* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH AT MY DOORSTEP
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177667691
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE DEATH HAS A WARRANT IN ITS HANDS, WHOSE NAME IS AT THE TOP TODAY? DEATH, THE ETERNAL TRUTH, THE FACT WHICH IS BREATH-TAKING, SAD, GLOOMY. EVERYONE LOOKS AT DEATH FROM A DIFFERENT ASPECT. SOME CONSIDER IT TO BE THE END OF LIFE, AND FOR SOME IT IS BEGINNING OF A NEW LIFE. SOME FEEL THAT DYING IS CHANGING BODIES BY THE SOULS. SOME FEEL THAT DEATH IS BEING NOTHING. AND SOME FEEL THAT IT IS A FULL-STOP TO EVERYTHING. WHAT IS IT ACTUALLY? WHEN THE BODY BECOMES LIFELESS, WHAT HAPPENS TO THE SOUL? WHAT HAPPENS TO THE MIND SITUATED IN THE BODY? WHAT HAPPENS TO THE FEELINGS IN IT? MANY SUCH QUESTIONS REMAIN UNANSWERED. DEATH IS CONSIDERED TO BE A BLOW, BEREAVEMENT, AN AGONY, A PAIN, MUCH CRYING, MUCH MOURNING. DEATH IS A VERY SERIOUS TOPIC. BUT THIS VERY DEATH MEETS US IN EVERY ARTICLE UNDER THIS BOOK IN THE PECULIAR STYLE OF THE AUTHOR IN A VERY STRAIGHT FORWARD WAY. HIS ARTICLES ON MANY OF THE FAMOUS PERSONALITIES REVEAL THE UNKNOWN SIDES. THEY MAKE US LAUGH, THINK, CRY, AND THEY BEDAZZLE US.
‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ ...मृत्यू ...अटळ सत्य... धडकी भरवणारं, वाईट, खिन्न मानलं जाणारं वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकडं पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम... पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KHUSHWANTSINGH #मृत्युनंतर #खुशवंतसिंग #मृत्यूआणिमरण #THOUGHTSONDEATH #TRANSLATIONSINMARATHI #अनुवाद #मराठीअनुवाद # मृत्युलेख # COLLECTIONOFOBITUARIES #THECOMPANYOFWOMEN #
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    खुशवंत सिंगानी प्रथम म्रुत्यु संबंधी आचार्य रजनीश,दलाई लामा आदिंचे विचार नमुद केले आहेत आणि नंतर अनेक व्यक्तिं चा नमुनेदार जीवनपट व त्यांचा अंत या विषयी अतिशय शैलीदार भाषेत विवेचन केलेले.संग्रहणीय पुस्तक!

  • Rating Starराजू गोसावी

    "मृत्यूच्या हातात कसलंस फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!" ...मृत्यू...अटळ सत्य... धडकी भरवणार ,वाईट, खिन्न मानलं जाणार वास्तव. जीवनातील या मूलभूत वास्तवाकड पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात. कुणी मृत्यू हा शेवट मानत. कणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम..... पण देहाची चेतना संपली कि, मनाचीहीं संपते ? आत्मा म्हणजे काय ? तो कुठं असतो ? जाणीवांच काय होत... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेश, दुःख, रडारडी असा हा विषय गहन गंभिर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्याने प्रकट झाले आहेत. तसच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहलेल्या मृत्युलेखातून त्या त्या व्यक्तित्वाचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात ; तर कधी अंतर्मुख करतात. अस हे मनातल्या एका कोपर्यात दडून बसणार पुस्तक. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-02-2007

    मृत्यू आणि खुशवंतसिंग... मृत्यू... माझ्या उंबरठ्यांशी’ हे खुशवंतसिंग यांचे अनुवादित पुस्तक वाचताना ‘मृत्यू’ या घटनेकडे पाहण्याचे मराठी साहित्यिकांचे सहजपणे आठवतात. ‘देह मृत्यूचे भातुके’, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे’। अशा नेक अभंग, श्लोक, ओव्यांमधून मराठी संतांनी ‘मृत्यू’या शाश्वत सत्याची जाणीव करून दिलेली आहे. अर्थात यामध्ये देहाची नश्वरता, देहाला दिलेले दुय्यम महत्त्व या गोष्टी आहेतच; पण ‘पाखरा येशील का परतून’ सारख्या कवितेत करुण विलापही जाणवतो. ‘कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या’ सारख्या कवितेतून ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,’ ही मृत्यूसारख्या घटनेतील एकटेपणा, एकाकी असणे ठळकपणे जाणवते. ‘जन्म म्हणे आला आला। जव्हा आलं बोलावनं। मौत म्हणे गेला गेला।’ बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री जन्म-मृत्यूमधली सहजता निखळपणे सांगते. ‘पावले तुझी कातड्याची, मरणमाडी चढायची...’ अशा शब्दांत आरती प्रभू मनुष्याची मृण्मय देहाची जाणीव करून देतात. ही स्वातंत्र्यहीन अवस्था आहे हे सांगताना कवी, ‘मागे फिरू नकोस बाबा। कुठे ठेवशिल दरीत पाय।’ असे म्हणतो. अशा अनेक बाजूंनी मराठी साहित्यात मानवी मृत्यूबद्दलचे चिंतन आणि एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आठवतो खुशवंतसिंग यांच्या पुस्तकामुळे. ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ या मूळ खुशवंतसिंगलिखित पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकात ‘मृत्यू आणि मरण’ या पहिल्या भागात मृत्यूसंबंधी दलाई लामा, आचार्य रजनीश यांनी मांडलेले विचार संकलित केले आहेत. भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग स्वत: कर्करोगाने पीडित आहेत. ‘पाहुणा मृत्यू’ या लेखात व्ही. पी. सिंग यांनी ‘‘दर आठवड्याला मी मृत्युदेवतेला विचारतो: तुझ्यासोबत निघण्याची वेळ झाली का?’’ ती उत्तरते,‘‘नाही, अजून नाही,’’ हे उद्गार व्यक्त केले आहेत. ‘हिट लिस्ट’वर ‘तयार रहा’ यासारख्या लेखांतून मृत्यूकडे पाहण्याची सहज दृष्टी व्यक्त होते. मृतांकडून ‘ज्ञानप्राप्ती’, ‘मृत्यूनंतरचं जीवन’ या लेखांमधून मृत्यूनंतरही ज्ञानप्राप्ती शक्य असल्याची श्रद्धा व्यक्त होते. हा पुन्हा श्रद्धेचा आणि विश्वास-अविश्वासाचा भाग आहे. पुस्तकाचा दुसरा भाग ‘मृत्यूनंतर’ हा आहे. या भागात झेड.ए.भुट्टो यांची फाशी, त्यापूर्वीच न्यायालयीन खटला, फाशीची शिक्षा निश्चित झाल्यानंतर भुट्टोंच्या मनातील निराशा, घालमेल यांचे चित्रण येते. प्रोतिमा बेदी, ‘नर्गिस दत्त’, ‘चेतन आनंद’ या चंदेरी दुनियेतील कलावंतांच्या मृत्यूसंबंधी लेख आहेत, त ‘फैज अहमद फैज’, ‘अली सरदार जाफरी’, ‘आर. के. नारायण’, ‘मुल्कराज आनंद’ इ. साहित्यिकांवर लिहिले. मृत्यूलेख दुसऱ्या भागात एकत्रित केले आहेत. ‘दादी माँ’, ‘राज विलातील छज्जूराम’ यांनी लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्यातला काही काळ व्यापला आहे. खुशवंतसिंग यांनी पाळलेला ‘सिम्बा’ हा कुत्रा आणि त्याचा मृत्यू, यांचा समावेशही या लेखांमध्ये झालेला आहे. दुसऱ्या भागातील कवी-कलावंत, देशी-विदेशी मित्र-परिचित यांचा निकटचा सहावास लेखकाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मृत्युलेख लिहित असताना लेखक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिच्या व्यक्तीमत्त्वाची भली-बुरी बाजू रोखठोक भाषेत मांडतो. ज्यांच्या सहवासात खुशवंतसिंग यांना वाईट अनुभव आला. त्या व्यक्तीच्या अवगुणांची परखड कबुली त्यांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना चांगले बोलावे, हा रूढ संकेत लेखकाने झुगारला आहे. यात एका बाजूने त्यांचे माणूसपण दिसते, पण दुसऱ्या बाजूने मरणदारी, मृत्यूनंतरही माणूस क्षमाशील होऊ शकत नाही का, माणसाच्या मनात कडवटपणा कायमच घर करून कसा काय राहतो, असे प्रश्न पुस्तक वाचताना पडतात. खुशवंतसिंग ‘द हिंदुस्थान टाइम्स’, ‘द ट्रिब्युन’ सारख्या वृत्तपत्रासाठी लिहिणारे लेखक, भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क विभागाचा कार्यभार सांभाळणारी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. उच्च वर्गातील माणसांचा वावर, त्यांच्या अवतीभवती असल्याच्या खुणा त्यांच्या लेखनातून जाणवतात. उच्च वर्गातील स्त्री-पुरुषसंबंधातील मुक्तपणाची चित्रे ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ या पुस्तकातून आली आहेत. दूरदर्शन, खासगी वाहिन्यांच्या माध्यमातून अहोरात्र पाझरणारी करमणूक या पुस्तकरूपाने का यावी? जागतिकीकरणानंतर सर्वत्र पसरलेल्या सुखवादातून अशा प्रकारचे रंजक चित्र पुस्तकातून आले आहे काय, असे प्रश्न मनात येतात, भीष्म सहानींवरील लेख अपूर्ण वाटतो. याशिवाय दुसऱ्या भागात कलावंतांवरचे मृत्यूलेख, लेखक-कवी, अधिकारी-उच्चपदस्थ व्यक्ती, अशी विभागणी करून लेखांचा क्रम लावला नसल्याचे जाणवते. व्यक्तींवरील मृत्यूलेखांचा एकसंध परिणाम होत नाही. कारण या लेखांचे स्वरूप त्रोटक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-01-2007

    जगण्याचा संदेश देणारा ‘मृत्यू’... ‘डेथ अ‍ॅट माय डोअरस्टेप’ हे खुशवंत सिंग यांचं सुंदर पुस्तक आता मराठी वाचकांनाही वाचायला मिळेल. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हा मूळ पुस्तकाची खुमारी कायम ठेवणारा सुरेख अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकत मृत्यूविषयीच लेखक बोलत राहतो. खुशवंत सिंग यांनी मृत्युलेख अनेक लिहिले; पण पहिला मृत्युलेख ऐन विशीत असताना लिहिला. ‘मृत्यूनंतर’ या दुसऱ्या भागात हे मृत्युलेख समाविष्ट आहेत. तरुण हुकूमशहा संजय गांधी, मार्क्सवादी लक्षाधीश रजनी पटेल, आर. के. नारायण, प्रोतिमा बेदी, भीष्म सहानी, धर्माकुमार, चेतन आनंद यांच्यावरील मृत्युलेख विशेष वाचनीय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील या माणसांची लेखकाने केलेली निरीक्षणे विलक्षण आहेत. त्यातून ती माणसे, त्यांचे कार्य नेमकेपणाने मांडले जाते. ‘मृत्यू आणि मरण’ या शीर्षकाचा पहिला भाग मला विशेष आवडला. दलाई लामांचे मृत्यूविषयक विचार, आचार्य रजनीश यांचे मृत्यूचे भय हे लेख सुन्न करतात. मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यूचा अनुभव हिटलिस्ट या लेखांमधील अनुभव थरारून सोडतो. हे पुस्तक मृत्यूविषयी आहे, त्यामुळे काही काळ आपण अस्वस्थही होतो. पण वाचून पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक जगण्याचाच संदेश देत आहे, असा सुंदर अनुभव येतो. - धरित्री जोशी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more