* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAULVATEVARLE GAON
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665772
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN EMPTY VESSEL AT THE RIVER BANK, BIRDS FLYING OVER THE SILENT WATERS. THE AFTERNOON SHADOWS ARE CAST UPON. A COOLING BREEZE STARTS FLOWING. MAY BE IT WILL RAIN. THIS VILLAGE WAS STILL THERE IN HER MIND, SOMEWHERE DEEP INSIDE. SHE IS AWARE OF THE FACT THAT AFTER ALL THESE YEARS, THE VILLAGE WHICH IS STILL LINGERING IN HER MINDS WILL NOT BE FOUND AS IT WAS LEFT. NOW THE WATER HAS SETTLED DOWN. BUT THERE ARE ALWAYS TIME WHEN THE WATER LOSES ITS CALMNESS, LEAVES ITS BOUNDARIES, STARTS RUNNING HITHER AND TITHER. THEN THE WATER DOES NOT RECOGNIZE ANYTHING. IT FORGETS ITS LIFESAVING QUALITIES. IT TAKES A FORM OF CATASTROPHE. THEN ARRIVES THE DOOMSDAY. THE CATASTROPHE ENGULFS EVERYTHING. IT DOMINATES THE MINDS FORGETTING THE WISHES AND RELUCTANCE OF A HUMAN NATURE.
एखादीच रिकामी होडी किनायाला. संथ पाण्यावरून पक्षी या तीरावरून त्या तीराकडे उडतात. दुपार कलते. थोडी थंड हवा सुटते. कदाचित पाऊस येईलही... हे तिच्या मनात राहून गेलेलं गाव तिलाही आता इतक्या काळानंतर जसंच्या तसं सापडणार नाही हे तिला कळलं. आता हे पाणी संथ होतं. पण अशाही वेळा असतातच न! की जेव्हा हे बेभान होतं, आपले तट सोडून सैरावैरा धावतं. त्या पाण्याला मग कुणीही कळत नाही. त्या वेळी ते पाणी नसतंच... प्रलयच असतो. तो प्रलय केवळ पाण्यातच शिरत नाही. तो मस्तकातच भिनत जातो. या सगळ्यात माणसाच्या इच्छा अनिच्छेचा सन्मान कुठला!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NISATLELE #AASHA BAGE # PAULVATEVARLEGAON #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #PRATIDVANDVI
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 27-05-2006

    चिंतनशील कथा... आशा बगे यांच्या स्वतंत्र धाटणीच्या कथांना मराठी साहित्यविश्वात एक खास ओळख प्राप्त झालेली आहे. त्यांचा ‘पाऊलवाटेवरले गाव’ हा कथासंग्रहही त्यांच्या आधीच्या कथांच्या लेखनपरंपरेशी नाते सांगणाराच आहे. या संग्रहात सात कथा आहेत. व्यक्तीच्याजगण्याच्या माध्यमातून प्रश्नांकडे पाहणे आणि चिंतनशीलतेचा स्पर्श असलेले निवेदन योजणे ही त्यांच्या कथांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ‘केवडा’ ही पहिली कथा एका जाणत्या वयातील मुलाचा अंत न पचवू शकलेल्या स्त्रीची भावस्पंदने टिपते. त्यांच्या शेजारी नव्याने राहायला आलेल्या तरुण आजारी मुलाविषयीची जयाची सुरुवातीची अनुकंपा हळूहळू विकृत कुतूहल आणि बटबटीत असूया अशा वाटेने बदलत जाते. केवड्याच्या वासाचा जयाला होणारा भास हा मरणगंधाचीच चाहूल व्यक्त करतो. त्यातही सूक्ष्म दरवळ ते उग्र गंध अशा छटांमधून वेगवेगळे भाव सूचित होतात. यातील काही कथा कसलाही गाजावाजा न करता गाभ्याशी सामाजिक आहेत. ‘गाव’, ‘लग्न’, ‘कलश’, ‘पुन्हा एकदा जन्म’ या सर्व कथा स्त्रीकेंद्री आहेत. या कथांमधील नायिका वेगवेगळ्या प्रकाराच्या जीवनानुभवातून जात आहेत. लेखिका व्यक्तिलक्ष्यी पद्धतीच्या या कथांमधून सामाजिक बदलांवर भाष्य सुचवत आहे. ‘लग्न’ ही कथा यात विशेष महत्त्वाची आहे. आंतरजातीय विवाह केलेली रेणू अर्थातच आपल्या घराला मुकलेली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर रेणू आपल्या मुलीबरोबर प्रथम माहेरी येते. तिच्या लग्नानंतर घरी नातेवाईक मंडळींनी पाठविलेली पत्रे तिच्या हाती पडतात. एक-दोन अपवाद वगळता ती पत्रे त्रागा करणारीच असतात. तिच्या काकांचे आणि आजीचे पत्र मात्र वेगळी समज दर्शविणारे असते. या सर्व भावनिक क्षोभाचे चित्र तपासताना ‘आपण खरंच बदललो का?’ हा प्रश्न तिला पडतो. तिच्या मुलीनेही स्वत: अशाच वेगळ्या वाटेने जायचे ठरवलेले असते. त्यामुळे या प्रश्नांचे सातत्य आणि त्यांना जाणून घेण्याच्या समाजिक कुवतीचे दुबळेपण विशेष ठसते. ‘गाव’ ही कथा जितकी नायिका अनूची आहे तितकीच ताराबार्इंचीही आहे. त्या दोघींच्या शेजारपणातून वाढत गेलेल्या नात्याशीच ही कथा थांबत नाही. मूल नसलेल्या स्त्री सामाजिक अस्तित्व हा कथेचा केंद्रबिंदू होतो. ताराबार्इंच्या परपुरुषाशी असलेल्या मैत्रीकडे अनू निकोप दृष्टीने पाहू शकते. मूल नसण्याच्या वैयक्तिक दु:खात जखडलेल्या ताराबाई आणि मतिमंद मुलांसाठी संस्था चालवणारी, मातृत्वाचे व्यापक रूप अनुभवणारी अनू यांच्यातील विरोध बोलका ठरतो. ‘कलश’ ही कथाही देवकी आणि विद्याधर या एके काळच्या जवळच्या आणि आता स्वतंत्रपणे संसारी असलेल्या दोघांच्या भेटीचा प्रसंग रंगवते. ‘महाभारतातील नायिका’ या विषयावर व्याख्यान द्यायला आलेला विद्याधर मुलाच्या मृत्यूचा आघात पचवून स्वत:च्या मृत्यूची चाहूलही शांतपणे ऐकत आहे. मात्र, देवकीकडील भेट त्याला जणू जीवनेच्छेने भरलेला कलश पुन्हा प्राप्त करून देते. ‘अँटिक’ ही कथाही जुन्या मित्रमैत्रिणीची फार वर्षांनी होणारी भेट चित्रित करते. भूषण सरदेसाईचे कुठेच न रूजणे, मैत्रिणीने दिलेले छोटे पितळी घंगाळ त्याला ‘फिंगर बाऊल’ वाटणे... इत्यादी गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे उडून गेलेले रंग दाखवून देतात. तो मैत्रिणीकडून शारीरिक सुखाची अपेक्षा करतो तेव्हा स्त्रीची अनावृत आकृती असलेला ‘अँटिक पीस’ ही कथेत एक अर्थगर्भ प्रतिमा बनते. ‘पुन्हा एकदा जन्म’ मधली कावेरी आजारपणात हॉस्पिटलमध्ये काही भासचित्रे अनुभवते. तिच्या अबोध मनातील इच्छा-आकांक्षा जणू त्यातून तरारून येतात. त्या एकांतातला आत्मभानाचा क्षण तिला नव्या जन्मासारखा समृद्ध करणारा ठरतो. ‘अतिथी’ ही कथा अर्ध्या उतरलेल्या वयात पहिले लग्न अनुभवून दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या दोघांची कथा आहे. लग्नाला जाताना वाटते रस्ता पुराने बंद होणे, अनोळखी ठिकाणी आसरा मिळणे, तिथे एक मृत्यू जवळून पाहणे... असे घटनाचक्र त्यांच्या लग्नाच्या आधी घडते. वृद्धापकाळी शांतपणे मृत्यू पावणाऱ्या पतीला तितक्याच इममामाने निरोप देणारी यातली प्रगल्भ वृद्ध स्त्री लक्षात राहते. नव्याने लग्न करणाऱ्या या जोडप्याला पती-पत्नी नातेसंबंधाचे एक प्रगल्भ रूपच यानिमित्ताने पाहायला मिळते. यातील अनेक कथा घटनाप्रधान नाहीत. दोन व्यक्तींची भेट, त्यांच्या नातेसंबंधातले सूक्ष्म हेलकावे यांनाच कथेत महत्व असते, ‘पाऊलवाटेवरले गाव’ हे शीर्षक व्यक्तीच्या आंतरिक जीवनाशी समाजाचे सूक्ष्मपणे जोडले जाणे सुचवते. या कथा सामाजिकतेचा आशय याच मार्गाने पोचवतात. ‘उत्तररामचरिता’तील सीताख् महाभारतातील नायिका इत्यादी साहित्यातील संदर्भ यात कथेच्या आशयाशी एकजीव होतात. स्वत:चा स्वत:शी असलेला संबंध, इतरांशी जोडलेले असण्याची जाणीव आणि कालप्रवाहाची अनिर्बंध गती अशा विविध कोनांतून मानवी संबंधाकडे पाहणारी यातली कथा चिंतनशीतनेचे परिमाण आत्मसात करते. क्वचित निवेदनशैली तरल होता-होता धूसर होते. जसे ‘केवडा’ या कथेतील केवडा. काही कथाबीजे कादंबरीच्या आवाक्याची असल्यामुळे लहान आकारात गुदमरतात. कथानकाच्या सांकेतिक पकडीतून सुटण्याच्या प्रयत्नात एखादी कथा नीट उभीच राहू शकत नाही. जसे ‘कलश’ ही कथा. तरीही दि. बा. मोकाशी यांच्या कथेला अर्पण केलेला हा संग्रह मोकाशी यांच्या कथेच्या आंतरिक सत्त्वाशी आणि देशीय संवेदनेशी सहज नाते सांगून जातो. -डॉ. नीलिमा गुंडी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-02-2006

    हवा होता तोल... चौकटबद्ध वर्गवारी नाही करायची असं कितीही म्हटलं तरी स्त्रीकेंद्री कथांचा एक प्रवाह मराठीत निरंतर वाहत आला आहे आणि त्यातल्या काही लेखिकांनी तो अधिकाधिक समृद्ध केला आहे, असं निरीक्षण नोंदवावंच लागतं. आशा बगे हे त्यातलं एक नाव. त्यांचे प्रतिद्वंद्वी’ आणि ‘पाऊलवाटेवरले गाव’ हे दोन कथासंग्रह आले आहेत. कथासंग्रहाचे शीर्षक असलेल्या कथेचा अंतर्भाव साधारणत: संग्रहात असतो. हे दोन संग्रह त्याला अपवाद आहेत. मात्र शीर्षक नामाचं सूत्र संबधित कथासंग्रहात कधी सैल तर कधी घट्ट बंधात जाणवत राहतं. ‘प्रतिद्वंद्वी’मध्ये चार कथांचा समावेश आहे. ‘दुसरा’, किती दूर’, ‘निर्मोही’ आणि ‘सखो’ या चारही कथा विस्तारानुषंगाने दीर्घ कथा म्हणता येतील. आशा बगे यांच्या लिखाणाची एक रीत आहे, त्यानुसार या कथांमध्ये रुढार्थाने घटना फारशा नाहीत. त्या प्रामुख्याने दिसतो तो माणसांतला नातेसंबंधातला शोध घेण्याचा प्रयत्न. नात्यातला तोल राखताना आणि तो राखत स्वत:ला सावरताना माणसाच्या मनात उठणारी वादळं वा तरंग यांची विविध रूपं कथांमधून जागोजागी भेटत राहतात. अपघातामुळे अंथरुणाला खिळलेला आणि त्यातून सावरत असलेला कार्तिक, फिजिओथेरपिस्ट अन यांच्यातला नातेसंबंधांचा धुसरसा पट उभा राहतो तो संमिश्र भावभावनांच्या पार्श्वपटलावर. माणसाच्या सावरण्याच्या क्रियेवर ही कथा भाष्य करून जाते. लौकिकार्थाने वाया गेलेला आणि मनाला असंख्य अढीचे पीळ पडलेला मुलगा आणि त्याची आई यांच्यातल्या संबंधांचा आलेख सामोरा येतो तो किती दूर मधून ही आई स्वत: निष्णात डॉक्टर. तिच्या हातून रोज अनेक जन्म घडतात. पोटचा पोरगा मात्र तिच्यासाठी एखाद्या शापासारखा त्यांच्यातल्या संबंधांच्या आलेखात संघर्षाचे बिंदूचे अनेक. या आलेखाचा शेवटमात्र काहीसा वेगळा. एकूण आयुष्याचे सखाले भान देणारी कथा ‘निर्मोही’. सुखवस्तू आणि समृद्ध घरातल्या अनुराधाबाई आणि त्यांच्या मदतीसाठी (घरकामासाठी) वृद्धाश्रमातून ‘आणलेली’ सामान्य स्त्री कृष्णा. या दोघींच्या व्यक्तित्वं पूर्णत: निराळी. त्यांच्यातल्या संबंधाच्या निमित्ताने आशा बगे एक व्यापक अर्थाचं भान देऊन जातात. ‘सखी’ कथेत एका कुटुंबातल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांचं चित्रण आहे. परस्परांना आकळून घेता घेता स्वत:ला आकळून घेण्याचा प्रयत्न करणारी ही माणसं आहेत. ‘पाऊलवाटेवरले गाव’ मधल्या ‘केवडा’, ‘गाव’, ‘लग्न’, ‘अ‍ॅन्टिक’, ‘कलश’ या कथांमधल्या वर्तमानावर भूतकाळाची सतत सावली पडलेली दिसते. ‘पुन्हा एकदा जन्म’ आणि ‘अतिथी’ या दोन कथा मात्र वेगळ्या रीतीच्या आहेत. ‘केवडा’मध्ये प्रतिमांचा तरल आढळ आहे. सर्जनाचा पायरव ऐकवणारी ही कथा उत्तम उतरली आहे. लहानपणची पावलं ज्यांच्या घरात वावरली त्या काकू निवर्तल्याचं कळल्यानंतर त्या गावाला जाणारी अनू... काकुंशी जडलेलं तिचं नातं... अस या कथेचे विविध बिंदू आहेत. ‘लग्न’ ही कथा उलगडते बरीचशी पत्रांमधून. आंतरजातीय विवाहामुळे उठलेले कल्लोळ हे कथेच्या पृष्ठाभागी असले तरी त्या पल्याडचं असं बरंच काही ही कथा सांगू पाहते. ‘पुन्हा एकदा नवा जन्म’ मधली कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. ट्यूमर झाल्याने तिचं गर्भाशय काढून टाकलं आहे. हॉस्पिटलमधल्या मुक्कामात जुन्या आठवणींच्या निमित्ताने तिला स्वत:ला तिच्याच एका नव्या जन्माचं भान लख्खपणे येते. मात्र भोवतालात ते विरूनही जाते. ‘अतिथी’ मध्ये उतारवयात विवाह करण्यासाठी निघालेलं आणि अगदी जवळून मृत्यूचं दर्शन घडलेलं जोडपं आहे. या दोन्ही कथासंग्रहांचा समग्र विचार करायचा तर त्यात जमेच्या बाजू आहेत तशाच त्रुटीदेखील. मानवी नातेसंबंधांबाबतचं कुतूहल आणि आस्था कथांमध्ये आहे. अशा लिखाणात प्रतिमा-प्रतिकांचा वापर होत असतोच; तसाच तो इथेही आहे. असा वापर तरलतेने तोल राखून झाला तर कथा उंची गाठू शकते. या संग्रहांतल्या काही कथा त्यात काहीशा कमी पडतात. काही ठिकाणी प्रतिक-प्रतिमांचा वापर ढोबळ करकरीतपणे होतो. कथेच्या मूळ वृत्तीशी तो तादात्म्य पावू शकत नाही. त्यामुळे तरल पातळीवर चालत असलेल्या कथेची पावलं अचानक दुसऱ्या पातळीवर पोहोचतात. रसभंग तिथे होतो. हा तोल राखला गेला असता तर कथा अधिक उत्तम झाल्या असत्या. -राजीव काळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more