* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LIGHTNING BIRD
  • Availability : Available
  • Translators : NIRANJAN GHATE
  • ISBN : 9789357209465
  • Edition : 3
  • Publishing Year : 1989
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 156
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`NISARGAPUTRA` IS A NOVEL THAT TELLS THE TRUE STORY OF ADRIAN BOSHIER`S LIFE. MOTHER REMARRIES, NEW FATHER. AFFAIR BRINGS FAMILY. THEN 16-YEAR-OLD BROCHIER WANDERS IN THE WILDERNESS OF SOUTH AFRICA AND EXPERIENCES THE TRUTH AND HARDSHIPS. BLOOD IS IMPORTANT IN THE HORNLESS CASE, SO THE FIRST RITUAL IS PERFORMED ON THE BOSHIER BY SLAUGHTERING THE BUCK. MOHLASANA: BOSHIER OBTAINS THE MEDICINAL INFORMATION OF TREES, LEAVES AND FLOWERS FOUND ON THE WAY. MORARA: GREAT VAIL- ALL TYPES OF MAGICIANS, VAIDUS HAVE KNOWLEDGE OF HERBAL MEDICINE. A PATIENT IS DIAGNOSED TO HAVE HIS LEG AMPUTATED, BUT HE LEAVES THE HOSPITAL FOR A VERY IMPORTANT JOB AND VAIDU CURES HIS LEG WITHOUT AMPUTATING IT WITH HERBS. TEMOSO: PREMONITIONS-TRIBALS-VAIDU KNOWLEDGE MAKES DAILY LIVING EASIER AND DISEASES ARE ALSO CURED BY PREMONITIONS. LAND IS IMPORTANT HERE. IN 1920, BRITISH ARCHAEOLOGIST GERTRUDE CATTON-THOMSON VISITED AFRICA AND BROUGHT THE TRUE CULTURE TO THE WORLD THROUGH NEW EXCAVATIONS. BROSHIER ALSO STUDIED INTIMATELY THROUGH SHORT WANDERINGS, SO PROF. RAYMOND DART GAVE HIS BRILLIANT DISCIPLE NEW VISION-INSPIRATION AND RIGHT DIRECTION FOR HIS WANDERINGS. FROM THESE 16 CHAPTERS, THE GREAT WORK OF NATURE`S SON BOSHIER IN THE UNIVERSE IS SEEN. THIS SON OF NATURE TRIES TO WRITE HIS `LIFE STORY`; BUT HE DIED IN 1978 DUE TO AN EPILEPTIC SEIZURE WHILE SWIMMING.
‘निसर्गपुत्र’ ही अ‍ॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्‍या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तक #कादंबरी #अनुवादितपुस्तक
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more