* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PARAM VIR
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788177666908
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PARAMVEER- OUR HEROES IN BATTLE IS A BOOK WRITTEN BY MAJOR GENERAL IAN CARDOZO, IN ENGLISH. MANY FAMOUS MILITARY PERSONNEL, LIKE SIR WINSTON CHURCHILL, AFTER RETIRING FROM ACTIVE MILITARY SERVICES HAVE WRITTEN ABOUT THE ACCOUNT OF WARS THEY FOUGHT, BATTLE FIELDS, THE MILITARY STRATEGIES ETC. THEY ARE REALLY THE MASTERPIECES OF THE LITERATURE. IN INDIA, VERY FEW HAVE TRIED THEIR HANDS ON PEN, AFTER GUITTING THE SWORDS AND MAJOR GENERAL IAN CARDOZO IS ONE OF THEM. ‘PARAMVEER CHAKRA’ IS THE HIGHEST HONOUR, THE HIGHEST AWARD IN THE ORDER OF MILITARY AWARDS GIVEN BY THE GOVT. OF INDIA, FOR THE ACT OF VALOUR, AND PATRIOTISM. THE BOOK GIVES ACCOUNT OF 21 "PARAMVEER` MEDAL RECIPIENTS WHICH WERE AWARDED FOR THE WARS WAGED ON THE SOIL OF INDIA NAMELY, JAMMU-KASHMIR WAR 1947-48, INDIA CHINA WAR 1962, INDIA PAKISTAN WARS, 1965, 1971 AND RECENT KARGIL WAR 1999 AND ALSO UNITED NATION`S PEACE KEEPING EXPEDITION AND SIACHEN WAR, EACH RECIPIENT`S STORY UNFOLDS A BREATH TAKING EXPERIENCE OF THE COURAGE, BRAVERY AND VALOUR . THE DESCRIPTION OF THE SIGHT, THE DIFFICULTIES FACED BY THE INCUMBENTS, THE DETERMINATION TO FIGHT AGAINST ALL ODDS AND SUCCEED IS SO GRIPPING THAT YOUR HEAD BOWS IN GRATITUDE FOR THEIR BRAVERY. MANY RECIPIENTS LAID THEIR LIVES TO SAVE THIS COUNTRY. FOR OUR TODAY THEY HAVE SPENT THEIR YESTERDAY. FOR GETTING THE INFORMATION ABOUT THE FAMILY BACKGROUND, BUILDING OT THE CHARACTER OF EACH RECIPIENT, THE WRITER HAS TAKEN LOTS OF EFFORTS. HE CONTACTED ARUN BATRA`S (THE THEN YOUNGEST RECIPIENT WHO LAID HIS LIFE) FATHER. THE STORY NARRATED BY THE FATHER IS MOST TOUCHING AND ABSORBING. THE DESIGNER OF THIS MEDAL IS A LADY. NAMELY MRS. KHANOLKAR, WHO WAS NOT INDIAN BY BIRTH. THIS BOOK IS QUITE INFORMATIVE, THERE IS A LETTER WRITTEN TO PANDIT NEHRU BY SARDAR PATEL, READING THIS YOU GET TO KNOW SARDAR PATEL’S FORESIGHT AND ACUMEN, INSIGHT. THIS BOOK IS HEARTWARMING, IT ENRICHES YOUR MIND. NOW IT IS AVAILABLE AS A TRANSLATION IN MARATHI.
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पेटून उठलेल्या हिंमतवान भारतीय सैनिकांच्या या कथा आहेत. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडूनही तसेच प्रोत्साहन मिळाले. युद्ध ही जरी राष्ट्राने हाती घेतलेल्या राजनीतीची पुढील पायरी असली तरी, रणधुमाळीत तोलले जाते ते सैनिकांचे नशीब! भारतीय सैनिक, ज्यांच्या गळी ‘स्वत:आधी सेवा’ हे तत्त्व पूर्णपणे उतरलेले असते, युद्धातील सर्व आव्हाने अंगावर घेतात, प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग शोधतात आणि अशक्यप्राय वाटणारे यश हसतमुखाने खेचून आणतात. फार थोड्यांचे शौर्य पदकाने सन्मानित होते. बाकीच्यांची दखल घेतली जाणे गरजेचे आहे. हे सर्व योद्धे, जे असे निर्भीड होते, ते कशामुळे झाले? त्यांना कोणी घडविले? भारतीय सैनिकांचे कर्तृत्व, त्यांची ध्येयधारणा, त्यांनी भारतीय सैन्याची आणि आपल्या देशाची केलेली सेवा वाचकांपर्यंत पोहोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे. ज्या भारतभूमीसाठी या जवानांनी आपले रक्त सांडले, त्या भारताचे सर्वार्थाने रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. या शूर योद्ध्यांना तीच खरी श्रद्धांजली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REFERENCE #PARAMVEERCHAKRA #BIOGRAPHY #JYOTSNALELE #MAJORGENIANCARDOZO
Customer Reviews
  • Rating StarRajiv Lute

    कश्मिर मध्ये काहीतरी होणार! अफवांचे पेव फुटले आहे.अनेकांना आज झोप येत नाही...आपल्या देशाचा गंभीर प्रश्न सुटावा असे प्रत्येकाला वाटते...भारतीयांना आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. सरकारचा पाठिंबा असेल तर सैन्य काहीही करू शकते हा आतापर्यंत चा अनुभव आे...अश्याच महान परमवीर चक्र विजेत्या नाटकांची गाथा सांगणारे हे पुस्तक सर्वांना आवडेल! ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    लेखक स्वतः एक धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत .१९५७ च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत त्यांचा एक पाय सुरुंगावर पडला तेव्हा त्यांनी स्वतः ची कुकरी काढून पाय तोंडाला .अपंग होऊनही त्यांनी पुढे सैन्यदलात राहून देशाची सेवा केली. परमवीर चक्र हा सैन्दलातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार समजला जातो .आतापर्यंत एकवीसजणांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे .त्या प्रत्येकाची माहिती आणि लढाईतील पराक्रम या पुस्तकात लेखकाने लिहिला आहे .इतकेच नव्हे तर परमवीर चक्राची माहिती . त्याचा इतिहास हेही लिहिले आहे .या पदकाचे डिझाईन एका स्त्रीने केले आहे हे विशेष आहे . पहिल्या पदकाच्या मानकऱ्यापासून ते कारगिल युद्धापर्यंत सर्वांचा इतिहास यात आहे .सर्वांनी आपल्या या शूरवीरांबद्दल वाचलेच पाहिजे ...Read more

  • Rating Starअरूण भट

    नुकतेच आपले ‘परमवीर च्रक’ हे अनुवादित पुस्तक वाचले व थरारून गेलो. मनोगतात लिहिल्याप्रमाणे मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. सर्वसाधारण नागरीकांना सैन्याबद्दल कमी माहिती असते. सदर पुस्तके अधिक प्रमाणात आली तर सैनिक, आधुनिक युद्धे याबद्दल अधिक माहती वाचकांना मिळेल. पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रीक बाबी उत्तम आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-10-2006

    परमवीर चक्र हे आपल्या देशातलं सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य, पराक्रम गाजवणाऱ्या रणमर्दाला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येतं. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानी सैन्यानेपठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या युद्धापासून १९९९ सालच्या कारगिल युद्धापर्यंतच्या विविध समरप्रसंगात पराक्रम गाजवणाऱ्या एकूण २१ योद्ध्यांना आजवर परमवीर चक्राने सन्मानीत करण्यात आलेलं आहे. कोण आहेत हे २१ परमवीर? त्यांचीच नावं आणि त्यांच्या पराक्रमकथा प्रस्तुत ‘परमवीर चक्र’ या पुस्तकात तपशीलवार देण्यात आल्या आहेत. या कथा सांगणारा लेखक हा स्वत:देखील एक बहाद्दर सैनिक आहे. लेखक मजर जनरल (निवृत्त) इयान कारडोझो हे हिंदुस्थानी सैन्यात ‘५ गुरखा रायफल्स’ या पलटणीत सेवा बजावत असताना, एका लढाईत त्यांचा पाय शत्रूने पेरलेल्या सुरुंगावर पडला. ते जबर जखमी झाले. त्याही स्थितीत या बहाद्दराने स्वत:च्या कमरेची कुकरी काढली आणि आपला चिंधड्या उडालेला पाय सरळ स्वत:च कापून टाकला. अपंग बनल्यावरही त्यांना उच्च सेनाधिकाऱ्यांची सेवेतून काढून न टाकता, त्यांच्या शौर्याची कदर करून त्यांची सेवा पुढे चालू ठेवली, असे ते पहिले सेनाधिकारी होत. १९९३ साली हिंदुस्थानी सैन्यदलाच्या पूर्वेकडील कोअरचे चीफ ऑफ स्टाफ अशा उच्च पदावरून ते निवृत्त झाले. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायिला, की तो श्रोत्यांच्या काळजाला अधिकच भिडतो. त्याचप्रमाणे मेजर जनरल कारडोझोनी लिहिलेली परमवीर चक्राच्या मानकऱ्यांची ही पराक्रमगाथा मोठी वेधक, प्रेरक उतरली आहे. युद्धात पराक्रम गाजवणाऱ्यांना सन्मानीत करून त्यांचा व सर्वच सैनिकांचा उत्साह वाढवण्याची प्रथा, परंपरा फार प्राचीन काळापासून जगभर सर्व देशांमध्ये आहे. आपल्याकडेही ती होतीच. महाराजा शिवछत्रपती आपल्या बहाद्दर सैनिकांच्या हातात सोन्याचे तोडे घालीत. त्यांना सर्जेराव, हंबीरराव, प्रतापराव, विश्वासराव असे मानाचे किताब देत. पालखी, हत्ती, नौबत, निशाण अशी मानचिन्हे देऊन गौरवीत. इंग्रजी अमदानीत हिंदुस्थानी सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, व्हिक्टोरिया क्रॉस इत्यादी मानचिन्हे दिली जात. स्वतंत्र हिंदुस्थानात व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च लष्करी सन्मानाला समकक्ष असं परमवीर चक्र हे पदक अस्तित्वात आणलं गेलं. मध्यभागी अशोकस्तंभावरील चार सिंह आणि चार बाजूंना इंद्राच्या वज्राची चार चिन्हं, असं हे पदक सावित्रीबाई खानोलकर या संस्कृत साहित्याची प्रकांड पंडिता असणाऱ्या महिलेने सुचवलं. मेजर जनरल विक्रम खानोलकर या मराठी सेनाधिकाऱ्याची ही पत्नी मूळची स्वित्झर्लंडची होती. तिची आई रशियन आणि वडील हंगेरियन होते. योगायोग पाहा. पठाणी टोळीवाल्यांचा हल्ला उधळून लावून पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरण्याचा अतुल पराक्रम गाजवल्याबद्दल ज्या मेजर सोमनाथ शर्मांना स्वतंत्र हिंदुस्थानचं पहिलं परमवीर चक्र मिळालं, ते मेजर शर्मा सावित्रीबार्इंच्या मुलीचे दीर होते. अशा अनेक रोमांचक हकीकतींनी पुस्तक अत्यंत वाचनीय बनलं आहे. मांडणी, मुद्रण, निर्मिती, मुखपृष्ठ सुबक. जोत्स्ना लेले यांचा मराठी अनुवाद ठीक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more