* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MRUDGANDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662740
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN AUTHOR HAS FREELY EXPRESSED HIS FEELINGS FOR INDIRA SANT IN THE FOLLOWING WORDS. `I MYSELF HAVE HANDLED CREATIVE WRITING IN MY `TOKONOMA`, HEERVI MANE`, AND `CHIVARICHI PHULE`; I AM PROUD OF MY WORK. YET, I TRULY FEEL THAT I WOULD NEVER BE ABLE TO WRITE LIKE YOU. YOUR WRITING HAS ITS OWN STYLE. IN OUR CHILDHOOD DAYS, WE WERE GREETED WITH JAGGERY AND WATER WHEREVER WE MAY GO IN KONKAN. THE MERE SIGHT OF THE GLASS FULL OF WATER AND THE PIECES OF JAGGERY WERE ENOUGH TO TAKE AWAY ALL MY TIREDNESS. TOGETHER, THESE THINGS REVEALED AFFECTION AND THE CULTURAL SIMPLICITY. YOUR ARTICLES RESEMBLE THAT COMBINATION, BRINGING THE AFFECTION BACK. FOR EXAMPLE, LET US DISCUSS YOUR ARTICLE `LALA GOJIRA PAKHRANCHA`. HARDLY ANY MALE OR FEMALE WRITER WILL COME UP WITH THE IDEA OF INTRODUCING THE BIRDS WHILE ON THE LAP OF THE MOTHER. ONCE STARTED IN THIS MANNER, THE STORY CONTINUES FURTHER WITH REFERENCES OF MANY BIRDS BRINGING BACK THE MEMORIES OF MANY TENDER MOMENTS OF YOUR LIFE; RIGHT FROM THE SMALL BOWLS OF WATER FOR THE SPARROWS TO THE BIRDS CROWDING ON THE ELECTRICITY WIRES OVER HEAD. WITHOUT ANY INTENTION, THE TIME RUNS OUT, REVEALING THE SECRETS OF TENDER AGES, MOMENTS OF HAPPINESS IN THE COMPANY OF THE BIRDS, TOTALLY UNAWARE OF IT, JUST LIKE THE BIRDS WHO ARE UNAWARE OF THEIR FLYING. THIS UNAWARENESS MAKES THEIR FLYING SO ADORABLE. BUT WHEN A SPARROW IS STUCK IN A ROOM AND WHEN SHE TRIES TO COME OUT OF THE ROOM, TO FIND OUT A WAY FROM THE ROOM, THEN HER FLYING LOSES ITS GRACE. I FIND YOUR ARTICLES RESEMBLING THE INBORN BEAUTIFUL AND GRACEFUL FLYING OF THE BIRDS...
‘‘....मीही ललित लेखन खूप केले आहे. ‘तोकोनामा’, ‘हिरवी उने’, ‘चिवारीची फुले’ या पुस्तकांचा मला अभिमानही आहे. पण ‘असे लिहिता आले नसते’ हे खरेच आहे. तुमच्या या लेखांना एक प्रकृती आहे. आमच्या लहानपणी कोकणात गूळपाण्याने स्वागत व्हायचे, पण त्यातला आपलेपणा, गोडवा आणि सांस्कृतिक सहजता फार भावायची. त्या गूळपाण्याच्या गडव्याच्या नुसत्या दर्शनाने सात-आठ मैल चालून आल्याचे श्रम पार पळून जायचे. तसे काहीतरी तुमच्या या लेखांत आहे. तुमचा ताजा ‘लळा गोजिरा पाखरांचा’ हा लेखच, उदाहरणार्थ, पाहू या. पाखरांची ओळख आईच्या मांडीवर (‘इथं इथं बैस, रे, मोरा’) अशी सुरुवात करण्याची कल्पना आम्हां पुरुष लेखकांना नाही सुचणार, पण किती लेखिकांना तरी सुचेल? अशी सुरुवात झालेला लेख या अंगानेच पुढे जातो. ‘येरे येरे काऊ’ .... तुळशी कट्ट्यापासची दगडी खल, ‘विजेच्या तारांच्या तोरणमाळा’.... हा लेख नुसताच पाखरांना भेटत जात नाही. तुमच्या जीवनातल्या अनेक सूक्ष्म स्मृती फुलवत जातो, आणि असा जातो, की असे काही होत आहे, याची त्याला जाणच नसते. पाखरांना स्वत:च्या उडण्याची जाण असते का! नसावी — म्हणूनच त्यांची हवेतली आंदोलने इतकी गोड वाटतात. खोलीत अडकलेली चिमणी बाहेर सटकण्यासाठी न सापडणारी वाट शोधते, तेव्हा तिची ती भ्यालेली जाणीव तिच्या उडण्यातले सारे सौंदर्य हिरावून घेत असते— नाही का? तसे, पाखरांच्या साहजिक उडण्यासारखे तुमचे हे लेख मला वाटतात....’’ प्रभाकर पाध्ये
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUDGANDH #MRUDGANDH #मृद्गंध #ESSAYS #MARATHI #INDIRASANT #इंदिरासंत "
Customer Reviews
  • Rating StarMADHURA 12-01-2005

    काही वर्षांपूर्वी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये श्रीमती इंदिरा संत यांच्या बरेच दिवस चाललेल्या ‘मृदगंध’ सदरातील लेख जेव्हा पुस्तकरूपाने माझ्या हातात आले, तेव्हा मी अगदी भारावून गेलो. हे भारावलेपण त्यांच्या अनेक लेखांमुळे, त्यातल्या प्रसंगांमुळे, आठवणींमुळे हते. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक कडू-गोड आठवणींचा ‘मृदगंध’ हा जणू गंधगाभाराच! अगदी त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर मुक्तागणात उमटलेले अम्लान इंद्रवलयच! ‘गंधगाभारा’ लेखातून इंदिरा संत अलगदपणे आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीच्या वासाची कुपी उघडतात. त्या आपल्याला कधी ओव्यांतून भेटतात, तर कधी तवंदीतल्या पाणंदीच्या वाटेवरून चालताना आसपासचा निसर्ग असा टिपतात, की वाचणाऱ्याची पावले जणू पाणंदीचीच वाट चालू लागतात. ‘खिडकी’, ‘घर कौलारू’ लेखांतून त्या निर्जीव वस्तूंकडेही विलक्षण सजीवतेने पाहतात. पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा त्यांच्या अनेक लेखांतून जाणवतो. वडीलधाऱ्यांच्या जबर धाकात वाढलेल्या इंदिरा संत आपले तवंदीतले बालपण, तिकडच्या आठवणी, ‘तांब्याचा एक पैसा आणि बायबल’, ‘एका रुपयाची कहाणी’, ‘थोरली आई’ अशा अनेक लेखांतून हळुवारपणे उलगडतात. पुढे पुण्यातल्या महाविद्यालयीन शिक्षण, संतांसोबतच्या गाठीभेटी, त्यांच्यातील नकळत फुलत जाणारे प्रेम, मग लग्न, संसार, मुले, मुलांच्या आठवणी, आजारपण, आयुष्यातले अनेक कठीण प्रसंग... या साऱ्या गोष्टींवर इंदिरा संत अगदी मनापासून लिहितात. या साऱ्यांतून त्या निसर्गातले सौंदर्य टिपायला कधीच विसरत नाहीत. ज्या गावी जातील, तिथल्या निसर्गाशी त्या निरागसपणे मैत्रीचे नाते जोडतात. रानफुले, पायवाटा, अगदी कारल्याचा वेल हाही त्यांच्या लेखाच विषय आहे. त्या त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक जीवनातले अनुभवही स्पष्टपणे लिहितात. शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार, मते खरेतर आजच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवू शकतात. तत्कालीन लेखक, कवींच्या तसेच त्यांच्या अनेक परिचितांच्या, सुहृदांच्या आठवणीही खूप छान आहेत, विशेषत: बोरकरांच्या आठवणींत इंदिरा संत विलक्षण रमतात. या साऱ्यांतून एकच जाणवते, की मुलगी, विद्यार्थीनी, प्रेयसी, पत्नी, आई, शिक्षिका, कवयित्री, संमेलनाध्यक्षा आणि या साऱ्यांपेक्षाही एक संवेदनशील स्त्री म्हणून इंदिरा संतांनी प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीने आणि जबाबदारीने समरसून निभावलेली आहे. त्यांनी टिपलेले क्षण, प्रसंग वाचून असे वाटते, की कोणीतरी नाजूकशा हाताने जणू प्राजक्ताचा सडा वेचतेय आणि त्या गंधभरल्या फलांनी आपल्याच मनाचा गाभारा घमघमतोय. -अतुल बाचीकर, पुणे ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 10 -05 -1987

    निसर्गाचे सहजगान गाणाऱ्या एका कलावंताच्या लेखणीतून साकारलेलं शब्दशिल्प म्हणजे ’मृद्गंध’. ‘मृद्गंध’ ची प्रकृती ललित लेखनाची असली तरी त्यातून आत्मकथनाचा घाट स्पष्टपणे दिसतो. उभ्या आयुष्यातील अनेक गतस्मृती या लेखातून शब्दबद्ध झाल्या आहेत. कवितेच्या माध्मातून सूक्ष्मतरल भावना आणि त्यांची स्पंदन टिपण्याचं कौशल्य इंदिराबार्इंजवळ निखालस आहे, पण तितक्याच सहजतेने त्यांनी हा काव्यात्मक ललितलेखांचा घाटही कांकणभर सरसतेनं हाताळला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्त होणार नाही. आपल्या स्मृतींच्या कंगो-यांनी त्यांनी तवंदीसारख्या लहानशा खेडयाचा परिसर सजग केला आहे. त्यांच्या स्मृतीचा एक धागा सतत तवंदीभोवती गुंफलेला असल्यानं त्यांच्या लेखनाला एक आगळंवेगळ,- परिमाणही प्राप्त झालं आहे. त्यात प्रांतिक शब्द वैशिष्टयांची झळाळी असल्याने एक वेगळेपणही लाभलं आहे - स्मृतिपटलांच्या वलयातील अनेक भावकण त्यांनी आपल्या आशयगर्भ शब्दसंभारानी समृद्ध केले आहेत. म्हणूनच ‘मृद्गंध’ चा आस्वाद घेताना वाचकही नकळत त्यातील भावजीवनाशी तादात्म्य पावतो. आत्मलेखनात्मक लेखन करणे हे थोडेसे अवघड असते. कारण बालपणापासून उत्तर आयुष्यापर्यंतचा पट रंगवताना वर्तमानातून भुतकालीन घटनांचा वेध घेतल्यामुळे त्या निवेदनात्मक स्वरुपातून सरळ दिशेने न येता वर्तमानकालीन जाणिवेच्या परिमितीतून मांडाव्या लागतात. हे सूत्र इंदिरातार्इंनी सदैव पाळलेले आहे. त्यांचे लेख कुठेच व्यक्तिकेंद्री झाले नाहीत तर आत्मकथनातून इतर व्यक्तीचे स्वभावविशेषही रेखले गेले आहेत. आत्मलेखनात आत्मशोधनाला महत्व असतेच. त्यांच्या एकूण लेखांचा आलेख काढला तर चिंतनशीलता आणि जीवनविषयक दृष्टिकोन लख्खपणे जाणवतो. अवघ्या जीवनात भले-बुरे अनुभव घेता घेता विचार बदलत अथवा विकसित होत गेलेले निश्चितपणे जाणवतात. १९८४ मध्ये कोल्हापूरच्या रविवार सकाळमधून सलगपणे साठ आठवडे हे ललित लेख प्रसिद्ध झाले. इंदिराबार्इंनी जीवाचे आत्म कवितासखीला ऐकवले आणि सहृदय रसिकाच्या काळजाला ते नेहमीच भिडले ‘मृद्गंध’ वाचत असताना. पावसाच्या पहिल्या सरीने आसमंतात भरुन राहिलेला मातीचा सुगंध भरभरुन मनात साठवावासा वाटतो. तसाच ‘मृद्गंध’ची दखल कितीदाही भरुन घेतली तरी परत परत आस्वादावी वाटतो. आपल्याशी केलेला संवाद ‘मृद्गंध’च्या ऋणानुबंधात निर्देश करताना, इंदिराबार्इंनी आपल्या या अशा लेखनाविषयी म्हटलंय की. विसरुन जाणारे हे लेखन त्या त्या स्वभाव धर्माचे अवतीभवतीच्या स्वभावधर्मावर आधारलेले’’ परंतु त्यांचे हे लेखन आपल्या मनात घर करुन रहाते कारण सहजता हा या सर्व लेखांचा स्वभावधर्म आहे हे ललितलेखन म्हणजे कवितेसारखेच पण जरा मोकळेपणाने केलेले काव्यात्मलेखन आपलाच आपल्याशी केलेला संवाद. तवंदीने त्यांना निसर्गावर प्रेम करायला शिकवले. निसर्गातील हिरवाई आणि गंधाचे वेड त्यांना लहानपणापासूनच, मनात साठवलेल्या लहान वयातील तवंदीच्या आठवणीत गंधाचे वेड त्या ‘गंधगाभारा’ मध्ये सांगतात. गंधगाभारा, झरा आठवणींचा या लेखातून तवंदीतील बालपणीच्या स्पर्श, रुप, रस, गंधाच्या आठवणी सजग होतात, त्यांच्या दृष्टीने तवंदी गावालाच एक छानसा वास असायचा. दगड मातीवरुन येणाऱ्या झळांचा वास, घराघरातून येणारा कडवट धुराचा वास, रॉकेलच्या चिमणीचा वास तव्यावर परतल्या जाणाऱ्या खमंग कोरड्याशाचा वास हे सगळं मिळून तवंदीचा वास हा वास आईच्या मायेसारखा मनात सुखाने उतरुन राहिला आहे. म्हणूनच म्हणते माझ्या गंधगाभाऱ्याचे मूळ तवंदीत आहे.’’ झरा आठवणींचा या लेखातील त्यांची लहानपणीची भातुकली, कलाकुसरींची ‘आर्ट गॅलरी’, भेंडाची बैलगाडी हे सारे वर्णन एका वेगळयाच बालविश्वात नेऊन सोडते. इंदिराबार्इंची निरीक्षणशक्ती अचूक आहे. सुपातले धान पाखडतानाचे त्यांनी केलेले वर्णन मुळातच वाचायला हवे. त्याविषयी त्या म्हणतात, ‘त्या अंगणात सामावलेले रंगबावरे नर्तन, ती स्वर-लय-तालाची मनोज्ञ वळणे हे मला या मुक्तांगणात उमटलेले इंद्रवलय वाटते. ओवी हा त्यांचा जीवाभावाचा विषय. खेड्यात तर ओवी जात्याच्या घरघरीबरोबर घराघरातून पहाटेपासूनच सूर धरते. ओवीला इंदिराबाई ‘अनाम माऊलीची भावगाथा’ म्हणतात. ‘चांदीच्या ताटामधी फूल दाशाळाचे लाल त्याच रंगाची चोळीधाडा भाऊराया’’ अशी भावगर्भ ओवी त्यांच्या हाती लागते, तेव्हा त्यांना चांदीच्या ताटात दाशाळाचे (जास्वंदीचे) लालभडक फूल ठेऊन त्याचे उमटलेले तेज पाहावेसे वाटते आणि त्या ते कृतीतही आणतात. ‘वाट पाणंदी’ ची मध्ये त्यांना पाणंद म्हणजे एक अवगुंठनवती निसर्गकन्या भासते. तवंदी आणि बेळगाव ही दोन्ही गावे त्यांना कर्मभूमी आणि स्वप्नभूमीसारखी भासतात. इथल्याच हिरव्या डोंगरदऱ्याचे आणि लाल मातीचे संस्कार त्यांनी घेतले आहेत. पुढील आयुष्यात इंदिराबार्इंनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला. मनावरची ओझी, मुलांचे संगोपन, तांब्याचा एक पैसा आणि बायबल, लळा गोजिऱ्या पाखरांचा या लेखातून त्यांची विद्यार्थीदशा उलगडत जाते. हरीमंदिराच्या वाटेवरील शाळकरी आणि कॉलेजमधल्या मुलामुलींना पाहून त्यांच्या मनात एक वेगळाच विचार येतो. या हसऱ्या फुलांना कोणत्या वैफल्याची कीड लागली आहे? आपल्या मनावरचे ओझे असेल ते कुठेतरी टांगून ठेवून आपण निश्चित मोकळे व्हायचे ही प्रवृत्ती तर बळावत चालली नसेल ना! आणि असे जर असेल तर त्या अज्ञानातून निर्माण झालेल्या आणि अगतिकतेतून बाहेर पडू बघणाऱ्या अंधश्रद्धेपेक्षा ही परिस्थिती अधिक भयानक आहे असे त्यांना वाटते. आजचे युग यंत्राचे आहे. या युगाने माणसाच्या जीवनात अनेक सुविधा दिल्या पण त्याबरोबर एक शापही दिला - स्पर्धेचा असे त्यांना वाटते. दांपत्यातील मैतर ‘संसारा’संबंधी त्यांच्या विचारांना निश्चित अशी एक दिशा आहे. त्या म्हणतात, ‘‘मी आश्रित आहे या कल्पनेतून स्त्री प्रथम मुक्त झाली पाहिजे. संसार हा दोघांचा असला पाहिजे तरच स्त्री मोकळेपणाने वागेल. पतीची गुलाम न होता खांद्याला खांदा लावून संसारात भाग घेईल आणि त्याने पती-पत्नीत वरिष्ठ-कनिष्ठाचे, मालक-गुलामाचे नाते न राहता मित्रत्वाचे, जिवाभावाचे नाते निर्माण होईल सुखाचा संसार होण्याला दांपत्यातील ‘मैतर’ या रसायनाची फार जरुरी आहे.’’ ‘कारल्याच्या वेलाचा मांडव’, हा एक आगळावेगळा लेख मनाला चटका लावणारा. माझं ऐक, अस्सं माहेर सुरेख बाई, कौटुंबिक आठवणींनी फुललेले लेख आहेत. थोरल्या आर्इंचं व्यक्तिचित्र मनाला अत्यंत चटका लावणारे. लेखात अनुषंगाने आलेले आई, वडील बहिण-कमळा, आशा ना. सी. फडके बा. भ. बोरकर, मित्र-मैत्रिणी, नोकर-चाकर, पुष्पा-रवी मुलं यांच्या आठवणींचा झरा भरभरुन वाहतो. गंधभारली कलाकृती जोगवा आणि चांदीचे ताट यातून संसारातील कडू-गोड आठवणी मनात रहातात. वर्तमानाचे क्षण जगत असताना भुतकाळातील संताबरोबर. आपल्या पतीबरोबर. १०-११ वर्ष मांडलेल्या संसारातील सुखद-दुखःद आठवणींचा पट त्यांनी प्रेमाच्या गहिऱ्या रंगाने अगदी सहजतेने रंगवला आहे. संतांच्या आठवणी लिहिताना आपल्या संसारातील दहा वर्र्षांचा लहानसाच कालपट त्यांनी अत्यंत प्रसन्न अशा आठवणींनी अत्यंत सूचकतेने उलगडला आहे. त्यात संतांचे प्रेम, कॉलेजातील आठवणी, भेटी, इतपासून सुरुवातीचा संसार इथपर्यंतच्या आठवणी गुंफल्या आहेत. मलयगिरीची चंदनबाधा, अष्टमीचे चांदणे, आंबटगोड, शतपावली, तप्तमुद्रा या लेखातून त्यांच्या उजळून निघालेल्या संसाराच्या विविध छटा त्यांनी मनोज्ञपणे साकार केल्या आहेत. त्यातून नितळ भावशील व्यक्तिमत्वाच्या संतांचे दर्शन घडते. भय, राग, कटुता, लोभ, प्रेम विरह-मीलन या साऱ्यांचं एक सुंदर रसायन या संसारात आहे. म्हणूनच ‘शतपावलीन’ त्या म्हणतात,‘‘दिन-रात्रीने सीमित असलेले आपले जीवन म्हणजे एक शतपावल्यांचा उत्सव नव्हे काय!’’ माधवराव पटवर्धन, दुर्गाबाई भागवत, वि. स. खांडेकर यांना आपल्या वाचन लेखनाच्या प्रवासातील वाटचालीतील या तीन प्रकाशकिरणांनी उजळले आहे असे इंदिराबाई म्हणतात. ज्याचे त्याचे श्रेय देऊन त्या मोकळया होतात. असा हा ‘मृद्गंध’ चा प्रवास. एक शब्दात सांगायचे तर ‘मृद्गंध’ हा एक इंदिराबार्इंसारख्या निसर्गप्रेमी कलावंताने निर्मिलेली गंधभारली कलाकृती होय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more