* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664294
  • Edition : 38
  • Publishing Year : JANUARY 1976
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"BY WHAT NAME SHOULD I CALL YOU? `PARTNER`; ACTUALLY WE HAVE NO NAME; THE NAME WHICH WE DISPLAY AS OUR OWN IS GIVEN TO THE BODY, NOT TO THE SOUL. A YOUNG LADY IS LIKE A COOL BREEZE; WHICH LINGERS AROUND US, TOUCHES US, GIVES US PLEASURE BUT WHICH CANNOT BE HOLD. WHAT IS HELL? IT IS THE COMPANY OF A THIRD PERSON WHEN MOST UNDESIRED. JUST REMEMBER FRIEND, BECAUSE YOU NEED ME, I TOO NEED YOU. AS YOU WRITE MORE AND MORE PERSONAL, IT BECOMES MORE AND MORE UNIVERSAL. "
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळू्व. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक! लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. "

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHDr.Shuchita Nandapurkar-Phadke  
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating Starसुशांत

    आणि शेवटी डोळे नकळत पाणवणार इतक्यात मी विचारात गुंग झालो-असा माझ्या आयुष्यात कोण आहे `पार्टनर`? आणि ती विचारांची माळ खंडीत झाली कारण माझ उत्तर मला क्षणार्धात मिळाल होत. पाणवणा-या डोळ्यातुन अश्रू अनावर झाले.अजाणते पणे भेटलेला पार्टनर हा महत्त्वाचा ऐज बनुन राहीला. अगदी कथेतल्या पार्टनर प्रमाणे ...Read more

  • Rating StarAniket Anil Apte

    तसं म्हणले तर आयुष्यात गरज अशी कुणाचीच लागत नाही अथवा कुण्या असण्या किंवा नसण्याने तसा फारसा काही फरक पडत नाही असे आपल्याला एकदा तरी वाटतेच. एखादा तरी पार्टनर असावा, मग तो कसा का असेना पण जीवाला जीव देणारा असावा, अडी अडचणीत साथ देणारा असावा... वैरे वगैरे सगळी फिलॉसफी वाटते खरी पण काही वेळा तथ्य असते. तुमचं अगदी बरोबर आहे, मी व. पु. काळेजींच्या पार्टनर या पुस्तकाबद्दलच बोलतोय. लाल कलरच्या बॅकग्रांऊंडवर अर्धा पत्त्यात राणीचे स्केच तर राहीलेल्या पत्यात राजा... असे कव्हर पाहिल्यावर अर्थातच पार्टनर म्हणजे संसाररूपी जीवनाचे कथानक आहे की काय वाटते पण जसे जसे पानं पलटत जातो तसतसे मित्र आधी पार्टनर बनतो आणि तो निस्वार्थपणे जीवनरूपी संसाराची घडी घालून देतो. सुरवात होते ते पार्टनरने सांगितलेल्या साहेबाच्या नाटकातली कथेने. मग पुढे नायकाला "किरण वर्तक" नावाची मुलगी भेटते. एकीकडे प्रेमाचे धडे गिरवत असताना भाऊ, वहिनी आणि आई यांना सांगून तिच्याशी लग्नाचे स्वप्न रंगू लागते. पार्टनर मदतीने नवा संसार नव्या जागी राजा राणी सारखा बहरू लागतो. पण रोज नवी लफडी करणारा पार्टनर मात्र आयुष्यातून दूर झालेला असतो... नेहमीप्रमाणे काही काही वाक्य मनाला भावणारी आहेत. "नरक म्हणजे काय?, आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं ", "गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो, तिस-या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो." "आपल्याला खरं तर नावच नसतं, बारशाला नाव ठेवतात ते देहाचं". अगदी मोजक्याच म्हणजे दिडशे पानातच वपूंनी कथा मांडली आहे ती ही इतक्या प्रभावीपणे वाटते की जणू डोळ्यासमोर चित्रफितच चालू आहे.. ...Read more

  • Rating StarShailaja Bhaskar Dixit

    कादंबरी वाचताना आपण कादंबरीच्या नायकाच्या सोबत त्याच्या विश्वात आपोआप जात जातो. अतिशय ओघवती व सोपी घरगुती भाषा लेखकाने योजली आहे. नायकाचा टपोरी मित्र, ज्याला या कादंबरीत `पार्टनर` म्हणुन म्हटले जाते, तो फारच रंगेल व बिन्धास्त दाखवला आहे.नवनवीन पोरींबरोबर टाईमपास करणं, यात त्याला काहीही गैर वाटत नाही. नायक मात्र अतिशय सभ्य, सहनशील, भावनाशील असतो. दोघांचे स्वभाव अपोझिट असुनही दोघं जीवश्च कंठश्च मित्र असतात. नायकाच्या जीवनात अडचणी येताच पार्टनर त्याला खूप मदत करतो, उपाय सुचवतो. पार्टनरचं लाईफ थिल्लर वाटत असलं, तरी काही वेळा तो जीवनाचे तत्वज्ञान सांगतोय असे वाटते. नायक हा लकीही आहे, अनलकीही आहे. त्याला सर्वांची मैत्री, प्रेम, मदत, मिळते म्हणून तो लकी वाटतो. पण आईचे फक्त मोठ्या भावावरच प्रेम असणं, आईचं कधीकधी स्वार्थी वागणं, बाळाचा मृत्यू, या गोष्टी वाचताना तो अनलकी वाटतो. थोडक्यात काय, तर जीवन हे सुखदुःखाचे मिश्रण आहे. ते जसे असेल, तसे स्विकारून पुढे चालावेच लागते. ...Read more

  • Rating Starमानसी सरोज

    #पार्टनर एखाद्या क्षणी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा किंवा आनंदाचा वर्षाव व्हावा आणि त्या क्षणी सगळ्यात आधी आपण पुकारा करत सुटावे आपल्या प्रिय माणसाचा तो असतो `पार्टनर`. मग ती आई, बायको, बहीण, वहिनी, लेकरू किंवा व. पु. काळे यांच्या पार्टर या कादंबरीतील देवधर! देवधरच्या औषधाच्या दुकानात काम करणारा श्रीनिवास..आयुष्यभर तडजोडी करत जगलेला...जेव्हा तेव्हा आई, भाऊ, वाहिणींची उपेक्षा मिळवलेला हा इसम आपल्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार पार्टनर म्हणून ठरवताना अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. एखाद्या प्रसंगात मावशी देखील देवसारखीच उभी राहते. अतिशय सोप्या भाषेत, ओघवत्या शैलीत मधेच गतीत जाणारे कथानक पण कुठेही अति रंजकपणा न जाणवणारी ही `पार्टनर` नावाची कादंबरी एका बैठकीत वाचून काढावी अशीच आहे. एक दोन ठिकाणी वापरलेल्या धक्का तंत्राने आपण बिथरतो कारण सगळं `गुडी गुडी` चालत असताना अचानक दुःख कोसळणे त्रासदायकच. अधूनमधून `वर्पूझा`चा चांदीचा वर्ख लिखाणावर लावलेला जाणवतो. उदाहरणादाखल घेतलेल्या उपमा मधेच विसंगत वाटत असल्या तरीही क्षणभर थांबून त्यावर विचार करायला भाग पाडतात.पात्रांच्या संवादाची फेक गतिमान असल्याने थेट मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही आणि अशाने "पुढे काय?" ही उत्सुकता टिकून राहते. डायरी आणि पत्रे कथेचे वजन वाढवतात. संपूर्ण कथानक श्रीनिवास आणि पार्टनर भोवतीचंच आहे पण बायकोसोबतचे काही प्रियराधन प्रसंग अंगावर शहारा आणतात. काही प्रसंग आई आणि भावाचा उगाचच राग आणतात. पण थोडा वेगळा विचार करता आईचे दुसऱ्या मुलावर म्हणजे अरविंदवर जास्त प्रेम असले तरीही कायम तडजोडी करणाऱ्या आपल्या मुलाला म्हणजे श्रीनिवासला आपली अडचण नको या हेतूने कदाचित मुद्दामच आईचं दूर राहणं असावं असा विचारही मनात येतो. माई दांपत्य आणि शेवटी माईने श्रीनिवासच्या पत्नीची सेवा केल्याबद्दलचं कटू फळ जीवाला चटका लावून जातं. एकंदरीत आपण कितीही लोकांत राहत असलो तरी आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी म्हणजे सख्या, सोबती, प्राणप्रिय ` पार्टनर`. कादंबरीतील काही सुविचार आणि वैचारिक ओळी मनाच्या गाभाऱ्यात जागा करतात...इंग्रजीतून वापरलेली वाक्येसुद्धा अगदी योग्य ठिकाणी बसतात. जीवनात वयात आल्यापासून प्रस्थापित होईपर्यंतच्या काळात अनेकदा उमेद हरपली जाते पण अशा वेळी किमान एक `पार्टनर` असायला हवा जो आपला कुणीच नसतो. तो असतो फक्त डोळ्यांवरून झोपेचं पीस फिरवत "चिंता नको ..शांत झोप ...तोडगा काढू" म्हणणारा.. अशा आशयाचे हे पुस्तक आनंद, द्वेष, प्रणय, लोभ अशा सगळ्या रुपांचं प्रतीक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
इंजि वा.पां.जाधव अमरावती

अमरावतीचे जी.बी. देशमुख तसे महाराष्ट्रात विविध वाङ्मयीन साहित्य प्रकाशित करून नामलौकिक मिळवलेले सिमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजेच आताचे जीएसटी या विभागाचे अधिक्षक पदावरून निवृत्त झालेले उच्चाधिकारी पण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच लेखनाचा नद लागून आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक म्हणून ख्याती प्राप्त साहित्यिक . त्यांच्यासोबत ज्यांचा स्नेह आला, संबंध आला त्यांना आपल्या अंगीकृत विनोदी शैलीतून आपल्या अनुभवातून गप्पात रंगविणारे हे व्यक्तिमत्त्व. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुटबॉलपटू राहून गेलेल्या त्यांच्या वडिलांवरील अंतर्मुख करणारे चरित्रात्मक पुस्तक `महारुद्र`, `कुलामामाच्या देशात` हा जंगलकथांचा संग्रह तसेच चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महानायक अमिताभ बच्चनच्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीतील विविध ६२भूमिकांचे खुमासदार चर्वण असलेले `अ-अमिताभचा` ही त्यांची पुस्तकं आपण वाचलीच आहेत. `अ-अमिताभचा` ह्या पुस्तकासाठी खुद्द महानायकाने लेखकाचे कौतुक केले होते. त्यांनी सन २०२२ ला `अमरावतीचे छप्पन स्वभाव` पुस्तकातून लिहिलेले अनेक विनोदी लघू लेख कथासंग्रहातून रसिकांना लोटपोट केले. हे पुस्तक देखील वाचकांना आनंद देऊन गेले. आता त्याही पुढे जाऊन मुळात गप्पीष्ट स्वभाव असलेले, गप्पा छाटण्यात पटाईत असलेले श्री. जी.बी. देशमुख यांचे " छाटीतो गप्पा " हे विनोदी शैलीतील साहित्याची लूट असलेले पुस्तक माझ्या वाचनात आले. विनोदी कथा संग्रहाची काही मुख्य वैशिष्ट्ये असतात. या कथांमध्ये विनोदाच्या विविध प्रकारांचा , संवादातील हास्य, अतिरेकी वर्णने इ. वापर केला जातो. वाचकाला खळखळून हसवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असते. कथांचा विषय हलकाफुलका, रोजच्या जीवनातील विनोदी प्रसंगांवर आधारित असतो, ज्यामुळे वाचकांना सहज रिॲक्ट करता येते. जी.बी.देशमुख यांचा `छाटितो गप्पा` हा असाच ४५ लघुकथांचा कथासंग्रह ! या ४५ कथांमध्ये असलेल्या पात्रांचे,घटनांचे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण, मजेशीर पद्धतीने लेखकाने केलेले आहे. व्यक्तिमत्त्वांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण यात आढळते जे वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते.आकर्षक संवाद , मजेशीर आणि मार्मिक संवादाने यातील कथा प्रभावी बनल्या आहेत. कथांमध्ये वर्णने आणि प्रसंग ज्यामुळे वाचकाला कथा अधिक रंजक वाटतात. गंभीर व हास्याच्या माध्यमातून बोध देण्याचा प्रयत्नही लेखकांनी काही कथांमध्ये केला आहे. विनोदी कथा संग्रह हा एक असा साहित्यप्रकार आहे, जो वाचकांना आनंद, विश्रांती आणि जीवनातील हलक्याफुलक्या बाजूंची जाणीव करून देतो. लहानपणीच्या आणि शाळकरी मित्रांच्या खोडकरपणात आपलीच बाजू कशी सक्षम होती हे दाखवत पुन्हा एकदा वाचकांना बालपणात घेऊन जाणारा हा विनोद प्रचूर कथासंग्रह... लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या आठवणिंनी आयुष्य धावत सुटतं, पण आपल्यातील मित्रत्व कधी सुटत नाही. कौटुंबिक, नातेवाईक गणगोतापेक्षा आपल्या मित्रांच्या गोतावळ्यातील आनंद बरा, असं अनेकदा आपल्याला वाटतं. जुन्या आठवणींनी आपण भूतकाळात हरवून जातो. ज्या वेटाळात आपण जन्मलो, ज्या शाळेत शिकलो, ज्या सवंगड्यांत बसून जगातील घडामोडींवर आपण गप्पा मारल्या, सुट्टीच्या दिवशी जसे मनसोक्त हिंडलो, आदी प्रसंगांचा ह्या पुस्तकात मनोरंजक प्रवास आहे. लेखक जी.बी देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावे ज्यातून आपणास निश्चितच एक वेगळाच आनंद मिळेल, यात शंका नाही. थर्मास, गव्हातले खडे, मामुची उधारी ,फुकटची अकड, मुगाच्या डाळिचा शिरा इत्यादी ४५ लघुकथा आनंद विभोर करून जातात. त्यामध्ये अंतर्भूत घटना घडलेल्या गोष्टी डोळ्यासमोर साक्षात ऊभ्या करण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत. मनाला साद घालणाऱ्या अगदी साध्या साध्या गोष्टी घटना वऱ्हाडी भाषेच्या गोडव्यातून मांडून रंगतदार गप्पांचा फड लेखकाने रंगविला आहे. दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या गोष्टी ज्यात कधी कधी वाचताना हास्यासोबतच डोळ्याच्या कडा ओलावून जातात इतके गांभीर्य सुद्धा त्यात आहे . मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुद्धा आकर्षक असून बोलके आहे. असा हा जी.बी देशमुखांचा अनोखा गोष्टीचा संग्रह हाती घेतल्यावर खाली ठेवू वाटणार नाही इतका वाचनीय आहे, एवढे मात्र नक्की. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more