* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663051
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 976
  • Language : MARATHI
  • Category : DICTIONARY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI -MARATHI- ENGLISH THESAURUS.
मराठी मराठी इंग्रजी पर्याय शब्दकोश

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHI MARATHI ENGLISH# THESAURUS#
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-12-2019

    ‘पर्यायकोशा’चे जनक... काही व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष भेटत नाहीत; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व व योगदान यातून त्यांची प्रतिमा निर्माण होते. नुकतीच वि.शं. ठकार यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. त्यांची माझी ओळख त्यांनी लिहिलेल्या ‘इंग्रजी मराठी पर्यायकोशातून झाली. साधारण चार वर्षांपूर्वी नितीन प्रकाशनचे हे पुस्तक योगायोगाने मला मिळाले. त्या वेळी मी मराठीत काही तांत्रिक विषयांवर लेखन करीत होतो. या पुस्तकाचा मला प्रचंड उपयोग झाला. यातले मराठी अनेक पर्यायी शब्द ठकार सरांनी अत्यंत परिश्रमाने एकत्र केले आहेत. ते वाचूनच थक्क व्हायला होते. चार महिन्यांपूर्वी ठकारांशी फोनवर बोललो होतो, त्या वेळी ‘अजून एक कोश करीत आहे,’ असे ते म्हणाले होते. त्यांना आवर्जून भेटायचे होते, पण राहून गेले. त्यांना आदरांजली! -श्रीरंग गोखले, कर्वेनगर ...Read more

  • Rating StarUsha N Koudinya

    Just out of a vernacular medium of up to your neck in translation or in deep conversation? Are you stammering stuttering searching for the right word then here is a book to rescue you from those tongue-tied situations? The first ever Marathi-MarathiEnglish Thesaurus is the answer. It hit the stands in January 2000 and the first edition has been sold out already. The thesaurus is the brain-child of Mr V. S. Thakaar and is his single handed effort. He took the Datte and Karve Marathi dictionary and the Roget`s Thesaurus as the two foundation stones, Thakaar has written this 830 page comprehensive book in six months. The words are arranged in alphabetical order like the Roget`s thesaurus. However, Marathi like othe Indian Languages encompasses the `barakhadis` in addition to the regular vowels and consonants. You could pick up a word and look up for synonyms in Marathi and in English through this book. It contains 1900 main words. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 19-11-2000

    ग्रंथजगत समृद्ध करणारा ग्रंथ... काय गंमत असते पाहा. मला सर्वस्वी अपरिचित अशा वि. शं. ठकार यांनी तयार केलेला मराठी पर्याय शब्दकोश खरेदी करून मी परतत होतो. बसमध्ये साहजिकच तो चाळत होतो. तेव्हा काही एक आगापिछा नसताना मला विनोबा भावे यांचं स्मरण झालं निवाटलं, त्यांना हा कोश फार आवडला असता. काही आगापिछा नसलेले, मनात उनाडक्या करणारे विचार तसे अर्थहीनच. शब्दकोशांचं परिशीलन करण्यात विनोबा रंगून जात, ही वाचलेली किंवा ऐकलेली आख्यायिका याच्या मुळाशी असणार, हे उघड आहे. परंतु गेले काही दिवस हा कोश चाळल्यानंतर लक्षात आलं, तो विचार सार्थच होता. या कोशाची गुणवत्ता तशीच मोठी आहे. वेगळेपण सर्वसाधारण शब्दकोशापेक्षा पर्याय शब्दकोश भिन्न असतो. शब्दकोशात शब्दांचा अर्थ नेमकेपणे देण्यात येतो. शब्दांच्या वाच्यर्थाबरोबर लक्षणेने शब्दांना प्राप्त झालेले अर्थही त्यात द्यावे लागतात. पर्याय शब्दकोशात किंवा थोडक्यात ‘प. श. कोशात’ एकेका शब्दाला पर्याय म्हणून वापरता येणारे सारे शब्द देण्यात येतात, तसेच शब्द पूर्णपणे समानअर्थी असतात असे नव्हे. तर त्या शब्दाला विविध अर्थछटा असलेले शब्दही ‘पर्याय’ शब्द म्हणून संग्रहित करण्यात येतात. साहजिकच या पर्याय शब्दांत संस्कृत, संस्कृतोद्भव शब्दांबरोबर अगदी माठमोळे शब्द येतात, त्याचप्रमाणे मराठीनं आत्मसात केलेले अन्य देशी भाषांतील शब्दांचा व परदेशी भाषांतील शब्दांचाही त्यात अंतर्भाव होतो. उदाहरण म्हणून ‘अन्न’ हा शब्द पाहावा. डॉ. प्र. न. जोशी यांच्या आदर्श मराठी शब्दकोशात अन्न या शब्दाचा अर्थ दिला आहे. ‘धान्य वगैरेचा खाद्यपदार्थ, आहार, भक्ष्य’. ज्या दृष्टीने ‘आदर्श शब्दकोश’ तयार केला आहे. त्या दृष्टीनं एवढा अर्थ पुरेसा आहे. प.श. कोशात ‘अन्न’ यापुढे देण्यात आलेल्या शब्दात ‘खाद्य, भक्ष्य’पासून ‘भंडारा दाणागोटा, खुराक’ हे पर्याय येतात. शिवाय अन्नाशी संबंधित ‘वनभोजन’ तसेच सूपशास्त्र यांचाही यात अंतर्भाव होतो. हे सारे शब्द १३० आहेत. अन्नाशी संबंधित ‘रांधणे’ वगैरे सहा क्रियापदे आणि माकडमेवा, च्याऊम्याऊसारखे ३५ वाकप्रचारही दिलेले आहेत. आपल्या भाषेतील शब्दांच्या या श्रीमंतीनं जीव लोभावतो या प.श. कोशात एका शब्दाच्या विविध अर्थछटा असलेले शब्द दिले आहेत. त्याचबरोबर या शब्दाशी संबंधित शब्दही दिले आहेत. ‘अंत्येष्टि’ शब्दाच्या पर्याय शब्दांत या शब्दाशी संलग्न असे ‘स्मशान’, ‘कबरस्थान’, ते ‘शववाहिनी’, नि ‘देहदान’ असे शब्दही आले आहेत. आज इंग्रजी भाषेला जे स्थान प्राप्त झाले आहे. ते लक्षात घेऊन मराठी शब्दांचे इंग्रजी पर्याय पर्याप्त प्रमाणात दिले आहेत, त्यामुळे या कोशाच्या गुणवत्तेत व उपयुक्ततेत मोलाची भर पडली आहे. येरा गबाळ्याचे काम नोहे वर दिलेली ‘अन्न’ व ‘अंत्येष्टि’ ही शलाका परीक्षेनं दिलेली भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन हा कोश कसा करतो, ते लक्षात येतं. त्याचप्रमाणे कोणत्याही भाषेतून मराठीत अनुवाद करणाऱ्यांना हा पं.श. कोश किती उपयुक्त ठरणारा आहे. याचीही जाणीव होते. मराठीच्या विविध स्तरांवरील अभ्यासकांना हा प.शं. कोश संग्रही असणं अपरिहार्य वाटावं व इतरजनांना हा ग्रंथ आपल्यापाशी असल्याचा अभिमान वाटावा. वरील दोन उदाहरणांनीच आणखी एक गोष्ट लक्षात यावी. ती ही की प.श. कोशाची निर्मिती हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. निरनिराळे शब्दकोश अभ्यासणे, महत्त्वाच्या ग्रांथिक साहित्याचे परिशीलन करणे, शब्द निश्चित करणे, त्यांच्या याद्या बनवणे, त्या पडताळून पाहणे, त्यांची उजळणी-फेरउजळणी वगैरे कामं वेळ खाणारी, डोकं चक्रावणारी नि चिकाटीचं टोक गाठायला लावणारी आहेत. श्री. ठकारांनी हे काम एकहाती केलंय, असं त्यांनी प्रारंभी दिलेल्या त्रोटक निवेदनावरून वाटतं. त्या निवेदनात बऱ्याचजणांनी प्रोत्साहन दिल्याचा त्यांनं साभार उल्लेख केलाय. ते प्रोत्साहन त्यांना महत्त्वाचं वाटलंही असेल, परंतु त्या ज्ञानशाखेबद्दल अतूट ओढ नि हृदयाच्या देठापासूनचा जिव्हाळा नसेल, त्याच्या जोडीला चिवट चिकाटी नसेल, तर दहा-पाच जणांच्या प्रोत्साहनानं अशी कामं सिद्ध होत नाहीत. हे अपवादस्वरूप गुण ठकारांपाशी आहेत, म्हणून हा ग्रंथ सिद्ध झाला. इंग्रजी थॅसॉरस इंग्रजीतील Rojet a Thesaurus of Synonyms and Antanyms प.श. कोश त्याच्या अनेक आणि अनेक प्रकारच्या आवृत्त्या निघाल्या आहेत. मोजकेच पर्यायी शब्द देणारी संक्षिप्त आवृत्तीही निघालीय. त्यात अमूर्त संकल्पना, वस्तुमान आदि प्रकारांत शब्दांचे वर्गीकरणे केले आहे. त्या वर्गीकरणानुसार क्रमांक देऊन शब्दांच्या नोंदी केल्या आहेत. पुढच्याच क्रमांकात त्याच्या विरुद्ध अर्थी शब्दाची नोंद. उदा. त्यातील क्र. १ची नोंद आहे. Existence तर क्रमांक २ची नोंद Non-existence परिशिष्टात इंग्रजी वर्णमालेनुसार सर्व शब्द दिले असून त्या शब्दांचे पर्याय कोणत्या (किंवा कोणकोणत्या) नोंदीत आहेत, ते क्रमांक दिले आहेत. ठकारांनी मराठी प.श. कोशात ही पद्धत अवलंबिली नाही. यात त्यांनी सर्व शब्द अकारविल्हे दिले आहेत. त्यामुळे पुष्कळ शब्दांच्या पुढं त्यांचा उल्लेख आधीच्या अथवा नंतरच्या ज्या नोंदीत आला आहे. त्या शब्दाकडे निर्देश करण्यात आला आहे. सहज उघडलेल्या पू. ३१४ वर डझनभर शब्दांपुढं असे निर्देश आढळतात. उदा. टाकलेली : पाहा : परित्यक्ता. टाकाऊ : पाहा : कुचकामी कोणती पद्धत अधिक चांगली, याबद्दल मतभेद होऊ शकतील. त्याचप्रमाणं कोशातील अधिक-उण्याबद्दल लिहिण्याचा अधिकार या विशिष्ट ज्ञानशाखेच्या अभ्यासकांना जाणाकारांनाच आहे. तो माझ्यापाशी नाही. कोशांना पूर्णविराम नाही शब्दकोश अथवा प.श. कोश यांचं काम कायम संपलं. असं कधी होत नाही. विविध ज्ञानशाखांत पडणारी भर, नव्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास, इतर भाषांशी वाढणारा संबंध अशा अनेकविध कारणांनी अशा कोशांना पूर्ण विराम संभवत नाही. हे जेवढं खरं, तेवढंच हेही खरं की कालौघाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची निर्मिती आवश्यक असते. असे कोश म्हणजे केवळ ग्रंथ नव्हेत, असे कोश म्हणजे ग्रंथसंपदा होय. म्हणूनच विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठीत अशा ग्रंथसंपदेची भर घालणाऱ्या ठकारांचं मन:पूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. माझा स्वत:चा ग्रंथसंग्रह अगदीच छोटा. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी ‘श्री तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा’ घेतल्यावर तो छोटा संग्रहच मला समृद्ध वाटला. ‘गाथे’हून सर्वस्वी भिन्न अशा ‘विश्रब्ध शारदे’च्या खंडाची भर पडली. तेव्हाही तसाच अनुभव मला आला. ‘गाथा’ व ‘विश्रब्ध शारदा’ यांच्यापेक्षा हा कोश अगदीच वेगळा. परंतु या कोशानं माझा छोटा संग्रह खूपच समृद्ध झाला, असं मला वाटलं. अर्थात असा अनुभव या कोशानं इतर काहीजणांना दिला असेल व यापुढंही अनेकांना तो देईल, यात शंका नाही. – वसंत फेणे ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI 03-04-2000

    मराठी भाषेतला अमरकोश... संस्कृत भाषेपासून उत्पत्ती झालेल्या मराठी भाषेला त्या भाषेतल्या विपुल शब्द भांडाराचा वारसा मिळाला. संस्कृतमध्ये एका शब्दासाठी समानार्थी, पर्यायी अनेक शब्द आहेत. तसेच मराठीतही आहेत. संस्कृतमधल्या या पर्यायी, समानार्थी शब्दांचा‘अमरकोश’ आहे, पण मराठीत मात्र असा पर्यायी शब्दकोश नव्हता. ती उणीव वि. शं. ठकार यांनी समर्पक शब्दांचा शोध घेऊन त्यांचे परिश्रमपूर्वक एकीकरण करून तयार केलेल्या अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोशाने आता दूर झाली आहे. या शब्दकोशात परंपरेने वापरात असलेल्या समानार्थी शब्दाबरोबरच त्यांनी मराठीत बोलीभाषेतून आलेल्या शब्दांचाही समावेश केला आहे. बोलताना आणि लिहिताना एकाच अर्थाच्या शब्दांचा किंवा म्हणी-वाकप्रचारांचा वापर केला जातो. शब्दाच्या वापरानुसार वाक्याची अर्थच्छटा बदलते. उदा. पेटणे, आग, वणवा, होरपळणे या शब्दांचा वापर करून तयार होणारी वाक्ये भिन्न अर्थाची होतात. हे सर्व शब्द ठकार यांच्या पर्यायी शब्दकोशात आहेत. वैज्ञानिक प्रगतीमुळे प्रचलित झालेल्या दूरदर्शक, दूरचित्रवाणी, ध्वनिक्षेपण अशा शब्दांचाही समावेश आहे. वर्णानुक्रमाने असलेल्या या शब्दकोशात त्या मूळ शब्दाचे नाम (पुलिंगी-स्त्रीलिंगी), सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण यांचाही तपशील आहे. समानार्थी शब्दांच्या शेवटी प्रचलित वाक्प्रचार आणि इंग्रजीतला समानार्थी शब्द आहे. अलीकडे अनेक मराठी दैनिके, साप्ताहिकात शब्दकोडी प्रसिद्ध होतात. ती सोडविताना एखादा शब्द अडतो, तेव्हा या शब्दकोशाच्या मदतीने हव्या त्या शब्दाचा सहज धांडोळा घेता येईल. नवा या एका शब्दासाठी या शब्दकोशात नव, नवीन, नूतन, नवाळ, नव्हाळ, अपूर्व, अभूतपूर्व, अपरिचित असे ४८ शब्द आणि त्यासोबत नव्याचे नऊ दिवस, तेरड्याचा रंग तीन दिवस, नवी विटी नवे राज्य हे वाक्प्रचार. New, Novel] Unfamiliar, Uncommon, Brand New २२ इंग्रजी शब्दही दिले आहेत. अशा या मूळ १८ हजार शब्दांसाठी समानार्थी शब्दांच्या नोंदीमुळे हा शब्दकोश विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, अभ्यासू, साहित्यिक आणि मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भग्रंथ ठरला आहे. आठशे तीस पानांच्या शब्दकोशाची ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने ठेवलेली अवघी ३०० रुपयांची किंमत सर्वांनाच परवडणारी आहे. ठकार यांनी हा महत्त्वपूर्ण कोश सिद्ध करून मराठी कोशभांडार समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. – वैजयंती कुलकर्णी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more