* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYPEE
  • Availability : Available
  • Translators : SHIRDHANKAR BHANU
  • ISBN : 9789353171964
  • Edition : 2
  • Publishing Year : 1966
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AS THE SHIP ‘DOLLY’ DOCKS INTO THE YARD AT NUKUHEVA PORT, TWO OF ITS SAILORS DECIDE TO RUN AWAY FROM ITS ATROCITIES. THEY ARE SCARED TO TRAVEL BACK ON THE WORN OUT SHIP ON A LIFE-LONG VOYAGE. INSTEAD, THEY WANT TO ENJOY LIFE WITH THE TRIBAL PEOPLE THERE. INITIALLY, WHEN THE TWO HAD JOINED THE SHIP, THEY WERE FOOLED THAT THERE ARE MANY ATTRACTIONS. BUT, OVER THE PERIOD, THEY REALIZED THAT THE OFFICERS ABOARD WOULD OFTEN BREAK ALMOST EVERY RULE. THE TREATMENT GIVEN TO THE LOWER RANKS WAS HIDEOUS. EXPLOITATION HAD BECOME THE FIRST RULE OF CONDUCT FOR THE HIGH-RANKING OFFICERS. AS THE VOYAGE CONTINUED FOR A VERY LONG PERIOD, EVERYONE WAS ANXIOUS TO SEE THE LAND. WHILE TRAVELING TOWARDS THE MARKISUS ISLANDERS, TWO OF ITS SAILORS TOMO-THE AUTHOR AND HIS FRIEND TOBO DECIDE TO RUN AWAY. AS THEY DROPPED THE ANCHOR AT NUKUHEWA, THE CAPTAIN PERMITTED THEM TO STROLL AROUND THE PORT. THEY SAW A GOLDEN OPPORTUNITY TO FULFIL THEIR PLAN. TO STAY AWAY FROM THE SHIP, THEY START RUNNING. THEY CANNOT AFFORD TO HALT AT ANY PLACE. INITIALLY, THEY ENTER THE TAIPI REGION. ALL THEY HAVE WITH THEM ARE A FEW LOAVES AND BISCUITS. THEY SURVIVE THE HARDSHIPS BUT AFTER TRAVELLING THUS FOR A WEEK OR SO, THE TAIPI DETAIN THEM. FOR FOUR MONTHS THEY REMAIN WITH THE TAIPI. HOW DID THEY SURVIVE DURING THIS PERIOD IS WORTH READING. "
डॉली जहाजावरील दोन खलाशी नूकूहेवा बंदरात जहाज आल्यावर जहाजावरून फरार होतात. आणि लपतछपत थेट नरभक्षक टैपी लोकांच्या प्रदेशात दाखल होतात. माणसाचं मांस खाणाऱ्या या जमातीच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांचं नक्की काय होतं? या उत्कंठावर्धक अनुभवांची थरारक कहाणी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#हर्मन मेलव्हिल#भानू शिरधनकर#पाचूचे बेट# #HERMAN MELVILL#BHANU SHIRDHANKEAR#
Customer Reviews
  • Rating StarRashmi Sasane

    कालखंड कोणताही असो, एखाद्या दर्यावर्दी खलाशाचं जीवन हे नेहमीच रोमांचकारी घटनांनी भरलेले असतं. दर्यावरच्या मोहिमेत प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठीचा एक नवीनच अनुभव असतो. आजच्या विज्ञानयुगात माहिती मिळवण्याची अनेक साधने हाताशी आहेत. अनेकानेक गोष्टींविषीच ज्ञान सहजपणे मिळू शकतं. त्यामुळे कदाचित या सागरी मोहीमा थोड्याफार सुकर झालेयत, अस आपण नक्कीच म्हणू शकतो. पण जर समजा , हा कालखंड अठराव्या शतकातील असेल तर? ज्यावेळेस माहिती मिळवण्याची साधनं तुटपुंजी होती. अगदी समुद्राच्या एखाद्या भागाची, एखाद्या बेटाची माहिती मिळवायची असेल तर त्या भागात भेट देऊन आलेल्या व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहावं लागायचं. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही परीपूर्ण असेलच अस ही नव्हतं.पुढे ती माहिती एकमेकांना सांगताना तिखटमीठ लावून सांगितली जायची. आणि मग त्या माहितीच्या गुढरम्य कहाण्याच बनून जायच्या. ` Typee ` ही पण एक गुढरम्य कहाणीच आहे. १८४२ मध्ये हर्मन मेलव्हिल हा खलाशी एका सागरी मोहिमेत सहभागी झाला. या प्रवासातील घटनांचे शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक, ` Typee ` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केलाय भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. पँसिफिक महासागरात मासेमारीच्या मोहीमेसाठी जहाजे उतरत. या मोहिमा अगदी चार - पाच वर्षे सतत चालत. या मुदतीचं वर्णन करताना लेखक म्हणतो, या मोहिमेत सहभागी झालेले कोवळे तरुण आपल्या आईचा निरोप घेऊन रवाना झाले ते पुन्हा परत आपल्या बंदरात आले त्यावेळी अर्धम्हातारे झाले होते. जहाजावरील सोयी- सुविधांच्या अभावी निर्माण झालेली गचाळ परिस्थिती, कधीकधी जहाजाला मिळालेला विक्षिप्त, हट्टी कप्तान आणि महिनोनमहिने दुर्लभ झालेल जमिनीच दर्शन यामुळे या सागरी मोहिमा म्हणजे एक नाईटमेर असत. लेखक हर्मन मेलव्हिल ` डॉली ` नावाच्या जहाजावर खलाशी म्हणून सहभागी होतो. ही मोहिम एवढी लांबते की जहाजावरील अन्नधान्य संपत येऊ लागतं, जहाजावरील खलाशांच मनोधैर्य डळमळू लागत. आणि अशा परिस्थितीत लेखक जहाजावरुन फरार होण्याचा निर्णय घेतो, जो फार धोकादायक निर्णय असतो. नुकूहेवा नावाच्या बेटावर त्यांचे जहाज थोड्या काळासाठी थांबले असताना लेखक त्या जहाजावरुन फरार होण्यात यशस्वी होतो. यात त्याला जहाजावरचा आणखी एक खलाशी ही सामील होतो, ज्याचं नाव असतं, टॉबी. आणि इथून सुरु होते ,त्यांची थरारक, ` फरार - सफर `. या प्रवासाच वर्णन लेखकाने बहारदार केलयं. समुद्राच्या लगत असणाऱ्या बेटावरचं हवामान, वातावरण, उंचच उंच टोकदार डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगलाने व्यापलेला परीसर अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर साकारतो. या बेटावरील रहिवासी तर खासचं. त्यांची पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी जीवनशैली, त्यांची अगम्य भाषा आणि हो, त्यांच्या नरभक्षी असण्याच्या अफवा (?) शेवटी कितीही भिती वाटत असली , जीवघेणा धोका वाटत असला तरी या दोन फरार लोकांना या बेटावरच्या आदीम लोकांनाच धरून राहावं लागणार असतं. त्याप्रमाणे हे दोन फरार खलाशी त्यांच्या कल्पनेतही नसणारा असा अनपेक्षित धोकादायक प्रवास करून अखेरीस एका खोऱ्यात उतरतात....टैपी जमातीच्या खोऱ्यात. आणि ही टैपी जमात नरभक्षी म्हणून कुप्रसिद्ध असते. मग या दोन खलाशांना त्यांचा काय अनुभव येतो? ही सगळी कहाणी सांगण्यासाठी ते जिवंत कसे राहतात?सर्व दर्यावर्दी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे हे टैपी लोक खरचं का नरभक्षी असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. Typee हे पुस्तक म्हणजे लेखक हर्मन मेलव्हिल चा पोलिनीशीनय बेटावर घालवलेल्या चार महिन्यांचा ऐतिहासिक लेखाजोखा आहे की ज्यामध्ये हर्मन मेलव्हिल ने या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी वास्तवात घडल्या आहेत, असा दावा केलाय. १८४६ मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांच्या सत्यतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पुस्तक म्हणजे कल्पनाविलास की वास्तविकता , यावर चर्चा घडू लागल्या होत्या. अगदी हर्मन मेलव्हिल नावाची व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे का? यावरही संशय घेतला जाऊ लागला होता. या वादळी चर्चा शिगेला पोहोचल्यावर ज्यावेळेस हर्मन मेलव्हिलची इतिहासकार म्हणून कारकीर्द धोक्यात येतीय अस वाटल्यावर , त्याने स्वतः त्याच्या डिफेन्स मध्ये एक निनावी लेख प्रकाशित करण्याचे ठरवले पण त्या आधीच या कथेची सत्यता सिद्ध करण्यासाठी लेखकाचा, त्याच्या फरार- मोहीमेतील दुसरा साथीदार, टोबी त्याच्या मदतीला आला. आणि त्याच्या साहाय्याने हर्मन मेलव्हिल ने Typee चा उत्तरार्ध, The story of Toby, A sequal of Typee लिहीला. त्यामुळे या पुस्तकाच्या सत्यतेविषयीचा उठलेला संशयाचा धुरळा खाली बसला. पुस्तकातील ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाविषयीच्या नकारात्मक वर्णनावर पण काही वाचक नाराज होतेच, पण लेखक आपल्या त्या मतांवर ठाम राहिला. एकुणच Typee हे एका अज्ञात संस्कृती चे छोटेखानी दर्शन घडवणारं पुस्तक ठरतं. एका आयुष्यात अनेक प्रकारच्या आयुष्याचे अनुभव देण्याची क्षमता पुस्तकात असते , मग ते अनुभव आपल्यासाठी काल्पनिक का असेनात . त्यापैकी Typee हे पुस्तक आहे. अनुवादाविषयी:: Typee या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे, भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. अनुवाद इतका सुंदर, ओघवता झाला आहे की आपण एक अनुवाद वाचतोय हे लक्षातच येत नाही. ...Read more

  • Rating StarNaresh Mohare

    जेव्हा नविन नविन बेटानचा शोध लावला जात होता तेव्हा समुद्रा वरील बोटीतून 2खलाशी पळून जावुन जंगलात जातात आणि तेथे ते जंगलातील नर भक्षक लोकाना भेटतात आणि त्याच्या सोबत काढलेल्या दिवसाचे वर्णन लेखकाने येथे दिले आहेत. वेळ काढून नक्की वाचा.

  • Rating StarKaushik Lele

    युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीनदिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले. चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं . लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया ...Read more

  • Rating StarHemant Latkar

    छान आहे.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more