* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RACING WITH DEATH : DOUGLAS MAWSON - ANTARCTIC EXPLORER
  • Availability : Available
  • Translators : PRASADDATTA GADGIL
  • ISBN : 9788184985146
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN RACING WITH DEATH, BEAU RIFFENBURGH REDISOVERS THE ALMOST FORGOTTEN STORY OF MAWSON - WITH SHACKLETON AND SCOTT, ONE OF THE THREE `GREATS` OF ANTARCTIC EXPLORATION. IT IS A BREATHTAKING STORY OF RAW COURAGE AND ESCAPE FROM THE VERY JAWS OF DEATH
ही कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अन्टार्टिक खंडावरच्या साहसी मोहिमांची... त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेल्या थरारांची... आणि मृत्यूच्या कराल दाढेतून जिवलगांची जिद्दीने केलेल्या सुटकेची... ही कथा आहे, मानवी स्वभावातील कंगो-यांची... राज्यविस्तारासाठीच्या संघर्षाची... आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटणा-यांची... ही कथा आहे, अथक मानवी प्रयत्नांची... ज्ञानलालसेची... आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाच्या विलोभनीय; पण अकराळ रूपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUTYUSHISHARYAT #RACINGWITHDEATH:DOUGLASMAWSON-ANTARCTICEXPLORER #मृत्यायुषी #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASADDATTAGADGIL #BEAU RIFFENBURGH "
Customer Reviews
  • Rating Starसर्वांचे आभार

    एका अद्वितीय माणसाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आखलेल्या साहसमोहिमा, त्यामधे आलेल्या अनंत अडचणी, अडथळे, संकटं यांचं वर्णन या पुस्तकात आहे. या साहसमोहिमा ध्रुवीय प्रदेशातल्या होत्या. मुळात तो एक भूगर्भशास्सत्रज्ञ होता , युनिव्हर्सिटीत कामकरत होता. पण त्याच्या आतला साहसी बाणा दुष्कर , दुर्गम स्थानांवर जाण्यास बाध्य करत होता. याचं नाव “डग्लस मॅासन”. धाडस, साहस, महत्त्वाकांक्षा, विजीगीषू वृत्ती, परििस्थतीला शरण न जाणे, परिस्थितीचे भान ठेवणे, भविष्याचा अंदाज घेणे, कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढणे या आणि अशा असंख्य गुणांचे प्रदर्शन त्याने मोहिमेच्या वेगवेगळ्या वेळी केले. तो जागतिक वैज्ञानिक समाजात, जनतेमधे आणि अॅास्ट्रेलियन वीरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होता. “अन्टार्क्टिक विज्ञानातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती “ म्हणून त्याची ओळख आहे. मॅासन ची पहिली मोहिम होती १९०७-०९ ची ब्रिटिश अॅन्टार्क्टिक एक्सपिडिशन. यामधे तो इतिहासातील सर्वांत मोठ्या आणि कठीण स्लेजिंग प्रवासाचा लीडर होता. या मोहिमेत शॅकलटन आणि वाईल्ड यांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी मॅासनचे गुरू प्रो.डेव्हिस यांनी मॅासनच्या कामाबद्दल त्याचे जाहीर कौतुक केले. या मोहिमेत त्यांनी दक्षिण ध्रुव जवळजवळ सर केला आणि आपल्या खुणा मागे ठेवल्या. या मोहिमेतच दुसऱ्या मोहिमेच्या आखणीची पायाभरणी झाली होती. पहिल्या मोहिमेत “निमरॅाड” बोट वापरली गेली होती. ॲास्ट्रेलियाच्या दक्षिणेला असलेलली अन्टार्क्टिका किनारपट्टी त्याला खुणावत होती.खूप धडपडीनंतर १९११-१४ मधे “””अॅास्ट्रेलेशियन अन्टार्क्टिक एक्सपिडिशन “””या नावाची मोहिम आखली गेली. आता “ॲारोरा “नावाची बोट या मोहिमेसाठी मिळवण्यात आली. बर्फाळ प्रदेशातील मोहिमांसाठी प्रत्येक छोट्या , बारीक, लहानसहान गोष्टींचा विचार केला जातो. योग्य , सशक्त, धाडसी विविध टॅलेन्ट्स असलेल्या लोकांची टीम तयार करणे , पैशाची तजवीज करणे , परवानग्या मिळवणे , वैज्ञानिक साहित्य मिळवणे, शिधा जमवणे आणि असंच खूप काही यामधे त्याची दमछाक झाली तरी उत्साह कमी झाला नव्हता. तो त्याच्या विचारांमधे क्लीअर होता. त्याच्या सहकारयांशी त्याचे भावबंध चांगले होते. नाहीतर सर्वदूर बर्फ , वादळ वारे , जिवंत राहण्याची आव्हाने अशा कठीण परिस्थितीत ते मॅासनचं नेतेपण झुगारू शकले असते. ही मोहिम कठीण ,,खूप जणांना परलोकी पोहोचवणारी व राहिलेल्यांचा पुनर्जन्म करणारी हेाती. मोहिमेच्या मध्यावर निन्निस आणि मर्ट्झ या त्याच्या जीवाभावाच्या मित्रांना तो अंतरला. ज्या हिवाळी तळावर त्यांनी अतिशय शांत जागा समजून तळ ठोकला होता तीच जागा सर्वाधिक वेगाने वाहणारया वारयाची निघाली. त्याचा त्यांना पूर्ण मोहिमेभर त्रास झाला. चुकीला क्षमा च नाही आहे या वातावरणात . त्यांचा प्रवास, घळींचे प्रदेश, सामान किंवा अन्न मधेच सोडून देणे, केबिन बर्फात लपून जाणे ,कुत्र्यांच्या समस्या ,जगण्यासाठी त्यांना ही खावे लागणे , ते खाल्ल्यामुळे तब्येतीला झालेला त्रास हे सगळं आपला वाचताना पुतळा होतो आपला! तसंच कळतं की आंघोळ करायला मिळणे, दोन वेळचं खायला मिळणं , घराबाहेर पडता येणं या किती सुखाच्या क्रिया आहेत. या सर्वाला तोंड देताना त्यांनी मनोधैर्य कसं टिकवून ठेवलं असेल??? धन्य ते लोक. !!! युनियन जॅक फडकवत देशभक्ती ही दाखवत होते. त्याची तिसरी मोहिम होती,१९२९-३१ ची ब्रिटिश, अॅास्ट्रेलियन,न्यूझीलंड अन्टार्क्टिक रिसर्च एक्सपिडिशन . या मोहिमेसाठी डिस्कव्हरी नावाची बोट वापरण्यात आली. या मोहिमेच्या शेवटी “अॅास्ट्रेलियन अन्टार्क्टिक टेरिटेरी “ अस्तित्वात आली. अशा रीतीने अन्टार्क्टिकाच्या महाकाय भूप्रदेशावर अॅास्ट्रेलियाचे अधिपत्य स्थापित झाले; ज्याचे स्वप्न प्रथम पाहणारयांमधे होता मॅासन डग्लस. त्याच्या नावे एक स्टेशन उभारण्यात आले जे अजून कार्यरत आहे. कधीही त्याने हार मानली नाही ,अविरत प्रयत्न करत आशेला जिवंत ठेवले. शब्द थिटे आहेत त्याच्या खंबीर मानसिक शक्तीपुढे!!!!! मृत्यूशी शर्यत त्याची १४ अॅाक्टोबर १९५८ पर्यंत सुरू होती. अशा व्यक्तिमत्त्वाला अभिवादन!! ...Read more

  • Rating StarMASIK LOKPRABHA 26-6-2015

    अ‍ॅन्टाक्र्टिक मोहिमांचा थरार अ‍ॅन्टाक्र्टिक मोहिमांची सुरुवात झाली ती मुख्यत: अज्ञाताचा शोध घेण्याच्या साहसी वृत्तीतून. पण त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड असल्यामुळे त्या केवळ साहसी मोहिम नव्हत्या. तेथील प्रतिकूल वातावरणामुळे तेथे जाणाऱ्या, राहणा्या सर्वांनाच साहसाचा थरार अनुभवायला लागत असे. अशाच थरारक वैज्ञानिक मोहिमांचा नेता असणारा डग्लस मॉसनचे नाव आजही अ‍ॅन्टाक्र्टिकाच्या संदर्भात आदराने घेतलं जातं. अ‍ॅन्टाक्र्टिक विज्ञानातील सर्वश्रेष्ठ व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. १९०७ ते १९३१ या काळात त्याने तीन मोहिमा केल्या. दुसऱ्या मोहिमेचा कर्ताधर्ताकरविता मॉसनच होता. या मोहिमेत सर्वाधिक भूभागावर संशोधन करण्यात आलं. ही मोहिम साहसविरहित संशोधन मोहिम म्हणून अपेक्षित असली तरी या मोहिमेवर सर एडमंड हिलरी यांनी भाष्य करताना संशोधन प्रवासाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ बचावकथा असा उल्लेख केला आहे. त्याच मोहिमेची ही चित्तरकथा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more