THE DRAMA `PRAKASHPUTRA` IS THE BATTLE OF THE AGES. THIS PLAY IN THE BACKGROUND OF `NAMANTAR PRASHNA` PRESENTS A DIFFERENT VIEW OF DALIT MENTALITY. THE STORY OF BAPU, A YOUNG ACTIVIST AND HIS IDEAL, WELL-EDUCATED FAMILY. AFTER LEARNING HARD FROM POVERTY AND BECOMING SELF-RELIANT, BAPU QUITS HIS JOB AND BECOMES THE SPEAKER. HIS LOUD SPEECHES, PROCESSIONS, SOCIAL FUNCTIONS, FLAMBOYANT STATEMENTS DRIVE HIM AND HIS FAMILY INTO EXILE. HIS FLAMBOYANT STATEMENTS LEAD TO HEATED ATMOSPHERE, ARSON-RIOTS-MARCHES. HIS PARENTS` HOUSE IN THE VILLAGE WAS BURNT DUE TO THIS. BAPU WAS ARRESTED BY THE ANTI-CORRUPTION DEPARTMENT. HE BECOMES POOR. HE TAKES OUT HIS ANGER ON HIS POOR WIFE SUMA. SPLASHES ON HER CHARACTER. SO THE WHOLE FAMILY WAS SAD. WHAT IS THE USE OF EDUCATION, BAPU`S OLD MAN ALWAYS THINKS AT THE END... A POLYMATH, A VIVID PLAY ON A VIVID SUBJECT.
‘प्रकाशपुत्र’ नाटक म्हणजे, युगायुगाची लढाई. ‘नामांतर प्रश्ना’च्या पार्श्वभूमीवरील हे नाटक दलित मानसिकतेचं एक वेगळंच दर्शन घडवतं. बापू हा तरुण कार्यकर्ता व त्याच्या आदर्श, सुशिक्षित कुटुंबाची ही कहाणी. गरिबीतून कष्टाने शिकून-सवरून स्वावलंबी झालेली बापू नोकरी सोडून सभापती बनतो. त्याची जोरदार भाषणे, मिरवणुका, सामाजिक कामे, भडक विधाने त्याला आणि कुटुंबाला देशोधडीला लावतात. त्याची भडक विधानं वातावरण तापवायला, जाळपोळ-दंगे-मोर्चे यांना कारणीभूत ठरतात. त्याच्या आई-वडिलांचं गावातलं घर यामुळेच जळून खाक होतं. अँटिकरप्शन विभागाकडून बापूला अटक होते. तो कंगाल होतो. त्याचा राग तो गरीब पत्नी सुमावर काढतो. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. त्यामुळे सगळं कुटुंबच दु:खी होतं. शिक्षणाचा काय उपयोग, असंच बापूच्या म्हातारा-म्हातारीला शेवटी वाटतं राहतं... ज्वलंत विषयावरचं बहुपेडी, ज्वलंत नाटक.