WE HAVE TO CONSIDER THE FUNDAMENTALS OF JOURNALISM, I.E. THE GENERAL RULES AND PRINCIPLES APPLICABLE IN THE FIELD OF JOURNALISM. FOR EXAMPLE, WE NEED TO ASK WHAT IS NEWS OR NEWS. THAT WILL RAISE OTHER RELATED QUESTIONS.
आपल्याला पत्रकारितेच्या मूलतत्त्वांचा, म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात लागू होणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा व सिद्धान्तांचा विचार करावयाचा आहे. उदाहरणार्थ, आपल्याला वृत्त किंवा बातमी म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित करायला हवा. त्यातूनच इतर संबंधित प्रश्न निर्माण होतील. उदाहरणार्थ, वृत्त किंवा बातमी मानवाच्या दृष्टीने का महत्त्वाची आहे? अचूक बातमी मिळवणे शक्य आहे का? वृत्तापत्र म्हणजे काय? वाचकाला आकर्षित करणारी, राजकारण्यांना भुरळ घालणारी आणि सत्ताधाऱ्यांना भयभीत करणारी अशी कोणती शक्ती वृत्तपत्रांकडे असते? वृत्तापत्राभोवती गोळा होणाऱ्या सत्तागटाचे स्वरूप काय असते? एखादे वृत्तपत्र या सत्तागटापासून मुक्त राहू शकते का? वृत्तपत्राला समाजाबद्दलची आणि स्वत:बद्दलची कर्तव्ये कोणत्या परिस्थितीत पार पाडता येतात? या प्रश्नांचा विचार करु लागलो, की आपण इतर प्रश्नांपर्यंत पाचतो. पत्रकारितेच्या वाढीला पोषक ठरणारी किंवा तिच्यावर बंधने आणणारी परिस्थिती कोणती? कोणत्या समाजात वृत्तपत्र स्वत:शी आणि समाजाशी प्रामाणिक राहू शकते? वृत्तपत्रीय नीतीशास्त्र म्हणजे काय? पत्रकारिता आणि साहित्य यांत कोठे व कोणता फरक आहे? या आणि अशा प्रश्नांचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.