GENERALLY, IT IS THE BUSINESS JOURNALIST WHO WRITES THE AUTOGRAPHY OF THE BUSINESSMAN. THESE JOURNALISTS GENERALLY END UP ASKING THE PROPORTION OF THE EXPENDITURE AND PROFIT, OR THEIR YEARLY TURNOVER. VERY RARELY, THE TRUE BUSINESSMAN IS REVEALED THROUGH THESE FIGURES. I INTERVIEWED THESE BUSINESS LEADERS AS I WOULD INTERVIEW ANY POLITICIAN, ANY ACTOR, ANY AUTHOR OR ANY SUCH PERSON. SURPRISINGLY, IT WAS VERY EASY TO MAKE THEM TALK, THE FORMAT WHICH I HAD SELECTED PROVED TO BE VERY PERFECT. YOU WILL HARDLY COME ACROSS THE FIGURES IN TERMS OF FINANCE OR LOSS AND PROFIT OR ANY SUCH THING RELATED TO FINANCE. MOSTLY, THESE INTERVIEWS REFLECT THE TRUE PERSONALITIES THAT THESE PEOPLE ARE. -VEER YES, I HAVE BEEN VERY RICH THROUGHOUT MY LIFE. I WAS BORN AS A RICH. BUT I CANNOT EVER FORGET THOSE 10 YEARS IN AMERICA. I WAS SURVIVING ONLY ON THE ALLOWANCE PROVIDED BY THE RESERVE BANK, NEEDLESS TO SAY THAT IT WAS ALWAYS VERY INSUFFICIENT. TO MAKE BOTH THE ENDS MEET, I HAD TO ACCEPT JOBS AS WASHING AND CLEANING THE PLATES AND DISHES IN HOTEL, ANYTHING THAT WOULD HELP ME TO KEEP MYSELF ALIVE. SUCH JOBS MAKE YOU FORGET HOW RICH YOUR FAMILY IS. -RATAN TATA. TO WHOM SHOULD WE GIVE THE CREDIT OF OUR SUCCESS? ACTUALLY, IT DOES NOT GO TO THE MAN POWER OR MACHINE POWER. TODAY, AT THIS STAGE I REALIZE THAT IT GOES TO THE IMAGINATION POWER. TODAY, I HAVE ALSO COME TO THE CONCLUSION THAT MY IDEAS HAVE IMPRESSED THOSE WHO HAVE NOT BEEN IN MY DIRECT CONTACT. NATURALLY, THIS GIVES ME IMMENSE HAPPINESS. -NANDAN NILEKANI.
"उद्योगपतींचे चरित्रलेख साधारणत: बिझनेस-पत्रकारच लिहितात. ते त्यांना किंमत व मिळकतीच्या गुणोत्तरांसंबंधी प्रश्न विचारतात, त्यांच्या समूहाच्या वार्षिक उलाढालीविषयी चर्चा करतात... यांतून, आकड्यांच्या जंजाळातून खराखुरा माणूस क्वचितच प्रकटतो... मी या बिझनेस नेतृत्वांची मुलाखत, इतर कुणाही व्यक्तीची – म्हणजे राजकारणी, चित्रपट तारा, लेखक किंवा
इतर कुणी – जशी घेतली असती, त्याच पद्धतीनं घेतली. या उद्योगपतींना बोलतं करणं आश्चर्यकारक सोपं गेलं... या लेखांच्या मांडणीचं मी निवडलेलं स्वरूप यशस्वी ठरलं. या चरित्रलेखांत आकडेवारी, नफा-तोटा, किंमत-मिळकत यासंबंधी फारसं आढळणार नाही; तर या लोकांविषयी व त्यांचं नशीब घडवणाऱ्या परिस्थितीविषयी अधिक वाचायला मिळेल."
– वीर संघवी
``होय, मी खूप श्रीमंतीत वाढलो आहे... पण मी अमेरिकेतली ती दहा वर्षं विसरू शकत नाही. मी तिथं रिझर्व बँकेच्या भत्त्यावर जगत होतो, ते पैसे कधीच पुरेसे नसत. त्यामुळं मला जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी
बश्या विसळण्यासह सगळ्या प्रकारची कामं करावी लागायची. अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुमचं कुटुंब श्रीमंत आहे ही गोष्ट झटकन विसरली जाते.``
– रतन टाटा
``आम्ही आमच्या यशाचं श्रेय कशाला द्यायचं? ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का?
– नंदन निलेकणी