VILLAGERS OFTEN USE CHANCHI`, A BAG SEWN FROM CLOTH HAVING MANY POCKETS. WHENEVER SOMEONE WANTS TO EAT VIDA` HE TAKES OUT THE DESIRED MATERIAL FROM THE VARIOUS POCKETS OF THE CHANCHI` AND HAS HIS VIDA`. SHANKAR PATIL HAS PRESERVED MANY EXPERIENCES DEEP IN HIS MIND JUST LIKE THE CHANCHI`. HE USES THEM TO MAKE HIS WRITING SAVOURY. OPENING PATIL`S MODERN CHANCHI` WITH THE SPECIAL KOLHAPURI LANGUAGE, GUARANTEES AN INTERESTING READING.
चंचीच्या कप्प्यांमधून निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. विडा खाणारा त्या कप्प्यांमधून हव्या त्या वस्तू काढून घेऊन आपला विडा रंगवतो. शंकर पाटलांनी आपल्या मन:कोषात असेच विविध अनुभव जपून ठेवले होते. आणि लेखन रंगतदार करण्यासाठी त्यांनी त्या अनुभवांचाच उपयोग केला. खास कोल्हापुरी शब्दयोजना असलेली पाटलांची आधुनिक स्मरण चंची उलगडली की, वाचन विडा रंगायलाच हवा.