* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME OF THE BOOK IS NASHTA MEYER, NASHTA GADYA. THE SOCIETY CONSIDERS ME TO BE NASHTA THAT IS THE ONE WHO IS NOW OUT OF HAND. BUT, I PREFER BEING CALLED THAT. BECAUSE IT IS A FACT THAT WHEN A WOMAN WANTS TO OVERCOME HER PAIN, POVERTY AND MISERY; WHEN SHE TRIES TO OPPOSE THE FILTHY RULES OF RELIGION, SOCIETY AND THE COUNTRY, WHEN SHE OPPOSES THE RIGHTS WHICH INSULT HER, WHEN SHE IS ALERT ABOUT HER RIGHTS, THEN THE SO CALLED GENTLEMEN OF THE SOCIETY CALL HER `NASHTA`. IF A WOMAN WANTS TO IMPROVE THEN THE FIRST CONDITION IS SHE HAS TO FORGET HERSELF, SHE HAS TO PERISH HERSELF. UNLESS AND UNTIL A WOMAN IS PERISHED FROM THE SOCIETY, SHE CANNOT BE RELIEVED FROM THE SOCIETY. ON THE CONTRARY THE WOMAN WHO IS PERISHED IN THE EYES OF THE SOCIETY IS IN TRUE SENSE THE HEALTHIEST AND INTELLIGENT HUMAN BEING.
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छनियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाया गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
उत्कृष्ट अनुवादासाठी रणजीत देसाई पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-05-2004

    जगाकडे बघण्याची लख्ख दृष्टी... स्वत:च्या सन्मानासाठी आणि तत्त्वांसाठी लढा देत आलेली आणि म्हणूनच बदनाम ठरलेली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरिन जगभरच्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. स्वत:चा देश सोडून तिला परागंदा व्हावं लागलं, अनेक आरोपांना सामोरं जवं लागलं, पण तिने स्वत:च्या मनाचा सूर ऐकला... कसलीही भीती न बाळगता ती आपल्या पद्धतीने जगत, बोलत आणि लिहित राहिली. पुरुष संस्कृतीच्या आक्रमक स्वार्थीपणाविरुद्ध आणि धर्ममार्तंडाच्या ढोंगाविरुद्ध तस्लिमाने जे लेखन केलं ते एकीकडे तिला अपराधी ठरवून गेलं, तर दुसरीकडे तेजस्वी, ‘लज्जा’, ‘निर्बाचित कलाम’, ‘अमार मेयेबेला’, ‘शोध’, अशा अनेक पुस्तकांतून तस्लिमाने केलेलं लेखन विलक्षण प्रत्ययकारी आहे. तस्लिमाचं आणखी एक विलक्षण पुस्तक म्हणजे ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ तिच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही मराठीत अनुवादित झालं आहे. मृणालिनी गडकरी यांनी ते मराठीत आणलं आहे. तस्लिमाला आक्रस्ताळी, धर्मभ्रष्ट ठरवून तिच्याकडे तिच्या आप्तांनी, मित्रांनी आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. तिला बहिष्कृतच केलं. बंगाली अशा व्यक्तीला ‘नष्ट’ म्हणतात. वाया गेलेली, नतद्रष्ट आणि नाठाळ बाई म्हणून तस्लिमाची नाचक्की करण्यात आली, तेव्हा या नतद्रष्ट मुलीने केलेलं लेखनही तसंच असणार अशा कल्पनेनं तिने या पुस्तकाला तेच शीर्षक दिलं! स्वतंत्र जाणिवा घेऊन जगणारी तस्लिमा या लेखनातून आपले मुक्त विचार व्यक्त करते. मुख्यत: बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी ती लिहित असली, तरी तिचं लिखाण जगभरातील स्त्रीची व्यथा-वेदना बोलून दाखवणारी आहे. छोटेखानी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक लेखिकेच्या मनात खदखदणारा क्षोभ आणि असंतोष दाखवनू देते. पुरुष वर्चस्वाच्या दुनियेत स्त्रीवर पदोपदी अन्याय होतो आणि तिला नेहमीच गौण स्थान मिळतं. हा अन्याय आहे असं बोलून दाखवणारी तस्लिमा रोषाला निमंत्रण देणारी ठरते हे ओघाने आलंच. तस्लिमाने या लेखांमध्ये स्त्रियांच्या आणि मुलींच्या जीवनाला वेढणाऱ्या प्रश्नांची दखल घेतलेली दिसते. शाळांमधून मुलींची गळती सुरू असणं तिला खटकतं तेव्हा ती या वास्तवाची नोंद घेते. जाहिरातींच्या क्षेत्रात स्त्री-देहाचा व्यापर करण्याची बोकाळलेली वृत्ती तिच्या मनात संताप जागवते. तोंडी तलाक, मुलगा-मुलगी असा भेद करण्याची परंपरा, स्त्रीची स्वत:च्याच घरात होणारी उपासमार, स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीवरच घेणं टाळलं जातं त्याबद्दलही ती कडक शब्दांमध्ये लिहिते. अशा लहान-मोठ्या विषायांमधून ती अतिशय गंभीर प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडते. भाषेबाबत जागरूक असणाऱ्या तस्लिमाला भाषेच्या पारंपरिक वापराबद्दलाही आक्षेप घ्यावेसे वाटतात. ‘सर्व मुले औरस असतात.’ या लेखात ती स्त्रीला औरस-अनौरस कल्पनेच्या रूपानं नैतिक जाळ्यात अडकविण्याच्या पुरुषी काव्यावर टीका करते. स्त्रीला बंधनामध्ये जखडून स्वत: मोकळाच राहणारा पुरुष दोषी आहे, असं ती म्हणते. हा ‘अनौरस’ शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे असं तस्लिमाचं म्हणणं आहे. या लिखाणातून तस्लिमाच्या कविमनाचंही दर्शन घडतं. तस्लिमा म्हणजे केवळ अन्याय-अत्याचाराच्याच गोष्टी करणार या समजुतीला खोटं पाडत ती आपल्या विविध अनुभवांबद्दल लिहिते. शांतिनिकेतनातील वसंतोत्सव तिला फार मोहक वाटतो. आयुष्यातल्या सुंदरतेचा वेध ती त्याबद्दल लिहिताना घेते. रवींद्रनाथ, रवींद्रसंगीत आणि वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये आनंदाच्या रंगाने न्हाऊन उठलेलं शांतिनिकेतन तस्लिमाच्या मनावर पसरत जातं... तस्लिमाचं हे लिखाण मनाला अंतर्मुख करून जातं. जगाकडे बघण्याची तिची स्वत:ची जी लख्ख दृष्टी आहे, तिचा प्रत्यय ते वाचताना येतो. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    बंडखोर लेखिकेचे अंतर्मुख करणारे वेधक लेख… आपले विचार प्रामाणिकपणे आणि परखड मांडणारी तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगलादेशी लेखिका म्हणजे अनेक गोष्टींना मुळापासून उघडेवाघडे करून दाखवणारे एक वादळच आहे. स्वातंत्र्याची आंतरिक ऊर्मी घेऊन जाणारी तस्लिमा जगाकड बघण्याची एक लख्ख अशी दृष्टी बाळगते आणि मनाला कसलीही भीती न वाटू देता आपल्या विचारांना आणि भावनांना लेखणीद्वारे वाट करून देते. स्वत:च्या या मुक्तपणाची किंमतही तिने भरपूर चुकवली आहे. अशा निडर, बंडखोर व्यक्तीला समाज नेहमी नावेच ठेवतो. त्यातूनही ती जर स्त्री असेल तर ती अधिकच बदनाम ठरते. तस्लिमावरही अशा अनेक शेलक्या विशेषणांचा आणि विविध आरोपांचा वर्षाव झाला, पण आपले लेखन तिने सुरूच ठेवले. ‘लज्जा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘आभार मेयेलेला’ ‘निर्वाचित मेयेर नष्ट गद्य’ आणि आता ‘शोध’ तस्लिमाचा लेखनप्रवास तिच्या जंगप्रवासाइतकाच प्रत्ययकारी. बांगलादेशातील तथाकथित धर्मरक्षक डोळ्यांवर झापडे बांधलेले लोक आणि राजकीय आसन सुरक्षित काकाच्या उद्योगात गुंतलेले राज्यकर्ते अशा सर्वांनीच तस्लिमाकडे पाठ फिरवली. तिला ‘वाया गेलेली बाई’ समजून जणू बहिष्कृतच केले. अशा ‘वाया गेलेल्या’ व्यक्तीला बंगाली भाषेत ‘नष्ट’ म्हणतात. तर या ‘नष्ट’ म्हणजे ‘नाठाळ’ किंवा ‘नतद्रष्ट’ बाईने केलेले लेखनच एका पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आले. ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’, म्हणजे नतद्रष्ट मुलीचे नतद्रष्ट लेखन ! मराठीत या पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. छोट्या आकाराच्या लेखांचे हे संकलन तस्लिमाच्या मनातील खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन घडवते. पुरुष वर्चस्वाच्या समाजरचनेत स्त्री पदोपदी दुय्यम ठरत जाते आणि अन्यायाची शिकार बनते, त्यामुळे अनेक गोष्टीमधला भेदभाव किंवा अन्याय हा समाजाच्या इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्याय आहे हे अनेकांना उमजतच नाही आणि कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्यांना ते पटत नाही. तस्लिमाच्या लेखनावर गहजब होतो तो याच कारणाने. तस्लिमा प्रामुख्याने बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी लिहित असली, तरी एकूणच जगातील स्त्रियांच्या आयुष्याशी तिच्या या लेखनाच्या प्रश्नाविषयीही तिने लिहिले आहे. या पुस्तकातून तिचे विविध विषयांवरील विचार वाचकांसमोर येतात. तिचे अनुभव आणि भावना शब्दबद्ध होऊन खुलेपणाने आपले अस्तित्व जाणवून देतात. स्त्रीजीवनाबद्दल तस्लिमा अगदी तळमळीने लिहिते. शाळांतून मुलींची रोडावत चाललेली संख्या, जाहिरात क्षेत्रात होत असलेला स्त्रीदेहाचा वापर, मुलींचा वारसा हक्क, तलाकचा प्रश्न अशा अनेक विषयांचे संदर्भ घेऊन तस्लिमा लिहिते. ‘सर्व मुले औरस असतात’ या लेखातून ती स्त्रीला अनौरस-औरस कल्पनांच्या नैतिक जाळ्यात अडकवून पुरुष मात्र मोकळा राहतो. यावर ती टीका करते. ‘अनौरस’ हा शब्दच नष्ट व्हावा अशी मागणी तस्लिमा करते. मुलगा-मुलगी भेद, नवऱ्याचे वर्चस्व, दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याची दूरदर्शन निवेदकांवर असलेली सक्ती, स्त्रीची घरात होणारी उपासमार, चारित्र्य या संकल्पनेचा फक्त स्त्रियांच्याच संदर्भात होणारा विचार, अशा अनेक मुद्द्यांवर तस्लिमा स्पष्ट शब्दांत लिहिते. स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीची संधीच न देण्याच्या प्रवृत्तीवर ती टीका करते. लग्नासाठी मुलगी पाहण्याची प्रथा, स्त्री-पुरुष समानता आणि पतिपत्नी संबंध, बांगलादेशचा ‘पाकिस्तान’ करण्यासंबंधी लहान मुलांवर आजही केले जाणारे संस्कार अशा अनेक घटना व अनुभव तिचे लेखनविषय बनतात. तस्लिमा कविमनाची स्त्री आहे, हे तिच्या लेखनशैलीवरून जाणवत राहते. केवळ अन्याय-अत्याचाराच्या पलिकडचे जीवनही ती एखाद्या लेखात शब्दबद्ध करते. शांतिनिकेतनमधील वसंतोत्सवाबद्दल लिहिताना तिची लेखणी आयुष्यातील सुंदरतेचा वेध घेते. रवींद्रनाथ, रवींद्र संगीत, वसंत ऋतूतील आनंदात रंगलेले शांतिनिकेतन या साऱ्यांनी भारावलेली तस्लिमा ढाक्याला आल्यावरही त्या सुंदर वातावरणातून परतलेलीच नसते. लेखांचा अनुवादही तस्लिमाच्या शैलीचा स्पर्श हरवू न देण्याचा प्रयत्न करणारा आहे. फक्त यात ‘पडदा’ ऐवजी ‘बुरखा’, ‘सावताळ’ ऐवजी ‘संथाळ’ असे मराठीत रूढ असलेले शब्द योजणे अधिक स्वाभाविक ठरले असते असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more