* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NATRANG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665130
  • Edition : 8
  • Publishing Year : OCTOBER 1980
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SET IN THE 1970S, NATARANG IS A VERY RENOWNED NOVEL IN MARATHI LITERATURE, ONE OF ITS OWN TYPE. IT IS ILLUSTRIOUS AS WELL AS GLOOMY. THIS PICTURES ALMOST ALL YADAV`S SKILL AS A WRITER. HE POSSESSES AN IMMENSE QUALITY TO PICTURE THE EVENTS TRULY, MAKING THEM VERY INTERESTING, GIVING THEM A TOUCH OF PSYCHOSCIENTIFIC ASPECT. HE HAS A PERFECT SENSE OF HUMOUR AND COMPASSION, CATCHES IT WITHOUT FAIL AND MAKES THE NOVEL LIVELY. `NATRANG` IS A MOURNFUL NOVEL OF AN INDIAN ARTIST. IT HAS MANY ASPECTS OF EXPERIENCE. IT IS A HOMOGENOUS MIXTURE OF THE INTENSE POVERTY AND ARTISTIC ENERGY, AN ARTIST`S FAMILY AND THE ARTIST`S PERSONALITY. THE AUTHOR HAS PORTRAYED THE LIFESTYLE OF AN ARTIST FROM THE `MATANG` COMMUNITY. HE WANTS TO LEAVE THE SAFE BOUNDARIES, LEAD HIS LIFE IN A DIFFERENT MANNER, AWAY FROM THE TRADITIONS, WANTS TO PRODUCE SOME FINE ARTS, HE IS INSPIRED BY HIS SOUL. HE HAS TO FIGHT WITH THE ARTISTS WHO ARE READY TO SELL THEIR ART FOR THE SAKE OF MONEY. THE AUTHOR PORTRAYS PERFECTLY WELL THE ARTIST WITH HIS PUREST MIND DEDICATED TOWARDS ARTS. DR. CHANDRAKANT BANDIWADEKAR.
`नटरंग` मराठीतील एक अव्वल दर्जाची, कलात्म आणि शोकात्म कादंबरी. `नटरंग` मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झालेली आहेत. प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनवण्याची, त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची, प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे. त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे. `नटरंग` ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक ऊर्जा, कलावंताचे कुटुंब आणि कलावंताचे कलाव्यक्तिमत्त्व, मातंग समाजाची रूढिग्रस्त जनमान्य जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत, कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत, अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे `नटरंग`मध्ये एकजीव झालेली आहेत. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarKacharu Chambhare

    आनंद यादवांची नटरंग लेखन हाच पिंड स्वीकारलेल्या लेखकांकडून एकाहून एक सरस साहित्यकृती निर्मिल्या जातात पण तरीही त्यांची ओळख एखाद्याच अजरामर साहित्यकृतीशी घट्ट विणली जाते.शिवाजी सावंतांची ओळख मृत्युंजयकार म्हणून तर विश्वास पाटील झाडाझडती ,विस भाऊंना यातिकार म्हणून अशी उदाहरणं वाणगीदाखल देता येतील.अशाच पंक्तीतलं एक उदाहरण म्हणजे डॉ.आनंद यादव अर्थात झोंबीकार.आनंद यादवांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांचा स्मृतिदिन व जयंती दिन.हे दोन्ही दिवस कमी अंतराने आहेत.कागलकर आनंदरावांचा जन्म 30 नोव्हेंबरचा व मृत्यू 27 नोव्हेंबरचा.दोन तारखातलं अंतर दिवसात मोजलं तर तीन दिवसाचं आहे पण शरीरदेहाच्या वावरण्याचा कालखंड मोजला तर तो तब्बल एक्याऐंशी वर्षाचा आहे.आकाशवाणी केंद्रातली काळी काळची नोकरी ,पुण्यातली दीर्घ काळ प्राध्यापकाची नोकरी केलेल्या आनंदरावांनी मराठी साहित्यासाठीही एकाहून एक सरस साहित्यकृती दिल्या.त्यांच्या नटरंग या कादंबरीचा परिचय मी मांडत आहे. नटरंग हा मराठी सिनेमा अनेकांनी पाहिलेला आहे.काहींनी तो दोनदा तीनदाही पाहिला असेल.तमाशा कलेचे वेड पांघरलेल्या गुणा या गुणी कलाकाराची चित्तरकथा म्हणजे नटरंग .अर्थपूर्ण गीते व दमदार कथानक यांमुळे नटरंग प्रेक्षकांचा ठाव घेतो. हो ,हा नटरंग सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलेला आहे तिचं नाव आहे नटरंग व लेखक आहेत डॉ.आनंद यादव. चित्रपट पाहिलेल्या माणसांनी कादंबरी वाचायला घेतली की सुरूवातीची काही पाने वाचताना माणुस चित्रपटातल्या दृश्यांना डोळ्यासमोर ठेऊन वाचतो.मग हळूहळू चित्रपटाचं झाकण आपोआप गळून पडतं व आपण साहित्यकृतीशी एकरूप होतो. कागलच्या मांगवाड्यातील गुणा हा मुलाची ही कथा.अंगापिंडानं चांगलं थोरलं व रूपानं राजबिंड असलेलं हे गुणा पोर खरोखरीच गुणी असतं.कुस्त्या मारलेलं शरीर त्याच्याजवळ असतं पण दणकट शरीराच्या मनात एक कलासक्त चित्त वावरत असतं.भोवतालच्या परिसरात यात्रा व यात्रेतलं मनोरंजन म्हणून तमाशा ही संस्कृती रूढगत झालेली असते.गुणालाही तमाशा पाहणं आवडत असतं .त्यातूनच त्याला तमाशात काम करण्याचं व स्वतःचा फड उभा करण्याचे वेड लागते.तमाशा उभा करण्यात येणाऱ्या अडचणी व अडचणींवर केलेली मात ,तमाशाबद्दलची मते या सगळ्या गोष्टी नटरंगमध्ये वाचायाला मिळतात.तमाशा ही जरी कला असली तरी कलावंताचा प्रवास किती खडतर किती जीवघेणा असतो ,याचा आरसाच नटरंग उभा करते. कादंबरी दोन भागात आहे.पहिल्या भागात गुणाचं कौटुंबिक जीवन ,तमाशा उभे करण्याचे कष्ट अडीअडचणी आहेत.कलेला साधना ,ध्येय स्वीकारलेल्या गुणाचा संघर्ष पहिल्या भागात आहे.गुणाच्या वडिलांना गुणाचे हे तमाशाचे वेड अजिबातच पटत नव्हते.दोघा बापलेकाचे वारंवार खटके उडत.शेवटी गुणाचा बाप आत्महत्या करतो.चित्रपटात गुणाच्या बापाचा मृत्यू नैसर्गिक दाखवलेला आहे. कादंबरीचा दुसरा भाग थरार आहे.गुणा ,नयना ,विष्णू या सामान्य कलाकारांना असामान्य रंगमंच मिळतो व नाच्या या पात्राने गुणाची वाहवा होते.रात्रीच्या वेळी कलाकार म्हणून गुणाच्या नाच्याचे कौतुक होत असले तरी दिवसा मात्र नाच्या गुणाच्या वाट्याला सगळीकडूनच हेटाळणी वाट्याला येत असते.पुढं तर जे घडतं ते भयावह व अकल्पित आहे.बापय माणुस असलेल्या गुणावर बलात्कार होतो.कलेच्या पुजेला ध्येय मानणारा गुणा पुजारी अक्षरशः उद्धवस्त होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे तांत्रिक कौशल्य असते .मुळ लेखनात पाया ,विस्तार व समारोप असल्यामुळे लेखकाची मुळ कृती चित्रपटाहून अधिक व्यापक असते.गुणाचा सारा प्रवास ,ग्रामीण बोली इ.बाबीसाठी नटरंग वाचावी. ...Read more

  • Rating StarKacharu Chambhare

    आनंद यादवांची नटरंग लेखन हाच पिंड स्वीकारलेल्या लेखकांकडून एकाहून एक सरस साहित्यकृती निर्मिल्या जातात पण तरीही त्यांची ओळख एखाद्याच अजरामर साहित्यकृतीशी घट्ट विणली जाते.शिवाजी सावंतांची ओळख मृत्युंजयकार म्हणून तर विश्वास पाटील झाडाझडती ,विस भाऊंन ययातिकार म्हणून अशी उदाहरणं वाणगीदाखल देता येतील.अशाच पंक्तीतलं एक उदाहरण म्हणजे डॉ.आनंद यादव अर्थात झोंबीकार.आनंद यादवांची आठवण येण्याची कारण म्हणजे त्यांचा स्मृतिदिन व जयंती दिन.हे दोन्ही दिवस कमी अंतराने आहेत.कागलकर आनंदरावांचा जन्म 30 नोव्हेंबरचा व मृत्यू 27 नोव्हेंबरचा.दोन तारखातलं अंतर दिवसात मोजलं तर तीन दिवसाचं आहे पण शरीरदेहाच्या वावरण्याचा कालखंड मोजला तर तो तब्बल एक्याऐंशी वर्षाचा आहे.आकाशवाणी केंद्रातली काळी काळची नोकरी ,पुण्यातली दीर्घ काळ प्राध्यापकाची नोकरी केलेल्या आनंदरावांनी मराठी साहित्यासाठीही एकाहून एक सरस साहित्यकृती दिल्या.त्यांच्या नटरंग या कादंबरीचा परिचय मी मांडत आहे. नटरंग हा मराठी सिनेमा अनेकांनी पाहिलेला आहे.काहींनी तो दोनदा तीनदाही पाहिला असेल.तमाशा कलेचे वेड पांघरलेल्या गुणा या गुणी कलाकाराची चित्तरकथा म्हणजे नटरंग .अर्थपूर्ण गीते व दमदार कथानक यांमुळे नटरंग प्रेक्षकांचा ठाव घेतो. हो ,हा नटरंग सिनेमा ज्या कादंबरीवर बेतलेला आहे तिचं नाव आहे नटरंग व लेखक आहेत डॉ.आनंद यादव. चित्रपट पाहिलेल्या माणसांनी कादंबरी वाचायला घेतली की सुरूवातीची काही पाने वाचताना माणुस चित्रपटातल्या दृश्यांना डोळ्यासमोर ठेऊन वाचतो.मग हळूहळू चित्रपटाचं झाकण आपोआप गळून पडतं व आपण साहित्यकृतीशी एकरूप होतो. कागलच्या मांगवाड्यातील गुणा हा मुलाची ही कथा.अंगापिंडानं चांगलं थोरलं व रूपानं राजबिंड असलेलं हे गुणा पोर खरोखरीच गुणी असतं.कुस्त्या मारलेलं शरीर त्याच्याजवळ असतं पण दणकट शरीराच्या मनात एक कलासक्त चित्त वावरत असतं.भोवतालच्या परिसरात यात्रा व यात्रेतलं मनोरंजन म्हणून तमाशा ही संस्कृती रूढगत झालेली असते.गुणालाही तमाशा पाहणं आवडत असतं .त्यातूनच त्याला तमाशात काम करण्याचं व स्वतःचा फड उभा करण्याचे वेड लागते.तमाशा उभा करण्यात येणाऱ्या अडचणी व अडचणींवर केलेली मात ,तमाशाबद्दलची मते या सगळ्या गोष्टी नटरंगमध्ये वाचायाला मिळतात.तमाशा ही जरी कला असली तरी कलावंताचा प्रवास किती खडतर किती जीवघेणा असतो ,याचा आरसाच नटरंग उभा करते. कादंबरी दोन भागात आहे.पहिल्या भागात गुणाचं कौटुंबिक जीवन ,तमाशा उभे करण्याचे कष्ट अडीअडचणी आहेत.कलेला साधना ,ध्येय स्वीकारलेल्या गुणाचा संघर्ष पहिल्या भागात आहे.गुणाच्या वडिलांना गुणाचे हे तमाशाचे वेड अजिबातच पटत नव्हते.दोघा बापलेकाचे वारंवार खटके उडत.शेवटी गुणाचा बाप आत्महत्या करतो.चित्रपटात गुणाच्या बापाचा मृत्यू नैसर्गिक दाखवलेला आहे. कादंबरीचा दुसरा भाग थरार आहे.गुणा ,नयना ,विष्णू या सामान्य कलाकारांना असामान्य रंगमंच मिळतो व नाच्या या पात्राने गुणाची वाहवा होते.रात्रीच्या वेळी कलाकार म्हणून गुणाच्या नाच्याचे कौतुक होत असले तरी दिवसा मात्र नाच्या गुणाच्या वाट्याला सगळीकडूनच हेटाळणी वाट्याला येत असते.पुढं तर जे घडतं ते भयावह व अकल्पित आहे.बापय माणुस असलेल्या गुणावर बलात्कार होतो.कलेच्या पुजेला ध्येय मानणारा गुणा पुजारी अक्षरशः उद्धवस्त होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे तांत्रिक कौशल्य असते .मुळ लेखनात पाया ,विस्तार व समारोप असल्यामुळे लेखकाची मुळ कृती चित्रपटाहून अधिक व्यापक असते.गुणाचा सारा प्रवास ,ग्रामीण बोली इ.बाबीसाठी नटरंग वाचावी. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-06-2017

    कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावामध्ये राहणाऱ्या मांग वस्तीतल्या माणसांची ही गोष्ट! खरं म्हणजे या माणसांबद्दल सांगण्यासारखं काय असणार?... जिथे समदा मांगवाडा पेकाट मोडलेल्या कुत्र्यागत निपचित पडलेला! तिथे सांगण्यासारखं काय असणार? दरिद्र्य, दु:ख आणि विलेली आयुष्ये! घराला घरं चिकटून उभी. एका बाजूला भांड्यातलं, गाडग्यातलं उरलं सुरलं. सडणारी गटारं आणि आदिवाशाप्रमाणे लंगोटी घातलेली, विटके जुनेर नेसलेली वाकड्या तिकड्या चेहऱ्याची माणसं. इथे राहणाऱ्या बाळूला कधी एकदा आयुष्य म्हणून वाट्याला आलेली साठ-सत्तर वर्ष संपतात, असं झालेलं आहे. त्याच्या तरुणपणी असं नव्हतं. गावात गुरं ढोरं होती. मोटा-औत होते. म्हसरं आणि गायरं होती. मांगाचा धंदा भरघोस चालत होता. परंतु जमाना बदलला. विहिरीवर इंजिन बसलं, इंजिनावर मोटरी आल्या आणि मोटा गेल्या. पाठोपाठ एस.टी. आली. धंदा चालणार कसा? चार पैसे मिळावे म्हणून बाळूने थोरल्या मुलाला मिलिटरीत भरती केला. चार वर्षे ठीक गेली. परंतु लढाईत तो कुठे बेपत्ता झाला, ते कुणालाच माहिती नाही. सात महिन्यांनी सरकार दरबारी ‘मृत’ अशी नोंद झाली. पोरगं गेलं म्हणून बायनी खूप रडली आणि त्यातच तिचे डोळे गेले. आता त्याचं पेन्शन येतं, परंतु ते त्याच्या बायकोच्या नावावर येतं. आणि ती तर वेगळी राहते. धाकल्या गुणाला त्याने शाळेत घातलं. परंतु तो कसाबसा सात आठ वर्षं शाळेत गेला आणि नंतर गावातच उंडारत बसला. नोकरीचं कुठे जमलंच नाही. परंतु पोट कोणाला चुकलंय? मग रोजगारी नशिबी आली. आज गुणाच्या रोजगारीवर घर कसं बसं चालतंय आणि ज्या गुणाच्या रोजगारीवर घराचं पोट अवलंबून आहे. त्या गुणाचं लक्ष मात्र... काळजाला भिडणारं हे महाराष्ट्रातलं ग्रामीण जीवन, आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीत अगदी भेदकपणे आलेलं आहे. मराठी साहित्यजगतात १९६० नंतरच्या कादंबरी लेखनामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आढळतो. आतापर्यंतच्या साहित्यात असलेलं महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे भाबडे, आनंद देणारे रंजक चित्रण न राहता खरेखुरे वास्तव दर्शन या नव्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं. दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या भीषण व्यथांचा तो आरसा आहे. गावातील रितीरिवाज, लहरी, निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, स्त्रीचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू गावातले उरूस, जत्रा या सगळ्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वाचकाला अस्वस्थ करून सोडतो. एकूणच काही सामर्थ्यवान कादंबरीकारांनी मराठी ग्रामीण जीवनावर भाष्य करून मराठी कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या वेगळी वाट चोखाळणाऱ्या लेखकांमध्ये आनंद यादव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र अशा साहित्यातील विविध अंगात मुशाफिरी करणाऱ्या आनंद यादव यांनी पाच कादंबऱ्या लिहिल्या. त्या सर्व गाजल्या. परंतु त्यात देखील त्यांच्या ‘नटरंग’ कादंबरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. या कादंबरीवर सिनेमादेखील निघाला. तो देखील रसिकांनी डोक्यावर घेतला. अगदी शहरी भागात देखील हा सिनेमा खूप चालला, तेव्हा प्रश्न पडतो की, या कादंबरीत असं नेमकं काय आहे की, जे समस्त महाराष्ट्राला विशेष भावले? ‘नटरंग’ कादंबरीचा नायक गुणा मांग हा त्याच्या मांग वाड्यातला पोरांसारखा रोजंदारीवर काम करतो आहे. परंतु त्याची नजर मात्र एका वेगळ्याच जगावर आहे. मांग वाड्यातील समस्या, दु:ख ती तर रोजचीच आहेत. परंतु या दु:खाला आपलेसे करून परंपरांगत आयुष्य जगणे, हे त्याच्या स्वभावातच नाही. त्याची नजर दूर क्षितिजावर आहे. हलगीचा नाद त्याच्या कानावर पडला की त्याची पावले हलकीफुल होऊन तमाशाच्या मांडवाकडे वळतात. जीव भरारतो. तमाशाच्या मांडवात शिरल्यावर देवळात आल्यागत वाटतं. भान हरपूर तो गाणी ऐकतो. सोंगाड्याच्या नकला त्याला गुदगुल्या करतात. मन एका झगमगत्या जगात जाऊन बसतं. तो त्याची गरिबी, त्याच्या आतावर असलेलं अवघ्या कुटुंबाचं पोट. त्याचा मांगवाडा हे सगळं विसरतो. दिमाखदार राजा आणि त्याची अहंकारी राणी यांच्या जगात तो हरवतो. तमाशा संपतो. विजारीला लागलेली धूळ आणि वाळके गवत झाडत तो उठतो. थकलेलं शरीर घेऊन घराकडे परततो. मनात मात्र अजूनही तमाशाच असतो. भोवतालची दुनिया त्याला शिळी वाटू लागते. मात्र या नादात आठवड्याची अर्धी कमाई खर्च झाली आहे, याची त्याला जाणीव देखील नसते. मांगवाड्यातल्या पोरांना सोबत घेऊन गुणाला तमाशाची बारी काढायची आहे. त्या प्रमाणे तो मांग वाड्यातल्या मुलांना जमा करतो. कोणी ढोलकी वाजवतो तर कोणी बाजपेटी. तो स्वत: वग लिहितो. लावणी रचतो... मांग वाड्यात पोरांना जोर चढतो. अर्थात तमाशा उभा करायचा म्हणजे सोपं काम नाही. पैसा कुठून उभा करणार?... जगात सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. गुणा आणि त्याच्या कंपूला याची जाणीव आहे. त्या दृष्टीने त्यांची धावपळ सुरू आहे. परंतु थेंबे थेंबे तळे साचे... हे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात आणणं महाकठीण! मुळात या सर्व पोरांची आवक ती किती? रोजंदारीवर कसंबसं पोट भरतंय... आणि म्हणूनच गुणाच्या वडिलांना म्हणजे बाळू मांगाला हे सगळं मान्य नाही. त्याचा या तमाशाला विरोध आहे. गुणाने वग लिहिला याचं त्याला बिलकूल कौतुक नाही. उलट आपल्या कमरेचा चांदीचा करदोडा त्याने मोडला याचा संताप आहे. तमाशाचा सराव मांग वाड्यात जोराने सुरू आहे. ढोलकीची थाप ऐकू येते आहे. आणि तसतसा बाळूचा पारा चढतो आहे. घरात मोठे भांडण होते. बाळू मांग आणखी एका गोष्टीला घाबरतो आहे ते म्हणजे उद्या तमाशाचा पैसा घरात आला तर मांगवाडा ते मान्य करणार नाही. आपल्याला वाळीत टाकलं जाईल. असं झालं तर करायचं काय?... तमासगीरांना मांग वाड्यात इभ्रत नाही. पूर्वी कधीतरी एकाने तमाशा उभा केला होता. परंतु मांग वाड्याने त्याला वाळीत टाकले, असं झालं तर काय करायचे? बाळू गुणाला स्पष्टच सांगतो, ‘तमाशाचा पैसा’ या घरात नको. बाराबिंदाच्यानी तमाशा करावा. ‘गणाची पत्नी दारकी ती देखील विरोधातच आहे. तिला गुणाची काळजी वाटते. या तमाशापाई तासभर सुदिक नीज मिळत न्हाई’ अशीच तिची तक्रार आहे. गुणाची मत मात्र स्पष्ट आहेत. तमाशा ही कला आहे. ज्याच्यात हुन्नर आहे. त्याने तमाशा करावा. पावसाळा आला. पेरण्या सुरू झाल्या आणि पोरांचा तालमीचा उत्साह मावळला. दिवसभर चिखलात राबलं की सांजच्याला पाय धुतल्यानंतर बाहेर पडावसं वाटत नसे. दोन तीन आठवडे असे गेले. पेरण्या झाल्या आणि जोरात पाऊस सुरू झाला. आता कोणालाच काम नाही. गुणाला वाटतं आता तालमी सुरू कराव्यात. परंतु कोणालाही उत्साह नाही. कारण वग लिहून झाला. लावण्या रचून झाल्या. परंतु मुख्य प्रश्न मुलींचा. तमाशात काम करायला मुली कुठे आहेत? मांग वाड्यातील एकही मुलगी तयार होणार नाही. मुली नसतील तर तमाशा उभा राहणार कसा? तमाशातील मुलींना भले समाजात मान नसेल, परंतु त्यांच्याशिवाय ही लोककला उभी राहूच शकत नाही. हे खूप मोठे सत्य! थकल्या मनाला रंजन हवे. त्यासाठी लोककला हवी. लोककला जपणारा कोल्हाटी समाज हवा. थोडक्यात समाजातील प्रत्येक घटक आवश्यक! प्राचीन भारतीय समाज रचनेतील ही महत्त्वाची गोष्ट कथानकाच्या ओघात लेखकाने सहजगत्या अधोरेखीत केली आहे. आनंद यादव इथेच थांबत नाहीत. तर बदलत्या काळानुसार प्रगत तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत जाणार. अशावेळी परंपरागत कष्टाचे काम करणाऱ्या मांग समाजासारख्या कष्टकरी हातांना कदाचित काम मिळणार नाही. अशावेळी त्यांनी स्वत:च्या अंगातील गुण ओळखून आपल्या यशाचा मार्ग निवडला पाहिजे, असा खूप मोठा गर्भित अर्थ सांगतात. म्हणूनच मराठी ललित साहित्याच्या क्षेत्रात आनंद यादव यांच्या ‘नटरंग’चे यश उल्लेखनीय ठरते. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साहाय्याने खुलत जाणाऱ्या प्रसंग, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली माणसांचे जगणे, अशी वैशिष्ट्ये नटरंगमध्ये आढळतात. नटरंग ही कादंबरी इथेच थांबत नाही. तर उत्तरार्धात ती एका कलाकाराची शोकांतिका होते. तमाशातील कलाकारांच्या व्यथा सांगते. त्या शोकांतिकेला असलेला मनोवैज्ञानिक स्पर्श वाचकाला हादरवून सोडतो. नटरंग ही निश्चितच एक अव्वल दर्जाची कलात्मक शोकांतिका आहे. म्हणूनच १९८० साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर २५ वर्षांनी आलेला सिनेमा देखील रसिकांना खूप भावला. -डी. व्ही. कुलकर्णी ...Read more

  • Rating StarLOKMAT 17-1-2010

    पुस्तकातून पडद्यावर... लेखक तमाशा... नाटक... शेवटी चित्रपट आधी वैताग... आता समाधान एखादी लोकप्रिय कादंबरी चित्रपटात रूपांतरित होऊन पडद्यावर अवतरते... ‘माध्यम-बदला’चा हा किचकट प्रवास नेमका कसा घडतो लेखकाची कोणतीही कलाकृती एका माध्यमातून दुसऱ्या मा्यमात जाताना त्या कलाकृतीचं पावित्र्य जपलं जायला हवं. लेखकाला आपल्या मूळ कलाकृतीतून जे काही सांगायचं आहे त्याची सवंग लोकप्रियतेसाठी मोडतोड व्हायला नको, अशी लेखकाची स्वाभाविक इच्छा आहे. मूळ कलाकृती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना निर्मितीची प्रक्रिया तशी गुंतागुंतीची असते. वाचक एखादी कादंबरी वाचतो म्हणजे काय करतो? तो त्या कादंबरीतील वर्णनं वाचतो, पात्रांचे संवाद वाचतो, पण चित्रपटासारख्या वेगळ्या माध्यमात साहित्यकृती रूपांतरित होत असताना असा आणि इतका ढोबळ विचार करता येत नाही. दिग्दर्शक, निर्मात्याला ती कादंबरी आतून-बाहेरून, अंतर्बाह्य ‘समजून’ घ्यावी लागते. हे ‘समजून’ घेऊन नंतर त्याची मांडणी करावी लागते. ही झाली अभिव्यक्ती. ती त्या दिग्दर्शकाची असते. कादंबरीतील एखादं पात्र ‘डुलत-डुलत’ चालतं असं जेव्हा लेखकानं म्हटलेलं असतं तेव्हा हे ‘डुलणं’ कसं असेल, कोणत्या प्रसंगात, कोणत्या पद्धतीनं तो डुलेल, अभिनेत्याची देहबोली कशी असेल म्हणजे त्या प्रसंगाला उठाव येईल इतका बारीकसारीक विचार दिग्दर्शकाला करावा लागतो, त्याने तसा तो केला पाहिजे. कादंबरीतील, मूळ कलाकृतीतील प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग आधी दिग्दर्शकाच्या मनात उमटला पाहिजे, ती घटना त्याला दिसली पाहिजे, ती त्याला ‘व्हिज्युअलाईज’ करता आली पाहिजे. तसे जर दिग्दर्शकाला करता आले तरच तो त्या कलाकृतीला न्याय देऊ शकतो. माझ्या ‘नटरंग’ या कादंबरीवर त्याच नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही कलाकृती अन्य माध्यमात जाण्याचा हा तिसरा प्रसंग. याआधी या कादंबरीवरून तमाशाची निर्मिती झाली होती, या कादंबरीवरून नाटक करण्यात आलं होतं, पण हा बदल खूपच सवंग होता, उठवळ होता. तमाशात जो काही ‘तमाशा’ घालण्यात आला होता ते पाहिल्यानंतर मला त्यांना सांगावं लागलं की, हे मी चालू देणार नाही. हा ‘तमाशा’ बंद करा, त्यानंतर तो तमाशा बंद पडला. नाटकाच्या बाबतीतही तेच, त्यामुळे दहा-बारा खेळ झाल्यानंतर मी ते बंद करायला लावलं. माध्यमातला हा बदल खरोखरच खूप उठवळ होता. कादंबरीतील महत्त्त्वाचा भाग त्यातून गाळलेला होता. प्रेक्षकाला भुलवण्यासाठी, त्याच्या खिशातील पैसे काढून घेण्यासाठी चित्रपट काढणं हा धंदा झाल. माझ्या कलाकृतीचा धंदा व्हावा असं मला वाटत नव्हतं, त्यामुळे मी ते बंद करायला लावलं. प्रत्येक कलाकृतीत अनुभवाचे अनेक स्तर असतात. एक दिग्दर्शक, कलावंत या नात्याने हे स्तर तुम्हाला समजलेच पाहिजेत, त्यामुळे नुसतेच कथानक घेऊन, पात्रं घेऊन, त्यांच्या तोंडी संवाद टाकून चित्रपट तयार होत नाही. बोलपटकाराला कलाकृतीतील आशय लक्षात घ्यावा लागतो. ‘नटरंग’च्या निमित्ताने सुनील जाधवांशी झालेली चर्चा खूपच सकारात्मक होती. ते कलेचे चांगले जाणकार आहेत. तरुण आहेत. मेहनती आहेत. कादंबरीचं कथानक ज्या ठिकाणी घडतं तो कागलचा सारा परिसर, तिथली घरं, वस्त्या, दारिद्र्य, गोठे... या सगळ्या गोष्टी चित्रपट तयार करण्यापूर्वी मी त्यांना प्रत्यक्ष दाखवल्या. मागचे अनुभव पाहता, ‘चित्रपट तयार झाल्यानंतर मी तो पाहीन आणि त्यानंतरच प्रदर्शनास परवानगी देईन’ ही माझी अट होती, त्यामुळे निर्माते, दिग्दर्शकांवरील जबाबदारी मोठी होती. त्यांनीही त्यासाठी अमाप कष्ट घेतले. स्टुडिओतील चित्रणापेक्षा माध्यमात माझी कलाकृती पाहताना खरोखरच समाधान वाटलं. ‘नटरंग’च्या बाबतीत माध्यम बदलाची निर्मिती प्रव्रिâया लेखक म्हणून समाधान देणारी ठरली. - डॉ. आनंद यादव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more