I THREW THE PIECE OF PAPER ON THE FIRE. SHE SAW IT BURN . . . ORPHANED AT AN EARLY AGE, PHILIP ASHLEY IS RAISED BY HIS BENEVOLENT OLDER COUSIN, AMBROSE. RESOLUTELY SINGLE, AMBROSE DELIGHTS IN PHILIP AS HIS HEIR, A MAN WHO WILL LOVE HIS GRAND HOME AS MUCH AS HE DOES HIMSELF. BUT THE COSY WORLD THE TWO CONSTRUCT IS SHATTERED WHEN AMBROSE SETS OFF ON A TRIP TO FLORENCE. THERE HE FALLS IN LOVE AND MARRIES - AND THERE HE DIES SUDDENLY. IN ALMOST NO TIME AT ALL, THE NEW WIDOW - PHILIP`S COUSIN RACHEL - TURNS UP IN ENGLAND. DESPITE HIMSELF, PHILIP IS DRAWN TO THIS BEAUTIFUL, SOPHISTICATED, MYSTERIOUS WOMAN LIKE A MOTH TO THE FLAME. AND YET . . . MIGHT SHE HAVE HAD A HAND IN AMBROSE`S DEATH?
माय कझिन रेशेल
ही गोष्ट आहे गूढ, अनाकलनीय आणि आकर्षक अशा स्त्रीची आणि त्या दोन इंग्लिश माणसांची- ज्यांनी तिच्यावर फार प्रेम केले.
अॅम्ब्रोसची काऊंटेस रेशेल संगलेट्टीशी भेट झाली इटालीत, तिथं त्याने तिच्याशी लग्न केले आणि तो कधीच घरी परतला नाही, परंतु त्याची त्याच्या चुलत भावाला आलेली पत्रं, ह्यात सूचक अशी विलक्षण त्रासांची नांदी होती. त्याच्यावर विषप्रयोग होत असल्याचा संशय होता. शेवटच्या पत्रात त्याने फिलीपला ताबडतोब येण्याविषयी लिहिले होते.
जेव्हा फिलीप फ्लॉरेन्समध्ये पोहोचला तेव्हा अॅम्ब्रोस जिवंत नव्हता आणि रेशेल निघून गेलेली होती.
मग रेशेल इंग्लंडला येते. प्रथम संतापलेला फिलीप तिच्या मोहून टाकणाऱ्या आकर्षकतेला बळी पडतो, अगदी अनुरक्त झालेला आणि तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला. फिलीपलाही संशय येऊ लागतो, कारण अॅम्ब्रोसने जी लक्षणे वर्णन केलेली असतात तशाच तऱ्हेचा त्रास त्याला होऊ लागतो. त्याच्यावरही विषप्रयोग होत होता का? रेशेल त्याच्यावर आसक्त होती की ती त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात होती? ती देवदूत होती की सैतान?