VA PU, A NAME FAMOUS NOT ONLY WITHIN THE BOUNDARIES OF MAHARASHTRA BUT ALSO ALL OVER THE WORLD WHEREVER MARATHI IS KNOWN. THE IMAGE WHICH APPEARS BY DEFAULT WITH THIS NAME IS THAT OF A FRESH, HANDSOME, ENERGETIC STORYTELLER REFLECTING HIS STORIES. THE STORIES, THE AUTHOR AND THE TEAM PRESENTING THE STORIES ALL HAVE BLENDED TOGETHER PERFECTLY WELL. ALL THE CHARACTERS REPRESENT THE MIDDLECLASS MENTALITY OF PEOPLE FROM MUMBAI AND PUNE. IT HAS NO TOUCH OF RURAL LIFE OR MODERNIZATION AND THE PROBLEMS OCCURRING WITH THAT. IT DOES NOT REACH DEEP DOWN ITS INTERIOR TO HANDLE THE PAINS, YET IT HAS A PECULIAR STYLE, A NATURAL FRESHNESS. IT FINDS DEPTHS AND HUMOUR IN SIMPLE SUBJECTS. IT DOES NOT AVOID PAIN, BUT IS NOT VERY FOND OF IT. IT PRESENTS THE NORMAL MIND, NORMAL SET UP, NORMAL FEELINGS. IT MAKES US LAUGH AND FRESHENS US UP. IT MAKES US FORGET ABOUT OUR DAY TO DAY LIFE AND THE MEAGER PROBLEMS THAT COME WITH IT. THIS IS THE SECRET OF HIS WRITING, OF HIS SUCCESS FOR 23 BOOKS, CONSECUTIVELY. M.V.RAJADHYAKSHA
उभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्ष