* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAVITRAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984545
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FICTION BY THE RENOWNED AUTHOR SWATI CHANDORKAR, UNFOLDS A LIFE-STYLE BEFORE US, GIVING US AN OPPORTUNITY TO GO THROUGH IT, FEEL IT AND PONDER OVER IT.THIS STORY TAKES PLACE IN A SMALL VILLAGE WHICH IS AWAY FROM THE PROGRESS OF THIS NEW WORLD. WITH ITS VERY FEW HOMES, THE ATMOSPHERE IN THIS VILLAGE IS QUITE A CONSERVATIVE ONE. THE TYPICAL VILLAGE CULTURE BASED ON THE CASTE SYSTEM IS SKETCHED HERE. DATTU PUJARI IS A YOUNG BRAHMIN WHO LIVES IN THIS VILLAGE WITH HIS MOTHER, WIFE AND THE ONLY SON. A PERSON WITH NOBLE THOUGHTS AND CONCERN FOR ALL TEACHES HIS WIFE THE ASPECTS OF HUMANITY. HE IS THE ONLY PERSON WHO IS ABLE TO PERFORM THE LAST RITUALS WHICH HE CONSIDERS TO BE VERY HOLY. FOR HIM, DEATH IS AS SACRED AND BLESSED AS BIRTH. HENCE, HE PERFORMS THESE RITUALS WHOLE HEARTEDLY. HE IS PAID VERY LESS FOR THESE SERVICES BUT YET PREFERS TO CARRY ON DOING WHAT IS RIGHTFUL ACCORDING TO HIM. THERE IS ONE SMALL TEMPLE OF LORD GANESHA IN THE VILLAGE, AFTER WHICH THE VILLAGE IS NAMED AS GANESHPUR. DATTU PERFORMS THE POOJA IN THIS TEMPLE AS WELL. THE REMAINING 4-5 BRAHMIN FAMILIES DO NOT APPROVE OF DATTU PERFORMING POOJA AS HE IS PERFORMING THE LAST RITUALS FOR ALL DEVOID OF CASTE AND RELIGION. THEY TELL HIM TO STOP OFFERING HIS SERVICES TO THOSE PEOPLE, WHICH HE REFUSES. HE BELIEVES THAT WHEN DEATH DOES NOT DIFFERENTIATE ON THE BASIS OF CASTE THEN WHY SHOULD HUMAN DO SO? THE OTHER BRAHMIN FAMILIES START CRITICIZING HIM AT EVERY CHANCE. THE PATIL OF THE VILLAGE IS A VERY GOOD PERSON AT HEART. THIS CHILDLESS PERSON CONSIDERS HIS VILLAGE AS HIS CHILD AND LOOKS LOVINGLY UPON THE VILLAGE. HE STRIVES HARD FOR THE BETTERMENT OF THE VILLAGE. WITH THE HELP OF DATTU HE IMPROVES THE VILLAGE SLOWLY AND STEADILY. ELECTRICITY, SCHOOL, HEALTH CLINIC AND MANY OTHER FACILITIES REACH THE VILLAGE WITH THE JOINT EFFORTS OF THE PATIL AND DATTU. BUT WITH THESE FACILITIES ALSO ENTER MANY PEOPLE IN THE VILLAGE. DATTU’S POOJA IN THE GANESH TEMPLE IS BANNED SYSTEMATICALLY. HE AND HIS FAMILY ARE IGNORED BY ALL. HIS ONLY SON STARTS HATING HIM. YET, DATTU DOES NOT STOP OFFERING HIS SERVICES. HE IS ON THE VERGE OF LOSING HIS ONLY SON. HIS CONSCIENCE DOES NOT LEAVE HIM THOUGH.HOW DOES HE FACE THE HUMILIATION? WHAT MAKES HIM STICK TO HIS PRINCIPLES?‘PAVITRAM’, A FACET OF MANKIND DESCRIBED LIKE NEVER BEFORE.
‘‘सोडून देतो माझं काम. पण जसे जन्म होत राहतात, तसेच मृत्यूही. मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार, अग्नि देणार? कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यानं काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही.’’ सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला.... कालिंदी म्हणाली, ‘‘तुम्ही योग्य तेच केलंत. आत्तापर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यात आलं. हीन वागणूक देण्यात आली. आता नदीपलीकडच्यांनीहीR मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं. मला नाही बोलावलं. ही एवढीशी होती शेवंता. जेव्हा हिला कावीळ झाली, वैद्यांकडून पानं, पुड्या रोज घेऊन जात होते. वैद्य त्या वस्तीत यायला तयार नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं. त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?’’ दाराआडून ऐकणारा गोिंवदा मात्र दुखावला. जो त्रास वर्गातली मुलं आपल्याला देतात, तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग त्यांच्याजवळ तक्रार ती काय करायची? ही कथा अंत्येष्टिविधी करणाNया दत्तूची, होरपळलेल्या गोिंवदाची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची, अपवित्राची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more