THE GREAT ACTRESS`S ACCOUNT OF HER CAREER, HER PERSONAL LIFE, AND THOSE WITH WHOM SHE HAS WORKED IS ACCOMPANIED BY INFORMATION ABOUT AND REACTIONS TO HER FROM HER DIRECTORS, CO-STARS, HUSBANDS, AND CHILDREN
INCLUDES CHRONOLOGY OF THE FILMS, PLAYS, AND TELEVISION APPEARANCES OF INGRID BERGMAN FILMOGRAPHY ONE OF THE WORLD`S FINEST STAGE AND SCREEN ACTRESSES GIVES US AN AUTOBIOGRAPHY AS OUTSTANDING AS SHE IS. MORE THAN JUST AN ACCOUNT OF HER ILLUSTRIOUS CAREER, HERE IS A TOTALLY CANDID SELF-PORTRAIT OF A REMARKABLE WOMAN: HER PERSONAL FAILURES AS WELL AS HER PUBLIC SUCCESSES..
जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. तीन वेळा ऑस्कर पारितोषिकं आणि तीन वेळा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अवार्ड्स मिळवणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीनं या पुस्तकात स्वत:ची पडद्यावरची कहाणी तर सांगितलेली आहेच; पण पडद्यामागची कहाणीही हातचं राखून न ठेवता, प्रांजळपणे सांगितलेली आहे.
नाटक आणि चित्रपट हे तिचे जणू श्वास आणि उच्छ्वास होते. त्यापुढं तिनं आपलं वैयक्तिक जीवन सदैव तुच्छ मानलं.
या आत्मकथनात तिच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या खुणा वाचकांना ठायी ठायी आढळतील.
हा केवळ तिच्या एकटीच्याच कलाजीवनाचा प्रवास नाही, तर 1934 ते 1979 या जवळजवळ अर्धशतकाच्या कालखंडातील चित्रनाट्य व्यवसायाचा आणि कलावंतांचाही चालता-बोलता, समृद्ध इतिहास आहे.