SET IN MUMBAI, THIS NOVEL TRACES THE POLITICAL MATURATION OF PERVEZ, A YOUNG PARSI WOMAN WHOSE MARRIAGE TO A CHRISTIAN HAS FALLEN APART. COMING FROM AN AFFLUENT BACKGROUND, PERVEZ IS DRAWN INTO THE ACTIVIST MOVEMENT IN THE MONTHS PRECEDING THE DEMOLITION OF THE BABRI MASJID, TO FIND HERSELF CONFRONTING FUNDAMENTAL BELIEFS REGARDING SOCIAL PRIVILEGE, JUSTICE, RELIGION AND SECULARISM. HER OUTRAGE IS TEMPERED BY A SURVIVAL INSTINCT THAT PROPELS HER INTO ACTION AND EVENTUAL CATHARSIS. A NOVEL THAT LOOKS AT CONTEMPORARY ISSUES WHILE GIVING AN INSIGHT INTO THE PARSI WAY OF LIFE.
आपल्या सूक्ष्म निरीक्षणाक्ती आणि संवेदनशीलता या गुणांच्या साहाय्याने पेस्तनजी यांनी आपल्या समाजातील लोकांच्या जगण्याच्या पद्धतींवर तत्कालीन ज्वलंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर सडेतोड टीका केली आहे. पेस्तनजी या आत्मपरीक्षणातून बंडखोर झालेल्या आहेत. मुंबईमध्ये या कादंबरीतील गोष्ट घडत जाते. एक तरूण पारशी स्त्रीच्या राजकीय परिपक्वतेचा प्रवास दाखवणारी ही कहाणी आहे. आपले एका ख्रिश्चन माणसाशी झालेले लग्न मोडून ती मुंबईला परत आली आहे. परवेझचे मूळचे कुटुंब हे एक उच्चभ्रू, श्रीमंत असे घर आहे. मुंबईला परत आल्यावर ती चळवळीतील काही कार्यकर्त्यांच्या कामात ओढली जाते. बाबरी मशिद जमीनदोस्त करण्यात आली त्या घटनेच्या आधीचा हा अस्वस्थ असा काळ आहे. अशा काळात वावरताना आपण सनातनी विचारांच्या विरोधात उभ्या राहिलो आहोत, हे तिच्या लक्षात येते. सामाजिक न्याय, धर्म, सहिष्णुता या विषयांवर ती विचार करायला लागते. सामाजिक असमतोलामुळे पेटून उठलेल्या तिच्या रागाचा कडेलोट होतो एका घटनेत, तिच्यातून ती आपला बचाव करत बाहेर येते, आपल्या विचारांचं कृतीत रूपांतर करते आणि आपल्या अस्वस्थपणाला संतापाला त्यातूनच वाट करून देते. ही कादंबरी पारशी लोकांच्या जगण्यावर प्रकाश टाकतेच, त्याबरोबरच समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांची मांडणी करताना दिसते.