* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ONE NIGHT @ THE CALL CENTRE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980813
  • Edition : 6
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
...PITCH-PERFECT... KEENLY FOCUSED ON NUANCES AND DETAIL ... ONE NIGHT @ THE CALL CENTER HAS STRUCK A CHORD WITH INDIA`S YOUNG...` IN THE WINTER OF 2004, A WINTER MET A YOUNG GIRL ON AN OVERNIGHT TRAIN JOURNEY. TO PASS THE TIME, SHE OFFERED TO TELL HIM A STORY. HOWEVER, SHE HAD ONE CONDITION THAT HE MAKE IT INTO HIS SECOND BOOK. HE HESITATED, BUT ASKED WHAT THE STORY WAS ABOUT. THE GIRL SAID THE STORY WAS ABOUT SIX PEOPLE WORKING IN A CALL CENTER, SET IN ONE NIGHT. SHE SAID IT WAS THE NIGHT THEY HAD GOT A PHONE CALL. THAT PHONE CALL WAS FROM GOD.
लेखकाला रात्रीच्या प्रवासात एक तरुण, देखणी मुलगी सहप्रवासी म्हणून भेटते. वेळ घालविण्यासाठी , ती त्याला एक गोष्ट सांगू इच्छिते, मात्र ती त्याला अट घालते, की त्या गोष्टीवर त्यानं दुसरं पुस्तक लिहायचं. लेखक सुरुवातीला ते मान्य करायला धजत नाही; पण त्याला ती गोष्ट जाणून घ्यायचं औत्सुक्यही असतंच. त्यानंतर ती मुलगी लेखकाला कॉल सेन्टरमध्ये काम करणाऱ्या सहा लोकांच्या एका रात्रीची कथा सांगते. `फाईव्ह पॉइन्ट समवन ` नंतर चेतन भगत यांचं तितकंच चर्चेत आलेलं हे पुस्तक वाचकांना निश्चितच निराळ्या अनुभवविश्वाची सफर घडवेल. नर्मविनोदाचा सुखद शिडकावा देणारी ही कादंबरी सद्य:स्थितीवर भेदकपणे प्रकाश टाकत वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONENIGHT@THECALLCENTRE #FIVEPOINTSOMEONE #THE 3 MISTAKES OF MY LIFE #फाईव्हपॉइंटसमवन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #CHETANBHAGAT #चेतनभगत
Customer Reviews
  • Rating StarRohini Londhe

    The Marathi translation of this book is awesome.I just love it.

  • Rating StarDAINIK SAGAR 18-04-2010

    ‘कॉल सेंटर’चं यथार्थ दर्शन घडविणारी कादंबरी… ‘द कॉल सेंटर’ ही चेतन भगत यांची अत्यंत गाजलेली कादंबरी. तिचा मनोज्ञ अनुवाद केलाय सुप्रिया वकील यांनी. मॉडर्न तरुणतरुणींच्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरलेल्या कॉल सेंटरचं यथार्थ दर्शन जसं प्रस्तुत कादंबरीत तसं त्या तरुणपिढीच्या भावभवनांचा आलेख नजरेसमोर उभा राहतो. एका वेगळ्याच अनुभवविश्वाची रोमांचक सफर घडविण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे. हसत खेळत सत्याचं विदारक दर्शन घडविण्याची त्याची वेगळीच शैली प्रभावशाली वाटते. प्रत्येक तरुण-तरुणीनं वाचावं, असचं हे पुस्तक. प्रस्तुत कादंबरीतील सर्व घटना एकाच रात्रीत घडत असल्यानं तिचा वेग हा देखील चक्रावून टाकणारा आहे. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 24-01-2010

    चेतन भगत यांच्या वास्तवदर्शी कादंबऱ्या… चेतन भगत हे नाव त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमुळे इंग्रजी साहित्यजगतात सुप्रसिद्ध झाले आहे. केवळ लेखक म्हणून पाहण्यापेक्षा भगत यांच्याकडे आज `युथ आयकॉन` म्हणून पाहिले जाते. भगत यांनी भारतातील लहानथोरांना वाचनची आवड लावली आहे. कादंबरीबरोबरच हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रातून ते स्तंभलेखन करतात. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर संसदेत चर्चा झाली आहे. आयआयटीमधून पदवी घेतलेले चेतन भगत यांनी इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँकिंग करिअर सोडून लेखनाला पूर्ण वेळ दिला आहे. २००९ पासून त्यांनी अक्षरधनाची महती वाचकांपुढे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत मांडली आहे. भारताची सद्यस्थिती बदलण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे आणि ते भगत आपल्या लिखाणातून करतात. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` आणि `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या दोन कादंबऱ्या त्यांच्या या हेतूचे सर्वार्थाने समर्थन आणि प्रतिपादन करतात. `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` यात उद्योग, व्यवसाय, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी आपल्यापुढे उलगडत जाते. तीन मित्रांची ही कथा असून स्वत:च्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने घेऊन ती समाजात स्वत:चे अस्तित्व अधोरेखित करू इच्छितात, परंतु वास्तवात येणाऱ्या संकटांना, अडचणींना तोंड देणे किती अवघड आहे आणि कल्पना तसेच वास्तवात किती फरक आहे हे त्यांना अनुभवातून समजून येते. स्वप्नपूर्तीसाठी ते जीवनाच्या धगीचा सामनाही करतात. तो कसा करतात हे भगत यांच्या `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या पुस्तकातून उलगडते. विलक्षण सहजसोपी लिखाणाची शैली हे भगत यांचे वैशिष्ट्य आहे. ही शैली तशीच ठेवण्यात अनुवादिका सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. दोन्ही पुस्तकांची भाषांतरे सुप्रिया वकील यांनी भगत यांच्या शैलीस धक्का न लागेल अशा पद्धतीने केली आहेत. त्यामुळे लेखकाचा हेतू थेट वाचकांपर्यंत पोहोचतो. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` यामध्येही आजच्या भारताची आणि त्यातील युवकांची मनोभूमिका लेखकाने स्पष्ट केली आहे. रेल्वेतील एका रात्रीच्या प्रवासात एका मुलीने सांगितलेली ही कहाणी वाचकांना खिळवून ठेवते आणि आयटी क्षेत्रातल्या वास्तवाचे भान देते. ...Read more

  • Rating StarSAMANA 25-04-2010

    तरुणाईची जीवनशैली… चेतन भगत हे नाव आज ‘युथ आयकॉन’ म्हणून घेतलं जातं. ‘सर्वोच्च खपाच्या इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखक’ म्हणूनही त्यांच्याकडे हिंदुस्थानी अभिमानानं पाहतात. ‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ आणि ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ अशी त्यांची दोन्ही पुस्तकंगाजली, त्यांची विक्रमी विक्री झाली. या पुस्तकांपाठोपाठ आता त्यांचं तिसरं पुस्तक ‘वन नाईट द कॉल सेंटर’ हे पुस्तक आलं. गाजलं. विक्रमी खपाचं ठरलं. आधीच्या दोन कादंबऱ्यांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला होता. ‘वन नाईट... ’चा अनुवादही सुप्रिया वकील यांनी केलाय. ‘वन नाईट... ’चा विषय, त्यातील अनुभवविश्व, त्यातील जीवन त्यातून निर्माण होणारे प्रश्न, समस्या, त्यातील तारुण्यातील होणारी घुसमट हे सारं आजच्या तरुण वाचकांना आकर्षित करणारं आहे. मुळात चेतन भगत त्यांनी मांडण्याची शैली, भाषाशैली ही साधी, सरळ, वाचकांशी थेट संवाद साधाणारी आहे. अनलंकृत भाषेमुळे त्यात नैसर्गिकता जाणवते. अगदी क्वचितच त्यात उपमा येतात. पण त्याही मजेशीर अन् नेमका आशय व्यक्त करणारी आहेत. उदा. ‘सुयोग्य मुलं ही धोक्यात आलेल्या प्रजातींसारखी दुर्मिळ झाली आहेत’ किंवा ‘मोनालिसाचं चित्र पूर्ण झाल्यावर दा विन्सीच्या चेहऱ्यावर जसा अभिमान फुलला असेल तसेच भाव बक्षीच्या चेहऱ्यावर फुलले होते.’ यातून बक्षीच्या हेतूंबद्दल असणारी साशंकता, त्यातून ध्वनित होणाऱ्या शक्यताही भगत यांनी स्पष्ट केल्या आहेत. ‘कॉल सेंटर’चे विश्व आजच्या तरुणाईला आकर्षित करतंय. पण या कॉल सेंटरचे, त्याच्या कार्यपद्धतीचे, त्याच्या वेळेचे दुष्परिणाम हिंदुस्थानी तरुणपिढीवर कसे विदारक होताहेत याचं अंतर्मुख करणारं चित्रण भगत यांनी अत्यंत परिणामकारकतेनं केलंय. ‘कॉल सेंटर....’चं क्षेत्र स्वीकारलं की प्रथम त्या एजंटसना आपली ‘ओळख’ विसरायला लागते आणि त्यांच्या क्लाएंट्ससाठी नवं नाव, ‘ओळख’ स्वीकारावी लागते. आपलंच व्यक्तिमत्व मारून, केवळ पैशासाठी नवं व्यक्तिमत्व तेही नोकरीच्या कालावधीसाठी घ्यायचं हे भयानक आहे. ही कहाणी सहा तरुण एजंट्सशी संबंधित असली तरीही ती प्रातिनिधिक आहे. राधिका, ईशा, व्रूम, प्रियंका, श्याम, मिलिटरी अंकल आणि त्यांचा बॉस बक्षी अशी आणि त्यांच्याशी संबंधित इतर पात्रं. पण या साऱ्याच पात्रांचे व्यक्तिमत्व भगत यांनी कमालीची सजीव चितारली आहेत. अत्यंत पारदर्शी, स्वाभाविक अन् तरुणाईच्या आयुष्याचं नेमकं चित्रण व्यक्त करणारी आहेत. ‘तुमच्या पाकिटात पैसे असतील तर जग तुम्हाला जरासा मान देतं आणि तुम्हाला श्वासोच्छवास करू देतं.’ हे त्यांचं वास्तव आहे. व्यावहारिक जगातील तरुणाईचं वास्तव! कॉल सेंटरमधील जीवन, तिथलं राजकारण, तरुणाईवर होणारा परिणाम, त्यांच्या प्रेमासारख्या नाजूक भावनांची होणारी शोकांतिका, त्यांच्या आकांक्षांचं पानिपत... यावर तोडगा काढण्यासाठी जो ‘देवा’शी मोबाईलवरचा संवाद या कादंबरीच्या अखेरीस आलाय, त्यात भगत जीवनाचंच तत्त्वज्ञान सांगतात, ‘प्रगती म्हणजे भविष्यासाठी काहीतरी टिकाऊ घडवणं’ आणि शेवटी देवाच्या तोंडून भगत जे सांगतात, ते भरकटलेल्या तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचं! ‘माणसाला यशस्वी होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक असतात. पहिली मध्यम प्रमाणात बुद्धिमान, दुसरी थोडीफार कल्पकता, तिसरी आत्मविश्वास... यश भरारी घेण्यात असतं, गुरगुटून पडून राहण्यात नाही.’ या कादंबरीची ही मोठीच शिकवण. इतर दोन कादंबऱ्यांप्रमाणेच सुप्रिया वकील यांनी या कादंबरीचा अनुवाद अप्रतिम केलाय. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाशी सुसंगत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more