* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NEELKANTH
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983302
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES REVEALING THE INTERWOVEN FEELINGS OF MEN, WOMEN AND DESTINY, ALL ALIKE, YET EACH ONE UNIQUE IN HIS OR HER OWN WAY. SPLENDID COLOURS OF THE COMPLICATED RELATIONS BETWEEN HIS AND HER. WE MEET SO MANY PEOPLE WHILE WE ARE TRUDGING ALONG THE PATH OF LIFE. MOST OF THE TIMES, IT IS DIFFICULT TO PENETRATE DEEP INTO THEIR MINDS, BENEATH THEIR PLAIN OR EXPRESSIVE FACES. THE RELATIONS BETWEEN HUMAN BEINGS ARE VARIED AND KNOTTY, AT MOMENTS, THORNY TOO. EACH ONE REFLECTS A DIFFERENT STYLE OF LIVING AND BEHAVING. THE SHOW OF FEELINGS AND THE REACTIONS IN ANSWER DISCLOSE LOTS OF RIPPLE ON MINDS. THIS BOOK AND THE WONDERFUL STORIES PRESENTS ALL THESE INTRICACIES OF LIFE FOR OUR PERUSAL. THE BASE OF IT IS THE RELATION BETWEEN A MAN AND A WOMAN, SUPERB YET THE MOST TRICKY, DEMANDING, CHALLENGING, AND YET AWKWARD AT TIMES. ‘LOVE’, JUST A WORD, BUT THE FEELINGS THAT IS REFLECTS HAVE END NUMBER OF SHADES. ‘LIFE’, ALL STUCK IN THE TRICKY AND COMPLEX MAZE OF DESTINY AND A HUMAN LIFE DEEP DOWN IN IT TOO. THE AUTHOR HAS IMMENSE SKILLS, SHE HAS AN OBSERVANT EYE, SHE HAS COLLECTED THESE VARIOUS SHADES, ASSORTED THEM AND THEN PRESENTED THEM ALL IN HER SKILLFUL HAND. SHE HAS SUCCEEDED IN COMBINING THE WORDS AND THE FEELINGS. EACH OF HER STORY INCREASES OUR INTEREST TO SUCH AN EXTENT THAT IT BECOMES IMPOSSIBLE TO KEEP THE BOOK DOWN TILL THE END. THESE STORIES WILL GIVE YOU A SERENITY, THESE WILL MAKE YOU WONDER ABOUT THE HUMAN NATURE AS WELL.
जीवनप्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेह-यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच! व्यक्ती-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण त-हा, भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग या सा-याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री-पुरुष नातं! प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा! नियतीच्या भोव-यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन! अशी सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणा-या, आतला तळ ढवळून टाकणा-या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणा-या या कथा म्हणजे एक तरल अनुभूती!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    अप्रतिम पुस्तक

  • Rating StarLOKPRABHA 25-01-2019

    स्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा... ‘नीलकंठ’ या पुस्तकामध्ये स्नेहल जोशी यांनी तब्बल १७ कथा लिहिल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अ‍ॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘रान्देव्ह्यू’, ‘वादळ’, ‘जाऐ तो जाए कहाँ’, ‘मेड फर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळ’, ‘एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ इत्यादी. ‘स्त्री-पुरुष नात्यातले काही न सांगितले गेलेले, न बोलले गेलेले पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न स्नेहल जोशी यांनी केला आहे. त्यांच्या सर्वच कथांच्या नायिका या कुठल्या अर्थी नियतीला शरण गेलेल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘जाऐ तो जाऐ कहाँ’, रान्देव्ह्यू’ या कथांमध्ये नात्यांतला एक वेगळा अनुबंध दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अ‍ॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘वादळ’, ‘मेड फॉर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळं’, एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ या साऱ्या कथांमध्ये मनुष्यवासनेची वेगवेगळी रूपे आपल्याला हैराण करतात. ...Read more

  • Rating Starभालचंद्र लेले

    उत्तम कथासंग्रह … आपला ‘नीलकंठ’ कथासंग्रह वाचनांत आला. या सर्वच कथा, आतापर्यंत न स्पर्श झालेल्या विषयांच्या आहेत. मांडणी अतिशय वाचनीय आहे. सर्व कथा काल्पनिक आहेत असे वाटतच नाही. प्रत्येक कथेचा विषयविस्तार सहजतेने उतरला आहे. त्यातील फ्रॉड, अ‍ॅना कॅरनना, भूक, बहिणी, रान्देव्हु, मेड फॉर..., रखवाली (या जमान्यातील पुरुष व्यथा), बळीचं तळे या कथा विशेष आवडल्या. आतापर्यंत अनेक कथा वाचनांत आल्या. पण श्री. शं.ना. नवरे यांच्या कथांना जसा अकल्पनीय विस्तार असतो त्याचप्रमाणे मानवी मनाची स्पंदने केव्हा कशी वळणे घेतील हे सांगता येत नाही व कळतही नाही. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच अशा कथा या अगोदर वाचनांत कधीही आलेल्या नाहीत. मुळात कथालेखन करणारेच कमी झाले आहेत आणि कथांची निवड करणे, मगच त्याचे वाचनमूल्य ओळखून कथासंग्रह काढणारे प्रकाशकही दुर्मिळ झाले आहेत. खूप वर्षांनी उत्तम कथासंग्रह वाचावयास मिळाला. मन:पूर्वक धन्यवाद. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more