IF YOU TAKE JINNAH`S EARLY POLITICAL CAREER, WHEN HE CAME BACK FROM LONDON IN 1897 AFTER FINISHING LAW, HE WAS TRULY SECULAR. LIAQAT ALI KHAN WENT TO ENGLAND AND CONVINCED JINNAH THAT HE SHOULD JOIN THE MUSLIM LEAGUE AND RETURN TO INDIA. WHEN THE PROVINCIAL ELECTIONS WERE HELD IN THE WINTER OF 1937 IN INDIA, THE MUSLIM LEAGUE FARED BADLY IN ALL MUSLIM AREAS. JINNAH THEN REALISED THERE WAS NO OTHER WAY BUT TO DEMAND A SEPARATE STATE FOR MUSLIMS. IT WAS A TURNING POINT, BOTH FOR JINNAH AND INDIA. THERE WAS AN INTERESTING INCIDENT THAT HAPPENED IN AUGUST 1947. IN HIS LAST DAYS HE MET INDIA`S AMBASSADOR TO PAKISTAN SRI PRAKASA AND TOLD HIM THAT CREATING PAKISTAN WAS HIS BIGGEST MISTAKE. HE ASKED SRI PRAKASA TO CONVEY TO JAWAHARLAL NEHRU THAT HE WANTED TO RETURN TO INDIA AND SETTLE DOWN IN JINNAH HOUSE IN MUMBAI.
देशाच्या फाळणीस कारणीभूत ठरलेले महंमद अली जीना यांच्याविषयी भारतात तिरस्काराची भावना असली तरी पाकिस्तानमध्ये त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपती’ असा होतो. त्यांच्याविषयी अनेक समज- गैरसमज आहेत. राष्ट्रप्रेमी असलेले जीना नंतर धर्मांध झाले, पण एक यशस्वी नेता म्हणून त्यांची इतिहासात नोंद घेतली जाते.
जीनांची संपूर्ण जीवनकहाणी अभ्यास पद्धतीने तटस्थ व पारदर्शकपणे सांगणे कठीण असले तरी दिनकर जोषी यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. भारताच्यादृष्टीने खलनायक ठरलेले जीना प्रत्यक्षात कसे होते हे ‘प्रतिनायक’ या कादंबरीतून कळते. तथ्यापेक्षा सत्याला महत्त्व दिल्याने ही कादंबरी वास्तव झाली आहे व एक वेगळा इतिहास आपल्याला समजतो.