* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOT WITHOUT MY DAUGHTER
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788171616732
  • Edition : 12
  • Publishing Year : MARCH 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN AUGUST 1984, MICHIGAN HOUSEWIFE BETTY MAHMOODY ACCOMPANIED HER HUSBAND TO HIS NATIVE IRAN FOR A TWO-WEEK VACATION. TO HER HORROR, SHE FOUND HERSELF AND HER FOUR-YEAR-OLD DAUGHTER, MAHTOB, VIRTUAL PRISONERS OF A MAN REDEDICATED TO HIS SHIITE MOSLEM FAITH, IN A LAND WHERE WOMEN ARE NEAR-SLAVES AND AMERICANS ARE DESPISED. THEIR ONLY HOPE FOR ESCAPE LAY IN A DANGEROUS UNDERGROUND THAT WOULD NOT TAKE HER CHILD...
१९८४ स्वत:च्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या मिषानं बेट्टी महमुदीचा नवरा आपल्या पत्नीला आणि मुलीला इराणला घेऊन गेला. त्या तिथं सुखात असतील, अधिक सुरक्षित असतील आणि त्यांना पुन्हा हवं तेव्हा अमेरिकेला परतता येईल, असं त्यानं तिला आश्वासन दिलं होतं. पण ते सारं खोटं होतं. त्यानं फसवणूक केली होती.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #BETTYMEHMOODY #NOTWITHOUTMYDAUGHTER #BIOGRAPHY & TRUE STORIES
Customer Reviews
  • Rating Starमोईन ह्यूमॅनीस्ट.

    बेट्टी मेहमुदी लिखित `नॉट विदाऊट माय डॉटर` या इंग्रजी पुस्तकाचा `लीना सोहोनी` यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं. मी हे पुस्तक फक्त वाचलं नाही तर जगलो आणि यातून एका आईच्या साहसाला नमन करून आलो. एकंदरीत कमालीचं अस्वस्थ करून जाणारा हा प्रवास हता. "खरंच ! अशी बिकट परिस्थिती नि दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये"जे या लेखिकेच्या नशिबी आले होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंतून ठेवणाऱ्या या पुस्तकातून एका आईच्या अफाट शौर्य अन् धाडसाचे दर्शन मला झाले. हा प्रवास वाचताना डोकं सुन्न व्हायला होतं नि कितीतरी वेळा डोळ्यांतून आपसुकच पाणी तरळत.`आजूबाजूचं काही भान राहतं नाही एवढं आपण यात गुंतून जातो.हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं आपल्याला वाटू लागतं.बेट्टी नि माहतोबचं दुःख आपल्याला आपल्या स्वतःच वाटू लागतं, या मायलेकीच्या दुःखाचे नकळतच आपण वाटेकरी होऊन जातो. हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मीच लेखिकेसोबत हा विलक्षण नि संघर्षपूर्ण प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.स्वतःच दुःख मला किरकोळ वाटू लागलं आहे. खरंच ना ! आपले दुःख किती क्षुद्र असतात व आपण त्यांनाच खूप मोठे समजून कुरवाळत बसतो.जगात लोकांच्या वाटेला काय काय आलेलं आहे हे आपल्याला ठाऊक सुद्धा नसतं.जेव्हा आपण इतरांच्या दुःख नि संकटाबद्दल हे असलं काही बघतो,वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने `आपण किती नशीबवान आहोत` याची जाणीव होते नि आपल्या आयुष्यात येणारी संकटे आपल्याला किरकोळ वाटू लागतात.या अश्या पुस्तकातून इतरांच्या वेदना तर कळतातच व यासोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना मात देण्याची प्रेरणा आणि हिम्मत सुद्धा मिळते. कथानकाबद्दल..... बेट्टी महमुदी ह्या मूळ अमेरिकन असलेल्या महिलेला त्याचा मूळ इराणी असलेला पती `डॉ.सय्यद महमूदी`त्याच्या कुटुंबियांना भेटण्याच्या निमित्ताने इराणला घेऊन येतो.त्यांच्या सोबत त्यांची 4 वर्षाची मुलगी `माहतोब`सुद्धा असते.`अमेरिकासारख्या देशात वाढलेल्या बेट्टीला इराण सारखा कर्मठ नि महिलांना कवडीची किंमत न देणारा देश अजिबात आवडतं नाही.जेमतेम पंधरा दिवस तर काढायचे आहे,त्यानंतर आपल्या मायदेशी परत जाणारच आहोतअशी मनाची समजूत घालून ती दिवस काढत असते. पण इकडे तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबीयांचं काही वेगळंच कारस्थान शिजत होतं,अमेरिकेला परत जायचं नाही असं यांनी ठरवलं होतं. एकेदिवशी मुडी बेट्टीला खडसावतो... "आता तू जन्मभर इथंच राहायचं, समजलं? तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं." इथून सुरू होतो प्रवास एका आईच्या एका आगळ्या वेगळ्या संघर्षपूर्ण नि खडतर प्रवासाचा. "काहीही झालं तरीही आपल्या मुलीला घेऊन अमेरिकेला परत जायचंच" हा मनाशी निर्धार करून इथे आलेल्या संकटांना तोंड देत,बिकट परिस्थितीचा सामना करत करत ती सुटकेचे प्रयत्न सुरूच ठेवते. शेवटी येथील एका माणसाच्या साह्याने ती इराण मधून पलायन करण्यात यशस्वी होते.`पण तीचा हा सुटकेचा मार्ग सोपा नसतो.पावलोपावली संकट,Sold असते परंतु तरीही ती काही जुमानत नाही नि मनाशी केलेला निर्धार पूर्ण करून दाखवतेच नि येथे एका आईचा विजय होतो ...! ...Read more

  • Rating StarGajanan Kale

    हिरकणी आठवते ना? कोजागिरी पौर्णिमेला गडावर दुध देण्यासाठी जाते आणि उशिर झाल्या मुळे गडाचे दरवाजे बंद होतात आणि गडातच अडकून पडते ..आपले तान्हे बाळ घरी असल्यामुळे त्याच्या विरहाने अगदी व्याकुळ होते.जिथे चिलट मुंग्या सुध्दा जाऊ शकत नाही एवढा मोठा डोंगर िथून खाली पाहिलं तरी धक्क व्हायला लागतं . अशा असाध्य डोंगर पार करुन ति माय आपल्या लेकराला जाऊन बिलगते...हे फक्त एका आईचे काळीजीपोटी केलेलं धाडसच... नाॅट विदाऊट माय डाॅटर ...हे पुस्तक त्याच धाटणीतले पण खुप वेगळे ..यातील साम्य म्हणजे आई चे लेकराबद्दलच ममत्व. एक विधवा अमेरिकन स्त्री एका इराणी माणसा सोबतो लग्न करते जो की पेशाने osteopathic Anasthetic (अस्थिचिकित्सा तज्ञ तसेच भूलतज्ञ) डॉक्टर असतो.काही वर्ष निवासी डॉक्टर म्हणुन अमेरिकेमध्ये काम करतो आणि नंतर आपल्या बायकोला आणि पोरीला घेऊन इराणला १५ दिवसांच्या अटी वर घेऊन जातो आणि इथेच गल्लत होते.तो घेऊन जातो कायमचा इराणला राहायला.तिथे गेल्यावर बायकोच्या लक्षात येते आपण पुरते फसलो आहोत,आपली आपल्या मायदेशी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.आता आपण कधीच अमेरिकेला जाऊ शकणार नाही. त्यादोघींना तिथे ओलिस ठेवले जाते,त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जातात ,त्याच परिस्थितीमध्ये हि माता अमेरिकन एंबसी मध्ये चकरा मारते पण काहीच साध्य होत नाही. शेवटी चोरट्या मार्गाने तुर्की ने अमेरिकेत दाखल होते. गजानन काळे. ...Read more

  • Rating StarNaresh Mohare

    बेत्ती मेहमूदी यांचे Not without my daughter हे पुस्तक आज माझे पूर्ण वाचून झाले. वाचनवेडा या ग्रुपमध्ये नॉट विदाऊट माय डॉटर या पुस्तकाबद्दल बरेच चांगले कमेंट वाचून मी रूपालीताई यांच्या पुस्तकभीशी द्वारे हे पुस्तक मी मागून घेतले आणि वाचयला सुरवात कली. या पुस्तकामध्ये एक अमेरिकन महिला जी आपली छोटीशी मुलगी अणि तिचे इराणी पती यांच्या बरोबर पतीच्या घरी इराण जाते. इराण मध्ये गेल्यावर तिला आलेले वाईट अनुभव, पतीने केलेली फसवणूक, तिचा आणि तिच्या मुलीचा शारीरिक अणि मानसिक छळ, युद्धजन्य वातावरण, तेथील लोकांचे राहणीमान, पुरुषी वर्चस्व आणि तेथील चालीरीती आणि परंपरा मुळे महिलांना पुरुषी वर्चस्वाखाली आपले जीवन कसे जगावे लागते हे सर्व पुस्तका मध्ये लेखिकेने मांडले आहे या सर्व परिस्थितीतून ती तिच्या मुलीला घेऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी इराण मधून पळून अमेरिकेला जाण्यासाठी तिने कशाप्रकारे प्रत्येक अडचणीवर मात करून अमेरिकेला कशी पोहोचली या सर्व घडामोडीचे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत मी दिलेल्या या छोट्याशा माहिती पेक्षा स्वतः पुस्तक वाचताना जो आपल्याला अनुभव येतो आणि एकदा हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर शेवट पर्यंत हे पुस्तक लवकर लवकर वाचून कसे पूर्ण होईल यासाठीच आपली धडपड चाललेली असेल.. ...Read more

  • Rating StarSandeep Jadhav

    "एका आधुनिक हिरकणीची सत्यकथा" आईचं आपल्या मुलांसोबतचं नातं शब्दांपलिकडचं! कवितांमधून वर्णन केलेली आई ही नेहमीच तिची एक प्रेमळ, शांत प्रतिमा आपल्यासमोर घेऊन येते. परंतु खऱ्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी प्रसंगी अतिशय कठोर होऊन धाडसीपणे निर्णय घेणयाची ताकदसुद्धा तिच्यामध्ये असते याची पुष्कळ उदाहरणे मिळतील. माणूसच नाही तर अगदी प्राणी-पक्षीही याला अपवाद नाहीत! अशा काही उदाहरणांचा विचार करायचा म्हटलं तर सर्वात प्रथम डोक्यात विचार येतो तो स्वराज्यातील "हिरकणीचा"! आपल्या तान्ह्या मुलासाठी ४५०० फूट उंच रायगडचा कडा भर अंधारात उतरून जाणाऱ्या हिरकणीकडे नेहमीच एक धाडसी मातृत्वाचं उदाहरण म्हणून पाहिलं जातं. प्रत्यक्ष शिवरायांनासुद्धा दखल घ्यावी लागणारी ती घटना! आज ३५० वर्षांनंतरसुद्धा ती कथा ऐकताना अंगावर शहारे येतात यावरूनच कल्पना करता येईल की आपल्या मुलासाठी "हिरकणीने" केलेलं धाडस किती अचाट होतं. "नॉट विदाऊट माय डॉटर" ही सत्यकथा आहे अशाच एका आधुनिक "हिरकणीची". बेट्टी महमूदी या अमेरिकन स्त्रीने आपल्या मुलीसाठी केलेल्या एका अफाट धाडसाची ही सत्यकथा! अमेरिकेत राहणार्‍या बेट्टी महमूदीला तिचा नवरा "मूडी" काही कारणाने इराणला घेऊन जातो व तिला तिच्या मुलीसोबत तिथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बेट्टीसोबतच आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अनन्वित अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे याची जाणीव बेट्टीला झाल्यानंतर आपल्या व मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस ती करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची आणि क्षणाक्षणाला वाचकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही सत्यकथा! बेट्टी महमूदी यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितल्यामुळे वाचत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर ओढवलेल्या जीवघेण्या घटनेची दाहकता जाणवत राहते. आजही जिथे अमेरिका आणि इराण यांच्यामधून विस्तवही जात नाही तिथे ३० वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याचा फक्त अंदाजच केलेला बरा. अशा वातावरणात फक्त आपल्या नवऱ्यावरील विश्वासाखातर, आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत तेहरानमधे पाऊल ठेवणारी बेट्टी जेव्हा आपला अनुभव पुस्तकातून आपल्याला सांगायला चालू करते तेव्हा वाचक अक्षरशः त्या प्रवासासोबत चिकटून राहतो. तिच्यावर ओढवणाऱ्या सर्व प्रसंगांसोबत वाचक इतका एकरुप होतो की तिच्या थरारक सुटकेनंतर नकळत वाचकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. बेट्टीचा अमेरिका ते तेहरान आणि परत अमेरिका हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बेट्टी महमुदी यांनी लिहिलेलं "नॉट विदाऊट माय डॉटर" हे पुस्तक म्हणजे इराणसारख्या काही धर्मांध मुस्लिम देशात व्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत हक्कासाठी स्त्रियांना आजही द्याव्या लागणार्‍या कठोर लढ्याची एक प्रातिनिधिक कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. तब्बल १८ महिने इराणमधे नवऱ्याच्या नजरकैदेत राहिलेल्या काळात स्त्रियांसाठी जाचक असणाऱ्या मुस्लिम रूढी-परंपरा जपताना बेट्टीची होणारी तारेवरची कसरत, तेथील वातावरणात आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी - स्वातंत्र्यासाठीची तिची तळमळ - धडपड, मधेच काही काळासाठी आपल्या मुलीपासून झालेली ताटातूट आणि तेव्हा एक आई म्हणून होणारी तिची मानसिक अवस्था, तिला स्वातंत्र्याची कळालेली किंमत आणि स्वदेशी परतण्याची तीव्र इच्छा, सुटकेसाठी तिने केलेले काही अयशस्वी प्रयत्न, शेवटी नाईलाजास्तव जीवावर उदार होऊन आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत इराणमधून बेकायदेशीररित्या पळून जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय आणि त्याच्या पूर्णत्वाचा थरारक प्रवास बेट्टी यांनी त्यांच्या या ३०४ पानी "नॉट विदाऊट माय डॉटर" मधून लोकांपुढे आणला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more