* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MIRACULOUS EFFECTS OF ACUPRESSURE
  • Availability : Available
  • Translators : MUGDHA GOKHALE
  • ISBN : 9788184984163
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ACUPRESSURE TECHNIQUE, WHICH HAS BEEN DERIVED DIRECTLY FROM THE PUNCTURE TECHNIQUE, HAS NOT BEEN AN UNKNOWN PROCEDURE BEFORE. ACUPRESSURE IS ONE OF THE SIMPLEST, EFFECTIVE AND SAFEST METHODS UNDER WHICH CERTAIN REFLEX POINTS ARE STIMULATED BY GIVING PRESSURE WITH THE HELP OF THUMB OR FINGERS OR WITH THE HELP OF SOME INSTRUMENTS SPECIALLY DESIGNED FOR THE PURPOSE WITH A VIEW TO RELIEVE THE BODY FROM ACHES, TENSION, FATIGUE, PAINS AND DISEASE WITHOUT ADMINISTERING ANY MEDICINE. WHENEVER ONE FALLS SICK, ONE HAS TO TAKE RECOURSE TO MEDICAL SCIENCE FOR THE TREATMENT OF THE DISEASE. IT IS OF IMMENSE IMPORTANCE TO EXPLAIN/UNDERSTAND IN THIS CONTEXT THAT THERE IS NO POINT OR EFFORT IN UNDERMINING THE EFFECTIVENESS OR SUITABILITY OF ONE PATHY OVER THE OTHER. ACUPRESSURE IS ONE OF THE OLDEST AND EFFECTIVE METHOD OF HEALING. IT IS BASED ON NATURE CURE. THE SIMPLE THEORY ADOPTED AND PRACTICED WHILE HANDLING A PATIENT IS THAT THE POWER TO HEAL ALL THE DISEASES IS PRESENT IN THE HUMAN BODY ITSELF. ALL THAT IS REQUIRED IS TO ACTIVATE THIS ENERGY AND DIRECT IT IN THE RIGHT DIRECTION. TO ACHIEVE IT, REFLEXOLOGY IS FOLLOWED WHILE HEALING THROUGH ACUPRESSURE.
विविध रोगांशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी आंतरिक शक्ती असते. या शक्तीस ओळखा, विविध व्याधींवर मात करण्यासाठी या शक्तीचा योग्य दिशेने वापर करण्यास शिका. यामुळे तुम्ही औषधांशिवाय तंदुरुस्त राहू शकाल. अ‍ॅक्युप्रेशर ही फक्त उपचारात्मक उपचार पद्धती नसून ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक व निदानात्मक उपचारपद्धती देखील आहे. या पद्धतीमुळे रोगाचे मूळ कारण नष्ट होते. ही पद्धती शिकावयास सोपी आहे व याचे कोणतेही अतिरिक्त परिणाम दिसून येत नाहीत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIRACULOUSEFFECTSOFACCUPRESSURE #MIRACULOUSEFFECTSOFACCUPRESSURE #मिरॅक्युलसइफेक्टस्ऑफअ‍ॅक्युप्रेशर #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MUGDHAGOKHALE #मुग्धागोखले #DR.L.C.GUPTA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JULY 2016

    अनेक विकारांचा रोगविलय नैसर्गिक उपचारांद्वारे... रोजच्या धबडग्यात अचानक एखाद्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि दैनंदिन जगण्याचा ताल-तोल बिघडून जातो. वेगवेगळ्या उपचारपद्धतींचे प्रयोग केले जातात, पण काही वेळा गुण पडतो, तर काही वेळा पडत नाही. कधी कधी शरर कोणत्याच उपचारपद्धतीला दाद देत नाही. त्यामुळे योग्य उपचारांचा शोध सुरू होतो. अशा वेळी कुणीतरी अ‍ॅक्युप्रेशर ही उपचारपद्धती घेऊन बघा असं सुचवतं, हेही करून बघू असं म्हणून माणसं त्याकडे वळतात आणि थोड्याच काळात त्यांचं शरीर अ‍ॅक्युप्रेशरच्या उपचारांना दाद द्यायला लागतं. आपल्या आसपास असं घडताना आपण अनेकदा बघतो. आजाराच्या मुळाशी जात, आपल्याला त्या आजाराशी लढायला आंतरिक बळ देत अ‍ॅक्युप्रेशर ही उपचारपद्धती आपल्याला वेदनामुक्त करू शकते. ही उपचारपद्धती नेमकी काय आहे, तिची मुलभूत तत्त्वे कोणती, ती आपल्या शरीरावर कशी काम करते, अ‍ॅक्युप्रेशरच्या दृष्टिकोनातून आपली शरीररचना कशी आहे, अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर यात फरक काय आहे. अ‍ॅक्युप्रेशरच्या दृष्टिकोनातून शरीरातल्या विविध बिंदूंची ओळख, कोणकोणत्या आजारात अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर केला जातो, तो कसा केला जातो, अशी सगळी तपशीलवार माहिती या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 25-06-2017

    रोगाना बरे करणारी जीवनऊर्जा... ‘आरोग्यम् धनसंपदा!’ असे प्राचीन कालापासून समजले जाते. ही बाब आपण सर्वांनाच माहीत आहे. निरोगी व्यक्तीच निरोगी समाज घडवू शकतात. आपल्या समाजातील व पर्यायाने देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असेल याची काळजी घेणे फार महत्त्वचे ठरते. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी यांपैकी कोणत्यातरी एका शाखेचे औषधोपचार सुरू करावेत, हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेवर आणि त्या विशिष्ट शाखेवरील विश्वासावर अवलंबून असते. पुरातन कालापासून निर्माण झालेल्या किंवा कालौघात विकसित झालेल्या अनेक वैद्यकीय शाखांपैकी अ‍ॅक्युप्रेशर ही सर्वांत जुनी आणि परिणामकारक अशी उपचारपद्धती आहे, असे म्हणणे अनुचित ठरणार नाही. ही उपचार पद्धती पूर्णपणे निसर्गोपचारावर आधारित आहे. या उपचार पद्धतीत कोणतीही औषधे घ्यावी लागत नसल्यामुळे त्याचे अतिरिक्त परिणामही (Side effects) नसतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या जोडीने इतर कोणत्याही पॅथीचे औषधोपचार चालू ठेवता येतात. काही कालावधीनंतर ही औषधे वैद्यकीय सल्ला घेऊन कमी करता येतात अथवा बंद करता येतात. साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी भारतात या उपचार पद्धतीचा उगम झाला व नंतर चीनमध्ये या पद्धतीचा शास्त्रशुद्ध विकास झाला, असे मानले जाते. नंतर या उपचार पद्धतीची परिणामकारकता लक्षात आल्याने तिचा प्रसार व अवलंब जपान, इंडोनेशिया, थायलंड, कोरिया, श्रीलंका, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा इत्यादी अनेक देशात झाला. अ‍ॅक्युप्रेशर ही उपचारपद्धती ज्या तत्त्वावर आधारित आहे. ते तत्त्व म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांना बरे करणारी जीवन ऊर्जा (Vital force) होय. ही जीवन ऊर्जा आपल्या शरीरातच असते. याच जीवन ऊर्जेस कार्यान्वित करून योग्य दिशा देण्याची गरज असते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशरचे तंत्र रिफ्लेक्सॉलॉजीच्या (Reflexology) तत्त्वावर आधारित केलेले आहे. या तत्त्वानुसार शरीरातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या अवयवांशी निगडित असलेले प्रतिक्षिप्त बिंदू (Reflexpoints) हाताच्या व पायाच्या तळव्यांवर असतात. या बिदूंना ‘उत्तेजक बिंदू’ असेही म्हणतात. एखादा आजार झाल्यास त्या विशिष्ट अवयवाशी निगडित असलेले हे बिंदू संवेदनशील (Sensitive) व थोडेसे दुखरे बनतात. हे बिंदू दाबल्यास त्याठिकाणी थोडेसे दुखते. जपानमध्ये अ‍ॅक्युप्रेशरला शिआत्सु (Shiatsu) असे म्हणतात. या शब्दातील ‘शि’ (Shi) या शब्दाचा अर्थ ‘हाताचे बोट’ असा असून ‘आत्सु’ (Atsu) या शब्दाचा अर्थ ‘दाब’ असा आहे. थोडक्यात अ‍ॅक्युप्रेशर म्हणजे हाताची बोटे किंवा अंगठ्याच्या साहाय्याने विशिष्ट बिंदूवर दिलेला दाब. दाब देणे सोयीचे व्हावे म्हणून विविध साधनांची निर्मिती करण्यात आली. या उपकरणाविषयी विस्तृत माहिती स्वतंत्र विभागात दिलेली आहे. आयुर्वेदाच्या महत्त्वाच्या अध्वर्यूपैकी चरक या ऋषींनी ग्रीस येथील युनान, इजिप्त येथील मिस्त्रा, तुर्कस्थान व रोम येथील विविध चिकित्सकांच्या मदतीने अ‍ॅक्युप्रेशरचा वापर करून मज्जसंस्थेशी निगडित, रक्ताभिसरण संस्थेशी निगडित अशा रोगांचे निवारण करण्याचे प्रतिपादन केले आहे. तसेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी व स्नायूंना बळकटी आणण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशरच्या वापराचे समर्थन केलेले आहे. अ‍ॅक्युप्रेशरची परिणामकारकता व त्याचे फायदे लक्षात आल्यामुळे विविध वैद्यकीय शाखांचे अनेक तज्ज्ञ यामध्ये रस घेऊ लागले आहेत. अ‍ॅक्युप्रेशर या उपचार पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे ही उपचार पद्धती फक्त रोग निवारण करण्यापुरतीच मर्यादित नसून अ‍ॅक्युप्रेशरमुळे रोग होण्यासही प्रतिबंध करता येतो. घरच्या घरी, रोज किंवा आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस दहा ते पंधरा मिनिटे अ‍ॅक्युप्रेशरचा सराव करून अनेक रोगांना प्रतिबंध करता येतो. सुरुवातीस अ‍ॅक्युप्रेशरचे तंत्र एखाद्या तज्ज्ञ चिकित्सकाच्या देखरेखीखाली शिकून घ्यावे. त्यामुळे अ‍ॅक्युप्रेशरचे बिंदू शोधणे, तसेच एखाद्या बिंदूवर किती प्रमाणात व किती कालाकरिता दाब द्यावा या महत्त्वाच्या बाबींचे योग्य ज्ञान होते. बिंदू उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असून याच बिंदूंवर दाब दिल्यास रोगनिवारण होते. उपचार करताना नवशिक्या चिकित्सकाने हाता-पायांच्या तळव्यांवरील हे बिंदू योग्य प्रकारे ओळखल्यानंतर त्या बिंदूंवर स्केचपेनच्या साहाय्याने एखादी खूण करून ठेवल्यास उपचार करणे अधिक सोपे जाते. अशा प्रकारे या विशिष्ट बिंदूंवर दाब दिल्यास दुखणे, हे त्या बिंदूशी निगडित अशा विशिष्ट अवयवाचे कार्य नीट चालत नसल्याचे निदर्शक असते. अशा प्रकारे रोगाची लखणे दिसू लागण्याआधीच अ‍ॅक्युप्रेशरच्या मदतीने निदान होऊ शकते. या दुखणाऱ्या विशिष्ट बिंदूंवर योग्य प्रकारे दाब दिल्याने तो रोग दूर होतो. दाब देणे सुरू केल्यानंतर काही दिवसात या विशिष्ट बिंदूंचे दुखणे हळूहळू कती होत जाऊन बंद होते. हे रोग बरा झाल्याचे निदर्शक असते. रोग नाहीसा होताच बिंदूंमध्ये होणारी वेदनादेखील बंद होते. अ‍ॅक्युप्रेशरचे तंत्र फक्त रोगनिवारक आणि रोगप्रतिबंधक नसून निदानात्मक सुद्धा आहे, असे म्हणणे अनुचित होणार नाही. या तंत्राच्या साहाय्याने तज्ज्ञ चिकित्सकाच्या देखदेखीखाली रोगनिदान करता येऊ शकते. त्यासाठी प्रयोग शाळेतील विविध चाचण्या करण्याची, तसेच या चाचण्यांवर अधिक पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. मात्र शरीरातील अति महत्त्वाच्या अवयवांशी संबंधित विकार (उदा. हृदय, मूत्रपिंडे, मेंदू इ.) असल्याची शंका आल्यास इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थित व योग्य त्या तपासण्या करून घेऊन अचूक निदान झाल्यावरच अ‍ॅक्युप्रेशरचे उपचार सुरू करणे सुरक्षित असते, अन्यथा गंभीर परिस्थिती ओढवू शकते. एकदा अचूक निदान झाले की मग अ‍ॅक्युप्रेशरचे उपचार अत्यंत सुरक्षित असतात. आधीपासून अ‍ॅलोपॅथीचे उपचार सुरू असताना अ‍ॅक्युप्रेशरचे उपचार सुरू केल्या अ‍ॅलोपॅथीची औषधे एकदम बंद करू नयेत. ती औषधे चालूच ठेवावीत. अ‍ॅक्युप्रेशरच्या उपचारांचे परिणाम दिसून येऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे हळूहळू कमी करावीत. विशेषत: हृदयाशी संबंधित विकारांबाबत अगदी हळूहळू अ‍ैषधे कमी करणे फायदेशीर ठरते. रुग्णाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतरही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी अ‍ॅक्युप्रेशरचे उपचार घेत राहावे. तसेच डॉक्टरी सल्ल्याने इतर औषधांचा कमीत कमी डोस घेत राहणे फायद्याचे ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more