- डॉ. नीला पांढरे, साहित्य सूची, ऑगस्ट २००५
रत्नाकर मतकरींच्या या गूढकथांमध्ये वाचकांचे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून मन सुन्न होते. कारण त्यातील अनुभव चित्तथरारक असतात. या कथा पूर्णत: काल्पनिक मात्र नाहीत.
मराठी साहित्यात ‘कथा’ हा सर्वाधिक लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. या ्रकारात विविधताही भरपूर आहे. सामाजिक आणि कौटुंबिक कथा हा प्रकार आता मागे पडलेला असून रहस्यकथा, विज्ञानकथा, भयकथा, गूढकथा असे कितीतरी नवनवे प्रकार रूढ झाले आहेत.
‘निर्मनुष्य’ हा रत्नाकर मतकरी ह्यांच्या अगदी अलीकडच्या गूढ कथांचा संग्रह. २००३ आणि २००४ या दोन वर्षांमध्ये हंस, दीपावली, शब्द, कथाश्री, सामना अशा दर्जेदार दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या नऊ कथा आता पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून मतकरी ख्यातकीर्त आहेत. गूढकथा लिहिणे ही तशी अवघड गोष्ट. पण मतकरी त्याबाबतीत सिद्धहस्त आहेत. खेकडा, मृत्युंजयी, एक दिवा विझताना, रंगांधळा, रंगयात्री अशा त्यांच्या कितीतरी कथासंग्रहांचा उल्लेख यासंदर्भात करता येईल. अमेरिकन लेखक एडगर अॅलन पो Edgar Allan Poe ह्याने इंग्रजी भाषेत काही गूढकथा लिहिलेल्या असून त्याल गूढकथांचा उद्गाता मानण्यात येते. मराठीत हा वाङ्मयप्रकार मतकरींनीच लोकप्रिय केला. त्याला नारायण धारप, यशवत रांजणकर ह्यांनी साथ दिली. २५-३० वर्षांपूर्वी ‘नवल’ मासिकातून या त्रयीच्या गूढकथा वाचल्याचे मला स्मरते आहे. पण एकंदरीत ‘गूढकथा’ मराठीत दुर्मीळच आहेत. त्यांचा वाचकवर्गही मर्यादित आहे. रसग्रहणाचे ठराविक निकष इथे अपुरे पडतात. कारा या कथांमध्ये अमानवी शक्तींचा वावर असतो. अज्ञात प्रदेश, गूढ वातावरण, मृतात्मे, चेटकिणी, जादू-टोणा यासारख्या गोष्टींमुळे आपण सुन्न होतो. कथानकांमध्ये गुंतत जातो. पुढे काय घडणार याबद्दल मनांमध्ये भीतीमिश्रित कुतूहल निर्माण होते.
रत्नाकर मतकरींच्या या गूढकथांमध्ये वाचकांचे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून मन सुन्न होते. कारण त्यातील अनुभव चित्तथरारक असतात. या कथा पूर्णत: काल्पनिक मात्र नाहीत. कारण त्यांना मानसशास्त्राचा आधार आहे. राजकारणाचा स्पर्श आहे. गारठून टाकणारे भय आणि उत्कंठा वाढविणारा संदेश त्यातून दिला जातो. ‘भीती’ ही मानवाची स्वाभाविक भावना असली तरी वाचकांना भयभीत करणे हा लेखकाचा हेतू नाही. या कथांमधून प्राणिमात्रांविषयी करुणा व्यक्त झाली आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनातून मानवी जीवनावर केलेले हे भाष्य आहे. या कथा आशयघन आणि अर्थगर्भ आहेत. या कथा केवळ व्यक्तींचे भावजीवन रेखाटत नाहीत तर अंतिम न्यायाचा आग्रह धरतात.
या संग्रहात एकूण नऊ कथा आहेत. त्यापैकी ‘भूमिका’ ही कथा त्यांच्याच ‘रणमर्द’ या एकाकिकेवर आधारित आहे. गुरुनाथ नावाचे प्रसिद्ध नट ‘रणमर्द’ या ऐतिहासिक नाटकात भूमिका करत असतानाच रंगभूमीवर मरण पावलेले असतात. त्यांची ती गाजलेली भूमिका ‘चैतन्य’ या तरुण नटाकडे येते आणि भूमिका रंगवत असतानाच गुरुनाथांचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो. चैतन्य आणि त्याची प्रेयसी विशाखा या प्रकाराविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करतात. पण तो अयशस्वी होऊन चैतन्याचाही रंगभूमीवरच मृत्यू घडून येतो असे त्याचे कथानक आहे.
‘प्रार्थना’ ‘शनचरी’ ‘पण नंतर मात्र’ आणि ‘दुरुस्ती’ या चार कथा स्त्री व्यक्तिरेखांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. ‘प्रार्थना’ कथेची नायिका कु. शिवारे ही असुरी शक्ती असलेली स्मार्ट तरुणी आहे. आपल्या चिडखोर आणि तापट बॉसने मरावे आणि त्याच्या जागी आपण ज्याच्यावर मन:पूर्वक प्रेम करतो आहोत त्याची नेमणूक व्हावी म्हणून ‘प्रार्थना’करणारी शिवारे बॉसच्या अपघाती मृत्यूने खूष होते. पण नायक प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर त्याचाही सूड घेऊ इच्छिते. ‘शनचरी’कथेत चेटकी म्हणजे दुसऱ्याचे वाईट घडवून आणणारी दुष्ट स्त्री – हा समज चुकीचा ठरवला आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या ‘शनचरी’ ने मध्यप्रदेशातील जुलमी, अनेक तरुणींचे आयुष्य बदबाद करणाऱ्या जमीनदाराचे पारिपत्य केलेले असते. तिच्या संदर्भातील आख्यायिका गोळा करण्यासाठी गेलेली जयमालाही असहाय्य व दुबळी आहे. तिच्या व्यभिचारी पतीने केवळ पैशासाठी तिच्याशी लग्न केलेले असून, तो तिचा छळ करत असतो. मुंबईला अकस्मात परत आलेली जयमाला त्याला परस्त्रीबरोबर रममाण झालेला पाहते. असाहाय्य, दुबळ्या जयमालेचे ‘शनचरी’त झालेले रुपांतर हा या कथेचा परमोच्च बिंदू असून, ‘शनचरी’च्या सामर्थ्याने व प्रभावाने रवीचे लिफ्टमध्ये अडकून अपघाती निधन होते आणि पतीच्या जुलुमातून तिची सुटका होते. जुलुमाचा, अन्यायाचा प्रतिकार करणारी ‘शनचरी’ मरत नाही तर दुसऱ्या रूपाने जन्माला येते – हे त्यातून सुचित केले आहे.
‘पण नंतर मात्र’ कथेतील निवृत्त प्राध्यापिका असलेल्या सरिताला आपला पती सागर आपल्याला मदतीसाठी हाका मारतो आहे असा भास पुन्हा पुन्हा होतो. प्रत्यक्षात सागर तिच्या शेजारीच असतो. आपल्या मदतीची आवश्यकता आपल्या मुलाला असावी असे समजून ती रात्री कोसळत्या पावसात सांताक्रूझला राहणाऱ्या आपल्या मुलाकडे जाते. तिथे सर्व सुखरूप असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा कारने तिला घरी सोडायला येतो. लॅचकीने कुलूप उघडून दोघे घरात शिरतात आणि पाहतात तर मुलाचे वडील गालीच्यावर मृत होऊन पडलेले असतात. रात्री कधीतरी त्यांना हार्ट अॅटॅक आलेला असतो. मदतीसाठी जवळ कोणीच नसते. फोनही डेड असतो. सरिताच्या लक्षात येते की तिच्या मनाने आधी सूचना दिली होती. त्याचा आवाजही तिने ओळखला होता. पण काळाने तिची फसगत केली होती.
‘दुरुस्ती’ कथेत वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांचे चमत्कारिक मिश्रण आहे. मिथिला आपल्या पतीसह वडिलोपार्जित बंगल्याचा ताबा घ्यायला आली आहे. तिचा सारा भूतकाळ विचित्र आहे. आजोबांनी चारित्र्याबद्दल संशयाने आजीचा खून केलेला, आई-वडील विभक्त झालेले- मिथिलेला काही काळ वेड्याच्या इस्पितळात राहवे लागलेले- सुदैवाने तिच्या पतीचे सिद्धेश्वरचे तिच्यावर खूप प्रेम आहे. बंगल्यात मिथिलेला भूतकाळातील व्यक्ती भेटतात. त्यांनी केलेल्या चुका ते दुरुस्त करतात. त्यामुळे मिथिलाही बदलते. पण त्याच वेळी सिद्धेश्वरचे रूपांतर सिद्धानंदमध्ये होऊन तो तिचा काटा कसा काढता येईल याचा विचार करू लागतो. मानवी स्वभावातील विसंगतीवर भाष्य करणारी ही कथा चित्तवेधक आहे.
लग्नाला अठरा वर्षे होऊनही मूलबाळ न झालेले मंत्रिमहोदय आणि एक आकर्षक अविवाहित कलावंत स्त्री यांच्या मीलनातून अस्तित्वाला आलेला ‘गर्भ’ हा एक कथेचा विषय आहे. मंत्रिमहोदय स्त्रीलंपट आहेत. तर कलावती महत्त्वाकांक्षी आहे. या दोघांच्या संबंधामुळे मंत्र्याच्या पत्नीची मात्र फरफट होते. हे विवाहबाह्य प्रकरण अंगावर शेकणार हे लक्षात येताच कलावतीचा खून करण्यात येतो आणि गर्भाचेही अस्तित्व आपोआपच संपुष्टात येते. या कथेतील व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे चित्रण आकर्षक असले तरी कथेतील गूढता मात्र अस्पष्ट आहे.
‘व्हायरस’ कथेलाही राजकारणाचा स्पर्श आहे. एका सभेत मुख्यमंत्री अचानक सत्य बोलू लागतात. आपण पाच लाख रुपये लाच घेतली, जनतेला लुटले, परस्त्रीवर प्रेम केले– अशी कबुली देतात. सत्य बोलण्याच्या त्यांच्या या आजाराची लागण पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री यांनाही होते. डॉक्टरांना पाचारण करण्यात येते. खरे बोलण्याचा हा व्हायरस सगळीकडे पसरू लागतो. खुद्द डॉक्टरही त्याला बळी पडतात.
आपले जीवन सध्यापेक्षा वेगळे असते तर काय झाले असते? यासबंधातील पर्यायी विचार आपण करत असतो. ‘पर्यायी’ कथेतील सुमीतच्या जीवनात असेच काहीतरी घडले आहे. विद्यार्थिदशेत सुमीतचे आकांक्षावर प्रेम होते. तो पत्नीच्या रूपात तिचाच विचार करत होता. पण नंतर त्याने साईड बदलली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्याचा परिचय श्रेयाशी झाला. दोघांनी लग्न केले पण दुर्दैवाने त्यांना मूलबाळ झाले नाही. एक दिवस अचानक दहा वर्षांचा समीर नावचा मुलगा सुमीतला भेटतो. आपण अमेरिकेत राहतो. आपल्या वडिलांचे नाव सुमीत तर आईचे आकांक्षा देवधर– अशी माहिती तो देतो. प्रयत्न करूनही त्याचा ठावठिकाणा सापडत नाही. दोन दिवस तो सुमीत-श्रेयाच्या घरी राहतो आणि अचानक गायब होतो. श्रेया-आकांक्षा देवधरचा पत्ता शोधून काढते. तिने एका पंजाब्याशी लग्न केलेले असते आणि तिलाही मुलगा नसतोच. एक मुलगी मात्र होते. सुमीत विचार करू लागतो- समजा आपले जर आकांक्षाशी लग्न झाले असते तर आपण अमेरिकेत स्थायिक झालो असतो. आपल्याला मुलगा झाला असता– पर्यायी जगात असे घडू शकले असते– त्या पर्यायी जगातून सॅम-समीर आला होता आणि परत नाहीसाही झाला होता.
जिचे नाव या संग्रहाला दिले आहे ती पहिल्याच क्रमांकाची ‘निर्मनुष्य’ कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. कथेचा नायक एका सायंदैनिकाचा वार्ताहर आहे. कथेच्या माध्यमातून जीवनातील असुरक्षितता रेखाटली आहे. निर्मनुष्य रस्त्याचे वर्णन आकर्षक पद्धतीने केलेले दिसते. मृतवत् पडलेला निर्मनुष्य रस्ता, मनगटी घड्याळ बंद, मोबाईल बंद, घरी किंवा ऑफिसमध्ये फोन लावला तर त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. रस्त्यावर त्याला वेगवेगळी माणसे भेटतात. अस्थिपंजर चित्रकार, गुंड मागे लागल्यामुळे भयभीत होऊन पळणारी तरुणी, वेगवान गाडीखाली सापडून जखमी झालेली माणसे– सगळे जगच असुरक्षित वाटू लागते. चित्रकार त्याला सांगतो की शहर बंद करण्यासाठी काढलेल्या मोर्चामध्ये जखमी होऊन तो मरण पावलेला आहे. आपण जिवंत नसून मृत झालेलो आहोत हे लक्षात येताच नायकाची अवस्था भयानक होते. तो ऑफिसकडे धाव घेतो तर बॉम्बहल्ल्यात ऑफिसही उध्वस्त झालेले. काही सहकारी मृत झालेले तर कोणी अत्यवस्थ असलेले– काय सुरक्षित आहे? हेच उमजेनासे होते– या कथेमध्ये वातावरण निर्मिती कलात्मक पद्धतीने केलेली असून, लेखकाच्या भाषाशैलीचे कौशल्य प्रकर्षाने जाणवते– कथानक, स्वभावचित्रे आणि भाषाशैली या तीनही दृष्टिकोनातून हा कथासंग्रह आकर्षक झाला आहे. भयकथा आणि गूढकथांची आवड असणाऱ्या वाचकांनी तो आवर्जून वाचायला हवा.
...Read more
- DAINIK SAKAL 24-07-2005
मतकरींच्या वैविध्यपूर्ण गूढकथा!...
गूढकथाकार म्हणून रत्नाकर मतकरी यांनी स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. ‘निर्मनुष्य’ या त्यांच्या ताज्या कथासंग्रहातील नऊही कथांतून त्यांची गूढकथेवरची पकड लक्षात येते.
मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे. नियतचे गूढ माणसाला आवाहन देत असते. मानवी संज्ञेला आणि बुद्धीला ज्ञान अशा जगापलिकडच्या, अनाकलनीय, अतर्क्य वास्तवाचे अस्तित्व, विज्ञानाच्या साह्याने उकलता न येणारे अनुभव, हा गूढकथेचा पाया असतो. ‘निर्मनुष्य’ या संग्रहातील मतकरींच्या गूढकथा कधी अतींद्रिय अनुभवांवर आधारित आहेत (पण नंतर मात्र) तर कधी मानसशास्त्र ही त्यांची बैठक आहे. माणसाच्या नेणिवेतील गुंतागुंतीच्या मनोव्यापारांतून गूढाची निर्मिती झाली आहे. (गर्भ, दुरुस्ती, पर्यायी) तर कधी अतिमानुषी अस्तित्व गूढाचा, भयाचा अनुभव देते. लोकपरंपरेतून चालत आलेल्या भूत, पिशाच्च, चेटकीण अशा रूपांत ते प्रकटते, तर कधी विदेही आत्म्यांचा वावर त्यात दिसतो. (निर्मनुष्य, शनचरी, भूमिका, प्रार्थना इ.) पिशाच्च योनीच्या संभाव्यतेचा परंपरागत संकेत या कथांतून ठोसपणे प्रकटतो; पण त्यामागची लेखकाची दृष्टी मात्र आधुनिक आहे. त्यामुळे कथेला वेगळे परिणाम लाभते. उदा. शनिचरी ही कथा माणसाच्या जगण्यातले क्रौर्य, त्यातील भयावहता अधोरेखित करते. अत्याचारी माणसाला शासन झाले पाहिजे, या काव्यगत न्यायाचे सूचन ही कथा करते.
शरीर अस्तित्व संपल्यावरही एखाद्या गोष्टीविषयीची तीव्र आसक्ती अतिमानुष अस्तित्वाचे प्रयोजन असू शकते, याचा प्रत्यय ‘भूमिका’ ही कथा देते.
कमालीच्या सहसंवेदनच्या प्रभावाने, तीव्र इच्छाशक्तीने प्रेरित होऊन अकल्पित असे घडवून आणणे, यातून प्रकटणारी गूढता प्रार्थना, दुरुस्ती, पर्यायी या कथांतून दिसते. शुभशक्तीप्रमाणेच अशुभाची केलेली प्रार्थनाही फलद्रूप होते (प्रार्थना), मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत जन्मालाच न आलेला पण येऊ शकला असता अशा मुलाची भेट (पर्यायी) एखादी घटना एक पद्धतीने न घडता दुसऱ्या पद्धतीने घडली असती तर, याच्या कल्पनेत आणि वास्तवात झालेली सरमिसळ (दुरुस्ती) ही आशयसूत्रे वेगळ्या गूढतेचा प्रत्यय देतात.
पण नंतर मात्र गर्भ, व्हायरस या कथा गूढतेची अपरिचित रूपे दाखवतात. या कथांत अतिमानुष अस्तित्व नाही. आपल्या प्रिय व्यक्तीत असलेल्या मानसिक, भावनिक गुंतवणुकीमुळे मृत्यूसारख्या घटनेची चाहूल सरिताला लागते. जे अतार्किक आहे. त्याची बुद्धीने संगती लावण्याच्या प्रयत्नात ती ऐन मृत्युसमयी सागरच्या जवळ असू शकत नाही. मानवी जीवनातील आयरनीचा प्रत्यय ही कथा विलक्षण सामर्थ्याने देते. दुरुस्ती ही कथाही तो देते. गर्भ आणि व्हायरस या कथांमधील गूढानुभव माणसाच्या मनातील अपराधगंडामुळे येतो समकालीन राजकीय, सामाजिक वास्तव, लौकिक मानवी व्यवहार यांच्या प्रत्ययकारी चित्रणामुळे या कथांतून अनुभवाला येणारे भय अस्वस्थ करते. व्हायरस या कथेत उपहासगर्भ विनोदाचा वापर करूनही त्यातील गूढ राखण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
गूढकथांच्या यशात लेखनतंत्र महत्त्वाचे असते. रहस्याची वा गूढतेची चाहूल, ते क्रमाक्रमाने गडद करत नेणे, त्यातील ताण, उत्कंठा वाढवत नेणे आणि अखेरची कलाटणी, हे सारे महत्त्वाचे असते. विशिष्ट रंगसंवेदना, पडके वाढे, अंधार-छाया-प्रकाश, प्रतिमा प्रतीकांचा भयसूचक वापर, नेमके, निवेदन, तपशिलांच्या निवडीमागचा दृष्टिकोन, या रचनातंत्रावर मतकरींची विलक्षण हुकमत असूनही त्यांच्या गूढकथा साचेबद्ध झालेल्या नाहीत, हे विशेष!
त्यांच्या पात्रांत, अनुभवांत वैविध्य आहे. पत्रकार, समाजशास्त्राची संशोधक, दहा वर्षाचा निरागस मुलगा, नोकरी करणारी सामान्य तरुणी, विख्यात नट अशा चारचौघांसारख्या माणसांच्या रूपात त्यातील अतिमानुष्स अस्तित्वे वावरतात. ती केवळ क्रूर, विध्वंसक आणि भयावह नाहीत. कधी कधी दिलासा देणाऱ्या रूपांतही त्यांचा आढळ होतो, (उदा. सॅम) तर कधी ती माणसाच्या मनातील अपराधगंडाचे प्रतीक ठरतात. (गर्भ, व्हायरस)
या सर्वच कथांमधून गूढ अनुभवांना समोरी जाणारी व साक्षी असणारी माणसे, त्यांचे भावविश्व त्या अनुभवांचा त्यांच्यावर होणारा परिणाम सामर्थ्याने व्यक्त होतो. कारण ‘गूढ’ असल्या तरी या कथाही माणसांच्या त्यांच्या सुख दु:खाच्या आणि आशा-अपेक्षांच्या आहेत. त्यातील पात्रांकडे पाहण्याची लेखकाची दृष्टी सहानुभूतिपूर्ण व सकारात्मक आहे. त्यामुळे भयचकित करणारा थरारक अनुभव देणे, एवढाच त्यांचा परिणाम सीमित राहत नाही, तर त्यापलीकडचे जीवनदर्शन इतर कुठल्याही चांगल्या कथेप्रमाणे त्या घडवतात.
-वंदना बोकील-कुलकर्णी ...Read more
- DAINIK SAKAL 12-06-2005
भय इथले संपत नाही...!
शुभंकराप्रमाणेच भयंकराकडेही त्याचे असे एक खास आकर्षण असते.
रत्नाकर मतकरी यांचं नवं पुस्तक ‘निर्मनुष्य’ हे संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावंस वाटत नाही.
गूढकथा लिहायच्या त्याही प्रत्येक कथेत वेगळंच रहस्य, वेगळी मिती, वेगळ्याभयाचा प्रत्येक वेळी वेगळा चेहरा हे सार फारच अवघड असतं. प्रत्येक वेळी नव्या पद्धतीनं वाचकाना दचकवायचं - घाबरवायचं आणि तेही सरधोपट पद्धतीनं नाही. मेंदूला मुंग्या, झिणझिण्या, मृत्यूचे नवनवे प्रकार, नवेनवे मुखवटे
मृत्यूनंतरचं भयाण जग कल्पनेपलीकडलं. म्हणूनच त्याची कल्पना करणं म्हणजे Sky is no limit.
आजकाल आयुष्यच इतकं भयानक आहे की खरं तर जिवंतपणे जगण्याच्या कथाही अमानवी गूढ रहस्यकथेत गणल्या जाव्या. पण जगण्याचा अनुभव कितीही भयावह असला तरी ते चित्तथरारक नाही वाटत. या संग्रहातल्या सर्व कथांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कथेला एक वेगळं भय आहे. माणसांचे प्रकार-विकार-स्वभाव-नियती सारंच वेगळं तरीही सुसंगत. म्हणजे विश्वास न ठेवणारा माणूसही हे मेंदूला पटेल असं अद्भूत वाचण्यात रंगेल.
मानवी मन मरणाच्या चेहऱ्याहून अद्भूत आहे न मानवी मनाचे असंख्य कंगोरे, छटा, त्याचं सकृत, विकृत हे रत्नाकर मतकरींनी असं दाखवलंय की मानवी अंतर्मनाचा तिरपा छेद घेऊन मायक्रोस्कोप भिंगातून आपण मनाचे खेळ, मरणानंतरच तग न् जिवंत व मृत शरीर मनाची उलथापालथ अनुभवतो. बघतो इतकं प्रत्ययकारी लिखाण हेच या कथासंग्रहाचं यश आहे.
जसं हसवणं सोपं नसतं तसं घाबरवणं पण सोपं नसतं. वाचकांना अंधश्रद्धेच्या कल्पनांकडे न ढकलून देता मरामानसशास्त्र, कल्पना वापरून बौद्धिक निखळ आनंद देणं हे खरंच कसब. एक बुजुर्ग लेखक म्हणून गेलेत की ‘माणूस स्वत:च्या सुरक्षितपणाच्या कवचामध्ये राहून दुसऱ्याच्या असुरक्षितपणाचा आनंद घेत असतो खरंय. त्याही बाबतीत या कथा आपल्याला आपला सुरक्षितपणाचा खुंटा बळकट करतात. चित्र, नाट्य, पत्रकारिता तसेच सामाजिक अंतर्विरोधांचा अभ्यास व व्यासंग असल्यामुळे त्यांच्या कथेतली पात्रे जरी ती गूढ रहस्यमयी जगातली, अवास्तविक जगातली असली तरीही ती खरी वाटतात. तुमच्या आमच्यासारखीच वाटतात. त्यांच्या जगण्याची मिती जरी आथर्वोय जगातली असली तरीही सारे कमालीचे आत्यंतिक मनस्वी-उत्स्फूर्त आणि असेही की न जाणे हे आपल्या कुणाच्याही बाबतीत घडू शकेल की काय असे वाटून जाण्याइतके प्रत्ययकारी झाले आहे.
भूत-पिशाच्च भय याचे एकजात सर्वांना वावडे असते. विश्वास असो अगर नसो, पण रत्नाकर मतकरींच्या गूढकथा मात्र एखाद्या लाडीक पिशाच्चप्रमाणे पिच्छा पुरवतात व डोळ्यावर, डोक्यात बसतात आणि ते वाचकांना आवडतेही असेच म्हणावे लागते.
-मलिका अमरशेख ...Read more
- SAHITYA SUCHI - AUG 2005
निर्मनुष्य – आशयघन अर्थगर्भ गूढकथांचा संग्रह…
रत्नाकर मतकरींच्या या गूढकथांमध्ये वाचकांचे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून मन सुन्न होते. कारण त्यातील अनुभव चित्तथरारक असतात. या कथा पूर्णत: काल्पनिक मात्र नाहीत.
मराठी साहित्यात ‘था’ हा सर्वाधिक लोकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. या प्रकारात विविधताही भरपूर आहे. सामाजिक आणि कौटुंबिक कथा हा प्रकार आता मागे पडलेला असून रहस्यकथा, विज्ञानकथा, भयकथा, गूढकथा असे कितीतरी नवनवे प्रकार रूढ झाले आहेत.
‘निर्मनुष्य’ हा रत्नाकर मतकरी ह्यांच्या अगदी अलीकडच्या गूढ कथांचा संग्रह. २००३ आणि २००४ या दोन वर्षांमध्ये हंस, दीपावली, शब्द, कथाश्री, सामना अशा दर्जेदार दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या नऊ कथा आता पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून मतकरी ख्यातकीर्त आहेत. गूढकथा लिहिणे ही तशी अवघड गोष्ट. पण मतकरी त्याबाबतीत सिद्धहस्त आहेत. खेकडा, मृत्युंजयी, एक दिवा विझताना, रंगांधळा, रंगयात्री अशा त्यांच्या कितीतरी कथासंग्रहांचा उल्लेख यासंदर्भात करता येईल. अमेरिकन लेखक एडगर अॅलन पो Edgar Allan Poe ह्याने इंग्रजी भाषेत काही गूढकथा लिहिलेल्या असून त्याल गूढकथांचा उद्गाता मानण्यात येते. मराठीत हा वाङ्मयप्रकार मतकरींनीच लोकप्रिय केला. त्याला नारायण धारप, यशवत रांजणकर ह्यांनी साथ दिली. २५-३० वर्षांपूर्वी ‘नवल’ मासिकातून या त्रयीच्या गूढकथा वाचल्याचे मला स्मरते आहे. पण एकंदरीत ‘गूढकथा’ मराठीत दुर्मीळच आहेत. त्यांचा वाचकवर्गही मर्यादित आहे. रसग्रहणाचे ठराविक निकष इथे अपुरे पडतात. कारा या कथांमध्ये अमानवी शक्तींचा वावर असतो. अज्ञात प्रदेश, गूढ वातावरण, मृतात्मे, चेटकिणी, जादू-टोणा यासारख्या गोष्टींमुळे आपण सुन्न होतो. कथानकांमध्ये गुंतत जातो. पुढे काय घडणार याबद्दल मनांमध्ये भीतीमिश्रित कुतूहल निर्माण होते.
रत्नाकर मतकरींच्या या गूढकथांमध्ये वाचकांचे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून मन सुन्न होते. कारण त्यातील अनुभव चित्तथरारक असतात. या कथा पूर्णत: काल्पनिक मात्र नाहीत. कारण त्यांना मानसशास्त्राचा आधार आहे. राजकारणाचा स्पर्श आहे. गारठून टाकणारे भय आणि उत्कंठा वाढविणारा संदेश त्यातून दिला जातो. ‘भीती’ ही मानवाची स्वाभाविक भावना असली तरी वाचकांना भयभीत करणे हा लेखकाचा हेतू नाही. या कथांमधून प्राणिमात्रांविषयी करुणा व्यक्त झाली आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनातून मानवी जीवनावर केलेले हे भाष्य आहे. या कथा आशयघन आणि अर्थगर्भ आहेत. या कथा केवळ व्यक्तींचे भावजीवन रेखाटत नाहीत तर अंतिम न्यायाचा आग्रह धरतात.
या संग्रहात एकूण नऊ कथा आहेत. त्यापैकी ‘भूमिका’ ही कथा त्यांच्याच ‘रणमर्द’ या एकाकिकेवर आधारित आहे. गुरुनाथ नावाचे प्रसिद्ध नट ‘रणमर्द’ या ऐतिहासिक नाटकात भूमिका करत असतानाच रंगभूमीवर मरण पावलेले असतात. त्यांची ती गाजलेली भूमिका ‘चैतन्य’ या तरुण नटाकडे येते आणि भूमिका रंगवत असतानाच गुरुनाथांचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो. चैतन्य आणि त्याची प्रेयसी विशाखा या प्रकाराविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करतात. पण तो अयशस्वी होऊन चैतन्याचाही रंगभूमीवरच मृत्यू घडून येतो असे त्याचे कथानक आहे.
‘प्रार्थना’ ‘शनचरी’ ‘पण नंतर मात्र’ आणि ‘दुरुस्ती’ या चार कथा स्त्री व्यक्तिरेखांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. ‘प्रार्थना’ कथेची नायिका कु. शिवारे ही असुरी शक्ती असलेली स्मार्ट तरुणी आहे. आपल्या चिडखोर आणि तापट बॉसने मरावे आणि त्याच्या जागी आपण ज्याच्यावर मन:पूर्वक प्रेम करतो आहोत त्याची नेमणूक व्हावी म्हणून ‘प्रार्थना’करणारी शिवारे बॉसच्या अपघाती मृत्यूने खूष होते. पण नायक प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर त्याचाही सूड घेऊ इच्छिते. ‘शनचरी’कथेत चेटकी म्हणजे दुसऱ्याचे वाईट घडवून आणणारी दुष्ट स्त्री – हा समज चुकीचा ठरवला आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या ‘शनचरी’ ने मध्यप्रदेशातील जुलमी, अनेक तरुणींचे आयुष्य बदबाद करणाऱ्या जमीनदाराचे पारिपत्य केलेले असते. तिच्या संदर्भातील आख्यायिका गोळा करण्यासाठी गेलेली जयमालाही असहाय्य व दुबळी आहे. तिच्या व्यभिचारी पतीने केवळ पैशासाठी तिच्याशी लग्न केलेले असून, तो तिचा छळ करत असतो. मुंबईला अकस्मात परत आलेली जयमाला त्याला परस्त्रीबरोबर रममाण झालेला पाहते. असाहाय्य, दुबळ्या जयमालेचे ‘शनचरी’त झालेले रुपांतर हा या कथेचा परमोच्च बिंदू असून, ‘शनचरी’च्या सामर्थ्याने व प्रभावाने रवीचे लिफ्टमध्ये अडकून अपघाती निधन होते आणि पतीच्या जुलुमातून तिची सुटका होते. जुलुमाचा, अन्यायाचा प्रतिकार करणारी ‘शनचरी’ मरत नाही तर दुसऱ्या रूपाने जन्माला येते – हे त्यातून सुचित केले आहे.
‘पण नंतर मात्र’ कथेतील निवृत्त प्राध्यापिका असलेल्या सरिताला आपला पती सागर आपल्याला मदतीसाठी हाका मारतो आहे असा भास पुन्हा पुन्हा होतो. प्रत्यक्षात सागर तिच्या शेजारीच असतो. आपल्या मदतीची आवश्यकता आपल्या मुलाला असावी असे समजून ती रात्री कोसळत्या पावसात सांताक्रूझला राहणाऱ्या आपल्या मुलाकडे जाते. तिथे सर्व सुखरूप असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा कारने तिला घरी सोडायला येतो. लॅचकीने कुलूप उघडून दोघे घरात शिरतात आणि पाहतात तर मुलाचे वडील गालीच्यावर मृत होऊन पडलेले असतात. रात्री कधीतरी त्यांना हार्ट अॅटॅक आलेला असतो. मदतीसाठी जवळ कोणीच नसते. फोनही डेड असतो. सरिताच्या लक्षात येते की तिच्या मनाने आधी सूचना दिली होती. त्याचा आवाजही तिने ओळखला होता. पण काळाने तिची फसगत केली होती.
‘दुरुस्ती’ कथेत वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांचे चमत्कारिक मिश्रण आहे. मिथिला आपल्या पतीसह वडिलोपार्जित बंगल्याचा ताबा घ्यायला आली आहे. तिचा सारा भूतकाळ विचित्र आहे. आजोबांनी चारित्र्याबद्दल संशयाने आजीचा खून केलेला, आई-वडील विभक्त झालेले- मिथिलेला काही काळ वेड्याच्या इस्पितळात राहवे लागलेले- सुदैवाने तिच्या पतीचे सिद्धेश्वरचे तिच्यावर खूप प्रेम आहे. बंगल्यात मिथिलेला भूतकाळातील व्यक्ती भेटतात. त्यांनी केलेल्या चुका ते दुरुस्त करतात. त्यामुळे मिथिलाही बदलते. पण त्याच वेळी सिद्धेश्वरचे रूपांतर सिद्धानंदमध्ये होऊन तो तिचा काटा कसा काढता येईल याचा विचार करू लागतो. मानवी स्वभावातील विसंगतीवर भाष्य करणारी ही कथा चित्तवेधक आहे.
लग्नाला अठरा वर्षे होऊनही मूलबाळ न झालेले मंत्रिमहोदय आणि एक आकर्षक अविवाहित कलावंत स्त्री यांच्या मीलनातून अस्तित्वाला आलेला ‘गर्भ’ हा एक कथेचा विषय आहे. मंत्रिमहोदय स्त्रीलंपट आहेत. तर कलावती महत्त्वाकांक्षी आहे. या दोघांच्या संबंधामुळे मंत्र्याच्या पत्नीची मात्र फरफट होते. हे विवाहबाह्य प्रकरण अंगावर शेकणार हे लक्षात येताच कलावतीचा खून करण्यात येतो आणि गर्भाचेही अस्तित्व आपोआपच संपुष्टात येते. या कथेतील व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे चित्रण आकर्षक असले तरी कथेतील गूढता मात्र अस्पष्ट आहे.
‘व्हायरस’ कथेलाही राजकारणाचा स्पर्श आहे. एका सभेत मुख्यमंत्री अचानक सत्य बोलू लागतात. आपण पाच लाख रुपये लाच घेतली, जनतेला लुटले, परस्त्रीवर प्रेम केले– अशी कबुली देतात. सत्य बोलण्याच्या त्यांच्या या आजाराची लागण पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री यांनाही होते. डॉक्टरांना पाचारण करण्यात येते. खरे बोलण्याचा हा व्हायरस सगळीकडे पसरू लागतो. खुद्द डॉक्टरही त्याला बळी पडतात.
आपले जीवन सध्यापेक्षा वेगळे असते तर काय झाले असते? यासबंधातील पर्यायी विचार आपण करत असतो. ‘पर्यायी’ कथेतील सुमीतच्या जीवनात असेच काहीतरी घडले आहे. विद्यार्थिदशेत सुमीतचे आकांक्षावर प्रेम होते. तो पत्नीच्या रूपात तिचाच विचार करत होता. पण नंतर त्याने साईड बदलली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्याचा परिचय श्रेयाशी झाला. दोघांनी लग्न केले पण दुर्दैवाने त्यांना मूलबाळ झाले नाही. एक दिवस अचानक दहा वर्षांचा समीर नावचा मुलगा सुमीतला भेटतो. आपण अमेरिकेत राहतो. आपल्या वडिलांचे नाव सुमीत तर आईचे आकांक्षा देवधर– अशी माहिती तो देतो. प्रयत्न करूनही त्याचा ठावठिकाणा सापडत नाही. दोन दिवस तो सुमीत-श्रेयाच्या घरी राहतो आणि अचानक गायब होतो. श्रेया-आकांक्षा देवधरचा पत्ता शोधून काढते. तिने एका पंजाब्याशी लग्न केलेले असते आणि तिलाही मुलगा नसतोच. एक मुलगी मात्र होते. सुमीत विचार करू लागतो- समजा आपले जर आकांक्षाशी लग्न झाले असते तर आपण अमेरिकेत स्थायिक झालो असतो. आपल्याला मुलगा झाला असता– पर्यायी जगात असे घडू शकले असते– त्या पर्यायी जगातून सॅम-समीर आला होता आणि परत नाहीसाही झाला होता.
जिचे नाव या संग्रहाला दिले आहे ती पहिल्याच क्रमांकाची ‘निर्मनुष्य’ कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. कथेचा नायक एका सायंदैनिकाचा वार्ताहर आहे. कथेच्या माध्यमातून जीवनातील असुरक्षितता रेखाटली आहे. निर्मनुष्य रस्त्याचे वर्णन आकर्षक पद्धतीने केलेले दिसते. मृतवत् पडलेला निर्मनुष्य रस्ता, मनगटी घड्याळ बंद, मोबाईल बंद, घरी किंवा ऑफिसमध्ये फोन लावला तर त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. रस्त्यावर त्याला वेगवेगळी माणसे भेटतात. अस्थिपंजर चित्रकार, गुंड मागे लागल्यामुळे भयभीत होऊन पळणारी तरुणी, वेगवान गाडीखाली सापडून जखमी झालेली माणसे– सगळे जगच असुरक्षित वाटू लागते. चित्रकार त्याला सांगतो की शहर बंद करण्यासाठी काढलेल्या मोर्चामध्ये जखमी होऊन तो मरण पावलेला आहे. आपण जिवंत नसून मृत झालेलो आहोत हे लक्षात येताच नायकाची अवस्था भयानक होते. तो ऑफिसकडे धाव घेतो तर बॉम्बहल्ल्यात ऑफिसही उध्वस्त झालेले. काही सहकारी मृत झालेले तर कोणी अत्यवस्थ असलेले– काय सुरक्षित आहे? हेच उमजेनासे होते– या कथेमध्ये वातावरण निर्मिती कलात्मक पद्धतीने केलेली असून, लेखकाच्या भाषाशैलीचे कौशल्य प्रकर्षाने जाणवते– कथानक, स्वभावचित्रे आणि भाषाशैली या तीनही दृष्टिकोनातून हा कथासंग्रह आकर्षक झाला आहे. भयकथा आणि गूढकथांची आवड असणाऱ्या वाचकांनी तो आवर्जून वाचायला हवा.
-डॉ. नीला पांढरे ...Read more