* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOFTWARE EXPERT PAR EXCELLENCE, NARAYANA MURTHY STRONGLY BELIEVED IN PUTTING INDIA ON THE GLOBAL MAP OF SOFTWARE TECHNOLOGY. HE AND HIS FRIENDS STRUGGLED HARD TO EARN WEALTH THROUGH FAIR AND HONEST MEANS AND FOUNDED INFOSYS, ONE OF THE LARGEST SOFTWARE COMPANIES IN INDIA TODAY.
आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते. त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,०००/- रुपये उसने घेतले होते! क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं! कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे! ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे. – आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#N. CHOKKAN# ANJANI NARAWANE# COMPUTER SERVICES# COMPUTER TECHNOLOGY# MYSOR# KOLAR# CHITALGATTA# SWAPNA# COMPUTER EXPERT# I.I.M.# SUDHA NARAYAN MURTHY# INFOSYS# BHARTIYA SOFTWARE UDYOG# MULYA #एन. चोक्कन# अंजनी नरवणे# कॉम्प्युटर सर्व्हिसेस# कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी# म्हैसूर# कोलार# चिटलगट्टा# स्वप्न# कॉम्प्युटर एक्स्पर्ट# आय.आय.एम. सुधा नारायण मूर्ती# बंगळुरू# इन्फोसिस# भारतीय सॉफ्टवेअर उद्योग# मूल्य
Customer Reviews
  • Rating StarPandurangdongre Dada

    आयुष्यात कधीही किती ही मोठे संकट आले तरी ही तो घाबरत नाही त्याचा सामना करतो.

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT

    प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. द इकॉनॉमिस्ट ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यवसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री नारायण मूर्तींची नोंद केली आहे. इतकंच नाही तर भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून तर ब्रिटिश सरकारकडून सीबीई ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे जीवनचरित्र असल्याने लेखकानं त्याचे बालपण कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, आई-वडील यांच्याकडून त्यांच्यावर होणारे संस्कार यांचा तपशील देत, नारायण मूर्तींच्या मनाची जडण-घडण कशी झाली याचे अतिशय हृद्य शब्दांकन केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीनुसार नारायण मूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विशेष त्यांच्या बालपणी प्रकट होत होते. त्यावर प्रकाशझोत लेखकाने टाकला आहे. त्यांना असलेली वाचनाची आवड व सिनेमाविषयीची अरुची तसेच त्यांचा समजुतदार स्वभाव, परिस्थितीची जाण यामागे त्या वयातही त्यांची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका होती. जी उत्तरोत्तर विकसित होत गेली. खूप पैसे मिळवून चैनीचं आयुष्य जगण्यापेक्षा नीट अभ्यास करून जगाबद्दल ज्ञान मिळविणं जास्त चांगलं, गरीब असण्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. या भूमिकेमुळे ते कायमच स्वाभिमानानं राहायचे. स्वार्थापेक्षा समाजाच्या कल्याणाचा विचार करावा हा विचारही आईवडिलांकडून त्यांच्या मनात रुजला आणि नंतर फोफावला. त्यांची सिम्फनी संगीताची आवड तर इतकी प्रेरक, प्रेरणादायी ठरली की सिम्फनी संगीताबद्दल समजून घेताना विचारांची वीज त्यांच्या मनात चमकली की स्वत: हुशार असून नुसतं चालत नाही तर इतरांबरोबर समन्वय करून एकजुटीनं चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं. हाच विचाराचा प्रकाश त्यांना उत्तम व्यवस्थापक बनविण्यास कारणीभूत झाला. आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चांगले शिक्षण! हा दृष्टिकोन उरात ठेवून वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या शैक्षणिक उंचीचा आलेख लेखकाने या ग्रंथात रेखाटला आहे, तसेच अपेक्षित शिक्षणात उंची गाठण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रणही केले आहे. परिस्थितीवर काबू मिळवून मला सफल झालंच पाहिजे. या दृढनिश्चयाने त्यांनी आय.आय.टी. कानपूरला एम.टेक साठी प्रवेश कसा मिळवला. आय बी एममध्ये बनवला गेलेला कंम्प्युटर बघून ते कसे अवाक झाले. आय आय एममध्ये पगार कमी असूनही ते रुजू का झाले, पाठ्यपुस्तकांतील शिक्षण व जीवनानुभव यांची सांगड घालणे कशासाठी महत्त्वाचे आहे. इ. गोष्टींवर प्रकाश टाकीत लेखकाने त्यांच्या विस्तारलेल्या ज्ञानक्षितिजांचे दर्शन घडवले आहे. नारायण मूर्तींचे व्यावसायिक अनुभव व त्याआधारे त्यांनी जीवनात महत्त्वाचे घेतलेले निर्णय यांचे चित्रण करताना लेखकाने त्यांच्या सामाजिक भानाचे, जीवनमूल्यांवरील निष्ठेचे, पैसा मिळविण्यामागील कारण व त्यांच्या उपयोगाची योग्य दिशा याविषयीचे विचार उलगडून दाखविले आहेत. त्यांच्या मते, एक सुसंस्कृत समाज ज्याला म्हणता येईल, ज्या समाजात प्रत्येक पिढीतील व्यक्ती, येणाऱ्या पिढीचं भविष्य जास्त चांगलं, आनंदाचं व्हावं म्हणून व्यक्तिगतरित्या स्वार्थत्याग करीत राहील. नोकरी सोडून स्वतंत्र कंपनी काढण्याचा त्यांचा निर्णय, सुधा मूर्तींची त्या संदर्भात झालेली मदत, कंम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या विकासाच्या दृष्टीनं असलेली सरकारची उदासीनता, परदेशात हा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, कायदे, कंपनीच्या विकासातील अडथळे व या सर्वांवर मात करत ठामपणे उभे राहणारे व निष्ठा, प्रेम व दूरदृष्टी यांचा साक्षात्कार घडवून सीईओची आपली इमेज बाजूला करत नेता ही इमेज सहकाऱ्याच्या मनात निर्माण करत नारायण मूर्ती कसे यशस्वी झाले याचे अत्यंत मार्मिक, रोचक, प्रासादक व प्रवाही शब्दांकन मूळ लेखकाने व अनुवादिका अंजनी नरवणे यांनी केले आहे. नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अनुवादही अत्यंत हृद्य व सरस झाला आहे. नारायण मूर्तींच्या व्यावसायिक विकासाचा आलेख दर्शविताना शब्दशैली जितकी सरळ, स्पष्ट आहे तितकीच कौटुंबिक प्रेमाभिव्यक्तीच्या प्रसंगी ती हळुवार व भावस्पर्शी होते. प्रसंगचित्रणात ती चित्रदर्शी बनते ज्यामुळे नारायण मूर्तींच्या जीवनातील प्रसंग जिवंत व उत्कट स्वरूपात वाचक मनाला भिडतात. विशेषत: आर्थिक परिस्थितीमुळे आय. आय. टी.चं स्वप्न दूर करून दूर दूर जाणाऱ्या ट्रेनकडे बघत मित्रांना निरोप देणारे मूर्ती हा प्रसंग तसेच सुधातार्इंच्या आई वडिलांना भेटून त्यांच्या व सुधातार्इंच्या विवाहासंदर्भात बोलणारे नारायण मूर्ती इ. प्रसंग लक्षणीय ठरतात. नारायण मूर्तींचा प्रामाणिकपणा, दृढ निश्चय, ठाम निर्णय, सत्याची कास धरणारा स्वभाव, अंतर्मुखता इ. अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना लेखिकेच्या भाषेत कुठेही अभिनिवेश, आग्रहीपणा यांची छटाही नाही. संकोची, सर्वांना आदराने वागविणाऱ्या, चुकूनही कठोर शब्दांचा वापर न करणाऱ्या व लोकांना कामात तडजोड न करता विकासाच्या व परफेक्शनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद सहजसुंदर उतरला आहे. -डॉ. शुभदा शहा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more