* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OMERTA
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788177665215
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TO DON RAYMONDE APRILE`S CHILDREN HE WAS A LOYAL FAMILY MEMBER, THEIR FATHER`S ADOPTED "NEPHEW." TO THE FBI HE WAS A MAN WHO WOULD RATHER RIDE HIS HORSES THAN DO MOB BUSINESS. NO ONE KNEW WHY APRILE, THE LAST GREAT AMERICAN DON, HAD ADOPTED ASTORRE VIOLA MANY YEARS BEFORE IN SICILY; NO ONE SUSPECTED HOW HE HAD CAREFULLY TRAINED HIM . . . AND HOW, WHILE THE DON`S CHILDREN CLAIMED RESPECTABLE CAREERS IN AMERICA, ASTORRE VIOLA WAITED FOR HIS TIME TO COME. NOW HIS TIME HAS ARRIVED. THE DON IS DEAD, HIS MURDER ONE BLOODY ACT IN A DRAMA OF AMBITION AND DECEIT--FROM THE DEADLY COMPROMISES MADE BY AN FBI AGENT TO THE GREED OF TWO CROOKED NYPD DETECTIVES AND THE FRIGHTENING PLANS OF A SOUTH AMERICAN MOB KINGPIN. IN A COLLISION OF ENEMIES AND LOVERS, BETRAYERS AND LOYAL SOLDIERS, ASTORRE VIOLA WILL CLAIM HIS DESTINY. BECAUSE AFTER ALL THESE YEARS, THIS MOMENT IS IN HIS BLOOD. . . .
जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यानं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव `अ‍ॅस्टर व्हायोला`. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया मिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतक्र्य घटना घडली... निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुध्द आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि अ‍ॅस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युध्दात विनाकारण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे? आणि आपण काय करायचं?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #MARIO PUZO #अनिल काळे # ओमेर्ता #OMERTA
Customer Reviews
  • Rating StarLaxmikant Kapgate

    मित्रहो नमस्कार, आधुनिक काळात कादंबरीच्या विश्वात अनेक उच्चांक प्रस्थापित केले गेले. अर्थात, कादंबरी चे संदर्भ आणि प्रकार शोधताना क्राईम जगताचे भयाण वास्तव वाचकांसाठी आणण्याचा प्रयत्न झाला. Science fiction या प्रकारात तंत्रज्ञान आणि संशोधन करून Futuistic आयुष्याच्या कल्पना केल्या गेल्या. परंतु साहित्य विश्वातील मारिया पूझो हे नाव काहीसं वेगळं आहे. फक्त आणि फक्त माफिया हाच त्यांच्या मेंदूला आवडता विषय असावा. नुकतीच त्यांनी निर्मिलेली " Omerta ( ओमर्ता) ही काहीशी रहस्यमय भयकथा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि माफियांच्या फॅमिली बद्दल अधिक माहिती देणारं आहे. सुहास शिरवळकर यांच्यासारख्याच किंबहुना त्याहीपेक्षा सरस कामगिरी पुझो ची आहे. इटालियन अमेरिकन माफिया किंवा सिसिलियन माफिया आणि त्यांची गुन्हेगारी बाबद विस्तृत व वाचकांस रंजक वाटेल अशीच लेखनशैली आहे. २००० साली प्रकाशित झालेल्या कथानकात रेमंड एप्रिल, हेंको, पोर्टेला, सोबतच एफ बी आय चा अधिकारी कुर्ट सिल्की याची कथा आहे. अभिताभ बच्चन यांनी भूमिका केलेल्या सरकार सिनेमांची कथा याच मारिया पूझो लिखित ठे Godfather या पुस्तकावर आधारित आहे. एकेकाळी थे Godfather II ला सहा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे हे कथानक वाचताना लेखकाचा दर्जा लक्षात येतो. मेहता पब्लिशिंग हाऊस ने Omerta च मराठी भाषांतर प्रकाशित केलं असून अनिल काळे नी अनुवाद केलाय. मजा आली वाचताना..... ...Read more

  • Rating StarSAHITYA SUCHI - JAN 2006

    ओमेर्ता - मारिओ पुझो, याची नवी कादंबरी... ‘ओमेर्ता’ या शब्दाला खास अर्थ आहे. एखाद्याच्या हातून गुन्हा घडलेला असेल आणि त्याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल, तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा सिसीलीमध्ये अतयंत कडकपणे पाळला जाणारा हा अलिखित दंडक आहे. अनुवादित पुस्तके मराठी वाचकांना एक वेगळ्या अपरिचित विश्वाचा परिचय करून देत असतात. एकेकाळी अनुवादित राहिल्याला फारसे महत्त्व दिले जात नसे परंतु अनुवाद वाचकांचे विचार क्षेत्र घेऊन आता अनुवादाला पुरस्कारही दिला जातो. ‘ओमोर्ता’ ही कादंबरीही रोमांचक अनुभव देणारी आहे. कादंबरीचा कॅनव्हॉस विशाल आहे. त्यात अनेक विस्मयकारक घटना असून मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे नमुने पहायला मिळतात. येथील घटना सिरीली बेट, रोम, न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांमध्ये घडतात कादंबऱ्यातली व्यक्तींचे जगही पूर्णपणे वेगळे आहे. हे जग आहे माफिया डॉनचे, कुविख्यात गुंडांचे गुन्हेगारी, दरोडेखोरी खून, मारामाऱ्या वेश्याव्यवसाय, अनैतिक संबंध, टोळीयुद्धे असे अनेक रंग तेथे आहेत आणि त्याचवेळी मानवी भावभावानांचे नर्तनही तेथे आहे. सूड आणि दया, शत्रुत्व आणि प्रेम परस्परविरोधा भावनांचे चित्रण इथे आढळते. ‘ओमेर्ता’ या शब्दाला खास अर्थ आहे. एखाद्याच्या हातून गुन्हा घडलेला असेल आणि त्याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल, तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा सिसीलीमध्ये अत्यंत कडकपणे पाळला जाणारा हा अलिखित दंडक आहे. अ‍ॅस्टर व्हायोला या तरुणाला हा दंडक पाळावा लागतो. कादंबरीला हे नाव दिले आहे. कादंबरीत सुमारे पस्तीस वर्षांचा कालावधी चित्रित केला आहे. कथानकाला प्रारंभ होतो १९६७ साली इटलीजवळील सिसिली बेटावर. त्या भागातील माफिया डॉन झेनो मृत्यूशय्येवर पडलेला असतो. त्याची तरुण पत्नी बाळंतपणात मरण पावलेली असते आणि मुलगा अ‍ॅस्टर फक्त दोन वर्षांचा असतो. त्याची जबाबदारी सोपविण्यासाठी डॉनने आपल्या पूर्वीच्या तीन सहकाऱ्यांना एप्रिल, बियांको आणि क्रुल्सी यांना अमेरिकेतून बोलावून घेतलेले असते. मृत्यूपूर्वी त्या अ‍ॅस्टरची जबाबदारी रेमंड एप्रिल यांच्यावर सोपवतो. त्यासाठी त्याला भरपूर मोबदलाही मिळणार असतो. एप्रिल अ‍ॅस्टरला अमेरिकेत घेऊन जातो. नंतर एप्रिल सुमारे ३०० वर्षे डॉन माफिया गुंड म्हणून जीवन जगतो. साठी उलटल्यानंतर मात्र तो गुन्हेगारी जगताचा निरोप घेतो. आणि एक बँकर व सभ्य गृहस्थ म्हणून उजळ माथ्याने जगात वावरू लागतो. अनेक संस्थांना देणग्या देतो. त्याला मार्क आणि व्हॅलेरस नावाचे दोन मुलगे आणि निकोल नावाची एक मुलगी असते - पत्नीचे निधन झालेले असते. आपल्या तिन्ही मुलांना त्याने गुन्हेगारी जगापासून पूर्ण दूर ठेवलेले असते बोर्डिंगमध्ये ठेवून त्यांना उत्तम शिक्षण दिलेले असते. अ‍ॅस्टरलाही त्याने मुलाप्रमाणेच वाढवलेले असते. मात्र त्याचा बाप डॉन होता हे मात्र कळू दिलेले नसते. दर उन्हाळ्यात तो सिसिलीला जाऊन राहतो तेव्हा अ‍ॅस्टरलाही बरोबर घेऊन जातो. आपल्या पश्चात अ‍ॅस्टरने प्रशिक्षण दिलेले असते. अ‍ॅस्टर प्रथम लंडनला मि प्रायर यांच्याकडे बँकिगचे शिक्षण घेतो. नंतर सिसिलीन त्याला बियांको मारेकरी होण्याचे शिक्षण देतो. बियांकोचा शरीररक्षक म्हणून काही वर्षे तो काम करतो लंडनला तो अभिनयाचे व संगीताचे शिक्षण घेत असताना रोझी नावाच्या सुंदर तरुणीच्या प्रेमात पडतो. त्याच्यावर हल्ला होतो पण त्यातून तो बचावतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो डॉन रेमंड एप्रिलकडे परत येतो. त्याच्या कारभारात लक्ष घालतो. १९९५ साली डॉन एप्रिलचा अचानक खून होतो. हा खून कोणी व केला हे गूढ अनाकलनीय वाटते. न्यूयॉर्कमधील एफबीआय एजंट सिल्की या खुनाच्या तपासामागे लागतो. अ‍ॅलर्टही त्याच प्रयत्नात असतो. काकांचा खुनाचा सूड घेण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग वापरतो. शेवटी असे उघडकीला येते की पोर्टलो या अमेरिकन डॉनने हेस्को नावाच्या एजंटला या खुनाचे कंत्राट दिलेले असते. फ्रॅंकी आणि स्टेस नावाचे दोघे नेमबाज जुळे बंधू ही हत्या करतात आणि हेस्को स्वत: त्यावेळी कार चालवत असतो. डॉनचे सर्व गुण अंगी असलेला अ‍ॅस्टर या चौघांना यमसदनाला कसा पाठवतो, सूडाचे राजकारण कसे खेळतो – ह्याची हकीगत विलक्षण रोमांचक पद्धतीने इथे सांगितली आहे. ह्या सर्व घटना घडल्यानंतर डॉन एप्रिलच्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्ण झाल्यावर, सर्व बँकाचा कारभार त्याच्याकडे सोपवून, अ‍ॅस्टर सिसीलीतील आपल्या मूळ गावी परत येतो, आपले खरे वडील कोण हे त्याला समजलेले असते. तो रोझीशी विवाह करून साधेसुधे आयुष्य जगू लागतो. त्याला रेमंड नावाचा मुलगाही होतो. त्याला माहीत असते की आपला मुलगाही एक दिवस सिसिली सोडून सूड, प्रेम, दया, शत्रुत्व आणि संधींनी भरलेल्या अमेरिकेत जाईल. अ‍ॅस्टर व रोझी सिसीलीत राहातात. इथे कादंबरी संपते. कादंबरीतील काही माहिती मात्र विपर्यस्त स्वरूपात दिलेली आढळते. उपोद्घातात डॉन झेनो हा आपल्या तीन साथीदारांपैकी रेमंड एप्रिल याच्या ताब्यात आपला छोटा मुलगा का देतो याची कारणमीमांसा करताना, रेमंड अपत्यहीन आहे. त्यामुळे तोच अ‍ॅस्टरचा सांभाळा पोटच्या मुलाप्रमाणे मायेने करील असा संदर्भ दिला आहे. परंतु नंतरच्या प्रकरणांमध्ये रेमंड एप्रिल ह्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असल्याची हकीगत झाली आहे ही तिन्ही मुले अ‍ॅस्टरपेक्षा वयाने मोठी आहेत म्हणजेच डॉन झेनच्या मृत्यूनंतर झालेली नाहीत. ही ढोबळ चूक मूळ कांदबरीकाराने तरी केलेली असावी किंवा अनुवादकाने तरी केली असावी. दुसरे म्हणजे कादंबरीच्या उत्तरार्घातील काही स्फोटक घटना अगदीच सपक पद्धतीने वर्णन केल्या आहेत. उदा. ट्यूलिपचा वध अधिक रोमांचक पद्धतीने वर्णन केल्या आहेत. उदा. ट्यूलिपाचा वध अधिक रोमांचक पद्धतीने वर्णन करता आला असता. कादंबरीत अनेक व्यक्तीचित्रणे असल्यामुळे त्यांची नावे आणि नाती लक्षात ठेवणे अवघड वाटता. कादंबरीच्या उत्तरार्धापेक्षा पूर्वाध अधिक रंगतदार वाटतो. चलतचीत्रपटाप्रमाणे त्यातील घटना आपल्या डोळ्यासमोर तरळतात आणि मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याविषयी मनात उत्सुकता निर्माण करतात. अनुवादकाने कादंबरीची मूळ लय कायम ठेवून तिचे मराठी रूपांतर केले आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मृखपृष्ठ आकर्षक व कलात्मक आहे. गुन्हेगारी जगताचे चित्रण कारणारी ही कादंबरी विषयाच्या नाविन्यामुळे लक्षवेधक ठरते. -डॉ. नीला पांढरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 30-10-2005

    गुन्हेगारी जगाचे चित्रण करणारी कादंबरी... या जगात जगण्याचे नियम माणसाने पूर्वीपासून ठरवून ठेवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचे, प्रत्येक देशाचे, प्रत्येक धर्माचे आणि जातींचे या सगळ्यांचेच आपले असे काही नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास काही ना काही शक्षांना सामोरे जावे लागते. ती शिक्षा कधी तुरुंगवासाची असेल तर कधी समाजातील बहिष्काराची असेल. गुन्हेगारी जगताचंही असंच आहे. या जगाचेही आपले म्हणून काही नियम आहेत, ‘एथिक्स’ आहेत. या जगात वावरणाऱ्या सगळ्यांनी हे नियम पाळणं आवश्यक ठरतं. नाहीतर दुसरी टोळी त्यांच्यावर वार करायला टपलेलीच असते. गुन्हेगार, त्याचं विश्व, त्याचं जगणं, पोलिसांशी असलेले संबंध या सगळ्यांचं चित्रण करणारी कादंबरी ‘ओमेर्ता’ ही मारिओ पुझो याची कादंबरी अनिल काळे यांनी मराठीत अनुवादित केली आहे. ओमेर्ता म्हणजे गुन्हेगारी जगतातील एक नियम. हा नियम खास सिसिलीत पाळला जातो. एखाद्याच्या हातून जर गुन्हा घडलेला असेल आणि याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा हा अलिखित कडक दंडक आहे. डॉन व्हिसेंझो झेनोने आयुष्यभर माफियातल्या परंपराचं आणि नीतिनियमाचं पालन केलं. शेवटी त्याचं मरण आलं तेव्हा त्याचा मुलगा अ‍ॅस्टर व्हायोला अवघा दोन वर्षांचा होता. स्वभावाने काहीसा झेनोसारखाच असलेल्या डॉन रेमंड एप्रिलवर त्याने आपल्या या मुलाची जबाबदारी सोपवली होती. नंतर त्याने अ‍ॅस्टरला आपल्या तीन मुलांबरोबर आपला पुतण्या म्हणून नेले. अत्यंत दूरदर्शी असलेल्या रेमंडचा गुन्हेगारी जगतावर चांगलाच वचक होता. पण त्याने या जगताचं आपल्या मुलांना वारंही लागू दिलं नव्हतं. ही तिन्ही मुलं आपापल्या क्षेत्रात, करिअरमध्ये चांगलीच स्थिरावली होती. कालांतराने डॉन एप्रिल गुन्हेगारीतून निवृत्त झाला. आपल्या बँका आणि इतर पांढऱ्या व्यवसायांमध्ये तो रमून गेला. एका दिवशी मात्र त्याचाच खून झाला आणि गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. त्याचा खून म्हणजे या जगतातील मोठी घटना. त्याच्या खुनाचा शोध घेण्याच्या दृष्टीने आणि माफिया नष्ट करण्यासाठी एफबीआय आणि विशेषत: त्यांचा एजंट कुर्ट सिल्कीने एक मोहीमच उघडली. त्यात डॉनची मुलं खेचली गेली. या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अ‍ॅस्टरने पुढाकार घेतला. त्याच्या रक्तात असलेला सिसिलियन गुन्हेगारी त्याचवेळी जागा झाला. त्याने आपल्या खास सिसिलियन पद्धतीने काकांच्या मृत्यूचे गूढ तर उकललेच पण गुन्हेगारी शिक्षाही दिली. एवढे सगळे करून कायद्याच्या कचाट्यातून मात्र तो दूरच राहिला. डॉन एप्रिलचा खून, अ‍ॅस्टरने खुन्यांचा लावलेला शोध, त्याचं मन, त्याचं प्रेम, बहीण-भावंडं, त्यांचे स्वभाव या सगळ्यांचं सुरेख चित्रण करणारी ही कादंबरी आहे. काळे यांनी अनुवाद करताना कुठेही मूळ कादंबरीचा ओघ, वेग कमी न करता रंजक बनवली आहे. त्यामुळेच ती वाचनीय झाली आहे. मारिओ पुझोऱ्या कादंबऱ्या हा एक चांगला अनुभव असतो. तो अनुभव काळे यांनी या अनुवादात कुठेही कमी होऊ दिलेला नाही. पुझोच्या कादंबरीचा ‘फील’ अत्यंत सुंदर रीतीने यात उतरला आहे. त्यांच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीवर आपल्याकडे ‘सरकार’ बनवला गेला. ओमेर्ता ही देखील अशीच एक हिट कादंबरी आहे. -कोमल कुंभार ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    विनोद भालेराव वेगवान घटना, नाट्यपूर्ण – उत्कंठावर्धक प्रसंग, प्रसंगाला कलाटणी देणाऱ्या धक्कातंत्राचा वापर करून वाचकांना विचार करण्याचीही उसंत न देणाऱ्या घडणाऱ्या आकस्मिक-अर्तक्य घटनांची मालिका...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more