* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NAGASAKI
  • Availability : Available
  • Translators : JAYASHREE GODASE
  • ISBN : 9789353171193
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 360
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE FIRST BOOK TO PIECE TOGETHER THE STORY OF THE JAPANESE CITY PULVERIZED BY THE GREATEST LETHAL FORCE EVER UNLEASHED BY MAN THE EVENTS OF A FEW DAYS IN AUGUST 1945 BROUGHT WWII TO AN END. THEY ALSO DESTROYED THE CITY OF NAGASAKI AND KILLED 80,000 OF ITS INHABITANTS, HALF OF THEM INSTANTLY. CRAIG COLLIE IS THE FIRST PERSON TO INTERVIEW ELDERLY SURVIVORS AND DESCENDANTS OF THE VICTIMS AND TO STITCH TOGETHER THEIR RECOLLECTIONS WITH CONTEMPORARY DIARIES AND LETTERS AND DETAILS FROM OFFICIAL DOCUMENTS. THE RESULT IS A UNIQUE, UNPRECEDENTED WORK OF NARRATIVE RECONSTRUCTION THAT FOLLOWS ORDINARY JAPANESE IN THE HOURS AFTER THE BLAST TO PROVIDE A GRIPPING ACCOUNT OF THE DECISION-MAKING, THE DENIALS, THE DEVASTATION AND THE LOSS.
नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"HIROSHIMA#NAGASAKI#6AUGUST1945 #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarSwapnaja Pawar

    मी वाचले आहे हे पुस्तक ..... वाचताना त्यांचे हाल पाहून काही ठिकाणी अंगावर शहारा येईल पण जरी ही भयावह आणि वेदनादायक सत्य कथा असली तरी त्याचा दुसरा पण एक परिणाम आहे ..... जपानचा जलद विकास झाला आणि जपान सैनिकांच्या विळख्यात जाण्यापासून वाचला .... मानवी अस्तित्वाच्या बाबतीत एक विसंगती आहे की अतिशय कठीण, जीवनाची परीक्षा बघणाऱ्या वेदनेच्या अंधारातही माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणारे , आनंददायी असे लखलखीत क्षण सापडतात ...📖 ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    मात्सुयामा-चो येथील टेनिसच्या मैदानावर 500 मीटर अंतरावर येऊन फुटण्यास फॅट मॅनला 43 सेकंद लागले .जमिनीवरून एक प्रचंड आगीचा लोळ आकाशात तयार होताना दिसला. त्यानंतर एक प्रचंड दाबाची लाट आली .आणि पाठोपाठ स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज . ज्यांनी त्याचा अनुव घेतला त्यांनी त्याला प्रकाशाची लाट असे नाव दिले .या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर पूर्ण उदवस्त झाला.माणसे प्राणी तत्क्षणी मेले.माणसाच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेने सुकून गेले .अतिउष्णत्यामुळे जळण्याजोगे सगळे जळत गेले .स्फोटानंतर निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे बरेचजण गंभीर भाजले . हे होते नागासाकी शहरावर अणुबॉम्ब पडल्यानंतरचे वर्णन . हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता . तरीही बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांना बंदी होती . जपानव्यतिरिक्त कोणीही कल्पना केली नव्हती की अमेरिका अजून एक बॉम्ब टाकणार आहे . काही दिवसातच नागासाकीवर दुसरा बॉम्ब पडला. बॉम्ब टाकण्याची पूर्व तयारी... त्याची हाताळणी. वैमानिकांची मानसिक तयारी ..बॉम्बची जोडणी याचे अंगावर काटा येणारे वर्णन या पुस्तकात आहे . क्रेग कोली यांनी या भयानक विध्वंसाची कथा अनेक पातळ्यांवर लिहून आपल्यासमोर उभी केली आहे .८० हजार लोकांचा मृत्यू हे या अणुस्फोटाचे तात्पर्य होते . आपण हे पुस्तक वाचत नाही तर प्रत्यक्षात बघत आहोत असे वाटते ..संपूर्ण जगात या घटनेनंतर बदलले . अणूशक्तीची ताकत काय आहे हे आजही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो . ...Read more

  • Rating StarVarsha Kulkarni, Thane

    I picked up this book out of curiosity during my last visit to MPH bookstore in Pune. Before this, I had read `Burnt Shadows` (written by Kamila Shamsie and translated by my daughter Reshma Kulkarni-Pathare), which was a fictional story set on the bakground of Hiroshima. Thus, I was curious to read a non-fictional account of Nagasaki, and this book shook me to the core! The wonderfully written and translated real accounts, makes one shiver in fright and think, whether such a tragedy was really necessary to fuel a few egos? A must-read book for anyone who likes real, non-fictional reading. ...Read more

  • Rating StarMILUN SARYAJANI MASIK JULY 2019

    सोमवार, ६ ऑगस्ट १९४५. सकाळी ८.०५ला ‘लिटल बॉय’ हिरोशिमाच्या दिशेनं झेपावला. हिरोशिमातील हानीचे वृत्त सर्व जपानला कळण्याआधीच ९ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ११वाजता नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ हा दुसरा अणुबाँब टाकण्यात आला. दोन्ही हल्ल्यात निरपराध अज्ञातांचा निंकुश संहार झाला. ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत हिरोशिमा व नाकासाकीतील प्रत्यक्ष घटनांचा अभ्यास करून क्रेग कोली यांनी पुस्तक लिहिले. क्रेग कोली हे ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी निर्माता व दिग्दर्शक आहेत. दैनंदिन व्यवहारात मग्न असणाऱ्या यामागुची निशिओका, टाकिगाव, मिस्त्यू, सातोषी नाकामुरा, फादर तमाया, फादर सायमन, डॉ. नागाई, डॉ. आकिझुकी, युद्धकैदी मॅकग्रथ-कर, चीक या व अशा असंख्य लोकांना या स्फोटांचा चटका बसला. असंख्या जीव गमावले तर अनेकांनी मरणयातना भोगल्या. जवळजवळ एक लाख लोक मरण पावले. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांच्या आधारे क्रेग कोली यांनी ही ऐतिहासिक सत्यकथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ चित्रण केले आहे. लेखकाने अनेक व्याqक्तरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. सामान्य लोक नरकयातना भोगत असताना जगाच्या पटावरील अमेरिकन, रशियन व इतर नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. अनुवादक डॉ. जयश्री गोडसे यांना असे वाटते की, हिरोशिमा स्फोटानंतर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर नागासाकी वाचले असते. अमेरिकेच्या अधिकाऱ्याची वृत्ती, शास्त्रज्ञांची हुशारी अशी संहारक शस्त्र तयार करण्यासाठी वापरली गेली आणि मानवतेला लाजवणारी घटना घडली. मुखपृष्ठावरील मशरूम आकाराचा ढग, चेहऱ्यावर साकळलेले दु:ख व लाल रंगातील ‘नागासाकी’ अक्षरे हा अनुभव गडद करतात. जगाला कलाटणी देणाऱ्या संहाराविषयीचे हे पुस्तक आवर्जून वाचावे, संग्रही ठेवावे असे आहे. - सुनीता भागवत, प्रतिनिधी पुणे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more