंबरीत.

No Records Found
No Records Found
Keywords
#मायक्रो #मायकेलक्रायटेन #रिचर्डप्रेस्टन #डॉप्रमोदजोगळेकर #रिकहटर #कॅरेनकिंग #पीटरजान्सेन #एरिकामॉल #अमरसिंग #जेनीलिन #डॅनीमिनोट #नॅनीजेन #व्हिनड्रेक #अ‍ॅलीसन #प्रे #स्टेटऑफफिअर #नेक्स्ट #पायरेटलॅटिट्यूडस #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #इंटरव्हेन्शन #दडेमनइनदफ्रीझर #पॉपी #सर्चिंगफॉरडॅडी #मीफुलनदेवी #माझेतालिबानीदिवस #वीरप्पन #असेघडलेसहस्रक #मेंदूआणिवर्तन #जॉर्जेसकॉस्मिकट्रेझरहंट #जॉर्जेससिक्रेटकीटूदयुनिव्हर्स #जॉर्जअँडदबिगबँग #MICRO #MICHAELCRICHTON #RICHARDPRESTON #PETERJANSEN #RICKHUTTER #AMARSINGH #KARENKING #DANNYMINOT #TANTALUS #JENNYLINN #NANIJEN #ALYSON #VINDREK #MIPHULANDEVI #GEORGESANDTHEBIGBANG #GEORGESCOSMICTREASUREHUNT #GEORGESSECRETKEYTOTHEUNIVERSE #SEARCHINGFORDADDY #PREY #NEXT #POPPY #CRISIS #CRITICAL #INTERVENTION #SEIZURE #TOXIN #STATEOFFEAR #THEDEMONINTHEFREEZER #ASEGHADALESAHASTRAK #CONTEGEN
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    होनोलुलूमधल्या एका बंदिस्त ऑफिसमध्ये तीन माणसे मृत्युमुखी पडलेले सापडतात. तिघांच्याही अंगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा होत्या.त्यातील एकजण नुकताच नॅनीजेन कंपनीच्या ऑफिसची गुप्त पाहणी करून आला होता. नॅनीजेन ही सूक्ष्मजीवशास्त्रावर संशोधन रणारी आघाडीची कंपनी आहे.हवाई बेटावर त्यांची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे.हवाईच्या घनदाट वर्षारण्यात त्यांचे संशोधन चालू आहे. नॅनीजेन केंब्रिजमधील सात विद्यार्थ्यांना हवाई येथे संशोधनासाठी आमंत्रित करते.त्यात पीटर ही आहे ...ज्याचा भाऊ नॅनीजेनचा उपाध्यक्ष होता आणि अचानक बोटीवरून नाहीसा झालाय. पीटर हा विषारी द्रवे आणि विषबाधा या विषयात तज्ञ आहे . रिक वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतोय .कॅरेन ही तरुणी कोळी विंचूसारख्या प्रजातीचा अभ्यास करतेय .एरिका किटकशास्त्र तज्ञ आहे.अमरसिंग हा वनस्पतींमधील हार्मोन्सवर अभ्यास करणारा तरुण आहे .जेनी ही तरुणी वनस्पती आणि प्राण्यांमधील रासायनिक संदेशवहन गंधाचा अभ्यास करतेय .तर डॅनी आकृतिबंधातील रचनात्मक बदल या विषयावर पीएचडी करतोय . असे हे सात विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांना नॅनीजनने केलेल्या अविश्वसनीय प्रयोगाची माहिती मिळते.त्याचबरोबर पीटरच्या भावाचा खून ड्रेक या नॅनीजेनच्या अध्यक्षांनी केलाय हे ही कळते . ड्रेक त्यांच्यावर आपला हुकमी प्रयोग करतो आणि त्यांना हवाईच्या घनदाट वर्षारण्यात सोडून देतो. आता ते सातजण आणि त्यांच्यासोबत प्रयोगात ओढला गेलेला नॅनीजेनचा एक कर्मचारी अश्या वातावरणात आहेत जिथे पावलोपावली मृत्यू आहे . त्यांची शारीरिक ताकद ही काही उपयोगाची नाही . त्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचाच वापर करून आपल्या मूळ स्वरूपात परतायचे आहे. मायकेल क्रायटन हे प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक . त्यांची ज्यूरासिक पार्क कादंबरी खूप गाजली . ही कादंबरी पूर्ण होत असताना मृत्यूने त्यांना गाठले तेव्हा रिचर्ड प्रेस्टन यांनी ही कादंबरी पूर्ण केली . ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 21-07-2019

    विद्यार्थ्यांची चित्तथरारक कहाणी... आपल्याकडे एखाद्या विशिष्ट वर्गाला गृहीत धरून पुस्तके लिहिण्याचे प्रमाण तसे विरळच आहे. पण इतर देशात अशा प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात लिहिले जाते आणि विशेष म्हणजे या लिखाणाला जगभरात प्रसिद्धी मिळते. जास्तीत जास्तभाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद होतात. अशाच प्रकारचे मायक्रो नावाची मायकेल क्रायटन आणि रिचर्ड प्रेस्टन या इंग्रजी लेखकांनी लिहिलेली मायक्रो कादंबरी. त्याचा मराठीत अनुवाद डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे. या कादंबरीचे कथानक हे केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथील सात पदवीधारक विद्यार्थ्यांच्या भोवती फिरणारे आहे, या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जगातली विलक्षण भरारी पाहायला मिळते. पण त्याचसोबत या मुलांचा साक्षात मृत्यूच्या कक्षेत प्रवेश होताना त्यांच्या हवाईच्या घनदाट अरण्याशी संबंध येतो आणि तिथे त्यांना आक्रमक मानवी हितसंबंधावर मात करून जगण्यासाठी निसर्गाच्याच विघातक शक्तीचा वापर करावा लागतो त्यचे वास्तववादी वित्रण, अंगावर शहारा आणणारी ही कादंबरी. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    सुक्ष्म जीवां वर संशोधन करणा-या नँनोजेन संस्थेतील एका अधिका-याच्या दुष्ट विचाराने नवू माणसांचे प्राण जातात त्यानेच निर्मित केलेल्या सुक्ष्म यंत्रा मुळे ह्या वर आधारीत कादंबरी,अतिशय रोचक!

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more