IN THIS BOOK WE GET A PICTORIAL VIEW OF THE VARIOUS ACTIVITIES AND PROJECTS IMPLEMENTED BY KIRAN BEDI DURING HIS `TOP COP` TENURE. THE AIM OF THIS INITIATIVE WAS TO HELP THE COMMON PEOPLE BY THE POLICE BUT ALSO TO REDUCE THE FEAR OF THE POLICE IN THE MINDS OF THE PEOPLE. KIRAN BEDI CALLS IT `INNOVATION`. THROUGH THIS, WE GET TO SEE A VISUAL REVIEW OF VARIOUS ACTIVITIES IN THE FORM OF COOPERATION WITH THE POLICE THROUGH THE DIRECT PARTICIPATION OF THE PEOPLE AND SOLVING THE PROBLEMS OF THE PEOPLE. EVERY PROBLEM HAS A SOLUTION AND THAT SOLUTION WAS EXTRACTED FROM PUBLIC
PARTICIPATION AND USED TO SOLVE COMMON PEOPLE`S PROBLEMS. THESE ACTIVITIES WERE INITIALLY OPPOSED INITIALLY, THESE ACTIVITIES WERE MET WITH OPPOSITION, BUT LATER, AFTER REALIZING ITS BENEFITS AND USEFULNESS, PEOPLE RESPONDED ENTHUSIASTICALLY. MANY OF THESE INNOVATIONS WERE HONORED WITH AWARDS AT THE NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS IF SOME NECESSARY ITEMS AND TOOLS ARE NOT AVAILABLE IN THE POLICE SYSTEM, WE CAN SEE THAT THEY ARE USED PROPERLY FOR THE BENEFIT OF THE PEOPLE BY GETTING THEM THROUGH PUBLIC PARTICIPATION. THROUGH THIS BOOK, READERS GET A GOOD PICTURE OF THE `CREATIVE` PERIOD OF KIRAN BEDI`S CAREER IN POLICE SERVICE.
किरण बेदी यांच्या `टॉप कॉप` कार्यकाळात राबवल्या गेलेल्या विविध उपक्रम आणि प्रकल्प यांचे चित्ररूपी दर्शन आपल्याला या पुस्तकात घडते.
सामान्यातील सामान्य लोकांना पोलिसांची मदत व्हावी पण लोकांच्या मनात पोलीसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी हा हेतूसुद्धा या उपक्रमामध्ये होता.
किरण बेदी याला `नवोपक्रम` असे नाव देतात. या माध्यमातून लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून पोलिसाना सहकार्य व त्यातूनच लोकांच्या समस्यांचे निराकरण असे स्वरूप असलेले विविध उपक्रम याचा आपल्याला सचित्ररूपात आढावा घेतलेला पाहायला मिळतो. प्रत्येक समस्येला तोडगा असतो आणि तो तोडगा लोकसहभागातून काढून त्याचा वापर करून सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यात करण्यात आला. या उपक्रमांना सुरुवातीला विरोधही झालेला पाहायला मिळाला मात्र नंतर याचे फायदे आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर लोकांचा उस्फुर्त प्रतिसाददेखील मिळाला. यातील बऱ्याच नवोपक्रमांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पोलीसयंत्रणेत काम करत असताना काही आवश्यक बाबी व साधने उपलब्ध नसतील तर ती लोकसहभागाच्या माध्यमातून मिळवून त्याचा योग्य असा वापर लोकांच्या हितासाठीच केलेला आपल्याला पाहायला मिळतो. किरण बेदी यांच्या पोलिससेवेच्या कारकिर्दीतील `सर्जक` कालखंडाचे उत्तम असे चित्ररूप दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडते.