* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WANDER WOMAN
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184986211
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 239
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER YEARS OF COACHING HIGH-ACHIEVING WOMEN, MASTER COACH AND PERSONAL DEVELOPMENT EXPERT MARCIA REYNOLDS STARTED NOTICING SOMETHING TROUBLING: MANY OF THE CLIENTS WITH WHOM SHE WORKED WERE PLAGUED BY ANXIETY OVER THEIR OWN RESTLESS RESPONSES TO THE WORLD. THESE WOMEN WERE JUMPING JOBS REGULARLY, DEFINING AND REDEFINING THEIR RELATIONSHIP WITH THE MARKETPLACE, CONSTANTLY QUESTIONING THEIR ROLES AS WIVES AND MOTHERS AND SISTERS. DUBBING HER SUBJECTS "WANDER WOMEN," REYNOLDS FOUND THAT THE MENTORING AND PERSONAL DEVELOPMENT RESOURCES CURRENTLY AVAILABLE DON`T ADDRESS THIS AUDIENCE`S NEEDS. THEY DON`T WANT TO BALANCE THEIR LIVES; THEY WANT TO FIND PEACE OF MIND IN THE CHAOS. THEY DON`T NECESSARILY WANT TO LEARN HOW TO GAIN A SEAT IN THE BOARDROOM; THEY WANT PROJECTS THEY CAN RUN WITH OR BUSINESSES THEY CAN RUN ON THEIR OWN. THE PROBLEM ISN`T THEIR LEVEL OF STRESS; IT`S ABOUT KNOWING WHO THEY ARE AND WHAT THEY WANT TO ACCOMPLISH IN THIS ONE LIFETIME. WANDER WOMAN EXPLORES HOW GENERATIONAL SHIFTS AND CHANGING EXPECTATIONS OF WORKING WOMEN HAVE FOSTERED A NEW KIND OF RESTLESSNESS AMONG MANY. THROUGH REAL-LIFE STORIES SHE REVEALS THE HOPES AND DREAMS, DISAPPOINTMENTS AND CHALLENGES THIS GROUP OF HIGH-ACHIEVING WOMEN ARE FACING. AND, MOST IMPORTANTLY, SHE PROVIDES EXERCISES AND DEVELOPMENT STRATEGIES FOR READERS AS THEY MAKE THEIR JOURNEY TO PEACE AND FINALLY COME TO REST WITH A STRONG SENSE OF IDENTITY AND PURPOSE.
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची र्नििमती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NAVINYACHYASHODHAT #WANDERWOMAN #नावीन्याच्याशोधात #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUMITABORSE #MARCIAREYNOLDS "
Customer Reviews
  • Rating StarPANJI, SUNDAY 19-07-2015

    उत्तम दिशादर्शक - वाँडर वूमन … कर्तबगार महिलांना शाप असतो अस्वस्थतेचा आंतरिक कोलाहलाचा. त्यांचे एक मन सतत कामाचा विचार करत असते, तर दुसरे सतत आपण नक्की कोण आहोत? आपली भूमिका, आपले महत्त्व, आपली किंमत घरात किती आहे या प्रश्नांवर झगडत असते. ‘वाँडर वून’ या मार्शिया रेनॉल्डस, लिखित व सुमती बोरसे यांनी त्यांच्या केलेल्या ‘नाविन्याच्या शोधात!’ या अनुवादात, लेखिकेने अनेक सत्ये उदाहरणे देऊन अशा अशांत स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा-प्रेरणा उद्देश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिमत्व विकास असे आपण ज्याला म्हणतो ते सर्व कार्यक्रम त्यात सामावलेले आहेत. हा ‘स्व’चा शोध काही सोपे काम नाही. अनेक आयामांतून या प्रश्नाकडे लेखिकेने पाहिले आहे. अनेक कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती, हकिकतीतून मिळवलेले हे ज्ञान उच्चपदस्थ पुरुषांसाठी, कंपन्यांच्या सीईओंसाठी अर्थपूर्ण व अत्यंत उपयोगी असे आहे. कॉर्पोरेट जगताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या लिखाणात प्रशिक्षणतंत्र, मानसिक स्वाध्याय यांची रेलचेल आहे. कर्तबगार स्त्रियांसोबत काम करणाऱ्यांनी, कायम अतृप्त असणाऱ्यांसाठी आपली ऊर्जा मार्गी लावू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरेल. यातील संशोधने सखोल व प्रामाणिक आहे. कुठेही उपदेशाचा आव आणला असे नाही, परंतु प्रत्येक कहाणी, अनुभवाचा, इच्छेच्या अंती एक-एक बोध दिला गेला आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांकडेच भव्यदिव्य स्वप्न व इच्छा असतात. वास्तवाशी सामना होताच पदरी अनेकदा केवळ निराशाच येते. परंतु स्वत:कडेच भिन्न दृष्टिकोनातून बघता यावे, म्हणून केलेली मदत असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तुम्हाला काहीतरी शिकवणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून, तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे हा खरा हेतू त्यामागे आहे. आयुष्यात जे शिकलात त्यांची अंमलबजावणी कशी करायची. आयुष्यातील काळोख्या कालखंडातून बाहेर कसे पडायचे. संधीच्या खिडकीचा उपयोग कसा करायचा. बरोबर मार्गाची निवड कशी करायची... अशा सर्व प्रश्नांची यथा योग्य उत्तरे सोदाहरण इथे मिळतील. महिलांवर लिहिलेले हे पुस्तक फक्त महिलांकरताच मात्र नाही. अनेक उच्चपदस्थ महिलांची फौज आपल्या उद्योगात बाळगणाऱ्या सर्व पुरुषांनी देखील हे पुस्तक जरूर वाचावे असा लेखिकेचा आग्रह आहे. त्यामुळे पुरुषांना मर्मदृष्टी मिळेल असेही ती म्हणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more