- मीना कश्यप शाह
भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...)
मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं.
अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं.
मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात.
ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच...
मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना...
स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ...
पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल...
जुलमाचा प्रतिशोध...
अतिमानवीय शक्तींनी झपाटणे...
भूतबाधा, भूतांशी गाठभेट...
मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा...
मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम.
ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट!
मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं.
अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत.
...Read more
- पुस्तकप्रेमी
मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more
- Aaditya Patil
मृत्युंजयी
मोठ्या प्रमाणात सो कॉल्ड बुद्धिजीवी वाचक हा फिक्शनल लिटरेचर कडे जरा हेटाळणीच्या नजरेतच पाहतो . त्यातल्या त्यात काल्पनिक रहस्यकथा म्हटल्यावर तर त्यावर ताशेरे ओढण्यातच ते धन्यता मानतात . पण मराठी साहित्यात एकापेक्षा एक सरस लेखकांनी हा विष अगदी छान हाताळलाय . रत्नाकर मतकरी हे त्यातील एक अग्रगण्य नाव .
रहस्यमय कथांचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे रत्नाकर मतकरी . त्यांच्या कथा सरळ सोप्या पण मनाला भिडणाऱ्या असतात . त्यांच्या कथेत रहस्यतेचे धागे इतके सुंदर गुंतविलेले असतात की कथा संपेपर्यंत आपण त्यांनी रंगविलेल्या जगात जाऊन पोहोचतो .
मृत्युंजयी ह्या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत . पैकी `किडे` ही कथा मला व्यक्तिशः खुप आवडली . `जंगल` आणि `किडे` या कथा वाचकाला अस्वस्थ करून सोडतात . `डायरी` , `शिंपल्यातील चांदणी` आणि `प्रियकर` ह्या कथा भावनिक करतात .
लेखकांच्या लेखणीचं गुणवैशिष्ट म्हणजे पात्र उभारणी इतकी सशक्त आहे की शेवटपर्यंत त्या व्यक्तिरेखेचे गुणदोष ओळखणे कठीण होऊन बसते . `कर्ता करविता` ह्या कथेमधील वकील हे पात्र याचं एक उदाहरण आहे .
जवळपास प्रत्येक कथेतून लेखकांनी सामाजिक जाणिवेचं भान राखलं आहे आणि वाचकाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . ...Read more
- NEWSPAPER REVIEW
मनाचे कंगोरे उलगडणाऱ्या कथा…
आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या आदिम प्रेरणा आहेत. या प्रेरणा रोजच्या व्यवहारामधून, मानवी आचरणामधून व्यक्त होतात, तेव्हा त्यांचे एकेरी असणे, सुट्यासुट्या स्वरुपात नसते. यातल्या प्रत्येक प्रेरणेच्या व्यक्त होण्याशी मातले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे षड्विकार चिकटलेले असतात म्हणूनच मूळच्या मानवी आदिम प्रेरणा आणि सनातन म्हणता येतील, असे मानवी षड्विकार यांच्या सरमिसळीतून आणि सतत गतिमान, बदलणाऱ्या स्वरूपामुळे माणसाचा स्वभाव अनाकलनीय होतो. अनेकदा माणसाचे वागणे - अतर्क्यतेच्या पातळीवर जाते. रत्नाकर मतकरी यांच्या `गूढकथा` या मनोविश्लेषणात्मक आहेत म्हणूनच त्या कथांमध्ये मानवी मनात खोलवर दडून बसलेले `भय` आणि माणसाच्या आचरण, व्यवहारातून व्यक्त होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रेरणा, प्रवृत्तींचा मिलाफ झालेला आढळतो. म्हणूनच या भयकथा केवळ रहस्यमय, मनोरंजन करणाऱ्या, भीतीने थरकाप उडविणाऱ्या किंवा सुलभ अशा धक्कातंत्राचा उपयोग करुन रहस्यभेद करतात, असे होत नाही. मतकरींच्या गूढकथा संग्रहाची दुसरी आवृत्ती आता प्रकाशित झाली आहे. माणसाच्या मनात क्षणभर चमकून जाणारी अनामिक भीती, (उगीचच) चुकचुकणारी शंकेची पाल, बऱ्याचदा स्वत:लाही न उमगणारे भास-आभास यांना मतकरींच्या गूढकथेस खास स्थान असते. हे सारे घटक उठावदार होऊन त्यांच्या कथेमध्ये स्पष्ट होतात. एरवी आपल्याला अधूनमधून जाणवणाऱ्या आपल्याच मनाच्या खेळांकडे काळजीपूर्वक पाहिल्यास जाणवणाऱ्या संभाव्य शक्यतांना रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून कथारूप प्राप्त होते. म्हणूनच या कथांचा शेवट, म्हणूनच या कथांची सुरुवात, संपूर्ण कथेतील वातावरण आणि कथेची अखेर यांच्यामध्ये परस्परांना छेद देणारे, परस्परविरोधी असे काहीतरी घडते, त्यामुळेच या भयकथांचा शेवट भडक किंवा बटबटीत अशा प्रसंगाने किंवा तद्दन फिल्मी वाटावा असा नाटकी किंवा रंजक प्रकारचा नसतो. आपल्या मनात क्षणार्धात चमकून जाणाऱ्या चित्रविचित्र भावना, विचार, खोलवर दडलेले असुरक्षित असल्याचे भय आणि त्यातून मनात बराच काळ रेंगाळत राहणारी भीतीची भावना, भासआभास आणि या साऱ्यांनाच लगटून येणारे मनातले नाना विचार यांच्यामधून कथेतला घटनाक्रम उलगडत जातो. बऱ्याचदा आपल्या मनातले विचार, भावना आपल्याला चकवतात. त्यांचे स्वरुप आपल्याला नीट स्पष्ट होते. कालांतराने आपल्या विशिष्ट प्रसंगी आपल्या मनात आले, त्या त्यावेळचे विचार, विकार, भावना, त्यामागचे कारण स्वच्छ प्रकारे समजतात. रत्नाकर मतकरींच्या भयकथेत मानवी मनाला लागणारे चकवे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेले दिसतात.
रत्नाकर मतकरींच्या भयकथांची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या काही कथांची उदाहरणे देणे आवश्यक आहे, असे वाटते. `हडळ` या कथेत खूप दारिद्र्यात जगणारी आई, तिचा आजारग्रस्त, मरणपंथाला लागलेला मुलगा, यांचे चित्रण येते. दु:खी आईचे असहायतेच्या पार्श्वभूमीवर उमटणारे वात्सल्य, मृत्यूनंतर मुलाला अग्नी दिला पाहिजे, त्यासाठी ही आई दुसऱ्या जळत्या चितेतील लाकडे चोरते. बघणारे लोक तिला हडळ समजतात. `हडळ इलीहा` असा एकच कल्लोळ गावात उठतो. चोरी करून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी चोरी करून लाकडे गोळा करणारी आई घरी येते. पाहते तर तिचा मुलगा उठून बसलाय आणि तिला `आये` म्हणून हाका मारतोय. `हडळ आसंच रे मी - तुजी आये न्हई,` असे म्हणून ही आई रडू लागते. एकाच वेळी कारुण्य, भीती, वात्सल्य, भास-आभास, चकवणारे सत्य, वास्तव अशा अनेक भावभावनांची संमिश्र अभिव्यक्ती या कथेमध्ये झालेली दिसते म्हणून या कथांना `मनोविश्लेषणात्मक भयकथा आणि अर्थातच रंजक नव्हेत अशा कथा असे म्हणावे लागेल. `फँटास्टिक` या कथेत `स्टोरी रायटर` आणि मादक अभिनेत्री `राणी` लालजीला ठार करू पाहतात; पण तो सरणावर जिवंत होतो. इथे आपल्याला वाटते, चला दचकायला लावणारी घटना घडली, आपल्याला धक्का बसलाय, इथे कथा संपलीच की! पण तसे घडत नाही. लालजी वाचला का मेला, हा प्रश्न बाकी उरतोच. याचे उत्तर लेखक वाचकांवर सोपवतो. त्याने हे सारे समजून घ्यावे.
आपल्याला स्वत:च्या आणि इतरांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या सकारात्मक मानवी भावना, प्रेरणा समजावून घ्यायला, पुन्हा पुन्हा आठवायला आवडते, पण भीती, हिंसा, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, आदी नकारात्मक, त्रासदायक, दु:ख देणाऱ्या त्रासदायक भावनांकडे काळजीपूर्वक पाहायला, नव्हे, विचार करायलासुद्धा आवडत नाही. रत्नाकर मतकरींच्या भयकथा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला लावतात. एका अर्थाने आपणच आपल्याला पुन्हा एकदा नव्या रूपात भेटतो. ...Read more