* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIGHT
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9789353172275
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NIGHT IS A WORK BY ELIE WIESEL ABOUT HIS EXPERIENCE WITH HIS FATHER IN THE NAZI GERMAN CONCENTRATION CAMPS AT AUSCHWITZ AND BUCHENWALD IN 1944–1945, AT THE HEIGHT OF THE HOLOCAUST TOWARD THE END OF THE SECOND WORLD WAR. IN JUST OVER 100 PAGES OF SPARSE AND FRAGMENTED NARRATIVE, WIESEL WRITES ABOUT THE DEATH OF GOD AND HIS OWN INCREASING DISGUST WITH HUMANITY, REFLECTED IN THE INVERSION OF THE PARENT–CHILD RELATIONSHIP, AS HIS FATHER DECLINES TO A HELPLESS STATE AND WIESEL BECOMES HIS RESENTFUL TEENAGE CAREGIVER. THE BOOK HAD BEEN TRANSLATED INTO 30 LANGUAGES, AND NOW RANKS AS ONE OF THE BEDROCKS OF HOLOCAUST LITERATURE. NIGHT IS THE FIRST IN A TRILOGY—NIGHT, DAWN, DAY—MARKING WIESEL`S TRANSITION DURING AND AFTER THE HOLOCAUST FROM DARKNESS TO LIGHT.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये ज्या ज्यूंनी अमानुष छळ सोसला आणि त्या मृत्यूच्या सापळ्यांमधूनही वाचून जे जिवंत राहिले, त्यांचे अनुभव म्हणजे वाहती जखम आहे. अशीच एक भळभळती जखम म्हणजे ‘नाइट’ हे पुस्तक. डॉ. एली वायझेल यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ऑशवित्झ आणि बुशेनवाल्ड इथल्या नाझींच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यांचे आई-वडील, लहान बहीण - सर्वांनाच जर्मनांनी पकडून नेले. त्या तुरुंगामधल्या यमयातनांमधून फक्त डॉ. एली वायझेल वाचले. आपल्या प्राणप्रिय आई-वडील-बहीण यांचे मृत्यू त्यांना कोवळ्या वयात सोसावे लागले. हा सगळा या विदारक अनुभव त्यांनी या पुस्तकात कमालीच्या प्रत्ययकारी भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे सखोल जीवनचिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील त्यांचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. पुस्तकाच्या पानापानांमध्ये त्या काळरात्रींचा जिवंत अनुभव ठासून भरला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ELIE WIESEL #NAZIGERMAN #SECONDWORLDWAR #HOLOCAUSTLITERATURE # HITLER # JEWLITERATURE #AUSCHWITZANDBUCHENWALDIN1944–1945 #दुसरेमहायुद्ध #नाझी #हिटलर #एलीवायझल #
Customer Reviews
  • Rating StarAmit Indurkar

    मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणारा व्यक्ती अर्थात ` हिटलर ` शाळेत असताना हिटलर हे नाव अनेकदा ऐकले होते. हिटलर म्हणजे कुणीतरी रागीट, तापट आणि सर्वांना नकोसा असणारा क्रूर व्यक्ती असावा एवढेच काय त्या हिटलर बद्दल माहित होते. शाळेत असताना मित्र एकमेांना " ए जास्त हिटलर बनण्याचा प्रयत्न करू नकोस, हिटलरशाही तुझ्या अंगात आली आहे का?" इत्यादी वाक्ये बोलायचो. पण हा हिटलर नेमका कोण होता हे त्यावेळी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण काही वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकाने (लेखक, पत्रकार व कवी असणारे) मला कुमार नवाथे लिखित नाझी नरसंहार हे पुस्तक दिलं. ते पुस्तक मी वाचून काढलं तेव्हा मला समजले की एखाद्या रागीट, तापट व क्रूर माणसाला हिटलर नावाने का संबोधले जात असते. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी आमच्या महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालो होतो. चर्चासत्राचा विषय होता मावधिकराच्या विस्तारित कक्षा (The Expanding Horizon of Human Rights). या चर्चासत्राच्या शोधपुस्तिकेसाठी मी एक लेख देखील लिहिला होता. या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या एका प्राध्यापकाने हिटलर ने तयार केलेल्या छळछावणीतील त्या क्रूर आणि हिंस्त्रक कार्यवाहीचे काही दाखले दिले होते. ते ऐकून अस्वस्थ वाटू लागले. पण नंतर शिक्षकाने दिलेले पुस्तक वाचल्यानंतर तर मनात एक विचार सारखा येऊ लागला (विचार नव्हे हा तर एक ठाम निष्कर्शच) की हिटलर का क्रूर आणि हिंस्त्रप्राणी होता. त्याला प्राणी देखील म्हणता येणार नाही. (माणूस म्हणण्याच्या लायकीचा तर तो नाहीच). आजवर वाघ, सिंह यांना आपण हिंस्त्रप्राणी असे म्हणत आलेलो आहोत पण ही प्राणी एखाद्या पशू किंवा प्राण्याची शिकार करतात, त्याचे रक्त पितात, त्याचे मांस खातात. पण पोट भरून झाल्यावर मात्र त्यांच्या समोरून कोणता प्राणी गेला तरीही ते शांत असतात कारण पोट भरलेलं असतं. पण हिटलर ने केलेली हिंसा ही कधीही पोट न भरलेल्या प्रण्यासारखी होती. या हिंस्त्र प्राण्याला माणसांवर (ज्यू स्त्री - पुरुष, बालके, अबालवृद्ध लोकांना छळण्याची, त्यांना जिवानिशी मारण्याची सवय झालेली होती. (रक्ताने माखलेले तोंड म्हणतात ना एकदम तशी सवय) याकरिता त्याने त्या जिवंत ज्यू लोकांना अनेक मरणयातना दिल्या, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना यमसदनी पाठविले. हिटलर चे हे कृत्य वाचले की अंग अक्षरशः थरथर कापू लागतो, मनात अस्वस्थता निर्माण होते, सभोवताली भीतीचे काळेकुट्ट ढग निर्माण झाल्याचा भास होतो. एली वायझल नावाच्या एका लेखकाने (हिटलरच्या छळछावणीत मरणयातना भोगणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी असणारी व्यक्ती) नाईट नावाचे त्याचे छळछावणीत आलेल्या अनुभवाचे एक आत्मकथन लिहिले. हे पुस्तक वाचून आता हिटलर हा शब्द, हे नाव नकोसे वाटू लागले. ते आत्मकथन वाचत असताना पूर्वी लिहिल्याप्रमाणे अंगाला थरकाप सुटतो. लेखकाने त्याच्या डोळ्यासमोर त्याचे कुटुंब, त्याचे गाव उध्वस्त होताना बघितले. त्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याला हिटलर च्या छळछावणीत त्यांच्याशी होणाऱ्या क्रूर वागणुकीचा सामना करताना बघितले. तेव्हा त्याचे वय जेमतेम १६ वर्षे होते. १६ वर्षाचा हा बालक हिटलर च्या क्रूर कार्यवाहीचा बळी ठरलेला होता. तहान, भूक त्यातल्या त्यात स्वतः चे जीवन वाचविण्यासाठी सोसावे लागणारे दुःख, डोळ्यादेखत अनेकांची हत्या होताना पाहणे, अनेकांना फासावर जाताना तर अनेकांना भुकेपोटी एकमेकांना मारताना पाहणे असे अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव लेखकाला आलेले आहेत. हे पुस्तक वाचताना ही परस्थिती आपल्या शत्रूवर देखील उद्भवू नये असे मनोमन वाटते. (पुस्तकातील प्रत्येक पृष्ठावर त्या छळछावणीत बंदिस्त असणाऱ्या आणि मरणयातना भोगणाऱ्या त्या सर्व लोकांच्या आर्त किंकाळ्या आहेत. जणूकाही ते आपल्याला सांगत आहेत, ` ही परिस्थिती भविष्यातील पिढ्यांवर ओढवू नये.` ) भारतातील अनेक लोकांना हिटलर, त्याची विचारसरणी, त्या विचारसरणीशी साम्य असणारी संघटन, व्यक्ती अजूनही आवडतात. अश्या विचारसरणी चा विरोध करण्याऐवजी या विचारसरणीला खतपाणी घालत असतात. अशी ही हिंस्त्र विचारसरणी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना ( समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष या विचारसरणीशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींना) नक्कीच आवडणार नाही, नव्हे ती कुणाला परवडणारी देखील नाही. हिटलर लिखित ` माझा लढा (संघर्ष)` हे आत्मचरित्र भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे. पण चिंतेची बाब आहे की, त्याची विचारसरणी अनेकांना आवडू लागलेली आहे. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    नाईट- पिता पुत्राचा मृत्यूशी संघर्ष नाझींच्या क्रूरतेच्या, नरसंहाराच्या घटना काळजाचा थरकाप उडवतात, अंगावर शहारे आणतात. नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या एली वायझल यांनी लिहिलेले ‘नाईट’ हे पुस्तक देखील वाचताना सुन्न करून जातं. १५ वर्षांचें असताना एलीयांना कुटुंबासह छळछावणीत डांबण्यात आलं. एली आणि त्यांच्या वडीलांचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी सामना सुरू होता. या संकटसमयी किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी या पुस्तकातून उलगडते. नाझींच्या छळछावण्या, ज्यू लोकांच्या निर्दयी कत्तली याविषयी अनेक पुस्तके, सिनेमे आहेत. ‘नाईट’ पुस्तकात वडील आणि मुलाच्या नात्याची करूण किनार दिसते. मृत्यूच्या नरकात एकमेकांनी जिवंत रहावे म्हणून दोघांची चालेलली धडपड, हतबलता वाचकांना बधीर करते. मृत्यू एकेक दिवस पुढे ढकल्यासाठी पिता पुत्रांचा संघर्ष सुरू असतो. एकेक प्रसंग काळजाचा ठाव घेतात. त्या कोवळ्या वयात एली यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती मृत्यूवर मात करते. पुस्तकातील घटनांची कल्पना करवत नाही, एवढ्या भयंकर आहेत. कुठल्याही क्षणी जिवंत भट्टीत टाकले जाईल, गोळ्या घातल्या जातील हे माहित असताना दुदर्म्य इच्छाशक्तीच्या बळावर तग धरून राहत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. एली वायझेल यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली आहेत. ...Read more

  • Rating StarAneruddha Devkar

    ज्युंचा जो छळ क्रुर हिटलरच्या जर्मनीने केला त्याचे ह्रदयस्पर्शी वर्णन या पुस्तकातुन एली वायझल यांनी केले आहे. माणुस किती अमानुषपणे दुस-याशी वागु शकतो हे वाचुन शहारे येतात. लेखकाने आपला पुर्ण परिवार ह्या छळछावणीत आपल्या डोळ्यासमोर तीळतीळ मरताना पाहिला केवळ पंधराव्या वर्षी कोणालाही भोगाव्या लागु नये अश्या यातना त्यांनी भोगल्या. हजारो, लाखो ज्यु बांधवांना निर्विकारपणे मरणाच्या खाईत लोटणा-या निर्दयी नाझींचे वास्तववादी चित्रण लेखकाने यशस्वीपणे या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकातील काही प्रसंग अतिशय भावस्पर्शी असुन मनाला हादरा देणारे आहेत. लेखकाने अनेक काळरात्री अनुभवल्या आणि त्या त्यांच्या संपुर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेल्यात. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरील त्यांचे अनुभव मानवतेला काळीमा फासणारे आहेत. अश्या छळछावण्यांमधुन सर्व हालअपेष्टा भोगुन सुटलेल्या सर्व योध्दयांना सलाम.... ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    अंगावर काटा आणणारे आत्मकथन.... हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी. नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भटटीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली. नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे. छळछावणीतील प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो. सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय. एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले. हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही. मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली . लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.