* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GUNGE KERI SARKARA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177665352
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO ELUCIDATES VERY SWEETLY KABIR`S MEANINGFUL AND BEAUTIFUL `DOHA` IN THIS BOOK. THE IMPORTANCE OF LOVE IS IMMENSE, RIGHT FROM THE BEGINNING OF THE LIFE TILL OBTAINING THE GLIMPSE OF THE VIBRANT SUPREME SPIRIT. KABIR VERY DELICATELY EXPLAINS THE MEANING OF LOVE AT THE SAME TIME TAKING US TO THE HIGHEST STEPS. LOVE IS GOD, ONLY THING REMAINS FOR US TO DO IS TO FIND TRUE LOVE. AS LOVE LOSES ITS MIGHT FROM OUR MIND WE START FILLING OUR LIFE WITH PHYSICAL PLEASURES. AS LOVE STARTS RULING OUR MIND, ALL THESE MATERIALISTIC THINGS START TO DISAPPEAR. THE `SUPREME SPIRIT` ITSELF DESCENDS IN FRONT OF US. THE TRUE MEANING OF LIFE IS TRANSFORMATION OF `ONE`S OWN`. THE ART TO IMMERSE OUR EGO. THOSE WHO ARE ABLE TO SHED THEIR EGO, WILL EXPERIENCE THE LOVE POURING DOWN ON THEM FROM ALL SIDES. YOUTH! IT IS OF BODY, IT COMES AND GOES. BUT YOUTH OF A SOUL IS THAT OF THE DIVINE POWER. IT IS ETERNAL. THE MOMENT YOU REALIZE THIS, YOU WILL EXPERIENCE A COOLNESS, YOU WILL POSSESS A FORETASTE OF THE UNIQUE FORM OF YOUTH, THAT OF THE SOUL. IT WILL NEVER LAPSE, LEAVE YOU, NEVER BECOME OLD OR EXTINCT. THE MOMENT YOU ACHIEVE THIS VISION OF SEEING THROUGH YOUR SOUL, THEN EVERYTHING AROUND WILL CHANGE. THERE WILL BE NO DIFFERENCES, NO WALLS HOLDING FROM EACH OTHER. YOU WILL FIND THE PRESENCE OF ONLY LOVE, THE AIR AROUND YOU WILL BE FULL OF LOVE. IT WILL BE INFINITE LOVE EVERYWHERE, NEVER ENDING SHOW OF LOVE, AND FROM THERE, FINALLY, YOU WILL BE ABLE TO NOTICE THE VASTNESS OF THE SKY.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MUGDHA KAHANI PREMACHI #RELIGIOUS & SPIRITUALS#MEENA TAKALKAR #OSHO #BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 30-01-2005

    कबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत! परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया ।। येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार? कोण धोका देत आहे? रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता! धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल! तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक! हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे! मग कोणाला सांगणार? ‘साधो धोखा कासूं कहिये!’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते! सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का? सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते! ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते! प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more