* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619443
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW RANJIT DESAI AS A VERSATILE WRITER HE GOT HIS NAME AND FAME BECAUSE OF THE NOVELS, STILL HE STARTED HIS CAREER AS A WRITER WITH SHORT STORIES. DURING THE EARLY YEARS, HE MAINLY FOCUSED ON THE RURAL LIFE AND THE REALITIES THEREIN. LATER ON, HE TRIED TO WALK ON THE PATH OF HISTORY GIVING US WONDROUS STORIES WITH MAJESTIC ENVIRONMENT. HE SKETCHED PICTURES OF WELL KNOWN PERSONALITIES IN THE FIELD OF MUSIC AND ART. LATER ON, HE SWITCHED OVER TO STORIES WITH MORE STRESS ON NATURE, STARS ETC. MORPANKHI SAWALYA IS A COLLECTION OF 15 STORIES OF DIFFERENT ANIMALS, USED TO THE NATURE. THE PECULIARITY OF THESE STORIES IS THOUGH THEY ARE WRITTEN BY A HUMAN NOT EVEN A SINGLE HUMAN BEING COMES INTO OUR SIGHT THROUGHOUT AFTER GOING THROUGH THE WONDERFUL NATURE PICTURED BY RANJIT DESAI, WE WILL ONCE AGAIN REALISE HIS GREATNESS.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाNया मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाNया काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPrachi Kadam- Pustak Bistak

    श्रीमानयोगी,राधेय,पावनखिंड,स्वामी,लक्ष्यवेध या आणि यांसारख्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांपेक्षा हे एक आगळं वेगळं निसर्गावर, त्याच्या सान्निध्यात राहणा-या प्राणी पक्ष्यांवर आधारित आणि विशेष म्हणजे मानवविरहित असं छोटसं पुस्तक. खरं तर मानवविरहित असलं तरी माणाच्या स्वभावाचं पुसटसं दर्शन घडवून जातं. वसंत आगमनाची चाहूल, पावसाच्या सरींनी तुडुंब भरून वाहणा-या वाहिनीचा आनंद, सागराच्या उन्मत्तपणाला मर्यादा आणू पाहणारी खडकाळी, उतार वयातही आपला स्वाभिमान डगमगू न देता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणारा गरूड, उन्हाने पर्णहीन आणि एकाकी झालेली सावर, खूप प्रयत्नांती खेकड्याची शिकार केलेल्या कोल्होबाचं सुख, अंधारातून प्रकाशाकडे झालेला ससोबाचा प्रवास आणि शेवट, कोंबड्याची पहाटेची बांग आणि प्राणी जगताची जंगलातील सकाळ, हुप्प्यांची,खारूताईची पळापळी, अशा मस्त कथांनी खिळवून ठेवणारं हे पुस्तक वाचायला निसर्गप्रेमींना नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पशुपक्ष्यांचे अंतर्मन व्यक्त करणाऱ्या प्राणिकथा रणजित देसार्इंच्या कथालेखन प्रवासाला एक विशिष्ट वळण मिळाले ते ‘मोरपंखी सावल्या’मुळे. प्राणी जीवनावरील हा अनोखा कथासंग्रह १९८४ मध्ये वाचकांसमोर आला असून त्यात पंधरा प्राणिकथा आहेत. ‘‘या संग्रहातील कथा मझ्या आजवरच्या इतर कथांच्यापेक्षा जरा निराळ्या आहेत. मानवविरहित निसर्ग आणि त्या सावलीत वाढणाऱ्या या प्राणिकथा आहेत.’’ असे त्यांनी स्वत:च सुरुवातीला नमूद केलेले आहे. ग्रामीण समाजाला निसर्गाचे सान्निध्य सहज-सुलभ असते. निसर्गाशी जमवून घेत व प्रसंगी निसर्गाशी झुंज घेत ग्रामीण भागातील लोकांना जीवन व्यतीत करावे लागते. पशु-पक्षी-कीटक इत्यादींसह येणारा ग्रामीण जीवनातील निसर्गाचा घटक अपरिहार्यपणे स्वीकारावा लागतो. पर्यायाने याचे प्रतिबिंब मग इतर वाङ्मय प्रकारांप्रमाणेच कथेतही पडल्याचे दिसून येते. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या प्रमाणेच रणजित देसार्इंच्या कथांमधून निसर्गाची अशी रेखाटने पाहावयास मिळतात. रणजित देसार्इंच्या निसर्गकथांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांत निसर्गाला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा निसर्ग जीवनाशी एकरूप झाल्यासारखा भासत नाही. कथांतील घटनांमधून निसर्ग डोकावण्याऐवजी निसर्गाच्या आधारेच घटना घडत राहते. एखाद्या पक्ष्याचा, प्राण्याचा किंवा किटकाचा उल्लेख येतो आणि ज्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडत असते, त्या निसर्गाचा आत्मस्पर्शी साक्षात्कार होऊन जातो. लघुकथा आणि लघुनिबंध यांच्यामधील सीमारेषा पुसट ठराव्यात, अशा प्रकारचे वर्णन या तीन निसर्गचित्रणामध्ये पहायला मिळते. कारण इतर कथासंग्रहांप्रमाणे कथानक, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णन, वातावरणनिर्मिती इत्यादी घटकांद्वारे कथा फुलत न जाता ती निसर्गाच्या माध्यमातून विकसित होताना दिसते. पण प्रत्येक कथेत एखादा प्राणी आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर साकार होतो. वाघ आणि माकड यांच्यातील परस्पर संबंधांविषयीची जिज्ञासा ‘जिज्ञासा’ या कथेत आढळते. तर गरुडाचे जगणे, राजेपण, जगण्यातील आब, कालांतराने येणारे वार्धक्य, त्या जाणिवेने झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय, हे सर्व ‘निर्णय’ या कथेत सूचक शब्दात चित्रित झालेले आहे. ‘कीड’मध्ये छोट्या आणि मोठ्या गव्यांतील रोमांचकारी संघर्ष चित्रित झालेला दिसतो. माणूस जसा नेहमी सुखासाठी धडपडतो, तसेच प्राणीही नेहमी सुखाची अपेक्षा करीत असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार एक जीव सुखासाठी दुसऱ्याच्या जिवावर अवलंबून असतो. ‘सुख’ या कथेतील कोल्हा खेकड्याची शिकार साधण्यासाठी अविश्रांत धडपडतो. नाना युक्त्या योजून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पाठलाग, खेकड्याचे सापडणे, निसटणे, शेवटचा रंगलेला अटीतटीचा सामना, बऱ्याच कष्टाने यशप्राप्ती झाल्याने कोल्ह्याला झालेला आनंद हे सर्व ‘सुख’मध्ये लेखक नाट्यपूर्ण रीतीने रंगवितो. वृद्धत्वाची सूचकता समर्थपणे प्रकट करणारी ‘पर्णहीन’, शिकार साधल्याच्या आनंदाची सूचना देणारी ‘अंधारातून उजेडाकडे’ किंवा हरिणांची प्रेमकहाणी असणारी ‘मृगजळ’ इत्यादी सर्व कथांतून झाडे, नदी, पाणी, ऊन, सावली, वारा, ओहोळ, झरा, वाघ, माकडे, कोल्हे, तरसे, चितळे, वाघळे, ससे, घुबडे, हरीण, मासे, कोंबड्या, गरुड, कावळे, कुत्री, चिमण्या यासारख्या निसर्गघटकांचे अस्तित्व पहायला मिळते. लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची आणि निसर्ग घटकांविषयीच्या चिंतनशीलतेची प्रचिती यातून येते. आटोपशीरपणा, प्रतिकात्मकता आणि सूचकता ही प्रमुख वैशिष्ट्ये यातील प्रत्येक कथेत आढळतात. लेखकाचा शिकारीचा नाद व त्याविषयीची जाण याचाही उपयोग प्रस्तुत कथालेखनासाठी झाल्याचे जाणवते. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या अंतर्मनात शिरुन त्याची उकल करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथासंग्रहात पणाला लागलेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more