* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A COMPILATION OF STORIES; TRANSLATED AS WELL AS SOME OF HIS OWN. THE WRITER ONCE AGAIN SUCCEEDS IN MAKING US LAUGH OVER THE PURE HUMOUR. HIS STORY ‘SHIVAJI MAHARAJANCHI PATRAKARANSHI BATCHIT’- MEANING THE CONVERSATION THAT SHIVAJI MAHARAJ HAD WITH THE JOURNALISTS POINTS AT THE DISCREPANCIES THAT ARE SO PROMINENTLY SEEN IN POLITICS THESE DAYS. ANOTHER GOOD ONE IS THE STORY ‘TAGEWADE FESTIVAL’; THIS ELABORATES HOW ANY FESTIVAL HAS BECOME A FAD IN THE TOWN/VILLAGE OF TAGEWADI. THE STORY ‘MANTRYANWAR ODHAWLELA PRASANG’ PINPOINTS AT THE HOPELESS SITUATION OF LAW AND ORDER AND ALSO THE ELIGIBILITY OF OUR MINISTERS. HIS STORY ‘EKA SHOKSABHECHA VRUTTANT- A REPORT ON A CONDOLENCE MEETING’ PORTRAYS MANY PEOPLE AROUND US PERFECTLY WELL. ALL HIS STORIES TALK ABOUT THE VARIOUS CARICATURES WE SEE AROUND. THEY MAKE US LAUGH, AT THE SAME TIME, THEY ALSO MAKE US THINK ABOUT THE SOCIETY, THE TRENDS, OUR ROLE, ETC. HIS STORIES AIM AT PEOPLE FROM POLITICS, SOCIAL WORK, EDUCATION DEPARTMENT, POLICE DEPARTMENT ETC. A WONDERFUL COLLECTION OF STORIES HELPING YOU TO LAUGH AT YOUR HEART’S CONTENT WHILE HAVING THE POTENTIAL OF MAKING YOU THINK.
‘फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा वाचकाचं लक्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’या कथेतून मिरासदार आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. तर ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मधून फेस्टिव्हलच्या फॅडवर त्यांनी भाष्य केलं आहे. आजची ढिसाळ कायदा-सुव्यवस्था आणि मंत्र्यांची ‘योग्यता’याचं मार्मिक चित्रण ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’या कथेतून केलं आहे. तर ‘एका शोकसभेचा वृत्तांत’या कथेतून त्यांनी माणसांचे विविध नमुने टिपले आहेत. या चारही विनोदी कथा श्रोत्यांना मनमुराद हसवतात आणि अंतर्मुखही करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण खातं, पोलिस खातं या क्षेत्रांतील व्यक्तींचं अत्यंत खुमासदार पद्धतीने केलेलं प्रातिनिधिक चित्रण त्या त्या खात्यातील विसंगतीवर बोट ठेवतंच; पण वाचकांना खळखळून हसायला लावतं. तेव्हा वाचकांना खळखळून हसवणारा हा कथासंग्रह सगळ्यांनी अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PHUKAT #PHUKAT #फुकट #SHORTSTORIES #MARATHI #D.M.MIRASDAR #द.मा.मिरासदार "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दर्जेदार विनोदी कथांचा संग्रह... मराठीतील विनोदी कथांचं दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांमध्ये द.मा. मिरासदार हे नाव अग्रस्थानी आहे. फुकट’हा द.मा. मिरासदारांच्या रूपांतरित आणि स्वतंत्र कथांचा संग्रह. अर्थातच या संग्रहातील त्यांच्या स्वतंत्र विनोदी कथा ल्ष वेधून घेतात. ‘शिवाजी महाराजांची पत्रकारांशी बातचीत’, ‘टगेवाडी फेस्टिव्हल’, ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ आणि ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ या चार कथांतून मिरासदारांच्या विनोदी कथेच्या दालनातील अग्रस्थानाचा प्रत्यय येतो. काही पत्रकार रायगडावर गेलेले असताना त्यांची शिवाजी महाराजांशी भेट होते आणि पत्रकार व शिवाजी महाराज यांच्यात प्रश्नोत्तररूपी जो संवाद होतो, तो आपल्या खास मिरासदारी शैलीत द. मां. नी रंगवला आहे. त्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून द.मा. आजच्या राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात. ‘टगेवाडी फेस्टिव्हल’मध्येही द.मां. नी राजकीय आणि सामाजिक विसंगतींवर बोट ठेवलं आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या धर्तीवर टगेवाडीत फेस्टिव्हल करायचं ठरतं. फेस्टिव्हलची तयारी कशी होते आणि प्रत्यक्षात फेस्टिव्हल कसा पार पडतो, याचं रंगतदार वर्णन द.मां. नी केलं आहे. ‘मंत्र्यांवर ओढवलेला प्रसंग’ ही त्याच वाटेवरची आणखी एक कथा. बाबूराव टोणग्यांचा गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर ओढवलेला एक प्रसंग याचं खास मिरासदारी शैलीत द.मां.नी वर्णन केलं आहे. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी टोणगेंची लाल दिव्याची गाडी थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो आणि टोणगे ड्रायव्हरच्या नकळत लघुशंकेसाठी उतरतात. टोणगे गाडीत बसले आहेत, असं समजून ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो आणि नंतर जी धमाल उडते ती प्रत्यक्ष कथेत वाचताना हसून हसून मुरकुंडी वळते. ‘एका शोकसभेचा वृत्तांत’ ही अशीच खळखळून हसवणारी कथा आहे. एका नगराध्यक्षाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंडळी जमतात आणि मग तिथे माणसं कशी वागतात आणि कसं भाषण करतात याची हकिगत द.मा. खुसखुशीत शैलीत वर्णन करतात. ही कथाही अर्थातच मुळातून वाचण्यासारखी. तेव्हा या चारही कथांचा मनसोक्त आस्वाद घेऊन हसण्यासाठी ‘फुकट’ हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे. त्यातील स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचा अनुभव घेतला पाहिजे. यातील रूपांतरित कथा आणि ‘नेम’ ही आबाच्या विठ्ठलभक्तीची थोडी गंभीर वळणाने जाणारी स्वतंत्र कथाही वाचनीय आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-07-2017

    द.मा. मिरासदार यांची पुस्तकं म्हणजे आनंदठेवाच फुकट आणि अंगतपंगत या त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अंगतपंगत हे त्यांनी लिहिलेल्या एका सदराचं पुस्तक आहे. भविष्याच्या नादापासून डॉक्टरांपर्यंत अनेक विषयांवर त्ांनी खुशखुशीत भाष्य केलं आहे. फुकट या संग्रहात कथांचा समावेश आहे. त्यात काही भाषांतरित कथा आणि दमांच्या काही कथांचा समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more